लेखक: डेविड मॅथीस
येशूचा जन्म कुमारिकेच्या पोटी झाला. देव मानव असलेल्या येशूचा हा एकमेव गौरव आहे.
संपूर्ण इतिहासात आतपर्यंत जन्मलेल्या अब्जावधी मानवांमध्ये एकाच व्यक्तीने जगामध्ये अशा रीतीने प्रवेश केला. देव आणि मनुष्य यांमध्ये एकच मध्यस्थ आहे. (२ तीम. २:५). आणि एकच व्यक्ती कुमारीकेद्वारे जन्माला आली. येशूचा विशिष्ट जन्म ही दंतकथा नाही किंवा शुभवर्तमानातली उद्देशरहित केवळ एक घटना नाही. हा विशेष सन्मान फक्त देवाच्या देहधारी पुत्रालाच बहाल केला आहे. आणि येशू ह्या व्यक्तीला ओळखण्यासाठी आणि ज्या देवाने स्वत:ला त्यच्यामध्ये प्रगट केले त्यासाठी हे फार महत्त्वपूर्ण आहे.
दंतकथा नव्हे तर दैवी
मत्तय आणि लूक यांनी अधिकारयुक्त वृतांत लिहिलेला आहे. तो फसवा, गुळमुळीत आहे असे मानण्यास कोणतेही कारण नाही. मत्तय हा पूर्वी जकात गोळा करणारा होता, त्यामुळे कोणाकडून सहज फसवला जाऊ शकत नव्हता. लूक हा डॉक्टर होता. वीस शतकांमध्ये आता वैद्यकीय शास्त्र खूपच प्रगत झाले असले तरी कुमारीला बाळ होऊ शकत नाही हा काही आता लागलेला शोध नाही. एन टी राईट हे कुमारीद्वारे जन्माचे जोरदार समर्थन करताना म्हणतात, “आपल्याइतकेच पहिल्या शतकातील लोकांनाही माहीत होते की लैंगिक समागमाद्वारेच बाळे जन्माला येतात. मत्तयाच्या वृतांतात योसेफाने मरिया गरोदर आहे असे ऐकले, त्याची समस्या त्याला जीवनाची सत्ये माहीत नव्हती म्हणून उद्भवली नाही तर माहीत होती म्हणून उद्भवली.”
लूकाने येशूच्या आईबरोबर याविषयी प्रत्यक्ष बोलणे केले – दोनदा तो लिहितो की “मरीयेने या सर्व गोष्टी आपल्या अंत;करणात ठेवल्या” (लूक २:१८,५१). यावेळी तो त्याच्या तिच्याशी झालेल्या वैयक्तिक संवादाची आठवण करत आहे. येशूचा जन्म हा दैवी आहे याची ती खात्री देवू शकत होती किंवा तो नाकारू शकत होती.
खिस्तजन्माच्या द्वाराशी संरक्षण
येशूच्या मानवी जन्माच्या अगदी आरंभापासून त्याच्या सार्वकालिक पित्याने त्याला असाधारण असे बाजूला काढून ठेवले. तो केवळ एक मानव नाही असे दाखवण्यासाठी देवाने अनेक चिन्हे दाखवली.
स्कॉटीश ईश्वरविज्ञानतज्ञ डॉनल्ड मकलोईड लिहितात:
‘ख्रिस्तन्माच्या रहस्यमय द्वाराशी कुमारीपासूनचा जन्म हा रक्षक म्हणून नेमला गेला आहे; आणि आपल्यापैकी कोणी त्याला ओलांडण्याचा घाईने विचार करू नये. नव्या कराराच्या उंबरठ्यावर तो उभा आहे, तो ठळकपणे दैवी (अलौकिक) आहे, आपल्या वास्तववादाला तो आव्हान देतो आणि आपल्याला माहिती देतो की यापुढे जे घडणार तेही अशाच प्रकारचे असणार आणि जर आपल्याला ते आक्षेपार्ह वाटत असेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही.”
ठळकपणे दैवी. आपल्या वास्तववादाला आव्हान. आणि दु:खाची गोष्ट म्हणजे आधुनिक टीकाकारांचे हे आवडते लक्ष्य आहे. पण आता असे दिसते की कुमारीपासूनचा जन्म आधुनिकतेच्या उद्धट कमकुवत दृष्टीपुढे टिकून राहिला आहे. आज तो अधिक सहजतेने स्वीकारला जातो. जे शुध्द निसर्गवादी आहेत ते म्हणतात की देव-मानवाचा जन्माचे स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. २००३ साली घेतलेल्या मतानुसार ७९% अमेरिकन कुमारीपासून झालेल्या जन्मावर विश्वास ठेवतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ख्रिस्ती नसलेले २७% ह्या सिद्धांताशी सहमत आहेत.
कुमारीकेपासून जन्म का?
कुमारिकेपासूनच्या जन्माचे महत्त्व काय आहे? देवाने असे करण्याचे का निवडले असावे?
पहिली गोष्ट म्हणजे ते दैवी भागावर प्रकाश टाकते. एका बाजूला येशूचे दैवी रीतीने झालेले गर्भधारण आणि जन्म आहे दुसर्या बाजूला त्याचे अलौकिक पुनरुत्थान आणि देवाच्या उजव्या हाताकडे स्वर्गारोहण आहे. दोन्ही टोकांशी देव – मानवाच्या अस्सलपणाची सत्यता पित्याच्या दैवी कार्याने सिध्द केली गेली.
