… आणिवल्हांडणाची सांगता झाली
संकलन- लीना विल्यम्स
“बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरू मारावयाचे तो दिवस आला” लूक २२:७.
यरुशलेमाचे रस्ते गजबजून गेले होते. वल्हांडणाचे पवित्र भोजन करण्याचा तो वार्षिक दिवस पुन्हा आला होता. तो पाळण्यासाठी अनेक यहुद्यांनी यरुशलेमात गर्दी केली होती. तथापि हा वल्हांडण वेगळाच ठरणार होता. येशूशिवाय इतर कोणालाच त्याची कल्पना नव्हती.हा वल्हांडण सर्व वल्हांडणांचा शेवट करणार होता. निर्गमापासून सर्व वल्हांडण त्या अखेरच्या देवाच्या कोकऱ्याकडे निर्देश करीत होते,जोपाप्यांना देवाच्या क्रोधापासून सोडवणार होता. अखेरीस येशूने स्वत: तो पाळण्याचीवेळ आली. माडीवरच्या खोलीत शिष्य येशूच्या मागे गेले. येशूने जेव्हा त्यांना पालन करण्यासाठी नवाकरार स्थापनकेला तेव्हा ते चकित झाले. वर्षानुवर्षे कोकऱ्याचा बळी देण्याऐवजी आता त्यांना कायमसाठी बळी गेलेल्या देवाच्या कोकऱ्याची आठवण करायची होती. प्रभूचे मरण आणि पुनरुत्थान यांची फक्त वर्षातून एकदाच नव्हे तर जितक्यांदा ते एकत्र येतील तेव्हा तेव्हा आठवण करायची होती. याचे महत्त्व त्यावेळी ते समजू शकले नाहीत.
प्रभूभोजनाची सुरुवात या वल्हांडणाच्या पार्श्वभूमीवर झाली. वल्हांडणाचीचिन्हे पुढे करून त्याचा अर्थ येशूने एका नव्या अत्युच्च पातळीवर नेला गेला. यामुळे हे भोजन वल्हांडणाच्या प्रकाशात अभ्यासणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण त्या रात्री घडलेल्या घटनाचा संबंध आता विश्वासी जे प्रभुभोजन घेतात त्याच्याशी लावणार आहोत.
प्रभुने शिष्यांबरोबर वल्हांडण पाळला तेव्हा ज्या मुख्य पायऱ्या ओलांडल्या त्या आपण पाहू या.वल्हांडण सणामध्ये चार प्याले आहेत. हे चार प्याले निर्गम ६: ६-७ मध्ये देवाने इस्राएलांना जी अभिवचने दिली आहेत त्यांचे दर्शक आहेत.याविधीमध्ये इतर रिवाजही होते.
१. पहिला प्याला – जरीमाडीवरच्या खोलीतल्या घटनांत याचा तपशील दिला नाही तरी प्रभू व शिष्य हापहिला प्याला रिवाजानुसार प्याले असतील.यानंतर विधीपूर्वक क्षालनाचा कार्यक्रम होत असे.
२. विधीपूर्वक हात धुणे – भोजनापूर्वी एक बालक पाणी व कापड घेऊन प्रत्येकाला हात धुण्यास मदत करीत असे. यावेळी प्रभूने त्या गर्विष्ठ शिष्यांपुढे आपली पूर्ण नम्रता प्रकट केली. रीतीनुसार फक्त हातच नाही तर त्यांचेपायही धुतले. त्यांच्यापैकी एक शुद्ध नाही हे ही त्याने सांगितले. दररोज शुद्ध होण्याची आवश्यकता त्याने पेत्राला सांगितली. विश्वासीयांनाही दररोजच्या पापापासून त्याच्या वचनाद्वारे शुद्ध होण्याची गरज आहे.
३. मधला मात्झा – वल्हांडणाच्या मेजावर बेखमीर भाकर असे, जिला मात्झा म्हणत. ह्या तीन भाकरी असून एकावर एक रचत असत.यातून मधला मात्झा निवडला जाई त्याचे दोन तुकडे केले जात आणि एक तुकडा घरप्रमुख लपवून ठेवत असे.विधीनुसारनंतर तो शोधला जात असे. उरलेला अर्धा भाग मेजावर ठेवला जात असे. याचा अर्थ नंतर स्पष्ट केला आहे.
