Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Apr 21, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा १    पाहणे आणि विश्वास ठेवणे   योहान १:१                      – स्टीफन विल्यम्स

धडा १    पाहणे आणि विश्वास ठेवणे   योहान १:१   – स्टीफन विल्यम्स

 

 • आपण देवाविषयी का शंका घेतो? (चर्चा करा)
  ▫   पाप, औदासीन्य, सहभागितेचा अभाव (इब्री ३:१२-१४).
  ▫   देवाच्या वचनाशी निगडित न राहणे.
  ▫   बायबलमधील संदर्भ न घेता अगदी निराळाच भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध लावणे.
  ▫   जगाच्या दबावामुळे विश्वास न ठेवणे.
  •  व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने कारणेही विविध असतात. पण म्हणून आपल्या कारणांना सबळ पुरावे  आहेत असा अर्थ होत नाही.
  ▫         सुमारे २००० वर्षांपूर्वी इ.स. ८०-८५ मध्ये योहान अगदी आपल्यासारख्याच मंडळीला हे पत्र                                                                   लिहीत आहे. ते शंकांना व सत्य नाकारणाऱ्यांच्या दबावाला तोंड देत होते. (त्या काळी अज्ञेयवाद                                                             पसरायला नुकतीच सुरुवात झाली होती. इतर काही गोष्टींबरोबरच येशू देव आहे हे सत्यही नाकारले  जात होते.)
  ▫       जरी शुभवर्तमानातील घटना नुकत्याच काही दशकांपूर्वी घडल्या होत्या तरी काही महत्त्वाच्या                                                                  सत्यांची त्यांना आठवण करून द्यावी लागत होती

                                                                                         शास्त्राभ्यास

जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो (योहान १:१).

जे अनंतकालिक आहे त्याला स्पर्श करता येतो

जे प्रारंभापासून होते

 • योहान पत्राची सुरुवात नेहमीप्रमाणे अभिवादनाने करत नाही. तो आपल्याला परिचित असलेल्या त्याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील भाषेने सुरुवात करतो.
  ▫         योहान १:१ – तो सार्वकालिक शब्दाचा संदर्भ देतो. कशाचीही सुरुवात होण्यापूर्वीपासून येशू                                                                   अस्तित्त्वात आहे. त्याला प्रारंभ नाही.
  ▫         येथे योहान आपल्याला सांगत आहे की जे सार्वकालिक आहे, ते स्पर्श करण्याजोगे झाले. म्हणजे                                                             जे पाहता येईल, न्याहाळता येईल, ऐकता येईल, हाताळता येईल असे झाले.
             ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. खोट्या शिक्षकांनी आध्यात्मिक व सार्वकालिक सत्ये आणि भौतिक गोष्टी  या  दोहोत भेद केला                 होता. ते असे शिकवायचे की आत्मिक गोष्टी चांगल्या असतात पण भौतिक गोष्टी वाईट   असतात. त्यामुळे “देव मानवधारी                       झाला” असे विधान करणे त्यांच्या दृष्टीने भयंकर पाप होते.
  ▫         योहान सुरुवातच असे म्हणून करतो की “जे प्रारंभापासून होते तेच मानवधारी झाले.”
  ▫         हे आम्हाला कसे समजले?  आम्ही ह्या सर्व गोष्टी पाहिल्या, ऐकल्या, न्याहाळल्या आणि                                                                            हाताळल्या.

