Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 13, 2016 in जीवन प्रकाश

कृपेद्वारे घडवले जाणे

कृपेद्वारे घडवले जाणे

लेखक: अॅलेस्टर बेग

(रोम १२: ९ –१६ही वचने बायबलमधून वाचावी)

जी मंडळी देवाच्या कृपेने आकार धारण करते ती कशी  दिसते? पौल रोम.१२ मध्ये १५ व १६व्या वचनात याचे उत्तर देत आहे. हे पत्र त्या काळच्या मंडळीसाठी लिहिले होते म्हणून त्याचे आपल्याला लगेचच लागूकरण करण्यापूर्वी प्रथम आपण रोमकडे जायला हवे. हे पत्र विविध प्रकारच्या पार्श्वभूमीतील लोकांसाठी लिहिले होते. काही यहूदी तर इतर निरनिराळ्या प्रकारचे विदेशी. त्यांची जीवने भिन्न होती एवढेच नव्हे तरसंस्कृती व परिस्थिती  परस्परविरोधी होती. म्हणून अशा सर्वप्रकारच्या लोकांना पौल एकच पत्र  लिहितो हे देवाने केलेलेमोठे आश्चर्य आहे. कारण आता ते एक झाले आहेत. ही देवाची कृपा तो प्रथम शिकवत आहे. उदा. तिसऱ्या अध्यायात तो सांगतो की यहूदी व विदेशी सर्व पापी आहेत.याचे कारण काही लोक म्हणत होते की मी त्याच्या इतका  पापी नाही कारण मी या यापार्श्वभूमीतून आलो आहे. आजही लोक असेच करतात ना?
दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व लोकांना एकच कृपा मिळालेली आहे. ते सर्व पापाच्या एकाच शिक्षेखाली होते व आता त्यांना एकच कृपा मिळाली.देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात (रोम ३:२४), व आता ते सर्व एकाच रीतीने पापापासून सोडवले गेले आहेत वनीतीमत्तेचे दास झाले आहेत(६:१८). तर असेलोक एकत्र उपासनेसाठी जमत होते व त्यांना पौल लिहीत आहे . पौल त्यांना सांगत आहे की तुम्ही सर्व एकाच मार्गाने चालला होता व येशूच्याद्वारे पापाच्या बंधनातून मुक्त केले गेले आहात. आता तुम्ही तुम्हाला हवे तसे जगू शकत नाही तर धार्मिकतेचे दास म्हणून जगायला हवे. देवाच्याअधिकाराखाली योग्य ते करण्यास समर्पित व्हायला हवे.
म्हणून १२ व्या अध्यायाची सुरवात तो जगाशी समरूप न होता तुमचा शरीराचा यज्ञ करा असे सांगून करतो. याचा अर्थ असा कीजेव्हा संपूर्ण विचारसरणी बदलेल तेव्हा संपूर्ण आचरण बदलले जाईल. आत्म्याच्या द्वारेमनाचे नवीकरण होऊन रूपांतर होणे आवश्यक आहे. काही लोकांना वाटते की ख्रिस्ती असणे म्हणजे वास्तव जगापासून संबंध तुटणे. आध्यात्मिक आभासात शोषले जाणे. पण प्रत्यक्षातख्रिस्ती  असणे म्हणजे प्रत्येक बिंदूला काळजीपूर्वक, विचारपूर्वक सत्याची निवड करणे.
म्हणून सुज्ञख्रिस्ती जणांनी बायबलचेकाळजीपूर्वकस्वत:साठी अध्ययन करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ते वाचता तेव्हा या पूर्वीच्या रोमन वाचकांप्रमाणेआठवण करून घ्यायला पाहिजे की जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्ही ख्रिस्ताचे आहात. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर हवा तसा विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नाही तरख्रिस्ताने जे शिकवले अगदी तसाच विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे. यामुळेच विवाहाबद्दल तुमचे स्वतंत्र विचार तुम्ही बाळगू शकत नाही .लैंगिकतेबाबततुम्हाला हवे ते विचार तुम्ही बाळगू शकत नाही. पैशाचा विनिमय , जगाशीकसे वागावे ह्यासाठी तुम्हाला हवा तो दृष्टीकोन तुम्ही बाळगू शकत नाही. आपला दृष्टीकोन हा आपला शिक्षक मशीहा येशू याचाच असायला हवा .म्हणून ख्रिस्ती लोकांना असाधारण/विशिष्ट लोक म्हटले आहे. कारण आता आपण येशूचे अवयव म्हणून त्याच्याशी जोडले गेलो आहोत.यामुळे हवा तसा विचार करण्याची मुभा आपल्याला नाही व हवे तसे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही;तरयेशूच्या प्रभुत्वाखाली मान्य असलेले जीवनच जगायला हवे. यामुळेच आपण मूलगामी/पुरोगामी बनले जातो.
याचमुळे काही जण ख्रिस्ताला सोडून दुसऱ्या धर्माकडे  जातात कारण इतर सर्व धर्म थोड्याश्या आध्यात्मिक सूचना देऊन बाकीच्या गोष्टींना मुभा देतात. त्यासाठी तुमची जीवनशैली बदलण्याची गरज नसते तुम्ही हवे तसे जगू शकता.
पौल येथे रोमी विश्वासीयांना सांगत आहे की फक्त विश्वास समजून घेऊन तृप्त असू नका तर विश्वास जगा. येशूने ही आपल्या शिष्यांना हेच सांगितले. या गोष्टी समजून जेव्हा तुम्ही त्याप्रमाणे आचरण करता तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहा . देवाच्यामुलालाआज्ञापालनानेच आशीर्वाद मिळतात. सत्याचे जीवन  म्हणजे अधीनता आणि आज्ञापालन व त्याद्वारे मिळणारा आनंदहे एकमेकांशी संबंधित आहेत. सत्य हे जीवनासाठीआहे. ह्यारोमन विश्वसियांचा प्रभाव त्यांच्या तत्वांमुळे पडला नाही कारण जसे ते पुढे जात होते तसतसे ते शिकत होते. तर त्यांच्याआचरणामुळे प्रभाव पडला. कारण त्यांना मिळालेला येशुवरील  नवा विश्वास त्यातून व्यक्त होत होता. आणि हे सहाजिक आहे. समजा तुम्ही तुमच्या परिसरात फिरत आहात . कोणीच तुम्हाला येऊन विचारणार नाही की तुमच्या विश्वासाची तत्वे आम्हाला सांगा .ते त्याची कदर करत नाहीत किंवा तुम्ही सांगायला सुरवात केली तर ऐकायला त्यांना वेळही नसणार. म्हणून खरा संवाद विश्वासाच्या तत्वाच्या पातळीवर सुरू होत नाही तर वर्तनाच्या पातळीवर सुरू होतो. मी जसे वर्तन करतो ते मला तसे मी का करतो हे सांगायला वाव देते. मंडळीचेलोक आम्ही असा विश्वास ठेवतो तसा विश्वास ठेवतो हे सहज सांगू शकतात पण जग त्यांना विचारते: हो, पण तुमचे वर्तन कसे आहे? हे खूप मोठे आव्हान आहे . एक जुनी कविता आहे. “तुम्ही लिहिताय शुभवर्तमान ; रोज एक अध्याय
तुम्हीकरता त्या कृत्यांनी,  बोलता त्या शब्दांनी
लोक वाचताहेत तुमचे लिखाण
मग कोणत बरं तुमचं शुभवर्तमान ? खरंकी विपरीत?”

