दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जेव्हा काय करायचं हे तुम्हाला समजत नाही डेव्ह झल्गर

संकट इतके झटकन आणि इतक्या जोराने तुमच्यावर आले की काय करावे ते तुम्हाला समजेना असे नुकतेच तुमच्यासाठी केव्हा घडले?

माझी पत्नी गेले आठ वर्षे तीव्र वेदना सहन करत जगत आहे. पण अगदी नुकतेच ती एका सकाळी उठली आणि  तिच्या प्रकृतीच्या नवीनच काळजीमुळे आम्हाला एका गोंधळात टाकणाऱ्या भीतीदायक सत्यासमोर आणले – आम्ही ज्याच्याबरोबर रोज न रोज सामना करत होतो त्यात ह्या ओझ्याची अधिकच भर पडली. नुकतेच आम्ही नव्या घरात राहायला गेलो होतो आणि नवीन चर्चला जायला सुरुवात केली होती. त्या चर्चचा मी पाळक होतो. नुकतेच जन्मलेले आमचे बाळ केवळ सहा आठवड्यांचे होते.

आमच्या परिस्थितीचे सैन्य जणू आमच्यावर हल्ला करत आहे असे आम्हाला वाटले. पती आणि बाप या नात्याने माझा तोल ढळतोय असे मला वाटत होते. मला उत्तेजन देणारे कोणीच नव्हते. माझ्या पत्नीला उत्तेजन द्यायला मी असमर्थ आहे असे मला वाटले. देवा असं का? इतक्या वर्षांच्या तिच्या तीव्र वेदनानंतर  – आणि त्यातून आमचा चांगला देव काय निष्पन्न करत आहे हे पाहिल्यावर – मला वाटले की मी विश्वासामध्ये पुन्हा पहिल्या पायरीवर आलो आहे – जसे एका धाग्याला पकडून टांगत आहे. मी पाळक म्हणून दुसऱ्यांची सेवा करायला हवी होती पण आता मी देवाशी केवळ एकच वाक्य बोलू शकत होतो “मला मदत कर.”

स्वयंपूर्णतेचे ढोंग

त्या दरम्यान मला एका राजाची गोष्ट सापडली. त्याच्या लोकांची काळजी घेऊन संरक्षण करण्यास त्याला असहाय वाटत होते. राजाला भीतीने सुद्धा घेरले होते. यहोशाफाट राजाला समजले की एक मोठे सैन्य आपल्या लोकांवर चाल करून येत आहे (२ इतिहास २०:१-२). अशा सैन्याचा ते स्वत:हून मुकाबला करू शकणार नव्हते.

त्याला जे वाटले ते आपल्यातील बहुतेकांना वाटणार नाही. आपल्या दारावर एक महान सैन्य कधीच चाल करून येणार नाही. पण आपल्या जीवनात आपल्याला भारून टाकणारी परिस्थिती आपल्याला अडकवून ठेवते, असहाय करते आणि आता आपण टिकाव धरू शकत नाही अशी खात्री आपल्याला वाटू लागते. यहोशाफाट राजाला जे वाटले ते बायबल प्रमाणिकपणे सांगते – त्याला भीती वाटली (२०:३). त्याचा प्रतिसाद लक्षणीय होता. “तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले” (२०:४).

हा सामान्य मानवी प्रतिसाद नव्हता. तुम्हाला कोणी विचारलं “कसं आहे?” तर तुम्ही सहज म्हणून जाता “ठीक आहे.” आपण आपली उत्तम, समर्थ व स्वयंपूर्ण असल्याची प्रतिमा सादर करतो. आपल्याला भीती वाटते, भग्न आहोत, एकटे आहोत, निराश आहोत, पापात पडलो, देवावर भरवसा ठेवण्यास झगडत आहोत असे आपण सहज कधीच सांगणार नाही.

यहोशाफाटाला आपण घाबरलो नाही असे ढोंग करता आले असते. आपल्याजवळ सर्व काही आहे असे नाटक करता आले असते. त्याने आपल्या सेनापतींना बोलावून उत्तम योजना आखली असती. त्याऐवजी त्याने लोकांना जमवले. आपला कमकुवतपणा कबूल केला आणि त्यांच्यासोबत देवाची मदत मागितली. त्याने प्रार्थना केली; “आमच्यावर चालून आलेल्या ह्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हांला ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हांला सुचत नाही; पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत” (२०:१२). तो देवाकडे स्वत:च प्रार्थनेसाठी धावून जात नाही तर इतरांना पण आपल्यासोबत प्रार्थना करण्यास सांगतो.

