सितम्बर 1, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

संपादकीय

नुकतेच कोणीतरी मला म्हणाले, “त्याची तत्वे अगदी आपल्या तत्वांसारखी आहेत.” त्याला म्हणायचे होते की त्याची तत्वे बरोबर आहेत. या विधानावर मी विचार केला आणि ठरवले की असे विधान एक गर्वाचेच  विधान ठरत नाही पण नकळत ते बायबलचा अंतिम अधिकार आपल्या स्वत:च्या किंवा गटाच्या अथवा चर्चच्या  विश्वासाकडे ओढून घेते . योग्य तत्वांचा अंतिम अधिकार आपल्या  स्वत:ला  किंवा आपल्या गटाला अथवा चर्चला न देण्याची आपण काळजी घेण्याची गरज आहे. बायबल आणि केवळ बायबल हाच आपला अंतिम अधिकार आहे.

दर महिन्याला “ख्रिश्चन जीवन प्रकाश” चा अंक तुम्हाला सुपूर्त करताना आम्हाला आनंद होतो. तरीही हे मासिक चालू ठेवण्यासाठी तुम्ही दोन गोष्टींद्वारे आम्हाला मदत करावी अशी आमची गरज आहे. १) तुमच्या वर्गणीचे नूतनीकरण करण्यास विसरू नका २) इतरांनी या मासिकाचे नियमित वर्गणीदार होण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. वर्गणीदारांचा आकडा वाढल्याशिवाय मासिक चालवणे फार महागात पडते.

ह्या अंकाचाही नेहमीप्रमाणे लाभ घ्या. यावेळेस मृत्यूनंतर आपले नक्की काय होते, स्वर्ग – आपली आशा ह्या विषयांवरचे लेख आहेत. नेहमीची  सदरे आणि समाधानी कसे राहता येते यावरचा लेखही तुम्हाला आवडेल  अशी खात्री आहे.

ख्रिश्चन जीवन प्रकाश मासिकासाठी व त्याचे वर्गणीदार वाढावे म्हणून प्रार्थना करा.

क्रिस विल्यम्स

अध्यक्ष

Previous Article

येशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर विचार

Next Article

ख्रिस्ती समाधान- एक दुर्मिळ रत्न

You might be interested in …

वाया गेलेले जीवन कसे वाचवावे

ग्रेग मोर्स न उमललेले फूल, न पिकलेले फळ, गर्भधारणा न झालले उदर, न उबवलेले अंडे: एक वाया गेलेले जीवन. जे तुम्ही बोलला नाहीत आणि केले नाहीत ते बोलायला, करायला, फारच थोडा वेळ उरला आहे. तुम्ही […]

इतरांना क्षमा करणे

पॉल ट्रीप लोक सहज क्षमा का करू शकत नाहीत? प्रश्न खूपच चांगला आहे. जर क्षमा करणे सोपे आणि आपल्यासाठी हितकारक आहे तर ते अधिक लोकप्रिय का नाही बरे? त्यात एक दु:खद सत्य आहे ते म्हणजे […]

चिडचिड? विसरून जा

स्कॉट स्मिथ देवाने आपल्यासाठी येशूमध्ये  भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी इतरांवर चिडण्याचे विसरून जातो. दुर्दैवाने चिडचिड करावी असे मी स्वत:ला सांगतो. पण जिथे मी कमकुवत आहे तेथे […]