जॉन पायपर
प्रश्न
पास्टर जॉन,
इफिस ६:१२ हे वचन आपल्याला आठवण करून देते की, “आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” वास्तविक जीवनात, जेव्हा आपण प्रत्यक्ष, दैनंदिन संघर्षांना तोंड देत असतो – मग ते नातेसंबंधाचे, भावनिक किंवा मानसिक असो – जेव्हा जवळचे लोकच समस्या वाटू लागतात तेव्हा आपण हे कसे लागू करतो? जेव्हा आपल्याला इतरांच्या शब्दांनी किंवा कृतींनी आक्रमण झाल्यासारखे वाटते, तेव्हा आपण संघर्षामागील आध्यात्मिक मुळे कशी ओळखावी? विशेषतः जेव्हा ती वैयक्तिक वाटतात? इतरांना शत्रू न मानता आपण ख्रिस्ताचे प्रेम आणि सत्य दाखवून कस प्रतिसाद द्यावा? आपल्या नातेसंबंधांमध्ये, कामात आणि वैयक्तिक जीवनात दिसणाऱ्या परिणामांना सामोरे जाताना आपण या अदृश्य लढाया कशा लढू शकतो? यामध्ये आपण संतुलन कसे राखू शकतो?
उत्तर
हा प्रश्न कोणत्याही प्रकारे कृत्रिम नाही. तो इफिस ६ मध्ये आहे. तो आपले लक्ष वेधतो. हा एक चांगला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे: आपण खरोखर मानवी शत्रूंसोबतच अलौकिक आणि सैतान या शत्रूंसोबतही लढत नाही का? तर येथे समस्या निर्माण करणारा मजकूर असा आहे:
“सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे” (इफिस. ६:११-१२).
प्रश्न असा आहे की, जेव्हा पौल म्हणतो, “आपण मांस आणि रक्ताविरुद्ध नाही तर सत्ता, अधिकारी यांच्याबरोबर लढत आहोत,” तेव्हा त्याचा अर्थ असा आहे का की हा मानवी पापाशी अजिबात संघर्ष नाही? म्हणजे आपल्या कुटुंबातील पापाशी, आपल्या सहकाऱ्यांमधील पापाशी, आपल्या धार्मिक विरोधकांमधील पापाशी याचा संबंध नाही का? कोणतेही लोक आपल्याला कोणतीही समस्या देत नाहीत – फक्त दुरात्मेच समस्या देतात असा अर्थ आहे का?
मानव विरुद्ध दुरात्मे
“मांस आणि रक्त” म्हणजे सामान्यतः दैवी किंवा सैतान यांच्या वास्तवापासून वेगळे मानले जाणारे मानव. मांस आणि रक्त हेच आहे. उदाहरणार्थ, जेव्हा पेत्र येशूला मशीहा म्हणून ओळखतो तेव्हा येशू उत्तर देतो, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे” (मत्तय १६:१७ पहा). दुसऱ्या शब्दांत, केवळ मानवी विचार किंवा मानवी भावना दैवी मदतीशिवाय हे सत्य जाणू शकत नाहीत. देवाने तुला हे ज्ञान दिले आहे, मांस आणि रक्ताने नाही – म्हणजेच तुझ्या मानवतेने नाही.
म्हणून, जेव्हा पौल म्हणतो की आपण रक्त आणि मांसाविरुद्ध लढत नाही, तेव्हा येथे “मांस आणि रक्त” हा शब्द मानवाविरुद्ध असलेल्या दुरात्म्यांना सूचित करतो.
पण पौलाचे खरे मानवी शत्रू होते ज्यांनी त्याच्या विश्वासाला, त्याच्या मंडळ्यांच्या विश्वासाला आणि त्याच्या स्वतःच्या जीवनाला धोका निर्माण केला होता याबद्दल काय? उदाहरणार्थ, तो १ करिंथ. १६:९ मध्ये म्हणतो, ” मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत.” – अनेक विरोधक. आता, ते कोण आहेत याचे एक उदाहरण येथे आहे. तो २ करिंथ ११:१३-१५ मध्ये त्यांचे वर्णन करतो: “अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.”
म्हणून, हे स्पष्ट आहे की पौलाला खरोखरच मानवी शत्रूंशी झुंजायचे होते. आणि आपल्यालाही तेच दिसते. पौलाची निंदा केली जाते; त्याचा छळ केला जातो; त्याची निर्भत्सना केली जाते; त्याला मारहाण केली जाते; त्याला चाबकाने मारले जाते; त्याला तुरुंगात टाकले जाते; त्याला सोडून दिले जाते; त्याचा विश्वासघात केला जातो. आणि हे सर्व लोक गोंधळ घालणारे आहेत, बरोबर ना? आणि तो स्वतः याचा अनुभव घेतोच पण तो तीमथ्य आणि तीत यांना पापात असणाऱ्यांना किंवा मंडळीच्या विश्वासाला आणि ऐक्याला कमकुवत करणाऱ्यांना निषेध करायला सांगतो (१ तीमथ्य ५:२०; तीत १:१३; २:१५). म्हणून, त्यांचे खरे शत्रू देखील माणसेच आहेत.
आणि इफिस ४:१३-१४ मध्ये, आपण प्रौढतेचा पाठलाग केला पाहिजे. म्हणजे आपण “माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वार्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये..” आता, वाक्यांश तोच आहे जो त्याने सैतानाच्या योजनांसाठी वापरला होता – फक्त येथे तो मानवी धूर्तपणा आहे. म्हणून, तो स्पष्टपणे सांगतो की ज्या गोष्टींशी आपण झुंजले पाहिजे, ज्यांच्याशी सामना केला पाहिजे आणि त्यापासून सावध राहिले पाहिजे त्या म्हणजे युक्त्या आणि धूर्तता. ज्या केवळ सैतानी नाहीत तर मानवी आहेत. तो त्यांना मानवी म्हणतो.