दुसरी गोष्ट म्हणजे कुमारिकेपासूनचा जन्म दाखवतो की मानव जातीला एका मुक्तीदात्याची गरज आहे आणि ती स्वत;ला वाचवू शकत नाही. मानवजात स्वत:साठी उद्धारक निर्माण करू शकली नाही हे सत्य दाखवून देते की त्यांचे पाप व दोष इतके गहन आहेत की त्यांचा उद्धारक बाहेरून येण्याची आवश्यकता आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे कुमारिकेपासूनच्या जन्मामध्ये देवाचा पुढाकार दिसला जातो. देवदुताने मरीयेला तिची इच्छा विचारली नाही. तर त्याने जाहीर केले की ”पाहा ! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. “ लूक १:३१. देव मरीयेची परवानगी घेत नाही . तो कृती करतो – सौम्यपणे पण दृढतापूर्वक – आपल्या लोकांना पापापासून तारण्यासाठी (मत्तय १:२१).
शेवटी हा कुमारिकेपासूनचा जन्म याकडे इशारा करतो की पूर्ण मानव व पूर्ण देव असलेले दोन स्वभाव येशू ह्या व्यक्तीमध्ये एक झाले आहेत. या जगामध्ये अनंतकालिक शब्दाचा प्रवेश अशा रीतीने होण्याची आवश्यकता नव्हती. पण ती अशाच रीतीने झाली. याचे कारण वेन गुडमन अशा रीतीने देतात:
“देवाने त्याच्या सुद्न्यतेने येशूच्या जन्मामध्ये दैवी आणि मानवी प्रभावाचा संयोग आखला त्यामुळे येशूचे पूर्ण मानवीपण त्याच्या मानवी मातेद्वारे झालेल्या त्याच्या सामान्य मानवी जन्माने स्पष्ट दिसेल , आणि त्याचे पूर्ण देवत्व हे मरीयेच्या पोटी पवित्र आत्म्याच्या झालेल्या सामर्थ्यशाली कार्याद्वारे गर्भधारणा-मुळे स्पष्ट होईल.”
आपल्या विशेष अभिषिक्ताचे, सार्वकालिक पुत्राचे आगमन हे या अलौकिक जन्माद्वारे ठळक करावे असे देवाने निवडले.
कुमारिकेच्या द्वारे झालेल्याजन्मावर आपण विश्वास ठेवलाच हवा का?
जर देवाला आपला पुत्र अशा रीतीने पाठवायचा नसता तर कुमारिकेच्या जन्मावर विश्वास ठेवणे आपल्यासाठी महत्त्वाचे होते का? याचे उत्तर एक जोरदार होय असेच येईल. अशा रीतीने हे घडण्याची गरज नव्हती पण देवाने हे याच प्रकारे हे केले. देवाने असा विशिष्ट मार्ग नेमला आणि मत्तय व लूक यांनी हे आपल्या शुभवर्तमानात नमूद करावे अशी त्यांची नेमणूक केली. ह्या सिद्धांताचा नकार करणे म्हणजे बायबलबध्ये जे स्पष्ट खात्रीपूर्वक दिले आहे त्याचा नकार करण्यासाठी दार उघडणे होय. कुमारिकेपासूनचा जन्म बाद करणे म्हणजे बहुदा ईश्वरज्ञानाचा वैयक्तिक प्रवास संपुष्टात आणण्यासारखे आहे.
जर येशूचा कुमारिकेपासूनचा जन्म थोतांड असेल तर येशूची कहाणी ही खूपच बदलून जाईल: लैंगिक पापाला बळी पडलेली एक तरुण मुलगी आपल्या मुलाच्या जन्मामध्ये देवाचा अद्भुत हात असल्याचा दावा करीत आहे आणि त्या मुलाला वाढवताना तो देवाचा पुत्र आहे असे सांगते आणि मग त्याच्या धर्म ती स्वीकारते. जर मरिया ही एक पापी फसवी कलाकार असेल तर तिच्यावर किंवा तिच्या पुत्रावर विश्वास ठेवता येत नाही. परंतु येशूच्या आरंभीच्या जगिक जीवनासंबंधीचे बायबलचे स्पष्ट शिक्षण आणि त्याच्या आईचे चरित्र यामुळे धोक्यात येते; म्हणून कुमारिकेपासूनच्या येशूच्या जन्माच्या सत्यासाठी आपण झगडले पाहिजे.
होय येशूच्या असामान्य व वैभवी कुमारीकेपासूनच्या जन्मासाठी झगडणे ही फार उचित गोष्ट आहे.आणि ज्या गोष्टी झगडण्यासाठी लायक असतात त्या आनंद देणाऱ्या असतात. आपल्या जन्मापूर्वी अजून कोणतीच मानवी व्यक्ती अस्तित्वात नव्हती फक्त प्रारंभापासून अस्तित्वात असलेला येशूच असा आहे. आणि या पुरुषासारखे कुमारिकेच्या पोटी कोणीच जन्माला आलेले नाही. या देव मानवाचा हा एकमेव गौरव आहे.
Social