जुलाई 25, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आत्म्याचे फळ – इंद्रियदमन

स्कॉट हबर्ड

इंद्रियदमन हे खूप आकर्षक वाटत असते –  तुम्हाला ‘नाही’ म्हणण्याची वेळ येते तोपर्यंतच.

मोहाच्या क्षणाच्या बाहेर कोणत्या ख्रिस्ती व्यक्तीला आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करायला आवडणार नाही (रोम ६:१३)?
पण मग जुन्या प्रियेसारखा मोह आपल्या देहाच्या दाराशी ठोठावत येतो. आपण दरवाजा किलकिला उघडतो आणि तेथे ती असते : वासना, कटुता, भेदक शब्द. तिची याचना अगदी रास्त वाटते. “ मी तुला आनंद देत नाही का?” ती विचारते. आणखी एकदा मला घेण्याचा तुला अधिकार नाही का? मी वचन देते की मी परत कधीच येणार नाही.

आणि त्या वेडेपणाच्या क्षणी आपले इंद्रियदमन स्वप्नाप्रमाणे विरून जाते.

नाही म्हणा

देवाला ठाऊक आहे. त्याला ठाऊक आहे की आपले मोह आपल्या आत काहीतरी भयानक जागृत करतात. जेव्हा देव इंद्रियदमनाबद्दल बोलतो तेव्हा त्याच्या वेदनेकडे तो दुर्लक्ष करत नाही. पौल तीताला लिहितो की इंद्रियदमन म्हणजे “आपण  अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारावे”  (तीत. २:१२). नाकारणे हा येथे वापरलेला शब्द कडक आहे. लूक ९ २३ मध्ये जेव्हा येशूने म्हटले  “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” तेव्हा हाच शब्द वापरला आहे. जेव्हा आपण अधार्मिकतेचा नाकार करतो तेव्हा आपण आपल्याला एकदा जे मोल्यवान होते  ते घेतो आणि त्याला ठार मारतो.

इंद्रियदमनामध्ये ‘नाही’ म्हणणे हे संथपणे नाही म्हणणे नाही. हे स्वनाकाराचे एक भयानक ‘नाही’ आहे. – आपल्या आत असलेल्या त्या भुंकणाऱ्या श्वापदाची तृप्ती करण्यास नकार देणे आहे.  इंद्रियदमन हे हात तोडून टाकणे किंवा डोळा उपटून काढण्यासारखे वाटू शकेल (मत्तय ५:२९-३०).

पण देवाचे वचन इंद्रियदमनाचा क्लेशच फक्त वर्णन करत नाही. देव त्या भयानक क्षणी आपली भेट घेतो आणि आपण आपल्या पापाला दारातच कसे भेटू शकतो आणि त्याची असहाय विनवणी ऐकून तरीही त्याला ‘नाही’ कसे म्हणावे ते सांगतो. पौल तीताला देत असलेली दोन साधी कारणे लक्षात घ्या : देवाची कृपा प्रकट झाली आहे, आणि देवाचे गौरव प्रकट झाले आहे.

कृपा प्रकट झाली आहे.

अभक्तीचा नाकार करण्यापूर्वी पौल कृपेविषयी बोलतो. “सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की, …आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारावे…”  (तीत २:११-१२). कदाचित तुम्ही पूर्वी देवाच्या शत्रूशी जारकर्म करत होता. पण आता देवाची कृपा वधस्तंभावर गेलेल्या आणि पुनरुत्थान झालेल्या येशूमध्ये  प्रकट झाली आहे. त्याने आपला पत्ता शोधला, दरवाजा तोडला आणि होशेयाच्या गोमरप्रमाणे त्या गचाळ जागेतून आपल्याला उचलून बाहेर आणले.

कृपेचे ‘नाही

जेव्हा देवाची कृपा प्रकट झाली, तेव्हा तो फक्त शांतपणे हात उंचावून तुमच्या व्यभिचाराची क्षमा केली आहे असे सांगत नाही. कृपा आपल्या अस्तन्या सारते आणि लढा करण्यास सुरुवात करते. आपल्या जीवाचा प्रत्येक शत्रू कृपा हुडकून काढते. किंवा पौल म्हणतो तसे  कृपा आपला हात धरून आपल्याला ‘नाही’ म्हणण्याचे प्रशिक्षण देते (तीत २:११-१२).