                                                                                     खरा  अनुभव

                    जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले

 • या पहिल्या वचनाचे बारकाईने निरिक्षण करा. अनुभवाशी संबंधित असणारे शब्द लक्षात घ्या. पाहिले, ऐकले,  न्याहाळले व चाचपले. योहान ठामपणे सांगत आहे की ही एखादी भाकडकथा नाही तर ही ऐतिहासिक  सत्यघटना आहे.
   अनुभव प्रत्यक्षात कसा विकसित होत गेला हे तुमच्या तुमच्या लक्षात येईल.
  ▫         ‘पाहणे’ म्हणजे बाहेरील काहीतरी डोळ्यांनी ग्रहण करून सामावून घेणे. पण अनेक वेळा लोकांची                                                         त्यांच्या  नेत्रांनी फसवणूक केली आहे. किती वेळा तुम्ही आपल्या नेत्रांनी पाहिलेले चुकीचे ठरले असेल.
  ▫         म्हणून योहान ऐकण्याविषयी बोलतो – ऐकण्याने तुमचे कान काहीतरी ग्रहण करतात. या प्रेषिताने                                                          प्रसंग व संदेश ऐकले.
  ▫         पण साक्ष अजून भक्कम होत जाते. आता न्याहाळले जाते. हा शब्द केवळ नेत्रांनी पाहण्याशी                                                                 संबंधित नाही. तर  तुम्ही आपल्या पाहाण्यावर प्रक्रिया करता – तुम्ही समजून उमजून बुद्धीने पाहता                                                       – तुम्ही जे पाहत आहात  त्याचे मेंदूचा वापर करून पृथ:करण करता. जसे मरीयेने जे काही  अनुभवले त्या सर्व गोष्टींचे मनन                   करून तिने त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या.
  ▫       ‘चाचपले’ हा अधिक जबरदस्त शब्द आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट विकत घ्यायला जाता तेव्हा  सर्वात उत्तम                                          म्हणजे  ती हातात घेऊन बारकाईने तावून सुलाखून तिचे संशोधन करून तपासून ती अनुभवायची. कदाचित                                           येशूच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांनी ही गोष्ट केली असेल. सार्वकालिक  वास्तवता व्यक्तिश: तपासण्याची तेव्हा त्यांना                                संधी मिळाली होती.
  ۰   लूक  २४:३७-४० – त्याने आपल्या पुनरुत्थित शरीराला त्यांना स्पर्श करू दिला.
  ۰    लूक २४:४६-४८- ते प्रत्यक्ष साक्षी असल्याने शुभवर्तमान सत्य आहे व सर्व  राष्ट्रांना त्याची घोषणा केलीच पाहिजे. हेच आपल्या                  शुभवर्तमानात आहे.
  ▫       योहान या प्रकारे का बोलत आहे? त्याचा मुद्दा हा आहे की जे काही येशूविषयी शुभवर्तमानात  आहे, तो व त्याचे                                        प्रेषित जे काही बोलले, ते त्यांना प्रत्यक्ष मिळालेले ज्ञान होते. (कोणीतरी मला  सांगितले, असे नव्हे तर मी तेथे हजर                                   होतो!)

