जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

चर्चला जाण्याची पाच अयोग्य कारणे ग्रेग मोर्स

एक पाळक मला ठाऊक आहेत, छताला कोणता रंग द्यायचा यावरून त्यांच्या मंडळीची दुफळी झाली.

जर रंग कोणता द्यायचा यावरून मंडळी दुभागते तर कोणीही प्रश्न विचारेल: चर्चला जायचं तरी कशाला? देवाची उपासना करायला? करमणूक करून घ्यायला? आपल्या हव्या त्या गोष्टी मान्य केल्या जाव्यात म्हणून?

आपण उपासनेला का जातो?

जेव्हा लोक बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा उपदेश ऐकायला गेले तेव्हा येशूनेही हाच प्रश्न विचारला होता. “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय? तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? मी तुम्हांला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. ‘पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे (मत्तय ११: ७-१०)

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या सेवेचे अवलोकन करून आणि ख्रिस्ताने समुदायाला जे प्रश्न विचारले त्यावरून देव आपल्याला चर्चला जाण्याची पाच अयोग्य कारणे देतो.

१.  आरामशीर वाटावे म्हणून

“तुम्ही काय पाहायला रानात गेला होता” (मत्तय ११:७)?

आपण जर दक्षता घेतली नाही तर ज्यांना सामाजिक क्लबचा सभासद होणे परवडत नाही त्यांना चर्च  हा एक क्लबसाठी पर्याय होऊ शकतो. मोलाची मोफत काळजी, प्रेरणादायी संदेश, अगत्यशील लोक, चहा आणि सर्व प्रकारच्या सुविधा, अशा गोष्टी देवावर प्रेम न करणाऱ्या व्यक्तीलाही आकर्षून घेऊ शकतात. अशा सुविधा वाईट आहेत असे नाही पण त्यामुळे जर आपल्याला झोप येत असेल किंवा आपला उत्साह बोथट होत असेल तर नाही.

येशू इस्राएल लोकांना आठवण करून देतो की ते अरण्यात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ऐकायला गेले होते. एका आरामशीर सभागृहात कॉफी घेत सवडीनुसार देवाचे वचन ऐकायला गेले नव्हते.  देवापासून ऐकण्यासाठी गैरसोय सोसण्याची त्यांची तयारी होती. आपण अरण्यात जाऊन, खडबडीत बाकांवर बसून, वेडेवाकडे गाणे वाजवणाऱ्या संगीतासह इतर देवाच्या संतासमवेत उपासना करायला जाऊ का? ते अरण्यात योहानाचे ऐकायला गेले होते. पार्टी, झगमगते दिवे, भव्य हॉल यांनी त्यांना आकर्षून घेतले नव्हते. ते अशा ठिकाणी स्वत:हून कधीच गेले नसते. योहान तिथे होता म्हणून ते गेले.

२. डळमळीत मते ऐकण्यासाठी

“तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय” (मत्तय ११:७)?

आज जे प्रचलित आहे त्याच्याशी  येशू सामना करत आहे. अनिश्चित शिक्षण. हा संदेष्टा काही आजचा प्रसिध्द प्रवक्ता नव्हता जो त्याला हवे तसे स्पष्टीकरण करतो आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून बायबलच्या सनातन विश्वासाला प्रश्न करतो. योहानाने आपल्याला अनुयायी मिळावे म्हणून किंवा शंका – संशय निर्माण करून आपला सच्चेपणा सिध्द केला नाही. त्याने चर्चा विनिमय केला नाही. त्याने उपदेश केला. त्याने प्रश्न विचारले नाहीत त्याने उत्तरे दिली. तो वाऱ्यावर हेलकावत गेला नाही तो खडकासारखा निश्चल होता.