ख्रिस्तामध्ये जे आहेत त्यांना कृपेचे ‘नाही’ म्हणजे काय यासबंधी काहीतरी ठाऊक असते.  देवाने नीतिमान ठरवले जाण्याची विश्वासाद्वारे  देणगी कृपेने कवटाळल्यानंतर (तीत ३:७) आपल्यामध्ये एक नवा नियम कार्य करत असल्याची जाणीव आपल्याला झाली आणि तो आपल्याला अभक्तीचा नकार करण्याचे प्रशिक्षण देतो.

कृपेचे रोमांचकारी सामर्थ्य जाणवण्याचे पहिले क्षण मला अजूनही आठवतात.  मी येशूकडे आल्यानंतर लगेचच माझे काही मित्र आमच्या एका परिचयाच्या व्यक्तीबद्दल कुचाळक्या करू लागले. हे माझ्या परिचयाचे होते. माझी स्वत:ची जीभ अशा तलवार खुपसणाऱ्या शब्दांना सरावलेली होती. पण मी माझ्या आतून येणारा एक नवा आवाज ऐकू लागलो – एक गोड, समर्थ आणि नवा. “नाही. यापुढे नाही.” कृपेने मला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.

कृपेचे ‘होय

पण लक्षात घ्या की फक्त ‘नाही’ म्हणूनच कृपा आपल्याला अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारावे…म्हणून शिक्षण देत नाही. कृपा आपल्याला ‘सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे’ हे शिकवते   (तीत २:११-१२). इंद्रियदमनाचे ‘नाही’ हे शक्य होते – जेव्हा पवित्रतेचे ‘होय’ हे सुंदर बनते .

ख्रिस्ती लोक हे अश्लील व्हिडीओला ‘नाही’ म्हणू शकतात, इतके दिवस दुर्लक्ष झालेला पवित्रता हा गुण जीवनाने फुलू लागतो. चहाड्याला आपण ‘नाही’ म्हणतो, शेजार्‍यावर प्रीती करा ही पूर्वी अडथळा वाटणारी बाब आता आपल्या हृदयात घर करून वसली आहे. पैशावर प्रेम करणे याला आपण ‘नाही’ म्हणतो इतके दिवस कटकट वाटणाऱ्या उदारपणाने आता आपल्या स्वार्थीपणाच्या भिंती मोडून टाकल्या आहेत. आपण पापाला ‘नाही’ म्हणतो कारण इतके दिवस अंधुक दिसणारी आकृती ‘येशू’ ही आता आपल्या अप्रतिम सौंदर्याने प्रकाशित झाली आहे.

ज्या कृपेने तुम्हाला प्रथम ‘नाही’ म्हणायला लावले ती अजूनही तुमच्याबरोबर आहे. जेव्हा तुमच्या पूर्वीच्या वासना तुमच्या दरवाजावर आज ठोठावू लागतात तेव्हा कृपा तुमच्याबरोबर असणार तुम्हाला शिक्षण देणार. “मी आता तुझा/तुझी नाही” असे म्हणून दरवाजा बंद कर. कारण येशू या व्यक्तीमध्ये कृपा प्रकट झाली आहे. हा वर तुम्हाला आपले स्वत:चे बनवण्यासाठी आला आहे (तीत २:१४).

गौरव प्रकट होईल

कारण आता कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला इंद्रियदमनाचे वेदनामय ‘नाही’ म्हणायला शिकवते. पण कृपेचे हे प्रशिक्षण कायमचे नसणार. अधर्माला नकार देण्याचे कृपेचे हे प्रशिक्षण  आपण ‘वाट पाहत आहोत’ तोपर्यंत चालू राहील (तीत २:१३). कशाची वाट पाहतो (तीत २:१३)? एक दिवस लवकरच कृपेचे काम संपेल आणि गौरव प्रकट होईल.