                                                                              जीवन बदलून टाकणारा अनुभव

                                                                                        त्या जीवनाच्या शब्दाविषयी

 • योहान सुवार्तेच्या संदेशाविषयी बोलत आहे. तो आपल्याला सांगत आहे की “आम्ही जे पाहिले, ऐकले, न्याहाळले व चाचपले” तोच संदेश शुभवर्तमानात समाविष्ट आहे .
  •   पण शुभवर्तमानाऐवजी तो दुसरा शब्द वापरतो. त्याला तो “जीवनाचा शब्द” असे संबोधतो. (पौलही  फिलिपै २:१६ मध्ये हाच शब्द           वापरतो.)
  ▫         तो कशावर लक्ष केंद्रित करत आहे तर शुभवर्तमानाच्या आशयावर – त्यात जीवनाविषयीचे शब्द आहेत, आणि ते                                    शब्द जीवन देतात.
  ▫         जेव्हा देवाच्या आत्म्याद्वारे आपण शुभवर्तमान उलगडू लागतो तेव्हा आपल्याल जिवंत  येशू भेटतो.
  •           तुमच्या माझ्यासाठी हेच सारे काही आहे. कारण (जर नव्हे) प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेल्यांची ही साक्ष  आहे. कारण (जर नव्हे)              बायबल मधील नोंदी विश्वसनीय आहेत. कदापि भ्रष्ट न होणाऱ्या प्रेषितांच्या  लिखाणात आपण याचा शोध घेऊ शकतो. मग                      प्रेषितांना आलेल्या वैयक्तिक अनुभवांमुळे त्यांचे जसे पूर्ण    रूपांतर झाले तसेच त्यांचा संदेश ऐकून आपल्यालाही वैयक्तिक                    रूपांतराचा अनुभव येईल!  येशू ख्रिस्ताला   आज आपण स्पर्श करू शकत नाही पण तरीही आपण त्याचा वास्तव अनुभव घेऊ              शकतो.
  ▫         येशूला पाहणे
  ۰         आपण  नेत्रांनी देवाला पाहू शकत नाही. पण शुभवर्तमानांच्या पानापानांतून जेव्हा आपण येशूला सामोरे येतो तेव्हा तो                             आपल्याला  त्या देवाची वैयक्तिक ओळख करून देतो (योहान १:१८).
  ۰         बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणेच आपलीही साक्ष होऊ शकते (योहान १:३४).
  ▫         येशूचे ऐकणे
  ۰         येशूचे ऐकणे म्हणजे त्याच्या विषयीचे केवळ ज्ञान मिळवणे नव्हे.
  ۰         येशूचे ऐकणे म्हणजे जीवन बदलण्याची घटना घडणे होय – कारण त्याचे वचन मृत आत्म्यासाठी जीवन                                                  असे आहे ( योहान ५:२५). हे देहाच्या पुनरुत्थानाला लागू आहे तसेच  त्याचे प्रथमफळ म्हणजे                                                                पुनरुज्जीवनालाही लागू आहे. त्याच्या वचनांमध्ये सामर्थ्य आहे.
  ۰        जे देवाचे आहेत त्यांचे लक्षण हे आहे की ते देवाची वचने ऐकतात  (स्वीकार करतात, अविश्वास दाखवत                                                  नाहीत) योहान ८:४७.
  ۰         योहान १०:२७-२८ मध्ये सारांश देतो – येशूची मेंढरे त्याची वाणी ऐकतात. जे ऐकतात, त्यांना सार्वकालिक जीवन देण्यात येते. ते             म्हणजे जिवंत देवाशी अतूट नाते.
  ▫         येशूला न्याहाळणे
  ۰        जसे शिष्यांनी निरीक्षणाने व पृथक्करणाने प्रथमदर्शनी निष्कर्ष काढला तसेच  त्यांनी विश्वासूपणे  शुभवर्तमानात ज्या नोंदी केल्या             त्या आपल्यालाही पृथक्करण करून बौद्धिक निष्कर्ष काढण्याची मुभा देतात – याचा उद्देश आहे; विश्वास ठेवणे, शंका न घेणे                 (योहान २०:३१;  ११:४५).
  ۰       येशूच्या नोंदींचे पृथक्करण करणे म्हणजे एका निश्चित निष्कर्षास येणे असल्याने येशू ख्रिस्तामध्ये आपण                                                   देवाचे गौरव पाहातो (योहान १:१४ – प्रत्यक्षात ‘आम्ही  देवाचे गौरव पाहिले’.

मी तुम्हास खचित खचित सांगतो,जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्याजवर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे , आणि त्याजवर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तर तो मरणातून जीवनात पार गेला आहे (योहान ५:२४).

चर्चेसाठी  प्रश्न

 •  शंकेशी लढा देण्याचे काही मार्ग कोणते?
  • कोणी म्हणतील की प्रेषितांना जसे ख्रिस्ताला पाहायला मिळाले तसे आपण त्याला पाहू शकत नाही तरीही   विश्वास ठेवण्याबाबत देव आपल्याला जबाबदार धरतो हा आपल्यावर अन्याय आहे. तो सरळ आपल्यालाही  का प्रकट होत नाही? याची आपल्याजवळ कोणती उत्तरे आहेत?
  ▫     चर्चेला सहाय्यक संदर्भ : योहान २०: २७-२९;  १६:७ (आपली त्यांच्यापेक्षा अधिक  चांगली परिस्थिती आहे)
  •           काही वेळा आध्यात्मिक शिस्त (प्रार्थना, वाचन, सहभागिता) सवयीच्या जबरदस्तीने राबवली जाते. येशूसोबत जिवंत नातेसंबंध                 जतन करण्याचे काही मार्ग कोणते?
  •           नित्यनेमाने १ले योहान संपूर्ण वाचत राहा. अज्ञेयवादाविषयी माहिती मिळवा.