मानवी संकट, सैतानाची रचना
खरं तर, मी इतके म्हणेन की पौलाला असे वाटत नाही की असे कोणतेही मानवी पाप आहे जे सैतान आणि त्याच्या शक्तींपासून प्रभावित नाही. दुसऱ्या शब्दांत, मानवी दुष्टता एक गोष्ट आणि सैतानी दुष्टता दुसरी गोष्ट मानण्याचा प्रयत्न करणे कधीही उपयुक्त ठरेल असे मला वाटत नाही. ते नेहमीच एकमेकांत गुंतलेले असतात.
आता इफिस २:१-३ ऐका: “तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता; त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्या लोकांत आता कार्य करणार्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.”
म्हणून, ख्रिस्ताबाहेरील सामान्य मानवांचे वर्णन करण्याचे तीन मार्ग आहेत: (१) या युगाच्या आत्म्याशी एकरूप असणे; (२) अंतरिक्षातील राज्याचा अधिपती, सैतानाचे अनुसरण करणे; (३) शरीर आणि मनाच्या इच्छा पूर्ण करणे.
आता हे मांस आणि रक्तासारखे वाटते आणि ते आहेच. ख्रिस्ताशिवाय मांस आणि रक्त नेहमीच या युगाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली असते आणि ते नेहमीच अंतरिक्षातील राज्याचा अधिपतीच्या नियंत्रणाखाली असते. आणि ते नेहमीच स्वतःच्या शारीरिक, मानसिक इच्छांनुसार कार्य करत असते. म्हणून एका अर्थाने, मानवी पापीपणा आणि सैतानी योजनांविरुद्धच्या आपल्या युद्धात कोणतेही वेगळेपण नाही. ते एकमेकांशी जोडलेले आहेत.
आणि येथे २ करिंथ २:१०-११ मधील एक उदाहरण आहे: पौल म्हणतो, “ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो… अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” त्याचे विचार , योजना. कोणत्या सैतानाच्या योजनेबद्दल आपण अज्ञानी नाही? जेव्हा आपण एकमेकांना क्षमा करण्यात अयशस्वी होतो, तेव्हा समाजाचा नाश करण्याच्या सैतानाच्या योजनेबद्दल तो अज्ञानी नाही.
दुसऱ्या शब्दांत, आपल्याविरुद्ध पाप करणारी व्यक्ती, एक मांस आणि रक्ताचा खरा मानव, अशा ठिकाणी आहे जिथे आपल्याला सैतानाच्या, समुदायाचा नाश करणाऱ्या कार्याविरुद्ध एक प्रकारचे आध्यात्मिक युद्ध करावे लागते. कारण आपल्याला त्यांना क्षमा न करण्याचा मोह होतो – आपण द्वेष बाळगू इच्छितो. ते खरे मांस आणि रक्त, मानवी विरोध आणि संकट आहे आणि मंडळी नष्ट करण्याची ही सैतानाची योजना आहे. म्हणून, जरी उपस्थित असलेला शत्रू ज्याला आपण क्षमा केली पाहिजे, तो आपल्याविरुद्ध पाप करणारी व्यक्ती आहे; तरीही, त्या सर्वामागील योजना सैतानाची आहे.
खरी लढाई
म्हणून, या सर्व गोष्टी लक्षात घेत, इफिस ६:१२ समजून घेण्याचा माझा प्रयत्न येथे आहे. जेव्हा वचन म्हणते की, “आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे” तेव्हा मला वाटते की पौलाचा अर्थ असा आहे: आपण केवळ मांस आणि रक्ताविरुद्ध, केवळ मानवांविरुद्ध लढत नाही. या जगात आपल्याविरुद्धचा विरोध नेहमीच त्यापेक्षा मोठा असतो.
२ करिंथकर ४:४ नुसार, जेव्हा आपण मांस आणि रक्ताच्या अविश्वासी व्यक्ती समोर उभे राहतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीसमोर उभे असतो जो केवळ त्यांच्या स्वतःच्या भ्रष्टतेमुळे अंधकारमय झालेला नाही तर त्याचे डोळे या जगाच्या देवाने अंध केले आहेत… पौलाने त्याच्या सुवार्तेच्या सेवेबद्दल प्रेषित २६:१८ मध्ये म्हटले आहे की, “मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”
आपण नेहमीच दोन मुद्द्यांशी सामना करत असतो: पापाचा अंधार आणि सैतानाचे बंधन. चांगली बातमी अशी आहे की, ख्रिस्ताच्या मृत्यूमध्ये, त्या पापांच्या क्षमेसाठी किंमत मोजली गेली आहे आणि सैतानाचे शापित सामर्थ्य मोडले गेले आहे. कारण स्वर्गाच्या न्यायालयात आपल्यावर टिकू शकेल असा कोणताही आरोप त्याच्याकडे नाही. ख्रिस्ताद्वारे आपण देवाने नीतिमान ठरवले आहोत. म्हणून आपण आपली संपूर्ण शस्त्रसामग्री घालतो. आपण तेच केले पाहिजे: देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री घाला आणि सुवार्तेमध्ये आणि आत्म्याच्या सामर्थ्यात विजयी व्हा.




Social