अप्रैल 13, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

यावर विचार करा

रोम ५:८ “परंतु देव आपल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.” या वचनातून तीन मुद्दे पुढे येतात. पहिला- देवाने त्याचे स्वत:चे प्रेम आपल्याला दाखवले. का? कारण देव असाच आहे, देव प्रीती आहे (१ योहान ४:८) हा त्याचा स्वभाव आहे. देव स्वत:ला प्रीतीमध्ये प्रगट करतो. आपल्यावर प्रीती करायला त्याला कारण लागत नाही तो बेशर्त प्रीती करतो.

देव त्याचे प्रेम आपण पापी असताना प्रकट करतो. देवाचे प्रेम विनाशर्त असल्याने आपल्यामध्ये लायक काय आहे हे तो पाहत बसत नाही. त्याचे प्रेम “यामुळे मी प्रेम करतो” असे नसून “ तू कसाही असलास तरी “ अशा प्रकारचे प्रेम आहे. आपण त्याच्या प्रेमासाठी लायक आहोत म्हणून नाही पण आपण लायक नसतानाही तो प्रेम करतो. पौल म्हणतो आपण पापामध्ये मेलेले असताना , आपण सर्व लोक निरुपयोगी झाले असताना (रोम ३:१२). येथे तो स्तोत्र १४:३ चा संदर्भ देतो. येथे “निरुपयोगी “ याचा अर्थ बिघडलेले – दुधासारखे बिघडलेले. पापी म्हणून आपण त्या दुधासारखे बिघडलेलो आहोत- फक्त फेकून देण्यासाठी. खऱ्या अर्थाने आपण देवाच्या दृष्टीने त्या दाखल्यातील दासासारखे आहोत. त्याला दिलेल्या ठेवीचे त्याने काहीच केले नाही आणि त्याला निरुपयोगी दास म्हणून बाहेर टाकण्यात आले.

पण तिसरी बाब म्हणजे देव त्याच्या स्वत:ची प्रीती दाखवतो की ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. ख्रिस्त हा एकच परिपूर्ण मानव आहे. देव त्याचे प्रेम दाखवत असताना वधस्तंभावर मरण्यासाठी तोच फक्त लायक आहे ( १ योहान ४:१०). आपले पाप आणि नालायकी काढून टाकण्यासाठी तो परिपूर्ण यज्ञ बनला. आपल्याला वाचवणे योग्य होते म्हणून ख्रिस्त मरण पावला नाही तर त्या पवित्र देवासमोर आपण लायक बनावे म्हणून तो मरण पावला. ख्रिस्तामध्ये आपल्याला मोल दिले गेले, ख्रिस्तामध्ये आपण लायक झालो. आपली किंमत  वधस्तंभाशी बांधली गेली आहे. त्याच्याशिवाय आपण शून्य आहोत. आपली किंमत ही आपल्याला विकत घेण्यासाठी जी अमोल किंमत भरली गेली – देवाच्या पुत्राची किंमत- त्यामध्ये आहे.

हेच देवाच्या प्रीतीचे तुमच्या आणि माझ्यासाठी आश्चर्य आहे. आपण निरुपयोगी असताना आपण लायक बनावे म्हणून येशू आपल्यासाठी मरण पावला.

Previous Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

Next Article

लेखांक १: जेव्हा देव अन्यायी वाटतो

You might be interested in …

बायबलला काहीही विचारा स्कॉट हबर्ड

जर बायबलबद्दल तुमचा विश्वास काय आहे याची माहिती हवी असेल तर तुम्ही त्यासाठी काय प्रश्न विचारता याकडे लक्ष द्या. आपल्यातील काही असे प्रश्न विचारत नाहीत कारण प्रश्न विचारण्याची वृत्ती अनादर करणारी आहे असे ते समजतात. […]

देव तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये  राखील

डेव्हिड मथीस पुढच्या दहा वर्षात तुम्ही प्रभूला धरून असणार याबद्दल तुमची किती खात्री आहे? अखेरीस निश्चितपणे विश्वासात  टिकून राहण्यासाठी देवच आपली आशा आहे. तोच आपल्याला राखतो(१ थेस्स.५:२३-२४; यहूदा २४). तरीही ख्रिस्ती चिकाटी ही निष्क्रीय नसते. […]

प्रार्थनांची उत्तरे माझ्या चांगुलपणावर अवलंबून असतात का?

जॉन पायपर आजच्या या विषयावर बायबल अगदी स्पष्ट सांगते. ते म्हणते: आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळावे म्हणून आपण देवाचे आज्ञापालन केले पाहिजे. हा मुद्दा परखड आणि आपले जीवन व्यापून टाकणारा आहे. बायबलमधले अनेक संदर्भ हे दाखवतात. […]