पौलानेहामूलभूत पाया घातला आहे. आता तो अध्याय १२ मध्ये आवश्यककृती  सांगतो. , जर तुम्ही रोममधील कृपेने घडवलेले  विश्वासी कुटुंबाचे सदस्य आहात तर  तुम्ही असे वर्तन करणार आहात.आपण जर आपआपल्या ठिकाणी कृपेने घडवलेले देवाच्या कुटुंबाचे सदस्य आहोत तर त्या कुटुंबाची काही चिन्हे आहेत. याचे कारण तुम्ही ख्रिस्तातेच फक्त नाहीत तर एकमेकांचेही आहात.ही शरीरातील जिवंत सहभागिता प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते.
आम्ही कठीण वाटणारी अशी काही विश्वासाची तत्वे धरून आहोत किंवा मानवावर विश्वास ठेवून  बुद्धाने सांगितल्याप्रमाणे रोजच्या चाकोरीतून दिनक्रमण करत आहोत असे नाही. तर ख्रिस्तामध्ये त्याचे अवयव म्हणून आपण जोडले गेलो आहोत. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले ,पाहा ते नवे झाले आहे (२ करिंथ ५:१७). आपण पूर्वी जसे होतो तसे आता नाहीत. आणि आता पण ख्रिस्ताचे आहोत म्हणून एकमेकांचे आहोत. वचन ५ मध्ये तो हेच म्हणतो प्रत्येक अवयव एकमेकांचा आहे . येथे नैसर्गिक आणि अलौकिक अशा दोन्ही बाबी आहेत. हे रूपक आपल्याला समजते पण त्यानुसार वागण्यासाठी देवाचे अलौकिक सान्निध्य हवे आहे. विशेषत: सहानुभूती दाखवण्याच्या विभागात.हाच १५व्या वचनाचा सारंश आहे.“आनंद करणाऱ्याबरोबर आनंदकरा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा.” आपल्याला सहानुभूती समजते. पण कोणी व्याख्या करायला लावली तर ते कठीण जाईल. मी एक  व्याख्या देतो. दोन विषयांमधील गाढ संबंध किंवा ओढ;जे एकच प्रभाव पडतात; त्याद्वारे  प्रत्येक विषयावर समान परिणाम केला जातो किंवा प्रत्येक विषय दुसऱ्यावर एकच प्रभाव पाडतो. आताही व्याख्यासमजायला थोडी कठीण आहे. पणशारीरिक दृष्ट्या पहिले तर समजायला सोपी जाईल. शरीरातील दोन अवयवांमध्ये एका अवयवाची स्थिती किंवा कार्यक्षमता कमी होते तेव्हा तिचा दुसऱ्या अवयवावर परिणाम होतो.सहानुभूती हेऔदासिन्यअसण्याच्याविरुद्ध आहे. एका विद्यापिठात बोर्डावर लिहिले की उदासीन व्यक्तींचा गट क या हॉलमध्ये भेटेल. कोणीच आले नाही व या वर्गाने जाहीर केले की आम्हाला अपूर्व यश आले. उदासीनता म्हणजे मला काहीच फिकीर नाही. सहानुभूती म्हणजे मी आणखी काय करू शकतो?सहानुभूती फक्त बोलत नाही तर त्या   व्यक्तीमध्ये आणि त्याच्याशी व तिच्या अनुभवाशी समरूप होते आणि ही सहानुभूती उत्तेजन व निराशा दोन्हीमध्ये दाखवली जाईल. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक. आता मला विचारू द्या की या दोन अनुभवांमध्ये कोणता जास्त कठीण आहे?मी म्हणेन की पहिला जास्त आव्हान देणारा आहे. दुसऱ्या लोकांच्या आनंदात व उत्तेजनात सहभागी होणे मोठे  कठीण जाते .दुसऱ्या व्यक्तीचे यश , देवाचा आशीर्वाद , किंवा कृपादान किंवा अशा इतर गोष्टीत देवाला धन्यवाद देण्याऐवजी ती हेवा करण्याची बाब ठरते.

