Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 8, 2018 in जीवन प्रकाश

देव आपल्या अंत:करणाचे डोळे कसे उघडतो?

देव आपल्या अंत:करणाचे डोळे कसे उघडतो?

लेखक जॉन पायपर

एखादी अंध असलेली व्यक्ती देव खरा कोण आहे हे त्याच्या गौरवासाठी कसे पाहू लागते?
नैसर्गिक डोळे, कान आणि मेंदू हे या प्रक्रियेचे भाग आहेत हे नक्की. त्यांच्याशिवाय आपण देवाने त्याचे गौरव प्रकट केलेल्या गोष्टींचा अर्थही लावू शकणार नाही. उदा. निर्मिती, ख्रिस्ताचे देहधारण, शुभवर्तमान, शास्त्रलेख. पण ह्या नैसर्गिक रीतीने दिसणाऱ्या गोष्टी देवाचा गौरव पाहण्यास निर्णायक ठरत नाहीत. मत्तय १३:१३ मध्ये येशूने म्हटले, “ते पाहत असता पाहत नाहीत.” याचा अर्थ नैसर्गिक डोळे, कान आणि मेंदूच्या उपयोगापेक्षा आणखी काहीतरी घडणे आवश्यक आहे.

प्रेषित पौल ते ह्या शब्दात मांडतो, “तुमच्या अंत:करणाचे डोळे प्रकाशित होऊन…तुम्ही जाणावे” (इफिस१:११). हे पण विचित्र आहे – अंत:करणाला डोळे आहेत! पण तरीही ते आकलन होण्यापलीकडचे नाही.
बहुतेक लोक ह्रदयासंबंधी बोलताना तो आपल्या छातीच्या पोकळीत ठोके देत असलेल्या एक अवयवापेक्षा काहीतरी अधिक आहे हा अर्थ सोयीस्करपणे वापरतात. ही भाषा आपल्याला परकी वाटत नाही.  आपण जे खरे आहोत ते; म्हणजे आपले अंत:करण. आपल्याला आतून माहीत आहे की आपण हाडे व मांस यापेक्षा अधिक आहोत. आपल्याला माहीत आहे की आपण कातडीच्या पोत्यात भरलेली रसायने नाहीत. जर आपण यावर विश्वास ठेवला नाही तर न्याय आणि प्रीती अशा गोष्टींवर आपण बोललो नसतो.

ह्रदयाचे डोळे

तर मग ह्या अमूर्त व्यक्तिमत्त्वाला अमूर्त डोळ्यांची कल्पना देणे जरा विचित्र वाटते – “अंत:करणाचे डोळे?” जी ही आंतरिक व्यक्ती, आपण खरे आहोत ते आम्ही आपल्या शरीराचे डोळे जे पाहतात त्याच्याशी समरूप नाही. पास्कलने म्हटले, “ह्रदयाला त्याचे तर्क असतात जे तर्काला ठाऊक नसतात. हे आपल्याला हजारो गोष्टींत जाणवते.” नैसर्गिक पाहण्यापलीकडे असलेले एक आध्यात्मिक पाहणे आहे. नैसर्गिक ऐकण्यापलीकडे असलेले एक आध्यात्मिक ऐकणे आहे. नैसर्गिक तर्का पलीकडे असलेले एक आध्यात्मिक सामंजस्य आहे.
तर मग जेव्हा अंत:करण देवाचा गौरव पाहतो तेव्हा काय घडते हे आपल्याला कसे आकलन होणार? पौल जेव्हा देवाचे निसर्गातील गौरव याबद्दल बोलतो त्यातून मला यासाठी एक निर्देशक खूण दिसली. एका बाजूला पौल म्हणतो आपण सर्व देवाला “ओळखतो.”

देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत” (रोम १:२१). हे चकित करणारे आहे. सगळे देवाला ओळखतात! पण इतर ठिकाणी पौल जोरदारपणे म्हणतो की निसर्गत: लोक देवाला ओळखत नाहीत. उदा. “कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही” (१ करिंथ १:२१). “देवाला न ओळखणार्‍या परराष्ट्रीयांप्रमाणे” (१ थेस्स. ४:५). “तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता” ( गलती ४:८).

