दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?

 

लेखक- डेविड मॅथीस

जगाच्या सर्व इतिहासातला तो एकमेव भयानक, निष्ठूर असा दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणतेही दु:खसहन इतके अयोग्य ठरलेले नाही. कोणत्याही मानवाला इतके अन्यायी रीतीने वागवले गेले नाही; कारण कोणताच मानव इतका स्तुतीला पात्र नव्हता. पापाविरहित असा कोणीही जगलेला नाही . दुसरा कोणीही मनुष्य खुद्द देव नव्हता. दोन हजार वर्षांपूर्वी यरुशलेमच्या बाहेर असलेल्या टेकडीवर जी  भयाण  घटना घडली तिच्याशी कशाचीही बरोबरी होणे शक्य नाही.आणि तरीही त्या दिवसाला ‘उत्तम शुक्रवार’ म्हणतात.

माणसाने  ते वाईटासाठी योजले होते
येशूसाठी या दिवसाची सुरुवात रोमी सरकारच्या मुख्य कचेरीत अटकेत असताना झाली. त्याच्या स्वत:च्या लोकांनीच त्याला या जुलमी राज्याच्या स्वाधीन केले होते. या यहूदी राष्ट्राला एकत्र जोडणारा धागा होता की त्यांच्या आवडत्या दावीद राजाच्या वंशात एक वचनदत्त राजा येणार होता. खुद्द दावीद व त्याच्या पूर्वीच्या तसेच नंतरच्या संदेष्ट्यांनीही ह्या महान राजाबद्दल भविष्ये केली होती. अखेरीस  जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या लोकांनी तो कोण आहे हे ओळखले नाही. त्यांच्या स्वत:च्या मशीहाचा त्यांनी धिक्क्कार केला.

यहूदाने  ते वाईटासाठी योजले होते

येशूविरुध्द कट करण्यात यहूदा पहिला नव्हता पण त्याने प्रथम येशूला त्यांच्या स्वाधीन केले (मत्तय २६:१५). शुभवर्तमानात त्याची ही जबाबदारी पुन्हा पुन्हा सांगितली आहे. आपल्याला यातून पैसे मिळू शकतात हे त्याला कळण्यापूर्वीच येशूला पकडण्याचा कट रचला जात होता. येशूला त्याच्या शब्दांत पकडण्याच्या योजनेचा (मत्तय २२:१५) परिणाम त्याला मारण्यात यावा अशा कारस्थानात झाला (मत्तय २६:४). आणि यहूदाची पैशावरील माया त्याला येशूला धरून देणारा मुख्य सूत्रधार बनवून गेली.
हे होणार हे येशूने पाहिले होते. त्याने पूर्वीच शिष्यांना सांगितले होते (मत्तय २०:१८). प्रथम हा धोकेबाज निनावी होता. आता तो त्याच्या आतील वर्तुळातील १२ शिष्यांतूनच निघाला. त्याचा  मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरुध्द गेला आहे    (स्तोत्र ४१:९).  आणि तेही एका दासाच्या किंमतीला (जखर्या११:१२-१३),  ३० चांदीच्या भिकार नाण्यांची.

यहूदी पुढार्यांनी ते वाईटासाठी योजले होते
पण यहूदाने एकट्यानेच ही कृती केली नाही. येशूने आधीच सांगितले होते की “मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. त्याने मेलेच पाहिजे असे ते म्हणतील. ते मनुष्याच्या पुत्राला यहूदीतरांच्या हाती देतील. ते लोक त्यची थट्टा करतील, त्याला चाबकाने मारतील नंतर ते त्याला वधस्तंभावर खिळून जिवे मारतील… (मत्तय २०;१८-१९). आणि हे सर्व योजनेनुसार उलगडत गेले.   “ यांनी त्याला पकडून पिलाताच्या स्वाधीन केले (योहान १८:१२,३०). पिलाताने येशूला म्हटलेच “तुझ्या मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले?” योहान १८:३५.
त्या दिवशी देवाचा निवडलेला मशीहा भीषण  अन्यायाने मारला गेला. त्यावेळी दूर उभे असणारे वाईटाचे मानवी हस्तक हे देवाच्या निवडलेल्या लोकांचे कायदेशीर अधिकारी होते. जरी चूक त्यांच्या पुरतीच मर्यादित नव्हती तरी त्यांना भरपूर देण्यात आले होते “आणि ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल” (लूक १२:४८). जो पिलात बऱ्याच दोषाला पात्र आहे त्याला येशूने स्पष्ट सांगितले,  “ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.”   (योहान १९:११). यहूदी लोक येशूवर का उठले आहेत हे पिलातही सांगू शकत होता “पिलात असे म्हणाला कारण त्याला माहीत होते की,  द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरून दिले होते” (मार्क १५:१०). लोकांना येशू आवडत आहे हे त्यांनी पाहिले आणि त्यांचा प्रभाव कमी होत आहे हे पाहून ते हादरले. (योहान १२:१९). येशूची प्रसिद्धी त्यांच्या अधिकाराच्या कमकुवत जाणीवेला दहशत घालत होती. त्यामुळे संधी मिळताच त्या शास्त्री व परूशांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली.