आपल्या स्वत:च्या प्रयत्नाने आपले आचरण आपण बदलू शकतो. यावर काय उपाय करायचा हे दाखवणारी आत्मवृद्धी करणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत व ती दुसऱ्याबरोबर कसा आनंद करावा , कृत्रिमरीत्या कसे स्मित दाखवावे हे ते दाखवतील किंवा आपला हेवा वरवरच्या प्रश्नातून कसा झाकावा किंवा अशी स्थितप्रज्ञ वृत्तीधारणकरूनस्वत:ला म्हणावे त्यात काय विशेष .
पणख्रिस्ती मंडळी यापैकी कोणतेच करणार नाही. कारण हेवा न दाखवणे आणि हेवा न वाटणे यात खूप मोठा फरक आहे.वर्तनातसुधारणा  आपल्याला हेवा न दाखवण्यापर्यंतच नेईल.पण आध्यात्मिक रूपांतर आपल्यालाहेवा न वाटण्यापर्यंत नेते. येथे हे रूपक फारच आवश्यक ठरते. ख्रिस्ती असणे ,त्याच्या शरीराचा अवयव असणे देवाच्या लोकांशी समरूप होणेयाचा अर्थ काय ? हेमहत्वाचे आणि शरीराचेघटकअसणे आहे. असे कीआपण एकाच संघाचे आहोत.
जर तुम्ही एका संघात राहून खेळला आहात तर तुम्हाला अनुभव असेल की दुसऱ्या व्यक्तीचे यश हे किती मोठा आनंद देऊ शकते. जेव्हा एक क्षण तुम्हाला हेवा वाटते की मीहा गोल करायला हवा होता; तरीतो लगेच विरून जातो कारण आपण त्या विजेत्या संघात असतो.जेव्हाआपण संघाबरोबर आनंद करू शकत नाही तेव्हाआपल्याला जाणीव होते की आपण त्या संघात किंवा संघाचे नाही. रडणाऱ्याबरोबर रडा हे तसे सोपे आव्हान आहे. आपल्यामानवीस्वभावात असे काही आहे की रडणाऱ्याशेजारी आपण रडू शकतो. म्हणून लोकांच्या निराशेत व दु:खात प्रवेश करणे सोपे जाते. पण त्यातहीएक विकृत भावना आपल्यात असते ती म्हणते “बरं झालं हेमला झालं नाही.” आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की,आम्ही तुमची काळजी घेऊ शकतो कारण हे तुम्हाला झालं ते बरं आहे. आपण दुसऱ्यांच्या संकटात असा आनंद करतो का ह्याकडे आपण लक्ष द्यावे.

“आपलेइतरांसाठी असलेले प्रेम आपल्याला काही करण्यास भाग पाडतेजेआपल्या भावंडांच्या गरजा ह्रदयापासून भागवू शकते “ -जॉन मरे.

भाग पाडते हा चांगली बाब आहे  कारण आपण फक्त भावनिक स्तरावर हे हाताळत नाही.पण व. ९ मध्ये म्हटल्यानुसार आपल्याला एकमेकांवरप्रामाणिकपणे प्रीती करायला पाचारण झाले आहे. ही प्रीती आपल्या भावनांना आवरून धरेल. जी गोष्ट नैसर्गिक रीतीने आपण करू म्हणजे आपल्या भावाचा हेवा करू ते करण्यापासून ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवर घालेल.  दुसऱ्याबरोबर असा आनंद करणारीही व्यक्ती सन्मान्य आहे.ती हेवा तर करतच नाही पण दुसऱ्याव्यक्तीला उंच करून तिच्याबरोबर आनंद करते.