आमच्या देवा, तू असे केलेस नाही काय?       

जरी यहोशाफाट राजापुढे स्वत:ची काहीही योजना नव्हती तरी तो निराश झाला नाही. त्याची प्रार्थना त्यांच्या देवापुढे धैर्याने व  आशेने निनादू लागते. हे धैर्य त्याला कुठून मिळाले?
“हे आमच्या देवा, तू ह्या देशाच्या रहिवाशांना आपल्या इस्राएल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहाम ह्याच्या वंशजांना कायमचा दिला आहेस ना? ते येथे वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रीत्यर्थ त्यांनी हे पवित्रस्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की, तलवार, दैवी क्षोभ, मरी अथवा दुष्काळ आमच्यावर आला तर ह्या मंदिरास तुझे नाम दिले आहे त्याच्यासमोर व तुझ्यासमोर आम्ही उभे राहून आमच्या संकटसमयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील” (२ इतिहास २०:७-९).

याच प्रकारे जेव्हा आपल्या परिस्थितीने आपण भारावून जातो तेव्हा येशूमध्ये असलेल्या देवाच्या अभिवचनामध्ये आपली स्थिर आशा जगते व टिकून राहते. येशू हा उत्तम मेंढपाळ आहे तो मृत्यूदरीमध्ये आपल्याला सोडणार नाही तर आपल्या सर्व दिवसात आपल्याला दया व कल्याण देईल (स्तोत्र २३: ४,६). “चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही”(यशया ४२:३). जे आपल्या अशक्तपणाची प्रौढी मिरवतात त्यांच्यावर तो आपल्या कृपेचा वर्षाव करतो (२ करिंथ १२: ७-१०).  देवाच्या प्रीतीपासून आपल्याला काहीही विभक्त करू शकत नाही तर ही परिस्थिती तो आपल्या कल्याणासाठी वापरतो (रोम ८:२८-३९).

जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा ह्या अभिवचनांमुळे आपण धैर्याने प्रार्थना करतो. – ही अभिवचने आपली आहेत कारण येशूने आपल्यासाठी आपला प्राण दिला आणि आपल्याला देवाची मुले बनवले.

देव कुणाद्वारे बोलला?

जेव्हा यहोशाफाटाने लोकांना प्रार्थनेसाठी बोलावले तेव्हा देवाने अपेक्षित नाही अशा प्रकारे त्यांना सामर्थ्य व उत्तेजन दिले. देवाचा आत्मा यहोशाफाटावर नाही तर “यहजीएल याच्या ठायी उतरला” तो म्हणाला “हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका; कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे” (२०:१४).  “तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पाहा. घाबरू नका, कचरू नका; उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्याबरोबर आहे” (२०:१७).

आशेचे वचन हे कोणा साध्या व्यक्तीकडूनही येऊ शकते. आरंभीच्या मंडळीमध्ये इतकी जवळीक होती  आणि ख्रिस्ताची स्वत:ला देऊन टाकणारी प्रीती त्यांच्यामध्ये इतकी भरून वाहत होती की आपली मालमत्ता विकून ते दुसऱ्यांच्या गरजा भागवत असत. प्रेषित पौल ख्रिस्ती जणांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यास पाचारण करतो कारण जेव्हा अनेक जण प्रार्थना करतात आणि देव उत्तर देतो तेव्हा देवाला गौरव दिला जातो ( २ करिंथ १:११). आपले संघर्ष आपल्याकडेच ठेवून आपली उत्तरे आपणच शोधणे हे सोयीचे व सोपे वाटते. परंतु देवाने विश्वासीयांना एका शरीरात ठेवले आहे. – एका कुटुंबात;  जेथे ही प्रीती एकमेकांची काळजी घेऊन व प्रार्थनेद्वारे दाखवली जाते.

दुसऱ्या शब्दांत आपल्या संकटात व परीक्षेत जर आपण दुसऱ्या लोकांना सोबत घेत नाही तर आपण देवाचे आशीर्वाद गमावतो.

आपला विजय काय आहे?

यहूदी लोकांनी  यहजीएलचे शब्द आनंदाने स्वीकारले. दुसऱ्या दिवशी सकाळी यहोशाफाटाने लोकांना प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवण्याचे आव्हान दिले आणि ते सैन्याला तोंड देण्यास कूच करून गेले. आपणही कठीण परिस्थिती असताना आपल्याला प्रभूवर भरवसा ठेवण्यास लावून आत्म्याची साक्ष व पित्याची काळजी अंत:करणात स्वीकारायला हवी (रोम ८:-१५-१६).