येशूचे हे श्रोते देवासाठी बोलणाऱ्या देवाच्या माणसाचे ऐकायला गेले होते. जन्मापासून आत्म्याने भरलेला योहान तळपत होता. त्या इस्रायली लोकांप्रमाणे आपण अशा नम्र सेवकांचे ऐकण्याची उत्कट इच्छा धरावी. जे सत्य सांगण्याबद्दल दृढ असतात व त्यांच्या नम्रतेमुळे ते त्या सत्यावरच अवलंबून राहतात. असा सेवक जेव्हा धाब्यावरून देवाचे वचन गाजवतो (मत्तय १०:२७) तेव्हा स्वत:संबंधीची कुजबुजही तो नाहीशी करतो. ज्यांना शंका आहेत व ज्यांनी ‘अजून नक्की  विचार केला नाही’ त्यांनी शिकवायचे धाडस करू नये.

३. करमणूक करून घ्यायला

जो प्रवक्ता सत्य सागून त्यांना इजा करणार होता आणि खोट्या शिक्षणाला सामना देणार होता त्याच्याकडे जाण्यास त्यांनी माघार घेतली नाही. ते योहानाचा पुढील संदेश ऐकायला गेले होते:

“अहो सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हांला कोणी सावध केले? ह्यास्तव पश्‍चात्तापास योग्य असे फळ द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. (मत्तय ३:७-९)

त्यांच्या कानांना खाज सुटली नव्हती आणि आपल्या स्वेच्छाचाराने ते शिक्षकांना जमा करत नव्हते (२ तीम. ४:३). त्यांच्या जिवासाठी जे चांगले अशा कठीण गोष्टी बोलण्यास भिणाऱ्या माणसाकडे ते गेले नाहीत. योहानाने त्यांची खुशामत केली नाही. त्याने त्यांच्या खोट्या आशांना आव्हान केले. आणि शास्त्री व परूशी यांना आपण अब्राहामाचे संतान असणाऱ्या आशेला तडा दिला.

हल्ली जे कृपा स्वस्त करतात व केवळ विश्वास ठेवायला लोकांना बोलावतात त्यांच्याप्रमाणे योहान नव्हता. त्याने लोकांना क्षमा मागण्यास आवाहन केले पण “पश्चात्तापाला योग्य अशी फळे द्या” असे सांगितले. जे आपल्या पापात मशगुल होते अशा लोकांच्या  “तो एक कायदेशीर धर्म सादर करतो” अशा आरोपाला तो भीत नव्हता. त्याचे श्रोते तेथे बसून असा प्रेरणादायी संदेश ऐकून तेथून विचलित न होता तेथून निघणे अशक्य होते. अरण्य आणि संदेष्टा हे स्वस्थ बसून करमणूक करून घेण्यासाठी चुकीचे ठिकाण होते. संदेष्ट्याचे ऐकावे, विश्वास ठेवावा, पापे कबूल करावी, पश्चात्ताप करावा आणि बाप्तिस्मा घ्यावा यासाठी ती जागा होती.

४. वास्तवापासून संरक्षण मिळण्यासाठी

“आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते” (मत्तय ३:१०).

जेव्हा जुन्या करारात देव खोटे संदेष्ट व याजक यासंबधी बोलत असे तेव्हा त्याने वारंवार हेच सांगितले,
“शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात” (यिर्मया ६:१४).

आपण असा संदेष्टा नाही हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सिध्द केले. त्याने इशारा दिला की, “जर त्यांनी पश्चात्तापाला योग्य अशी फळे दिली नाहीत तर ते कापून टाकून त्यांना अग्नीमध्ये टाकले जाईल” – न विझणाऱ्या अग्नीत- (मत्तय ३:१२). त्याने लोकांची जखम वरवर बरी केली नाही.  न्याय व नरक यांच्याबद्दल तो गुळमुळीतपणे बोलला नाही. त्याने आपण देवापेक्षा अधिक प्रेमळ आणि क्षमाशील असल्याचे ढोंग त्याने केले नाही. अनंतकालिक सत्ये वा अविनाशी जीव ही त्याने सहजपणे हाताळली नाहीत.