४. चार प्रश्न – आता जेवणाची वेळ असते. पण मिसरातून सुटका झाल्याची संपूर्ण गोष्ट सांगून झाल्याशिवाय कुणाला जेवायला मिळत नसे. यावेळी सर्वात लहान व्यक्ती ठरवलेले प्रश्न विचारत असे. कुटुंब प्रमुख त्याची ठराविक उत्तरे देत असे. ही उत्तरे लांबलचक असत व गुलामगिरीतून संपूर्ण सुटका झाल्याचा इतिहास त्यात दिलाजात असे.यावेळीही लहान व्यक्ती बहुधा वडिलांच्या खांद्यावर टेकून प्रश्न विचारत असे.
माडीवरच्याखोलीत सर्वात लहान योहान होता व तो प्रभूला टेकून बसला होता. याचा अर्थ तो त्याच्या उजव्या बाजूला बसला होता व त्या रात्री प्रश्न विचारण्याचा मान त्याला मिळाला.
५. दुसरा प्याला – सुटकेची गोष्ट सांगताना दुसरा पेलाभरून पीत असत. याला सुटकेचा प्याला म्हणत.
६. मात्झा बुडवणे – वरचा मात्झा व उरलेला मधला मात्झा तोडून त्याचे तुकडे मूळी , बेदाणे व सफरचंद यांच्या मिश्रणात बुडवले जात. प्रमुख पाहुण्याला याचा पहिला घास दिला जात असे. यावेळी प्रभूने आपल्याला कोण धरून देणार हे दाखवले. “ज्याला मी भाकर बुडवून देईन तो”.
ह्यावरून हे ही दिसते की प्रभूने यहूदाला प्रमुख पाहुण्याचा मान दिला. त्याला आपल्या डाव्या बाजूस बसवले. यहूदा हा किरीयोथचा रहिवासी होता. इतर सर्व शिष्य गालीलचे होते व ते वल्हांडण सण आदल्या दिवशी पाळत. इतर यहुदी दुसऱ्या दिवशी पाळत. त्यामुळे यहुदाप्रमुख पाहुणा होण्यास पात्र होता. याद्वारे प्रभूचे त्याच्यावरील प्रेमच दिसून येते. पाहुण्याला पहिला घासाचा मान मिळत असल्याने शिष्यांना तो धरून देणारा आहे हे समजले नाही. याचवेळी यहुदाने ती खोली सोडली व आपल्या योजना पूर्ण करण्याच्या कामी लागला.
७. भोजन – आता जेवण वाढले जाई. यामध्ये भाजलेले कोकराचे मांस , कडू भाजी व मात्झायांचा समावेश असे. यहुदाच्या जाण्यामुळे प्रभूभोजनाची स्थापना करण्यास योग्य समय लाभला. “ तोबाहेर गेल्यावर येशूने म्हटले आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाला आहे.”योहान१३:३१
८. एफिकोमेन – ही सर्वात महत्वाची पायरी असून हिचे प्रभूभोजनात रूपांतर झाले. सर्वात लहान सदस्याला तो दडवलेला मात्झाचा अर्धा भाग घरात शोधावा लागत असे. शोधल्यावर त्याला छोटेसे बक्षीस दिले जाई.
याद्वारे काही प्रश्न उपस्थित केले जातात.
अ) मात्झा तीन का आहेत? ते काय दाखवतात?
ब) मधल्या मात्झाचे दोन तुकडे का केले जातात? तो का दडवतात व नंतर का शोधतात?
क) एफिकोमेनकाय आहे?वल्हांडणामध्ये याचा समावेश कधी करण्यात आला?
ड) यावेळी प्रभूने काय केले?
एफिकोमेन किंवा मधला मात्झा या शब्दाचा अर्थ आपल्याला हादरून टाकणारा आहे. एफिकोमेन म्हणजे “मी आलो”
यहूदी स्पष्ट करतात की तीन मात्झा हे अब्राहाम इझाक व याकोब यांचे दर्शक आहेत. पणहे स्प्ष्टीकरण पुरेसे नाही. फक्त मधला मात्झा का मोडला जातो? इझाकच का, याकोब का नाही अशा प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये मिळत नाहीत.