पुन्हा ते एक चकित करणारी गोष्ट करतात. ते प्रथम गाणारे पाठवतात (२०:२१,२२). ही लढाई जिंकली म्हणून गायची गीते नाहीत. ती ज्या देवाने अभिवचन दिले त्याची भक्ती/आराधना करण्याची गाणी आहेत. त्यांनी जशी गायला सुरुवात केली तसे देव बलवान सैन्य तयार करतो. इस्राएल महान विजयाच्या खात्रीने देवाच्या नावाची स्तुती करतो.

तुम्ही विचार करत असाल, “जर मी जिंकत नाही असे मला वाटतंय तर मी आराधना कशी करू? आपल्या परिस्थितीत इतक्या समस्या असताना कशी स्तुती करायची?

उत्तर आहे आपला विजय हा यहूदाला दिलेल्या विजयाच्या अभिवचनाइतकाच खात्रीचा आहे. बायबल आपल्याला अभिवचन देते की आपण जीवनात जे काही सहन करू, ज्याला तोंड देऊ, बरेच काही गमावू तरी ज्यांना त्याने निवडले, त्यांना त्याने पाचारण केले, नीतिमान ठरवले आणि गौरव केले त्यांना आपले भविष्य हे निश्चित आहे. सुरक्षित आहे. आपल्यासाठी जगणे हे ख्रिस्त व मरणे हे लाभ असे आहे (फिली. १:२१).

 

देवाला (आणि इतरांना) सहभागी करा

आपण आपली स्वयंपूर्तता बाजूला ठेऊन आपल्या भीतीमध्ये इतरांना बोलवा आणि मग आशेने भक्ती व प्रार्थना करा, हे लक्षात ठेऊन की या ना त्या प्रकारे आपला विजय हा नक्की आहे. यहूदी लोकांचा मवाबी व अम्मोनी लोकांवरचा विजय जितका निश्चित होता तितकाच.

मी आणि माझी पत्नी या सध्याच्या कसोटीतून जात असताना आम्हाला जाणवले की या युद्धात आमच्याबरोबर इतर लोकांना सहभागी करावे अशी देवाची इच्छा आहे. आणि आमच्यासाठी त्यांनी ज्या प्रार्थना केल्या व जे उत्तेजन मिळाले त्यामुळे आम्ही भारून गेलो. देवाच्या नियंत्रणाखाली त्यांनी आम्हाला टिकवून धरले. आणि असह्य वेदना व भीती वाटत असताना आमचे डोळे येशूकडे लावण्यास आम्हाला मदत केली.

जसे आपण एकत्र येऊन त्याच्याजवळ धैर्याने जातो तसे देव त्याच्या लोकांमध्ये काम करतो व त्यांची सुटका करतो. या विश्वाने असे कार्य करावे अशी त्याने रचनाच केली आहे. यामुळे आपण स्वयंपूर्ततेपासून सोडवले जाऊ व आपल्याला ज्याची गरज आहे त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेऊ. यामुळे पुन्हा पुन्हा त्याला गौरव मिळेल.

Previous Article

आत्म्याचे फळ  स्टीफन विल्यम्स

Next Article

देव जगात क्लेश , संकटे, आपत्ती का येऊ देतो? जॉन मॅकार्थर

You might be interested in …

जेव्हा देव अन्यायी वाटतो

  जॉनी एरिक्सन टाडा लेखांक ३                                (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतरनवी  कौशल्ये घेऊन व अशा […]

जर आपण प्रीती केली नाही तर आपण टिकणार नाही

जॉन ब्लूम “वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक” (रोम. १२:२१). जेव्हा पौलाने हे शब्द रोम मधील एका छोट्या मंडळीला लिहिले तेव्हा तो एका साधुसंताचा सल्ला देत नव्हता. किंवा त्यांना प्रेरणा देऊन त्यांनी गाठावे […]

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स लेखांक ४ ठासून केलेल्या विरोधातून प्रॉटेस्टंट व सुवार्तावादी चळवळींचा जन्म रोमन कॅथॉलिकवादाच्या कित्येक शतकांपासूनच्या जुनाट शृंखला तोडून त्यांचा विध्वंस करून अगदी पूर्ण नवीन मतप्रणालीची सुरुवात झाल्याचे पाहून तुमच्या मनात खोल प्रतिक्रिया उमटलीच पाहिजे. […]