Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on नवम्बर 25, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा ३२.                                          १ योहान ५:१९                                    स्टीफन विल्यम्स

धडा ३२. १ योहान ५:१९ स्टीफन विल्यम्स

                                                                     ख्रिस्ताच्या प्रीतीच्या खात्रीमुळे उपयोगी

जीवनाला हेतू असणे का महत्त्वाचे आहे?

वचन १९ योहानाचे दुसरे विधान सांगते. येथे तो आपल्याला आठवण करून देत आहे की मरण्यास चाललेल्या या जगात कोण आहेत आणि ही गोष्ट आपल्याला अभिमान नव्हे तर हेतू बाळगण्यास प्रवृत्त करते.

शास्त्राभ्यास

खात्री असणे म्हणजेच निश्चित ठाऊक असणे

आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे (१ योहान ५:१९अ).

योहान जे सांगत आहे त्याच्या दोन बाजू आहेत. पहिली गोष्ट ख्रिस्ती व्यक्तीचे मूळ कोठे आहे – आपण देवाच्या मालकीचे आहोत आणि याविषयी आपली पक्की खात्री आहे.
• या पुस्तकात याआधी आपण जे काही अभ्यासले ते संदर्भ विचारात घेतले नाहीत तर योहानाचे हे विधान अतिशयोक्तीने खात्री  दिल्यासारखे वाटेल. आपल्याला हे कसे ठाऊक होते? केवळ  वैयक्तिक भावनेने नव्हे तर पुरावा देवून.
१ योहान २:३ – आपण त्याच्या आज्ञा पाळल्यावरून आपल्याला कळून येते.
१ योहान ३:९ – आपल्याला कळते कारण आपण पापाशी लढा देत असतो.
१ योहान ३:१४ – आपल्याला कळते कारण आपण देवाच्या लोकांवर प्रीती करतो.
१ योहान ३:२४, ४:१३ – आपल्याला कळते कारण आपल्याला देवाचा आत्मा आहे.
• हा गर्विष्ठपणा नाही; तर आत्मपरीक्षण करून अगदी प्रामाणिकपणे केलेले हे विधान आहे. जर जीवनात आपण देवाचे मूल असल्याचे फळ सतत  दिसत असेल तर ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या समोर आपण कसे आहोत हे    खात्रीपूर्वक समजू शकते.
• योहानाच्या विधानाची दुसरी बाजू ख्रिस्ती व्यक्तीच्या हेतूविषयी आहे – आपण देवापासून आहोत.
जर योहानाला फक्त आपल्या मुळाविषयीच बोलायचे असते तर तो फक्त म्हणाला असता आपण देवा”चे”आहोत किंवा आपण देवा”कडचे” आहोत.
पण तो म्हणतो आपण देवा”पासून” आहोत. ही भाषा हेतूदर्शक आहे.
जेव्हा तो म्हणतो की आपण देवापासून आहोत तर याचा अर्थ आपण त्याच्या मालकीमुळे त्याच्याबरोबर आहोत परंतु काही खास हेतूने आपण आता या जगात आहोत. आपण देवाचे, त्याने पाठवलेले, त्याच्याकडून आलेले, त्याने योजलेल्या कामासाठी आलेले त्याचे राजदूत आहोत.

खात्री असणे म्हणजे उपयुक्त असणे

सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे (५: १९ब).

आपण “देवापासून आहोत” या अर्थाने या पुढच्या विधानाकडे पाहायला हवे. नाहीतर आपण “आम्ही आणि ते” एवढ्या मनोवृत्तीपाशीच आपण संपून जाऊ व या जगाच्या असलेल्या जगातील पापी लोकांच्या विरोधात तुलनेने स्वत:कडे गर्वाने पाहू लागू.
•  आपण त्या परूश्यासारखे होऊन म्हणू लागू की देवा, मी या जगासारखा नाही म्हणून मी तुझे उपकार मानतो (लूक १८:११). त्याच्यावर देवाची मेहरबानी झाली नाही.
• उलट योहानाची भाषा कळवळ्याने भरलेली आहे.
• या वचनातील कशामुळे आपण स्वत:कडे पाहत असता (” आपण देवापासून आहोत”) गर्वाकडून कळवळ्याकडे वळतो व या प्रकारे जगाकडे पाहू लागतो?
योहानाच्या संपूर्ण लिखाणात जगाचे संपूर्ण क्षेत्र  देवाच्या इच्छेप्रमाणे आज्ञापालनात राहण्याच्या अगदी उलट आहे (उदा. १ योहान २:१७)
जगात राहणारा विश्वासी ख्रिस्ती दररोज येता जाता पाप, अवज्ञा व अविश्वास याविषयी आपले मन कठीण करील व जगाशी नातेसंबंध ठेऊच नये अशी तीव्र इच्छा बाळगील.
पण येथे जगाचे वर्णन करताना कळवळा बाळगण्यासाठी योहान आपल्याला मदत करतो.
सगळे जग त्या दुष्टाच्या सामर्थ्याखाली आहे. येथे कसली धडपड नाही, जबरदस्ती नाही, संघर्ष नाही, लढाई हरलेली आहे. तो दुष्ट विजयी आहे व मालक आहे ( इफिस २:२; ६:१२ पाहा). वचन १९ मधील विश्वासी व्यक्तीला असलेले विशेष अधिकार व हक्क पाहा – तो दुष्ट त्यांना स्पर्शही करू शकत नाही.

उपयोगी ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्त घोषित करते

आपल्यापुढे दोन प्रकारचे लोकगट अस्तित्वात आहेत असे मांडले आहे. एक, जे देवापासून आहेत ते, आणि दुसरे, जे असहाय असून त्या दुष्टाच्या सामर्थ्याच्या अधीन आहेत; पापात मृत आहेत आणि सार्वकालिक नाशाकडे वाटचाल करत आहेत.
• यावर उपाय काय?
१ योहान २:२ पाहा: येशूच्या प्रायश्चित्त कोणासाठी पुरेसे आहे ते लक्षपूर्वक पाहा. केवळ आपल्यासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आहे याकडे बारकाईने पाहा.
तसेच १ योहान २:२ मध्ये “आपल्या” हा शब्द दाखवतो की येशू ख्रिस्त संपूर्ण जगासाठी अर्पिला गेला व अस्तित्वात आहे.
• या सर्वाचे सार हे आहे की –  तुमचा हेतू काय असावा? गर्व करणे नव्हे, तर येशू पाप व मरणापासून मुक्ती देतो हे तळमळीने घोषित करत राहणे हा असावा.
आपण या जगाच्या रहाटीवर प्रेम करत नसतानाच (१ योहान २:१५), आपण जगाचा द्वेष करायचा  नाही – पाप्यांना ख्रिस्ताकडे पाचारण करायचे. यासाठी की “त्यांनी” “आपल्यात” सहभागी व्हावे.

चर्चा व मननासाठी प्रश्न

  • जेव्हा जग किती पापात पूर्णपणे बुडून गेले आहे हे ख्रिस्ती व्यक्ती पाहते तेव्हा तिला असहाय वाटते. खालील वचने वाचा व चर्चा करा की आपली आशा कशी ख्रिस्तामध्ये रोपलेली आहे:
    ▫         योहान १२:३१;  १४:३०;  १६:११.