येशूच्या आगमनाची तयारी करणाऱ्याने देवाच्या कोकऱ्यासाठी तुतारी वाजवून तयारी केली. कारण शास्त्रलेखात अचूकपणे सांगितले आहे की या जीवनातच अनंतकाळचा मार्ग निश्चित केला जातो. आता जर तुमची जीवनरूपी नाव बुडाली तर तुमचा कायमचा नाश होणार. जर एखादा उपदेशक -काहीच बिघडणार नाही, नरकाचे तोंड उघडलेले नाही, स्वर्ग तुम्हाला साद घालतो  – असे सांगतो. जर तो दुष्ट गोष्टींना पुलपिटवरून हसतो आणि मनोरंजक गोष्टी सांगून चांगले राहण्याचे शिकवतो, पण येशू आपल्याला वाचवण्यासाठी देऊ करत असलेल्या क्षमेची किंमत कमी करतो तर तो त्याच्या जागेसाठी पात्र नाही.

५. विशेषकरून आपल्यासबंधी ऐकण्यासाठी

तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? मी तुम्हांला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे” (मत्तय ११:९-१०).

योहानाची सेवा ही सर्व खरे ख्रिस्ती सेवक जे करतात त्यांचे प्रतिक आहे. ते कायम ख्रिस्ताकडे निर्देश करतात. ते स्वत: प्रकाश नाहीत पण ते प्रकाशाची साक्ष म्हणून उभे राहतात यासाठी की सर्वांनी येशूवर विश्वास ठेवावा. ते योहानाबरोबर म्हणतात, “ हा पहा जगाचे पाप जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहान १:२९) आणि “त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे” (योहान ३:३०) ज्या ख्रिस्ताच्या वहाणेचा बंद सोडायला ते लायक नाहीत त्यालाच ते सर्वस्व मानतात.

ते माणसाचा गौरव करत नाहीत तर ख्रिस्ताचा. ते स्वत:कडे निर्देष नाहीत तर ख्रिस्ताकडे. ते फक्त जीवन स्वच्छ करण्याचे शिकवत नाहीत तर वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवतात. योहानाचे श्रोते देवापासूनचा संदेश ऐकायला गेले होते आणि त्यांनी येणाऱ्या मशीहाबद्दल ऐकले. सर्वात महान पुरुषाने दुसऱ्याबद्दल घोषणा केली (मत्तय ११:११).

जर देवाच्या माणसाने ख्रिस्ताचे गुणविशेष धैर्याने गाजवले तर सर्वात चांगले म्हणजे आपल्याला अधिकाधिक ख्रिस्त प्राप्त होईल.

Previous Article

देव नेहमीच मेज तयार करतो मार्शल सीगल

Next Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

You might be interested in …

असमाधान

लेखक: अॅबीगेल ससाणे समाधानी नसणे किंवाअतृप्त असणे या समस्येशी आपल्या सर्वांचाच झगडा चालू असतो. ही समस्या कदाचित आपल्या जीवनातील लोकासंबधीअसेल, आरामदायी जीवनशैलीचा अभाव असेल, कामावरची कठीण परिस्थिती असेल, अनपेक्षित आजाराशी करावा लागणारा मुकाबला असेल. अशा […]

कोमट कसे राहू नये

लेखक: ग्रेग मोर्स अनेक वर्षे मी समजत होतो की मी ख्रिस्ती आहे -पण मी नव्हतो. माझे आणि देवाचे नाते आहे हे मी शपथेवर सांगे- पण तसे नव्हते. मी कोणत्याही क्षणी मेलो तरी स्वर्गात माझे स्वागत होईल […]

तुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का? लेखक : मार्शल सैगल

कोणत्याही पुस्तकाच्या स्टोअरमधून चक्कर टाका आणि तुम्हाला वाटेल की येथे आपल्यासाठी सुखाचा एक कोपरा  आहे. प्रत्येक पुस्तकाचे मुखपृष्ठ काहीतरी नव्या आणि खोल समाधानाचे अभिवचन देत असते. प्रत्येक पुस्तकाचा खप हजारो प्रतींचा असतो. सवयी, नातेसंबंध, खाण्याचे […]