जनवरी 10, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

एका कडक थंडीच्या  तुरुंगातील नाताळ

टोनी रिंक

डीटरीच बॉनहॉपर २५ डिसेंबर १९४३ ला सकाळी एका कडक लाकडी बिछान्यावर जागा झाला. नाझी तुरुंगात एकांतवासात घालवणार असलेला हा त्याचा पहिला नाताळ होता. तेजेल येथील तुरुंगात एकांतवासात त्याने गेले नऊ महिने काढले होते. येथेच तो आणखी नऊ महिने काढणार होता व अखेर त्याच्या शेवटच्या घरी म्हणजे नाझी कोन्सनट्रेशन कॅम्पमध्ये त्याला पाठवले जाणार होते.

बॉनहॉपरला वाटले होते की त्याला सुटीसाठी सोडले जाईल पण ते अनिश्चित होते कारण त्याच्या वकिलावर तो विश्वास ठेऊ शकत नव्हता. कुटुंबासोबत नाताळ चालवण्याची त्याची कल्पना त्या थंड शांततेत मावळून गेली. आईवडील फक्त पत्राद्वारे त्याच्याशी संपर्क साधू शकत होते.

तेजेल मध्ये
तेजेल येथील तुरुंगातील  ७०० कैद्यांना खटला न चालवता  व निकालाशिवाय गुन्हेगाराची वागणूक दिली जात होती. त्यांना खूपच कमी जेवण मिळे, तोंडसुख घेतले जाई व बहुधा तुरुगाधिकारी लाईट लावण्यास नकार देत असे. त्यामुळे त्या जागेत अंधाराचे साम्राज्य वाढून त्यांना नैराश्य येई. बॉनहॉपरच्या कोठडीभोवती देहदंडाची वाट पाहणारे  कैदी होते . रात्री हे कैदी अस्वस्थपणे न झोपता हालचाल करीत बसत व त्यांना बांधलेल्या साखळ्यांच्या आवाजाने त्याला झोप येत नसे.

पण या ३७ वर्षांच्या विद्वान पाळकाला या गुदमरून टाकणाऱ्या दु:खामध्ये ख्रिस्तजन्माचा एक खोल अर्थ कळून येऊ लागला. एका मित्राला त्याने लिहिले, “ या प्रसंगाचे ही कोठडी हे उत्तम उदाहरण आहे. कोणी थांबतो, वाट पाहतो , उगाच काही निरर्थक काहीबाही करीत राहतो. पण दाराला कुलूप लावलेले असते आणि ते फक्त बाहेरूनच उघडले जाणार असते.”

ख्रिस्तजन्माच्या दोन बाजू

बॉनहॉपरसाठी ख्रिस्तजन्माच्या दोन बाजू होत्या. या घटनेला एक आशाहीनतेचे चिन्ह होते. देवाचे आगमन होईपर्यंत आपल्याला या पापाच्या तुरुंगातून सुटकेची आशाच नव्हती. आपण अडकलेले होतो व दोषी ठरलेले होतो आणि दरवाज्याला बाहेरून कुलूप लावलेले होते. आपल्याला बाहेरून सोडवण्यास आपण कोणावर तरी  पूर्णपणे अवलंबून होतो.

आणि तरीही ख्रिस्तजन्माची दुसरी बाजू – खिस्त या राजाच्या  जन्माच्या दुसर्या बाजूला आपल्याला दिसते की दु:ख अजूनही तसेच  आहे. यामुळे आपल्याला स्वातंत्र्य आणि आशा मिळते पण दु:ख पुसून जात नाही. मार्टीन लूथरने म्हटले आहे  “देव हा फक्त वधस्तंभ आणि दु:खातच मिळू शकतो.”  देवाच्या पुत्राच्या दु:खसह्नातच आपल्याला देव मिळतो.

एका तुच्छ गव्हाणीपासून तर त्याच्या वधस्तंभाच्या मरणापर्यंत देवाच्या पुत्राने दु:ख सहन केले. ख्रिस्त हा दु:खाशी परिचित होता (यशया ५३: ३). आणि दु:खाशी ख्रिस्त परिचित असल्यामुळे आपल्यालाही दु:खाचा परिचय करून दिला जातो (२ करिंथ १:५. १ पेत्र ४:१३).