याचे योग्य स्पष्टीकरण म्हणजे तीन मात्झा त्रैक्यत्व दाखवतो. पिता, पुत्र व पवित्र आत्मा. आपल्या पापांसाठी पुत्र वधस्तंभावर मारला गेला आणि तीन दिवस पुरला किंवा दडवला गेला आणि नंतर पुनरुत्थित झाला. ज्याला पुत्र सापडतो त्याला सार्वकालिक जीवन बहाल केले जाते. ख्रिस्तीविद्वान हेच स्पष्टीकरण योग्य मानतात.
या पायरीला प्रभूने मात्झा घेतला, उपकार मानले व तो मोडला आणि त्यांना दिला व म्हटले,“हे माझे शरीर तुम्हासाठी दिले जात आहे: माझ्या स्मरणार्थ हे करा.”
सध्या यहूदी लोक हे भाजलेल्या मासाऐवजीएफिकोमेनवापरतात. कारण आता मंदिर नष्ट झाल्यामुळे यज्ञकरणे बंद झाले आहे. त्यांनाएफिकोमेन याचा अर्थ स्पष्टपणे समजलेला नाही. कारण“देवाचा पुत्र” याद्वारेच त्याचा अर्थ समजू शकतो. एफिकोमेन हा शब्द आपल्या प्रभू येशूविषयीच बोलतो. व या चित्रात तो बरोबर बसतो कारण आता अर्पण करण्याची गरज राहिलेली नाही याचेकारण “ मी आलो”.
९. तिसरा प्याला – तिसऱ्या प्याल्याकडे पाहण्यापूर्वी चवथ्या पेल्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे चार प्याले निर्गम६;६-७ नुसार इस्राएलांना दिलेली चार अभिवचने दाखवतात ती म्हणजे:
अ) मी तुला मिसरातून बाहेर काढीन- शुद्धीकरणाचा प्याला
ब) मी तुला बंधनातून सोडवीन- सुटकेचा प्याला
क) मीमाझ्या हाताने तुला बाहेर नेईन – तारणाचा प्याला /आशीर्वाद
ड) मी तुम्हालामाझे लोक बनवीन आणि मी तुमचा देव होईन – उद्धाराचा प्याला
लूक २२:२० मध्ये म्हटल्यानुसार “ हा प्याला तुम्हासाठी ओतले जात आहे असे जे ‘माझे रक्त त्यात नवा करार’ आहे.” येथे सुटकेची किंमत त्याने शब्दांत सांगितली – त्याचे रक्त
आपल्याओंगळ पापापासून सुटका होण्यासाठी प्रभुने त्याचे रक्त अर्पण केले. पेत्रजेव्हा यासंबंधी बोलतो तेव्हा त्याला याची कशाशीच तुलना करता येत नाही तो म्हणतो;“वाडवडील माणसांच्या परंपरेनेचालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक कोकरा, असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहा हे ध्यानात ठेवा (१ पेत्र:१८-१९).
अखेरीसएफिकोमेन व तिसरा प्याला यांचाआता प्रभुभोजनात समावेश झाला आहे.
१०. चवथा प्याला – प्रभूने हा प्याला पिणे नाकारले. काही तासातच इस्राएल लोकांनी त्याला धरले व त्याची वाट लावा म्हणत त्याचे देवत्व नाकारले. ज्या प्रभूला सर्व भविष्य आधीच ठाऊक होते त्याने आदल्या रात्री या राष्ट्राच्या पुनरुध्दाराबद्दल सांगितले. त्याने म्हटले,”मी आपल्या पित्याच्या राज्यात नवा पिईपर्यंत एथून पुढे हा द्राक्षीचा उपज पिणारच नाही” (मत्तय २६:२९). इस्राएल लोकांनी ख्रिस्ताला धिक्कारले . चवथा प्याला जेव्हा प्रभू इस्राएल राष्ट्राचा स्वीकार करील आणि ते त्याचा खरा मशीहा म्हणून स्वीकार करतील त्या भविष्याबद्दल बोलतो.
त्यानंतर एक गीत गाऊन हा विधी संपला (मत्तय २६:३०). स्तोत्र ११८ गायल्यावर वल्हांडणाची समाप्ती झाली.
Social