येशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर तुम्ही विचार करत असताना खाली दिलेले काही विचार तुम्हाला आणखी मदत करतील.
- पाप म्हणजे फक्त वाईट गोष्टी करणे एवढेच नाही. तर “चांगल्या” गोष्टींनाच आपले अंतिम ध्येय करणे हे ही पाप आहे. जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्यांचा आपण पाठपुरावा करू शकतो. पण ह्या चांगल्या गोष्टी जेव्हा आमचे अंतिम व प्रमुख ध्येय बनतात आणि जेव्हा आपण त्यांच्यावर देवापेक्षा जास्त प्रेम करू लागतो तेव्हा ते पाप आहे. देवाला दररोज तुमच्या जीवनात प्राधान्य द्या.
- देवाला सर्वच पाप दु:ख देते. आपण ज्याला निवडून मोठी पापे गणतो आणि टाळतो तीच फक्त पापे देवाला दु:ख देत नाहीत . पौलाने कलसै च्या मंडळीसाठी प्रार्थना केली की त्यांनी सर्व प्रकारे देवाला संतुष्ट करावे” ( कल १:९-१४). आपल्या जीवनातील ज्या गोष्टी देवाला संतोष देत नाही त्याबद्दल आपण पश्चात्ताप करू या.
- यिर्मया १७:९ हे वचन पाठ करू या. “ ह्र्दय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे ; त्याचा भेद कोणास समजतो?” तुमचे मन जेव्हा तुम्हाला सांगते की तुम्ही चांगले आहात, इतर लोकांपेक्षा तुम्ही खूपच चांगले आहात किंवा निदान त्या व्यक्तीपेक्षा तरी तुम्ही चांगले आहात , तेव्हा फसू नका. आपल्या सर्वांमध्ये गर्व आहे आणि कित्येकदा आपण गर्विष्ठ नाही याचाच आपल्याला गर्व असतो!
- पाप म्हणजे आपण केलेली ती चुकीची गोष्टच फक्त नाही पण कराव्या त्या चांगल्या गोष्टी आपण केल्या नाहीत हे ही पाप आहे. म्हणजेच जाणून बुजून केलेली पापे व टाळल्यामुळे झालेली पापे- “चांगले करणे कळत असून जो त्याप्रमाणे वागत नाही त्याला ते पाप आहे (याकोब ४:१७).
- ख्रिस्ताने आपली पात्रता नसताना आपल्यावर मुफ्तपणे दया देऊ केली आहे याचा अर्थ आता आपल्याला पाप करायला मुभा मिळाली आहे असा नाही. देवाने त्याच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर केला आणि आमच्यावर अमोल प्रीती केली या सत्यामुळे आपण देवाला अधिक कृतज्ञ असायला हवे. या कृतज्ञतेमुळे आपण त्याच्या आज्ञा पाळायला व चांगली कामे करायला उद्युक्त व्हायला हवे.
केव्हिन यंग नावाचे एक पाळक व लेखक म्हणतात, ख्रिस्त आपल्याकडे येताना केवळ एवढेच म्हणत नाही की, “मी माझा भाग पूर्ण केला आहे, मी माझे जीवन सर्वांसाठी दिले आहे कारण माझ्याकडे तारणारी प्रीती आहे. आता तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्याकडे या , मी तुमचे तारण करतो” याऐवजी तो आपल्याला म्हणतो, “ मी तुमच्या अपराधांमुळे घायाळ झालो, तुमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेलो, मी वधला गेलो आणि मी आपल्या रक्ताने सर्व वंश, भाषा, लोक व राष्ट्रे यातले इसम विकत घेतले आहेत व त्यांना देवासाठी राज्य व याजक केले आहे (यशया ५३:३ , प्रकटी ५:९). मी तुमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली यासाठी की तुम्ही पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे”( १ पेत्र २:२४).
Social