पिलाताने ते वाईटासाठी योजले होते

दुष्टतेच्या जाळ्यामध्ये दोषी गट आपापली भूमिका बजावतात. यहूदी पुढार्यांनी योजना आखली, यहूदाने मध्यस्थाचे कार्य केले आणि पिलातानेही स्वत:चा भाग पार पाडला – कदाचित निष्क्रीय. आपली दोषी भावना या घटनेतून धुवून काढण्यासाठी त्याने सर्वांसमोर आपले हात धुतले. पण तो यातून स्वत:ला सोडवू शकला नाही.
त्यावेळी असलेला उच्च रोमी पदाधिकारी म्हणून जो अन्याय त्याला दिसत होता त्याचा तो शेवट करू शकत होता. तो दुष्टपणा आहे हे त्याला दिसत आहे. पण लूक व योहान दोघेही पिलात घोषणा करत असलेले तीन स्पष्ट प्रसंग नमूद करतात “मला याच्यात काहीच अपराध सापडत नाही” (लूक २३:१४-१५; योहान १८:३८; १९: ४,६). अशा प्रसंगी एखाद्या न्यायी अधिकाऱ्याने आरोपीला दोषमुक्त केले असते. पण येशूमध्ये दोष न दिसणे हीच बाब पिलात दोषी ठरण्यास कारण झाली. कारण त्याच्यासाठी राजकीय फायद्याचे जे होते त्याच्यापुढे त्याने आपली मान तुकवली.
प्रथम पिलाताने घासाघीस करण्याचा प्रयत्न केला . त्याने एका लुटारूला सोडण्याचा प्रस्ताव मांडला. पण पुढार्यांच्या चिथावणीने लोकांनी त्याच्या या थापेलाच मान्यता देऊन दोषी व्यक्तीला सोडण्याची मागणी केली. आता पिलात कोंडीत पकडला गेला. त्याने देखावा म्हणून त्याचे हात धुतले “मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले”  (मत्तय २७:२६;मार्क १५:१५). कट रचणाऱ्या यहूद्यांपुढे  पिलाताची कृती जरी प्रतिकाराची असली तरी जेव्हा “ पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले”  (लूक २३:२५) तेव्हा तो त्यांच्या दुष्टपणात सामील झाला.

लोकांनी ते वाईटासाठी योजले होते
अधिकाराचा दर्जा व कागदपत्रे यांनीही आपले काम बजावले होते. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या चिथावण्यांवर लोकांनी विश्वास ठेवला. आणि निर्दोष व्यक्तीच्या बदल्यात जो दोषी आहे हे त्यांना माहीत होते त्याला सोडण्याची त्यांनी मागणी केली. पेत्राने यरूशलेममध्ये त्यांना योग्यच रीतीने उपदेश केला “त्याचा खास सेवक येशू याला त्याने गौरव दिलेला, परंतु तुम्ही येशूला मारण्याचा निर्णय घेतला. तुम्ही पिलाताला सांगितले की, तुम्हांला येशू नको.
येशू शुद्ध आणि निष्पाप होता. परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको, तुम्ही पिलाताला सांगितले की येशूऐवजी आम्हांला एक खुनी दे.  आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले! परंतु देवाने त्याला मरणातून उठविले,” प्रे. कृ. ३:१३-१५. अखेरीस याला एक आश्चर्यकारक वळण मिळाले आणि यहूदी व विदेशी यांनी जो जीवनाचा निर्माता त्याला मारण्यासाठी एकत्रितपणे काम केले. जेव्हा आपल्याला समजू लागते की यहूदा, पिलात व लोक हेच फक्त यात गोवलेले नाहीत . तर  त्या शुक्रवारच्या काळकभिन्न अंधारात आपण जेव्हा आपली स्वत:ची दुष्टता देवाच्या चांगुलपणात पाहतो तेव्हा: आम्ही त्याला धरून दिले. “ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला”  (१ करिंथ १५:३). “येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले”  (रोम ४;२५). “येशूने स्वत:ला आमच्या पापांसाठी दिले” (गलती १:४).  “त्याने स्वत: आमची पापे  त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली”  (१ पेत्र २:२४). जे आपण  वाईटासाठी योजले होते ते देवाने चांगल्यासाठी योजले.

