नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

एक गोष्ट तुम्ही कधीही गमावू नका

जॉन ब्लूम

देवाने तुम्हाला सर्वात प्रथम जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तुम्ही दक्ष कारभारी असावे. यामध्ये सर्व गोष्टींहून अधिक राखायची एक प्रमुख बाब आहे. तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. ती म्हणजे: तुमचा जीव राखणे. आत हे मला कुठे मिळाले? मोशेने त्याच्या निरोपाच्या वेळी इस्राएल लोकांना दिलेल्या संदेशाच्या वेळी हे म्हटले आहे जे अनुवादाच्या पुस्तकात आहे.
“मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी” (अनुवाद ४:९).
अनेक पिढ्यांपासून पाहत असलेल्या स्वप्नाच्या तीरावर हे लोक उभे होते. चारशे वर्षांची भयंकर, अपमानकारक गुलामगिरी आणि चाळीस वर्षांचे शिस्त लावणारे रानातील भटकणे आता त्यांच्या मागे पडले होते. अब्राहामाच्या संतानाला दिलेला वचनदत्त देश त्यांच्या पुढे होता. देवाने अब्राहामाला कोणतेही संतान नसताना हे अभिवचन दिले होते (उत्पत्ती १२:७). आता अब्राहामाचे लक्षावधी संतान हे अभिवचन प्राप्त करून घेण्यास तेथे आले होते. हा क्षण खऱ्या अर्थाने वैभवी होता.

पण हे अभिवचन एका अटीसह आले होते: तुम्ही तुमच्या जिवाचे रक्षण करायला हवे. जर त्यांनी तसे केले नाही, जर भरभराटीमध्ये ते देवाला विसरले आणि इतर गोष्टींवर भरवसा ठेवू लागले (ज्याला मूर्तिपूजा म्हटले आहे) तर त्याचे परिणाम भयंकर होतील अशी धोक्याची सूचना मोशेने दिली. “तर आज आकाश व पृथ्वी ह्यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी सांगतो की, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल. परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांत विखरील; ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हांला घालवील तेथे तुमची संख्या अल्प राहील”
(अनुवाद ४:२६-२७).

ही धोक्याची सूचना फक्त प्राचीन इस्राएलांनाच नव्हती. ती आपल्यालाही आहे. आपणही आपल्या जिवाचे रक्षण करायला पाहिजे.

जीव म्हणजे नक्की आहे तरी काय?

आपला जीव नक्की काय आहे? बायबल अगदी अचूक अशी त्याची व्याख्या करत नाही. जीव हा प्रेमासारखा आहे. तुम्हाला वाटते की ते तुम्हाला समजलंय जोपर्यंत तुम्ही त्याची व्याख्या करायचा प्रयत्न करू लागता. मग तुमच्या लक्षात येते की तुम्ही अशा अद्भुत गोष्टीबद्दल बोलू पाहताय की जी तुम्ही पूर्णपणे समजू शकत नाही.
बायबलमध्ये काही वेळा जीव आणि आत्मा यांचा उल्लेख दोन भिन्न वास्तव असा केला जातो. उदा उत्पत्ती २:७ मध्ये  देवाने आदामाला “जीवधरी प्राणी” बनवले. येथे जीव म्हणजे आदामाचे (आणि आपले) संपूर्ण शारीरिक आणि आध्यात्मिक परिमाण (मोजमाप). आणि यहेज्केल १२:७ नुसार जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा “त्याचा आत्मा देवाकडे परत जातो.” येथे आत्मा म्हणजे म्हणजे आपल्या अस्तित्वाचे परिमाण (मोजमाप) जे आपल्या शरीरापेक्षा भिन्न आहे. पण इतर काही वेळा बायबल जीव आणि आत्मा हे शब्द समानार्थाने वापरते. उदा. राहेलच्या मृत्युच्या वेळी आपल्याला सांगितले आहे की, “तिचा जीव जात असता” (उत्पत्ती ३५:१८).
आणि जेव्हा दावीदाने त्याची देवासाठी असलेली आध्यात्मिक भूक व्यक्त केली तेव्हा त्याने ती जिवाची तहान या शब्दांत व्यक्त केले (स्तोत्र ६३:१). नव्या करारात प्रेषित योहान त्यावेळी येशूचा जीव व्याकुळ झाला असे म्हणतो (योहान १२:२७) आणि येशू आत्म्यात व्याकुळ झाला असे म्हणतो (योहान १३:२१). आणि येशूने स्वत:ही सांगितले की. “जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत” (मत्तय १०:२८). कारण बायबल जीव व आत्मा हे शब्द आलटून पालटून वापरत असल्याने प्रेषित पौल आत्म्यासाठी  “आंतरिक मनुष्य” हा जो शब्द वापरतो तो आपल्याला समजतो (इफिस ३:१६; २ करिंथ ४:१६ पं. र. भा.).

