जनवरी 20, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा ४.  १ योहान १:५-७    खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स

 

  • तुम्हाला अशा लोकांशी कधी बोलण्याचा प्रसंग आला का, जे फार मोठमोठे दावे करतात पण त्यांचे जीवन त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणारे नसते?
    ▫         मला पोहायचे कसे ते माहीत आहे; विणकाम काय सोप्पे आहे!; मी एक उत्तम चित्रकार आहे; इ.                            ▫                           अशा लोकांची पारख करण्यात काही चूक आहे का? कोणी म्हणेल, नाही. पण जेव्हा खोटे दावे केले जातात तेव्हा पारख करणे               ओघाने येतेच कारण ते दावे धादांत खोटे असतात. मी जर म्हणालो की मला पोहोता येते; आणि तलावात बुडी मारली व                           बुडायला लागलो तर तुम्ही मला वाचवून बाहेर काढल्यावर माझे दावे कसे चुकीचे होते हे तपासण्याचा तुम्हाला नक्कीच हक्क                 राहतो.
    •           पण काही दावे सहज नाकारता येतात. तर इतर दावे नाकारणे कठीण असते. उदा. एकादी व्यक्ती दावा करील की  तिचे                        देवाशी  चांगले संबंध आहेत, “मी आत्मिक व्यक्ती आहे पण मी धार्मिक नाही.” त्यांचे हे म्हणणे खरे असल्याचे कोण नाकारील?
    ▫        एक बरे आहे की देवाला ओळखण्याविषयी जेव्हा दावा केला जातो, तेव्हा ती फक्त त्या व्यक्तीपुरती, वैयक्तिक बाब नसते.                      कारण तुमची येशूशी भेट झाली तर त्याचे परिणाम व्यावहारिक, जीवनाचे परिवर्तन  किंवा रूपांतर करणारे असतात.
    ▫       आपण सुवार्तेविषयीच्या विशेष तपशीलात व येशूच्या ओळखीत  शिरलो तर प्रेषित योहान देवाची ओळख असल्याचा दावा खरा             असल्याचे आपण कसे ओळखू शकतो याच्या व्याख्येनेच सुरुवात करतो असे आढळते. योहानाचे पहिले पत्र हे पुस्तक या                       विषयानेच भरलेले आहे. पण पुढील काही वचनांमध्ये लोक पापाविषयी जे तीन खोटे दावे करतात त्याविषयी योहान विधाने                       करतो. आज आपण त्यापैकी पहिला खोटा दावा पाहाणार  आहोत.

शास्त्राभ्यास

देवाचा स्वभाव खरा व उत्तम आहे

जो संदेश आम्ही त्याच्यापासून एकला आहे तो तुम्हाला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. १  योहान १:५

  • आरंभीच ज्या “जीवनाच्या शब्दाविषयी” योहान बोलला त्याचे अधिक तपशीलवार स्पष्टीकरण योहान येथे करत आहे. येशूच्या संदेशाचा काही आशय आपण येथे पाहातो.
    •           प्रथम व प्राधान्याने तो देवाच्या चारित्र्यावर जोर देतो. “देवापासून प्रकाश येतो” असे तो म्हणत नाही; तर “देव प्रकाश आहे” असे              तो म्हणतो. ही देवाच्या स्वभावासंबंधीची चर्चा आहे.
    •           या चर्चेसाठी तो प्रकाशाचे उदाहरण वापरतो.
    •           बायबलमध्ये प्रकाशाचे उदाहरण मुळात दोन प्रकारे वापरले आहे: सत्याविषयी बोलण्यासाठी (स्तोत्र ११९:१०५); आणि नैतिक                 दृष्टीने जे उत्तम आहे, त्याविषयी बोलताना (यशया ५:२०).
    •           या दृष्टिकोनातून जेव्हा आपण देवाविषयी विचार करतो, तेव्हा प्रकाशाचे उदाहरण देत योहान आपल्याला  आठवण करून देतो              की देव स्वभावानेच सत्य आहे; आणि जे सत्य तेच तो प्रकट करतो. पण त्याचवेळी तो  पूर्णपणे नीतिमान आहे.
    •           आपण प्रकाशाचा वापर का करतो?
    ▫        अंधार उघडपणे व स्पष्ट दिसावा व नाहीसा व्हावा. म्हणून आपण प्रकाशाचा वापर करतो. आपल्याला अंधारात मार्गदर्शन व्हावे               म्हणून आपण प्रकाशाचा वापर करतो. आपण जेव्हा प्रकाशात  चालू लागतो तेव्हा आपण अंधारातून बाहेर येतो.
    ▫         जेव्हा आपण एखादा भाग उजळून टाकतो, तेव्हा कोणी तरी  म्हणते, ” आता मला छान स्पष्ट  दिसते.” तरी मग तो कशावर तरी
    धडपडतोच. मग आपण निष्कर्ष काढतो की मला छान स्पष्ट  दिसते हा त्याचा दावा बरोबर नव्हता.
    •           त्याचप्रमाणे योहानही देव प्रकाश आहे याचे स्पष्टीकरण करतो. कारण सत्य व नीतिमत्तेच्या प्रकाशात असताना त्यानुसार                        आपल्या जीवनशैलीविषयी योग्य निष्कर्ष काढणे आवश्यक असते.

