नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आत्म्याचे फळ – सहनशीलता

डेरिल गुना

सहनशीलता म्हणजे काय? – दीर्घ सहन करण्याची वृत्ती, मंदक्रोध असणे. हा खुद्द देवाचा स्वभाव आहे. “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” (निर्गम ३४:६).

ख्रिस्ती लोकांनी सहनशीलता दाखवावी अशी देवाची इच्छा आहे. इतरांच्या तुलनेत तुम्ही सहनशील असला तरी सहनशीलतेमध्ये वाढत जाण्याची गरज आहे.
यहूदी नियम शिकवत की तुम्ही इतरांना तीन वेळा क्षमा करू शकता. क्षमा करायला मर्यादा आहे का? – नाही.

“तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?” येशू त्याला म्हणाला, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा” (मत्तय १८: २१,२२).

येथे आपण क्षमा कशी करायची हे शिकत नाही तर किती करायची हे शिकतो. पेत्राला उत्तर देताना येशूने म्हटले सातांच्या सत्तर वेळा. याचा अर्थ ४९० वेळा असाच नाही तर मोजमाप न करता.
सहनशीलता शिकण्यासाठी आपण त्यापुढे येशूने दिलेला सर्व दाखला पाहणार आहोत.

“म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे; त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले” (मत्तय १८:३३).

या दाखल्यामध्ये आपण एक राजा पाहतो. हा राजा आपल्या स्वर्गीय पित्याचे द्योतक आहे. त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले. आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले” (१८:२४,२५).

ह्या दाखल्याची सुरुवात येशूने केली ती क्षमेसंबंधी सांगून. त्या दासाने मिळवलेली क्षमा आपण ख्रिस्तामध्ये जी क्षमा मिळाली त्याची आठवण करून देते. येथे त्या गरीब दासाचे राजाला लक्षावधी रुपयांचे देणे होते.  येशूचे श्रोते म्हणत असतील की ह्या मूर्ख माणसाने इतक्या कर्जात बुडण्याची काय गरज होती आणि तो राजा पण इतक्या मूर्खपणाने त्याला हे सर्व देणे कसे सोडतो?

देवाने तुमचे अगणित कर्ज माफ केले आहे (१ योहान १:९), कारण देवाला तुमची असहाय स्थिती समजली.

“त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, ‘तो, त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी.’ तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, ‘मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.’ (व. २५,२६).

अर्थातच सर्व विकून हे कर्ज फिटणार नव्हते. आता तो पाया पडून विनवणी करतो. हे दाखवते की तो आता राजाला पूर्णपणे शरण जातो आणि त्याच्या दयेवरच तो अवलंबून आहे.

“आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला” (रोम ५:६).

देवाला आपली दया येते

“तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले” (व.२७).

यामुळेच ख्रिस्ताने आपली पापे वधस्तंभावर वाहून नेली.

राजा सर्व हानी सहन करण्यास व क्षमा करण्यास तयार होता. “त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे” (इफिस १:७).

सहनशील नसण्याचा क्रूरपणा समजून घ्या.

“तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते; तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक” (व.२८).

आता लाखो रुपयांची १०० रुपयांशी तुलना करा. येथे दासाचे ह्रदय दिसून येते. – रागीष्ट, निर्दय, अवास्तव.  ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.’

“ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, ‘मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.’ पण त्याने ते नाकारले” (१८:२९).

येथील मोठा फरक पहा. राजाकडून दासाला दया मिळाली. पण आता दासाला दया दाखवण्याची संधी आहे तेव्हा त्याने क्रोधाचा स्वीकार केला. पापाचा आपल्यात असलेला अर्क आपल्याला क्रूर , निर्दयी बनवतो. आता तो सूड उगवत आहे.

“पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले” (व. ३०).

सूड म्हणजे काय? सूड चुकीचा आहे का?
“प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभू म्हणतो” (रोम १२:१९).
आपण पापी असल्यामुळे सूड घेण्यामध्ये आपण अन्यायी असणार. आपण तो देवाकडेच सोडून द्यायला हवा.

“तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दु:खी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले” (व.३१). क्षमा न करण्याने देवाचे सर्व कुटुंब – मंडळी अस्वस्थ होते.