सध्या ख्रिस्ती जण ‘सांप्रतच्या युगात’ येशूच्या मागे जात आहेत (तीत २:१२). हया युगावर दुष्टाचे वर्चस्व आहे   (गलती १:४). आणि सैतान त्यावर राज्य करत आहे (२ करिंथ ४:४). या युगामध्ये देवाकडे दुर्लक्ष केले जाते, बंड साजरे केले जाते, आणि धार्मिकता पृथ्वीतून हद्दपार केली जाते. सैतान असे दाखवतो की पाप हे या जगाचे मूळ  निवासी आहे आणि इंद्रियदमन हे परके आणि वनवासी आहे.

पण लवकरच एक दिवस देव यामध्ये खूप मोठा अडथळा आणणार आहे: पृथ्वी गुंडाळली जाईल, आकाश फाटून उघडे पडेल आणि देवाचे गौरव प्रकट होईल. आणि जेव्हा तसे होईल तेव्हा सर्व जग इंद्रियदमनाची किंमत पाहील. ज्यांनी पापाचा हात सोडण्याचे नाकारले त्यांना त्या भयानक हातामध्ये पूर्णपणे आणि कायमचे दिले जाईल- आणि त्यासोबतच त्यांनी धिक्कारलेल्या देवाचा राग आणि क्रोध त्यांच्यावर पडेल (रोम २:८). पण जे कृपेच्या प्रशिक्षणाच्या अधीन झाले त्यांना दिसेल की स्वनाकाराने त्यांना अनंत जीवनाचा मार्ग दिला आहे (रोम २:७).

इंद्रियदमनाने आपण काही क्षण ते भयानक ‘नाही’ म्हटलेच पाहिजे. तेव्हा देवाच्या समृद्धीच्या घरात आपण कायमचेच मेजवानी करणार आहोत (स्तोत्र ३६:८). एका क्षणासाठी आपल्या जुन्या प्रियेला आपण नाकारले पाहिजे. तेव्हा आपल्या वराचा चेहरा कायमचाच आपण पाहत राहू (१ करिंथ १३:१२). एका क्षणासाठी आपण आपला हात तोडण्यास किंवा डोळा उपटून काढण्यास तयार होतो. तेव्हा नव्या यरूशलेमेच्या मातीला आपले पाय कायमचे स्पर्श करतील. आणि नव्या निर्मितीमध्ये आपण आनंदाने उड्या मारू.

येशू दाराशी आहे. इंद्रियदमनाचे जीवन हे खूप लांबलचक वाटत असले तरी ही फक्त आपल्या विवाहदिनाची सकाळ आहे. अगदी थोडा वेळ आणि मग आपण त्याला पाहू.

आणि ही ‘आशीर्वादित आशा’ आपल्या अंत:करणात  असताना  (तीत २:१३) आज आपण पापाला नाही म्हणू शकतो.

Previous Article

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

Next Article

जेव्हा जीवन चिरडून टाकले जाते

You might be interested in …

पूर्ण झाले आहे

स्कॉट हबर्ड त्या पहिल्या उत्तम शुक्रवारी यरुशलेमेच्या वेशीच्या बाहेर एका टेकडीवर समुदाय जमला आहे आणि वधस्तंभावर टांगत असताना येशूला ते पाहत आहेत. परूशी एका चळवळीच्या आंदोलकाला आणि देवनिंदकाला अखेरीस देवाच्या न्यायाला तोंड देताना पाहत होते. […]

नम्रतेने तुमचा जीव तजेलदार करा

जॉन ब्लूम जर तुम्ही काही काळ ख्रिस्ती असाल तर खालची ही वचने नक्कीच पाठ असतील. पठणाचा प्रयत्न करून नव्हे तर अनेक वेळा ऐकून ऐकून. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू […]

चांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल? कोल डाईक

लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी काय बोलतात याबद्दल तुम्ही कधी  विचार करता का? कधी कधी तुम्ही जवळ असताना लोक आपसात कुजबुज करतात तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. आणि वाटते: मी काहीतरी केले की काय? आपले मन […]