मूलभूत तुम्ही

कदाचित बायबलनुसार याचा साधा अर्थ समजण्यासाठी आपण म्हणू शकतो की जीव म्हणजे मूलभूत तुम्ही. किंवा डॅलस विलार्ड यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे “तुमचा जीव म्हणजे तुमच्यासबंधीची सर्वात महत्त्वाची बाब. ते तुमचे जीवन आहे.” तुमचा जीव हे तुमचे आवश्यक जीवन आहे. तुमचा जीव तुमच्या शरीरात जीवन आणतो आणि जेव्हा तुम्ही मरता तेव्हा त्याचे अस्तित्व चालूच राहते. तुमचा जीवच तुमच्या  पुनरुत्थित शरीरात प्राण आणील.
जिवाची अचूक व्याख्या करणे आपल्याला जमत नाही – जीवशास्त्रामधून पीएच डी केलेल्यांनाही जीव म्हणजे नक्की काय याची व्याख्या करताना अडचण येते. मज्जाशास्त्रामध्ये पीएच डी केलेल्यांनाही सदसद्विवेकाची व्याख्या करायला अडचण येते. पण एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याचा मूलभूत भाग गेला आहे हे जाणून घेण्यात आपल्याला अडचण येत नाही. शरीर हे त्याचा मौल्यवान भाग होते पण त्यामुळे तो जो होता तो बनला गेला नाही. त्याचा जीव, त्याचा आत्मा, त्याचा आंतरिक मनुष्य यामुळे तो जो होता तो तो बनला.

आपले जीवन हे आपल्यासाठी एक गूढ आहे कारण देवाचे जीवन हे आपल्यासाठी गूढ आहे. देवाचे जीवन काय आहे ह्याचे स्पष्टीकरण आपण करू शकत नाही. तो केवळ अनाकलनीय आहे. म्हणून देव स्वत:बद्दल सांगताना सोप्या आणि आकलन न होणाऱ्या रीतीने सांगतो की “मी आहे तो आहे” (निर्गम ३:१४). देव हा वास्तव आहे. आपण वास्तव आहोत कारण देव वास्तव आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण “जीवधारी प्राणी” आहे (उत्पत्ती २:७) ते जीवनामुळे (योहान १४:७). सर्व जीवांचा जो जीव त्याने आपल्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला.

