रोम ५:८ “परंतु देव आपल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.” या वचनातून तीन मुद्दे पुढे येतात. पहिला- देवाने त्याचे स्वत:चे प्रेम आपल्याला दाखवले. का? कारण देव असाच आहे, देव प्रीती आहे (१ योहान ४:८) हा त्याचा स्वभाव आहे. देव स्वत:ला प्रीतीमध्ये प्रगट करतो. आपल्यावर प्रीती करायला त्याला कारण लागत नाही तो बेशर्त प्रीती करतो.
देव त्याचे प्रेम आपण पापी असताना प्रकट करतो. देवाचे प्रेम विनाशर्त असल्याने आपल्यामध्ये लायक काय आहे हे तो पाहत बसत नाही. त्याचे प्रेम “यामुळे मी प्रेम करतो” असे नसून “ तू कसाही असलास तरी “ अशा प्रकारचे प्रेम आहे. आपण त्याच्या प्रेमासाठी लायक आहोत म्हणून नाही पण आपण लायक नसतानाही तो प्रेम करतो. पौल म्हणतो आपण पापामध्ये मेलेले असताना , आपण सर्व लोक निरुपयोगी झाले असताना (रोम ३:१२). येथे तो स्तोत्र १४:३ चा संदर्भ देतो. येथे “निरुपयोगी “ याचा अर्थ बिघडलेले – दुधासारखे बिघडलेले. पापी म्हणून आपण त्या दुधासारखे बिघडलेलो आहोत- फक्त फेकून देण्यासाठी. खऱ्या अर्थाने आपण देवाच्या दृष्टीने त्या दाखल्यातील दासासारखे आहोत. त्याला दिलेल्या ठेवीचे त्याने काहीच केले नाही आणि त्याला निरुपयोगी दास म्हणून बाहेर टाकण्यात आले.
पण तिसरी बाब म्हणजे देव त्याच्या स्वत:ची प्रीती दाखवतो की ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. ख्रिस्त हा एकच परिपूर्ण मानव आहे. देव त्याचे प्रेम दाखवत असताना वधस्तंभावर मरण्यासाठी तोच फक्त लायक आहे ( १ योहान ४:१०). आपले पाप आणि नालायकी काढून टाकण्यासाठी तो परिपूर्ण यज्ञ बनला. आपल्याला वाचवणे योग्य होते म्हणून ख्रिस्त मरण पावला नाही तर त्या पवित्र देवासमोर आपण लायक बनावे म्हणून तो मरण पावला. ख्रिस्तामध्ये आपल्याला मोल दिले गेले, ख्रिस्तामध्ये आपण लायक झालो. आपली किंमत वधस्तंभाशी बांधली गेली आहे. त्याच्याशिवाय आपण शून्य आहोत. आपली किंमत ही आपल्याला विकत घेण्यासाठी जी अमोल किंमत भरली गेली – देवाच्या पुत्राची किंमत- त्यामध्ये आहे.
हेच देवाच्या प्रीतीचे तुमच्या आणि माझ्यासाठी आश्चर्य आहे. आपण निरुपयोगी असताना आपण लायक बनावे म्हणून येशू आपल्यासाठी मरण पावला.
Social