पाप देवाशी असलेली सहभागिता तोडते

त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही (१ योहान १:६).

  • प्रकाशाचे उदाहरण चालू ठेऊन योहान तीन खोट्या दाव्यातील पहिल्या दाव्याविषयी बोलतो.
    •           ही व्यक्ती दावा करते की ती देवाशी सहभागिता ठेवते (ऐक्य, सहभागिता, परस्परसंबंध). हे आपल्याला कसे समजणार? आपण
    त्याचा न्याय करायचा का? हे एखाद्याच्या खाजगी जीवनाविषयी बोलणे नाही का होणार?
    ▫        आता आपल्या पूर्वीच्या उदाहरणाप्रमाणे येथेही योहान दाखवतो की, देवाला ओळखण्याच्या आंतरिक वास्तवतेचे परिणाम बाह्य
    जीवनातून पडताळता येतात.
    •           देवाशी आपले नातेसंबंध असल्याचा जर एखादी व्यक्ती दावा करत असेल तर ती कशी दिसायला हवी?
    ▫        “मला स्पष्ट दिसते” असा दावा करूनही नेहमीच भिंतींवर व लाकडी सामानावर आदळणाऱ्या  व्यक्तीप्रमाणे नक्कीच त्यावरून               जे आपण देवाला ओळखतो असा दावा करतात  ते “अंधारात चालत नाहीत.”
  • “अंधारात चालणे”  याचा अर्थ काय ?
    ▫         “चालणे” हे कृतीवर जोर देते. ती सततची जीवनशैली असते.
    ▫         येशू त्याला अनुसरणे म्हणजे “अंधारात न चालणे” असे म्हणतो (योहान ८:१२). अशा रीतीने अंधारात चालणे म्हणजे अशी                       जीवनरहाटी असणे की येशूला न अनुसरणे, त्याची आज्ञा न पाळणे व  त्याची सेवा न करणे.
  • योहानाच्या काळातील खोटे शिक्षक दावा करीत असत की नीतिमान असण्याचा नीतिमान जीवन जगण्याशी काहीही संबंध नाही. हल्लीचे ख्रिस्तीपण असे आहे की “एकदा तारण झाले की कायमचे तारण झाले” म्हणजे ते म्हणते की एकदा का तुम्ही  ख्रिस्तामध्ये आलात की तुम्ही काय करता याला काही महत्त्व उरत नाही.
    •           ही गोष्ट जरी खरी असली की ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सर्वकाळासाठी सुरक्षित असतात, तरी सर्वकाळाकरता सुरक्षित                          असलेल्या आपल्या मेंढरांविषयी येशू जे म्हणतो  ते देखील सत्य आहे: “ती माझी वाणी ऐकतात, मी  त्यांना ओळखतो आणि ती                माझ्या मागे येतात” (योहान १० :२७).
    •           योहान म्हणत आहे की जे त्यांचे दावे खोटे ठरवणारी जीवनशैली जगतात, ते लबाड आहेत. ते ढोंगी आहे आणि त्यांची देवाशी                  सहभागिता नाही – असे त्यांची कृत्ये दर्शवतात.
    ▫        ते सत्याने वागत नाहीत – कारण त्यांच्या कृती त्यांचे सत्याचे दावे नाकारतात.

खरी सहभागिता पापरहित असते

पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे; आणि त्याचा पुत्र येशूख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते (१ योहान १:७).