देवाला कोण ओळखतो?

जेव्हा पौल रोम १:२१ मध्ये म्हणतो की सर्वजण देवाला ओळखतात तेव्हा त्याचा अर्थ काय? ह्याचे उत्तर आपल्याला रोम १:१९-२० मध्येच मिळते. “कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये.”
पण ते देवाला ओळखत होते असे म्हणताना पौल फक्त याच अर्थाने ते म्हणतो का? मला वाटते त्याच्या आधी काही आहे. रोम २:१४-१५ मध्ये पौल म्हणतो, “ज्या लोकांनी देवाचे नियमशास्त्र कधीही ऐकले नाही ते काही वेळा नियमशास्त्राची जी अपेक्षा आहे त्यानुसार वागतात. त्यांची सदसद्विवेकबुद्धीही  देवाच्या इछेची साक्ष देते.” तो म्हणतो, “ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात.”
म्हणून मी असे सुचवतो: रोम १:२१ मधील देवाला ओळखणे यामध्ये रोम २:१५ मधला हा खोल अंत:करणाचा अनुभव आहे. देवाचे अगम्य ज्ञान व त्याची इच्छा यांचे आकलन होण्याचा नमुना किंवा साचा मानवी ह्रदयात आहे. ह्या नमुन्याची रचना देवाने प्रत्येक ह्रदयात एका विशिष्ट आकारात किंवा रचनेत केलेली आहे व ते देवाच्या गौरवाशी संबंधित आहे. दुसऱ्या शब्दांत देवाचा गौरव जर ह्रदयाच्या डोळ्यांनी पाहायचा असेल तर तो या साच्यात इतका परिपूर्ण बसेल की आपल्याला कळेल की देवाचे गौरव हे खरे आहे. आणि आपल्याला समजेल की आपल्याला ह्यासाठीच घडवले गेले आहे.
जेव्हा पौल म्हणतो मानव देवाला ओळखतात किंवा मानवांच्या अंत:करणात नियमशास्त्र लिहिले आहे तेव्हा याचा अर्थ तेथे एक गौरवाच्या आकाराचा साचा प्रत्येक ह्रदयात असून तो देवाचे गौरव मिळण्याची वाट पाहत आहे. आपल्या प्रत्येकाला देवाची ओळख आहे ही या अर्थाने की, आपल्या ह्रदयात ही साक्ष आहे की आपण त्याच्या गौरवासाठी उत्पन्न केले गेले आहोत. तेथे एक सुप्त अपेक्षा व उत्कट इच्छा आहे आणि तिचा साचा आपल्या अंत:करणात खोलवर पुरला गेला आहे.