तुम्ही तुमच्या जिवाचे रक्षण करायलाच हवे

यामुळे आपल्याला समजते की वचनदत्त देशाच्या तीराशी आल्यावर मोशेने अशी तातडीची धोक्याची सूचना का दिली की तुमचे जीव राखा. आणि त्यानंतर इब्रीकरांस पत्राचा लेखक या प्राचीन इस्राएलांच्या पतनाचे उदाहरण देऊन हीच सूचना देतो: “ म्हणून त्या ‘विसाव्यात येण्याचा’ आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये” (इब्री ४:११).
देव हा जीवन आहे आणि जीवन देवापासून येते. आपले आवश्यक जीवन टिकवून ठेवणारा व उगम एकटा तोच आहे. (अनुवाद ३०:२०, योहान १:४; कलसै ३:४). आणि देवाला सोडून कोणत्याही प्रकारे जीवनाची व्याख्या करणे, पाठलाग करणे आणि जगणे ही मूर्तिपूजा आहे. मूर्तिपूजा म्हणजे देवाला विसरणे: “ नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील” (अनुवाद ४:९). देवाला विसरणे हे पाप आहे. कारण हे विसरणे म्हणजे जो खरा, सत्य आणि जीवन त्याला विसरणे आणि म्हणून “पापाचे वेतन मरण आहे” (रोम ६:२३).
आपल्या जिवाचे रक्षण करणे म्हणजे देवाला न विसरण्यासाठी परिश्रम करणे (अनुवाद ४:९) किंवा होकारार्थी म्हणायचे तर देवाची आठवण ठेवण्यासाठी कशाचीही किंमत देणे – जीवन म्हणजे काय व ते कशाविषयी आहे याची आठवण ठेवणे (फिली १:२१).

आपल्या जिवाचे रक्षण कसे करावे

देवाची व त्याच्या सुवार्तेची आठवण करण्यासाठी त्याने आपल्याला स्थानिक मंडळी दिली आहे. जेव्हा आपण नियमितपणे एकत्र जमतो (इब्री १०:२५), जेव्हा आपण एकमेकांना शिकवतो व गाणी गातो (कलसै ३:१६), जेव्हा आपण एकत्र प्रभुभोजन घेतो (१ करिंथ ११ २३-२६), आणि एकत्र प्रार्थना करतो (इफिस ६:१८) आणि एकमेकांना
दररोज बायबल वाचून प्रभूला शोधण्यास उत्तेजन देतो (स्तोत्र १:२), तसेच एकांतात उपास व प्रार्थना करतो (मत्तय ६:५-६, १६-१८) तेव्हा आपण एकमेकांना देवाची आठवण करायला मदत करतो. ह्या गोष्टींचा कायदेशीर रीतीने पाठलाग करायचा नाही तर हा जीवनाचा पाठलाग आहे. आपले जीवन राखण्यासाठी दिलेल्या त्या देवाच्या देणग्या आहेत. पण “त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे; ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू”   (इब्री ४:१). हे अभिवचन एका अटीसह येते: आपण आपल्या जिवाचे परिश्रमपूर्वक रक्षण करायला हवे (२ पेत्र १:१०). किंवा ते न करण्याचे परिणाम भोगायला तयार व्हावे (इब्री ६:७,८).

तुमचा जीव हा तुमचा आवश्यक भाग आहे, तो देवाची अमोल देणगी आहे. येशू जो महान जीव, जो जीवनाचा उगम, तो तुमच्या पापाचे वेतन जे मरण ते भरण्यासाठी मरण पावला यासाठी की तुम्ही कायमचे वाचवले जावेत (रोम ३:२३). जी सर्वात महान देणगी म्हणजे खुद्द देव या एकाच मार्गाने तुम्ही तुमचा जीव प्राप्त करू शकाल.

आणि म्हणून तुमची सर्वात प्रमुख जबाबदारी म्हणजे ज्या गोष्टीचे तुम्ही इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक कारभारीपण करावे, ज्यावर तुमचे सर्व जीवन अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे तुमच्या जिवाचे तुम्ही रक्षण करावे.

Previous Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

Next Article

तुमच्या मुलांशी खोलवरचा संपर्क

You might be interested in …

लेखांक १: जेव्हा देव अन्यायी वाटतो

लेखक: जॉनी एरिक्सन टाडा (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना […]

 पंतैनस (इ. स. १५० – २१५)

प्रकरण ३                                     इतर देशांच्या तुलनेत भारताच्या इतिहासात एक उणीव आहे. इतर देशात ध्येयाला वाहून घेऊन प्रसंगी त्या ध्येयासाठी रक्तसाक्षी देखील झालेले पुष्कळ लोक आढळतात. त्यामुळे त्यांची लक्षवेधी जीवन चरित्रे वाचून उत्तेजनपर माहिती मिळवणे सुलभ होते. […]