  • उलटपक्षी ७ वे वचन खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचे लक्षण वर्णन करते. त्याची देवाशी सहभागिता असते. या वचनात दोन आशीर्वाद रेखाटले आहेत.
    •           जेव्हा एखादी व्यक्ती आपली देवाबरोबर सहभागिता असल्याचा दावा करते तेव्हा “तो जसा प्रकाशात आहे”    तसेच “प्रकाशात               चालून” ती आपला दावा सिद्ध करते. “प्रकाशात चालणे” याचा अर्थ काय?
    ▫         प्रकाश कोणताही अडथळा न येता मोकळेपणे चालण्याची मुभा देतो. शिवाय तो सर्व अंधकार घालवून देतो. तो सर्व काही                       बारकाईने नजरेस आणून देतो.
    ▫        येशूच्या “प्रकाशात जो चालतो” त्याला देवाच्या वचनाचे मार्गदर्शन मिळते. पण एवढेच नव्हे तर जेव्हा आपण “प्रकाशात चालतो”
    तेव्हा आपण देवासमोर उघड  होतो आणि प्रकाशात चालणाऱ्या इतरांसमोरही उघड होतो (नीति २८:१३).
    ▫         “प्रकाशात चालणे” म्हणजे निष्पाप  होणे नव्हे तर पापाचा समाचार घेण्याची तीव्र इच्छा असणे.                                                               आपल्या जीवनातील ‘काही पापांचे विभाग’ उघड करणे नव्हे तर खरेपणाने  देवापासून लपण्यास नकार देणे.
    •           परिणामी मिळणारे दोन आशीर्वाद कोणते?
    ▫         एकमेकांबरोबर सहभागिता – पुन्हा एकदा आपल्याला आढळते की योहानाच्या मनात नीतिमान जीवन जगणे ही खऱ्या ख्रिस्ती                सहभागितेची वाट आहे. पाप देवाबरोबरच्याच केवळ नव्हे तर परस्परांबरोबरच्या सहभागितेलाही अडखळण होत असते.
    ▫         पापांपासून शुद्धी – हे शुद्धीकरण कोठून येते? ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील घायाळ मरणाद्वारे.  योहान  त्याला “येशू ख्रिस्ताचे                        रक्त” असे संबोधतो.
    ۰            ते वर्तमानकाळातील, चालू असणारे शुद्धीकरण व पवित्रीकरण होय.
    ۰           योहान असे म्हणत आहे की आपली जीवने आपण देवासमोर उघड केल्यावर त्याचा उद्देश  आपल्याला  दंड करणे हा नसतो तर
    त्याच्या पुत्राद्वारे आपल्यामधून पापाचे अस्तित्त्व दूर करणे व पापाच्या कलंकापासून आपल्याला शुद्ध करणे हा असतो.
    ۰           येशूच्या अनुयायास माहीत असते की देवासमोर उघड होण्याने वाटणारी लज्जा तात्पुरती असते. कारण दूरगामी परिणाम “सर्व                पापांपासून शुद्ध होणे” हा असतो.
    ۰           नीति २८:१

चर्चेसाठी प्रश्न

  • आपण देवापासून पाप का लपवतो?
    •           आपण चर्चमधील ही संस्कृती कशी बदलू शकू की जेथे लोक पापाबद्दल पश्चात्ताप करायला घाबरतात? या गोष्टीला आपण कसा               अटकाव करू शकू?
    •           आपल्याला देवाची ओळख आहे असा खोटा दावा करणाऱ्या लोकांना आपण कसे हाताळावे? त्यांना देवाची कृपा दाखवता                      येईल अशा प्रकारे आपण त्यांना कसे हाताळू शकू?
    •           वैयक्तिक लागूकरण: तुम्ही पापाकडे हलगर्जीपणे पाहता का? तुमच्या  पापकबुलीच्या खरेपणाबद्दल पुन्हा विचार  करा.

 

 

 

 

Previous Article

देव आपल्या अंत:करणाचे डोळे कसे उघडतो?

Next Article

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

You might be interested in …

 कुटुंबात ख्रिस्त

 लेखांक १ “तो घरात आहे असं ऐकण्यात आलं” (मार्क २:१) ख्रिस्ती घर! ख्रिस्ती कुटुंब! कुठल्याही घरासंबंधी किती किती गोष्टी ऐकण्यात येतात, बऱ्या अन् बुऱ्याही! बऱ्यांपैकी सर्वात चांगली गोष्ट कोणती? ‘ख्रिस्त या घरात, कुटुंबात आहे.’ हीच […]

एक वेदनामय आणि सुंदर दफन – अंधारात देवाचे आज्ञापालन

गेविन ऑर्टलंड येशूने क्रूसावर त्याचा शेवटचा श्वास सोडल्यानंतरच्या तासांचा आपण फारसा विचार करत नाही. पवित्र आठवड्यामध्ये आपण गुरुवार, शुक्रवार आणि रविवार यावर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि ते योग्यच आहे. पण येशू मरण पावला आणि […]

क्षमा करणे हे आध्यात्मिक युद्ध आहे

मार्शल सीगल आपल्या जीवनात गोंधळ आणि दु:ख होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या जिवाच्या शत्रूची किंमत आपण कमी करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यातील काहीजण सैतानाचा व त्याच्या हस्तकांचा विचारही करत नाही आणि केलाच तर त्यांचे […]