अंत:करणे कठीणतेने भरलेली आहेत

आपण देवाचा गौरव पाहत नाहीत याचे कारण हा साचा चुकीचा आहे किंवा देवाचा गौरव प्रकाशत नाही असे नाही. याचे कारण “अंत:करणाची कठीणता” (इफिस ४:१८). ही कठीणता म्हणजे देवाबद्दलचा खोलवर तिटकारा आणि त्याला अनुरूप अशी स्वत:ला उंच करण्याची आवड. पौल म्हणतो, “कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण” (रोम ८:७). आणि येशूने म्हटले, “जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.”
म्हणून मी देत असलेल्या साच्याचा अर्थ लक्षात घेणे म्हणजे – देवाने पूर्ण समाधान देण्यासाठी हा साचा प्रत्येकासाठी तंतोतंत बनवला गेला असला तरी तो त्याऐवजी इतर गोष्टींच्या प्रीतीने खचून भरलेला आहे. यामुळे जेव्हा देवाचा गौरव आपल्या अंत:करणात प्रकाशू लागतो – निर्मिती अथवा येशूचे देहधारण किंवा सुवार्ता यांद्वारे – तेव्हा त्याला जागा दिसत नाही. त्याचा काही परिणाम होत नाही किंवा ते योग्य नाही असे मानले जाते.
स्वाभाविक वृत्तीच्या  माणसाला – ज्याचे गौरवाच्या साच्याचे मन अनेक मुर्त्यांनी खचाखच भरलेले असते – त्याला देवाचे गौरव मूर्खपणाचे वाटते (१ करिंथ २:१४). ते त्याच्या साच्यात बसू शकत नाही. ज्यांचा कठीणपणा येशूचा खून करण्यापर्यंत पोचला होता त्यांना येशूने म्हटले; “तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही; म्हणून तुम्ही मला जिवे मारायला पाहता” (योहान ८:३७). अर्थातच ते त्याच्या वचनाचा अर्थ लावू शकत होते आणि आठवू शकत होते. पण त्यांना ते वैभवी, गळ घालणारे किंवा सुंदर वाटले नाही.
त्यांनी ते शब्द ऐकले पण ते त्यांना आवडले नाहीत. जो साचा देवाच्या वैभवाचा प्रकाशासाठी तयार केला गेला होता त्याऐवजी त्या साच्यामध्ये असलेला अंधकार त्यांना प्रिय वाटला.

देवाने रिते करणे

जर आपण योग्य मार्गावर असलो तर वचनामध्ये  देवाचा गौरव पाहण्याची एकमेव आशा म्हणजे देवाने हिऱ्याचा कठीणपणा फोडायला पाहिजे. या साच्यात ठासून भरलेल्या या मूर्ती देवाने त्याच्या गौरवासाठी भग्न करायला हव्यात.
ह्या दैवी कृतीविषयी बायबल अनेक मार्गांनी बोलते.  २ करिंथ ४:६ मध्ये हे दैवी काम “देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात प्रकाशणे” असे म्हटले आहे. २ तीम. २;२५ मध्ये “सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्‍चात्ताप बुद्धी मिळणे,” फिली. १:२९ मध्ये “विश्वास देणे,” १ पेत्र १:२३ व याकोब १:१८ मध्ये वचनाद्वारे नवा जन्म मिळणे, मत्तय १६:१७ मध्ये पित्याचे विशेष प्रकटीकरण, मत्तय ११:२७ मध्ये पुत्राचे प्रकटीकरण, अंत:करणाचे डोळे प्रकाशित होणे (इफिस १:१८) आणि देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान मिळणे, असे म्ह्टले आहे.
जेव्हा हे आश्चर्य आपल्यामध्ये घडते तेव्हा देवाचा गौरव आपल्या साच्यातून हे आत्मघाताचे काठिन्य, परक्या गोष्टींची प्रीती भेदून टाकतो, जाळून टाकतो व वितळून टाकतो व स्वत:चे योग्य स्थान घेतो. आपण ह्याच्यासाठीच निर्माण केले गेलो आहोत. वचनामध्ये या गौरवाच्या सच्चेपणाची  साक्ष अगणित आहे. जेथे पूर्वी आपल्याला फक्त मूर्खपण दिसले तेथे आपल्याला सर्व समाधान देणारे देवाचे सौंदर्य दिसते. देवानेच हे घडवले आहे – दैवीपणाने.
ख्रिस्ती शास्त्रलेख हे इतके आकर्षून घेणारे, इतके समाधानकारक वाटावे असे कोणी फक्त इच्छा करून अनुभवू शकत नाही. दिसणे ही देणगी आहे. तसेच देवाच्या वचनाला मुक्तपणे आलिंगन देणे ही देवाची देणगी आहे. देवाचा आत्मा आपल्या ह्रदयाचे डोळे उघडतो. आणि जे पूर्वी कंटाळवाणे, खूळचट, मूर्ख, अथवा पुराणकथेचे वाटले ते आता अगदी सत्य असल्याचा स्वत:च पुरावा देणारे दिसते.