देवाने ते चांगल्यासाठी योजले होते

देव कार्यरत होता. जेव्हा आम्ही सर्वात, सर्व भेसूर दुष्तेतेत होतो तेव्हा देव त्याचे सर्वात चांगले करत होता. यहूदा , यहूदी नेते, पिलात, लोक आणि सर्व क्षमा पावलेले पापी यांच्या वाढत्या दुष्टपणावर देवाचा हात स्थिर आहे. तो आपल्या अंतिम भल्यासाठी कार्य करत आहे. पेत्राने लवकरच याविषयी संदेश दिला, “हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती”  (प्रे. कृ. २:२३).  आणि जसे पहिले ख्रिस्ती प्रार्थना करीत असता त्यांनी म्हटले, “या गोष्टी खरोखर घडल्या, जेव्हा हेरोद, पंत पिलात, यहूदीतर राष्ट्रे व यहूदी लोक हे सर्व जण येशूविरुद्ध ‘एकत्र आले.’  त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली,  हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले” ( प्रे. कृ. ४:२७-२८).

उत्तम शुक्रवारी देव कार्यरत होता. मनुष्याच्या अति भेसूर दुष्टतेच्या वेळी तो त्याचे सर्वाधिक चांगले करत होता.
योसेफाचा झेंडा कधी नव्हे इतका खऱ्या रीतीने फडकला तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता “ (उत्पत्ती ५०:२०) आणि सर्व समयातील याच दिवशी जेथे माणसाच्या सर्व दुष्ट्तेची बोटे उमटलेली दिसतातच तेथे  देवाचा सार्वभौम हात चांगले करताना दिसतो. तर मग योसेफाचा झेंडा आपल्या जीवनाच्या भयाण काळात , आपल्या दु:खात आपण का फडकवू नये? कारण “ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय” (रोम ८:३२)?

जगाच्या इतिहासातील सर्वात दुष्ट दिवशी देवाने चांगले लिहिले. आणि असा एकही दिवस – आठवडा, महिना, वर्ष अथवा जीवनभरचे दु:ख  – एकही आघात, हानी, क्षणिक व दीर्घ असे काहीही नाही ज्याच्यावर देव ख्रिस्त येशूमध्ये  असे लिहू शकत नाही.
सैतान व पापी लोकांनी तो शुक्रवार वाईटसाठी योजला होता पण देवाने तो चांगल्यासाठी योजला म्हणून आपण त्याला उत्तम शुक्रवार म्हणतो.

Previous Article

सर्व पुनरुत्थानाचे ईश्वरविज्ञान एकाच अध्यायात

Next Article

पवित्र स्थानातील पडदा

You might be interested in …

जेव्हा काय करायचं हे तुम्हाला समजत नाही डेव्ह झल्गर

संकट इतके झटकन आणि इतक्या जोराने तुमच्यावर आले की काय करावे ते तुम्हाला समजेना असे नुकतेच तुमच्यासाठी केव्हा घडले? माझी पत्नी गेले आठ वर्षे तीव्र वेदना सहन करत जगत आहे. पण अगदी नुकतेच ती एका […]

गेथशेमाने बाग

लेखांक २                                          येशूच्या खुनाच्या काळ्या कटानं काळोखलेल्या त्या खुल्या बागेत … त्या काळरात्री त्याच्यासाठी अधिकच काळवंडत चाललेल्या दु:खरात्रीमध्ये आपल्या शिष्यांसहित त्यांच्या सहवासासाठी, सहानुभूतीसाठी आसुसलेला प्रभू चालला आहे. ‘बाहेर पडला.’ यरुशलेमच्या तटापासून त्या भयाण दरीच्या तळापर्यंत […]

शांत केव्हा राहावे?….याविषयी बायबल काय म्हणते?

१. शीघ्रकोप झाल्यास शांत व्हा (नीती१४:१७). २. तुम्हाला सर्व सत्य माहीत नसल्यास शांत राहा (नीती १८:१३). ३. सर्व गोष्ट तुम्ही पडताळून घेतली नसेल तर शांत राहा (अनु.१७:६). ४. जर तुमचे शब्द कमकुवत व्यक्तीला अडखळण आणणार […]