देवाच्या पुत्राचे दु:खामध्ये असलेले ज्ञान आपल्याला चक्रावून टाकते. पापाची पूर्ण किंमत भरताना आपल्यासाठी दु:ख सहन करावे म्हणून ख्रिस्त कमकुवत , घाला करण्याजोगा असा बनला (फिली. ३:९). याचा अर्थ असा कि देवाचे मूल जेव्हा दु:ख सहन करते तेव्हा देवाने त्याच्याकडून पाठ फिरवली आहे म्हणून नव्हे तर देव त्याच्याजवळ आला आहे म्हणून. आपण ख्रिस्ताशी जडले गेलो आहोत आणि त्याच्या दु:खात आपण सहभागी होतो (फिली ३:१०).

अर्थभरित आणि खराखुरा ख्रिस्तजन्मदिन

आता मी बॉनहॉपरने  कार्ल आणि पौला या त्याच्या  आईवडिलांना १७ डिसेंबर१९४३ ला तेजेलच्या तुरुंगातून लिहिलेल्या पत्राकडे येतो. त्यामध्ये त्यांनी काळजी करू नये अथवा दुराव्यामुळे  संताप करू नये असे तो सांगतो. त्यांनी हा सण साजरा केल्याने त्याला आनंद होणार होता. त्यांनी एकत्र मेजवानी करावी आणि तो स्वत: पूर्वीच्या ख्रिसमसच्या आठवणींची  मेजवानी करणार होता.

एका ठिकाणी तो लिहितो:

ख्रिस्ती दृष्टिकोनातून पहिले तर तुरुंगाच्या कोठडीतला नाताळ तर तितकासा त्रासदायक नसणार. या इमारतीतले बहुतेक जण जेथे फक्त नावासाठी नाताळ साजरा केला जातो त्या ठिकाणांपेक्षा फारच अर्थभरीत नाताळ साजरा करतील.  हाल, विपत्ती, सुख, गरिबी, एकाकीपण, असहायता आणि दोषारोप याचा अर्थ देवाच्या दृष्टीने फार वेगळा असतो. नाव, जात, ठिकाणापासून तोंडे फिरवतील अशाच ठिकाणाकडे देव येतो , खिस्ताने गाईच्या गोठ्यात जन्म घेतला कारण त्याला कोणत्याच उतारशाळेत जागा मिळाली नाही. याचा अर्थ इतर लोकांपेक्षा कैद्याला अधिक चांगला कळतो आणि त्याच्यासाठी  ही खरच चांगली बातमी –शुभवर्तमान आहे.

आणि ज्या प्रमाणात तो ह्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावरून त्याला समजते की त्याचा देवाच्या कुटुंबामध्ये समावेश झालेला आहे  ही  काळ आणि सीमेच्या पलीकडची बाब आहे. आता तुरुंगाच्या भिंतींना अर्थच उरलेलं नसतो….

अत्यंत आदराने व प्रीतीने

तुमचा दियेत्रिच

दुखसह्नाने ख्रिस्तजन्माला अर्थ येतो

दु:खाची बाब ही आहे की जर आपला हा उत्सव उबदार वातावरणात व कुटुंब आणि मित्रांच्या सहवासात घालवत असलो तर  ख्रिस्तज्न्माचा हा अर्थ आपण गमावू शकतो. ज्यामुळे देवाच्या पुत्राला हे करावे लागले ती आपली असहायतेची आठवण आपण विसरून जातो.

Previous Article

मानव होणारा राजा      

Next Article

लेखांक ३: कृपा आणि वैभव

You might be interested in …

देवावर विश्वास (मार्गदर्शनासाठी) लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

रोजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तो देवाने नेमला आहे. जर आपण जीवनाला कंटाळलेले असू तर काहीतरी चुकले आहे. देवाच्या संकल्पनेविषयी आपण गल्लत केली आहे. देवाची आपल्या जीवनातील गुंतवणूक आपल्याला समजलेली नाही. अगदी उदासवाणे, दमणूकीचे […]

यावर विचार करा

पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल अन त्याला इम्मॅन्युएल म्हणतील यशया ७:१४ येशू हा देहधारी देव आपला प्रभू व तारणारा आहे आणि तरीही तो आपला भाऊ आणि मित्र आहे. चला आपण त्याची भक्ती अन प्रशंसा […]

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

देव मानवी ज्ञानाच्या एवढा विरोधात का आहे? हे ऐका: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” (१ करिंथ १:१९) हे लढणारे शब्द आहेत. आणि प्रेषित पौलाद्वारे आणखी पुढे जाऊन तो म्हणतो: “कारण […]