तुम्ही जर सहनशील नसाल तर देवाला राग येतो.

“तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, ‘अरे दुष्ट दासा! तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते; रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्‍यांच्या हाती दिले” (व.३२).

        जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती पाप करते तेव्हा देवाला पवित्र संताप येतो (प्रेषित ५:१-१०). परंतु देव आपल्या मुलांना रागाने नव्हे तर प्रीतीने शिक्षा करतो. “कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो” (इब्री १२:६). त्यांनी आपल्यापासून दूर जावे म्हणून नव्हे तर आपल्या जवळ आणि त्याच्या नीतिमत्वामध्ये यावे म्हणून तो असे करतो. पण तो शिक्षा करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो (इब्री.१२:१०).

जेव्हा तुम्ही क्षमा करत नाही तेव्हा तुम्ही दुष्ट असता.

“काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती” (१ योहान ३:१२).

“खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल” (मत्तय ५:२१,२२).

तुम्ही दया करावी हे अपेक्षित आहे.

आणि त्याची अपेक्षा आहे की त्यानेही अशीच इतरांना क्षमा करावी. “मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?” (व.३३)

जशी देवाने आपल्याला क्षमा केली तशी आपणही इतरांची क्षमा करायची आहे. इफिस ४:३२.

तुम्ही जे पेरता त्याचीच कापणी करता

मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्‍यांच्या हाती दिले (व.३५).

जो दया करणार नाही तो आपले तारण गमावील असे येशू येथे शिकवत नाही. दोन प्रकारच्या क्षमा असतात.

१.जेव्हा आपण आपला विश्वास येशूच्या क्रूसावरील कार्यावर ठेवतो तेव्हा आपल्या पापांची कायदेशीर रीतीने क्षमा होते. भूत, वर्तमान व भविष्य काळातील. आपण नीतिमान ठरवले जातो.

२. या पापी देहात व जगात राहत असताना आपण पापात पडतो. त्या पापासाठी आपल्याला देवाच्या क्षमेची दररोज गरज आहे. हे तारण टिकवून धरणे नाही तर नातेसंबंधाची सुधारणा करणे आहे.

दास त्याचे कर्ज केव्हा फेडील?

“म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील” (१८:३५).

 क्षमा ही बाह्य, राजकीय, फक्त तोंडाने म्हटलेली क्षमा नाही तर मनापासून आहे.

“मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही” (यशया ४३:२५).

कर्ज फेडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपल्या भावाला सहनशीलता दाखवणे. “कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील” (मत्तय ६:१४).

आपण ख्रिस्ताच्या सहनशीलतेचे अनुकरण करायला हवे. ख्रिस्त हा आपले महान उदाहरण आहे. त्याने म्हटले “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही” (लूक २३:३४).

अशी ख्रिस्तासारखी सहनशीलता आपण कशी दाखवू शकतो? तुम्हाला ख्रिस्तामध्ये जी क्षमा मिळाली त्याची आठवण करा .

“कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील;
परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही”

(मत्तय ६:१४,१५).

Previous Article

दु:खसहनाची हमी, कृपेची हमी

Next Article

उगम शोधताना

You might be interested in …

प्रत्येक पापात एक लबाडी दडलेली असते

स्कॉट हबर्ड “ वाचकांनी लक्षात ठेवावे की सैतान हा लबाड आहे.” असे सी एस लुईस यांची त्यांच्या “स्क्रू टेप लेटर्स” या पुस्तकाच्या आरंभीची सूचना आहे. आणि ही सूचना सर्वत्र असणाऱ्या प्रत्येक काळच्या लोकांसाठी आहे. आपण […]

काहीही न करण्याचे पाप

ग्रेग मोर्स या जगात माझ्या जीवनावर प्रेम करण्याचा मोह मी बहुधा ओळखूही शकत नाही. मग त्यासाठी प्रतिकार करण्याचे बाजूलाच. त्यामुळे चांगले न करण्याचे पाप माझ्याकडून घडते. चार्ल्स स्पर्जन म्हणतात त्याप्रमाणे “ काहीही न करण्याचे पाप” […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ९ मिसरातील भयानक तडाखे […]