दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

रोगी असणे निरोगी असण्यापेक्षा चांगले असू शकेल का?

वनिथा रिस्नर

आजार आणि दु:खसहन निरोगी आणि समृद्ध असण्यापेक्षा चांगले असू शकेल का?

 या जगात जेथे दु:ख टाळण्यासाठीच जीवन जगले जाते तेथे हा प्रश्न हास्यास्पद वाटू शकतो. केवळ विलासात राहणारे नव्हे तर धार्मिक लोक सुद्धा दु:खसहन हे पूर्णपणे नकारार्थी पाहतात – देवाला तुम्ही नापसंत असल्याचे चिन्ह. जगातील बहुतेक धर्मामध्ये आरोग्य आणि समृद्धी हे चांगल्या व विश्वासू जीवनाचे फळ आहे तर आजार व दु:ख हे शाप आहेत.  आणि ते या किंवा पूर्वीच्या जीवनातल्या वाईट कृत्यांचे परिणाम आहेत. “समृद्धीचे शुभवर्तमान” अशा लबाड्या शाबीत करते. ते आपले आरोग्य आणि भौतिक आशीर्वादाचा संबंध आपला विश्वासूपणा आणि देवाची मर्जी याच्याशी जोडते तर आजाराचा संबंध हा कमी विश्वासाशी  जोडते.

माझे आजारी जीवन

कधी कधी मी त्यांच्याशी जवळजवळ सहमत होत असे – विशेषत: माझ्या प्रार्थनांना उत्तरे मिळत नसत आणि माझ्या वेदना थांबत नसत तेव्हा. मला प्रश्न पडायचा की देव माझ्या प्रामाणिक याचनांना प्रतिसाद का देत नाही. मला शंका वाटायची की मला आशीर्वाद देण्याऐवजी त्याने शाप दिला की काय. मला सुटका मिळावी हेच माझ्या केंद्रस्थानी असल्याने पुढील काही वचने मला गोंधळात पडत असत:
“माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना” (याकोब १:२)  आणि “मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो” (स्तोत्र ११९:७१).

परीक्षा मला अस्वस्थ करून सोडत. दु:खासंबंधीची कोणतीच गोष्ट चांगली दिसत नव्हती. मला जे हवे ते ज्या लोकांकडे होते त्यांच्याकडे मी हेव्याने पाहत असे . मला सोपे जीवन हवे होते आणि तीच माझी  आकांक्षा होती.

बालपणीच पोलिओ झाल्याने माझ्यावर नेहमीच शारीरिक बंधने आली होती. पळता येणे, चढता येणे किंवा एकटे बाहेर असणे हेही मला शक्य नव्हते. मला घरच्याघरीच  करता येणारे उपक्रम आवडू लागले. उदा, कलाकुसर, पेंटिंग, स्वयंपाक. मला हातांनी कोणतीही निर्मिती करायला आवडत असे.

पोलिओनंतरच्या परिणामांनी हेही बदलून गेले. त्यामुळे माझे शारीरिक जग अजूनच संकुचित झाले. इतके की एखादा ग्लास उचलायला पण मला धडपड करायला लागायची. प्रथम अधूनमधून येणाऱ्या वेदना आता रोजच येऊ लागल्या. यामुळे माझे जीवन कठीण होण्याऐवजी प्रत्येक शारीरिक हानी ही एक विचित्र देणगी बनली. कारण त्यामुळे माझे  देवावरचे प्रेम व त्याच्यावर अवलंबून राहणे वाढत गेले.

सहन करणाऱ्यांच्या साक्षी

माझा अनुभव हा काही असामान्य नाही. सर्व जगभरच्या  आणि  सर्व काळामधल्या ख्रिस्ती लोकांनी अनुभव घेतला आहे की आजार व दु:खसहनात देवाने त्यांना खास आशीर्वाद दिला आहे. १९व्या शतकातील चीनमध्ये गेलेले प्रसिद्ध मिशनरी हडसन टेलर निवेदन करतात:

“अगदी मौल्यवान, खोल आणि टिकणारे असे देवाने मला शिकवलेले आध्यात्मिक अनुभव हे माझ्या निरनिराळ्या आजाराच्या अनुभवातून मी शिकलो …ज्या शारीरिक दु:खातून मी गेलो ते जर मी गमावले असते तर ते एक संकटच ठरले असते… माझी खात्री आहे की जेव्हा जेव्हा मी देवाच्या सान्निध्यात अधिक असे तेव्हा बहुधा देवाने मला बरे करण्यास नकार दिला होता.
 ज्या शारीरिक दु:खातून मी गेलो ते जर मी गमावले असते तर ते एक संकटच ठरले असते.

हडसन टेलर यांच्या शारीरिक दु:खात कावीळ, खराब झालेले लिव्हर, सततचा थकवा, पडल्यामुळे सर्व वर्षभर सहन करावा लागणारा पक्षघाताचा परिणाम आणि अत्यंत निराशा यांचा समावेश होता. तरीही दु:खसहनानेच ते देवाजवळ ओढले गेले.

हडसन टेलरचे एक निकटवर्ती मित्र डॉ. हेन्री फ्रॉस्ट यांनी सुद्धा दु:खसहनाचे असेच फायदे आहेत असे म्हटले आहे. त्यांनी पाहिले की त्यांचे काही पेशंट प्रार्थनेनंतर आश्चर्यकारक रीतीने बरे झाले तर इतर काही पेशंट तितकेच आजारी व तितकेच विश्वासू असताना बरे झाले नाहीत. फ्रॉस्ट लिहितात,

“ज्यांना आजारीच राहावे लागले त्यांना खास आध्यात्मिक आशीर्वाद दिले गेले. आणि त्यांच्यातील कित्येकांनी साक्ष दिली की आरोग्यापेक्षा आजारी असणे अधिक चांगले होते.”

आरोग्यापेक्षा आजारी असणे अधिक चांगले होते.

एक आधुनिक संत जॉनी एरिक्सन टाडा हिला पक्षघात झाला असून यातनामय वेदनात ती जगत असते. तिच्या “अ प्लेस ऑफ हिलिंग” या पुस्तकात ती लिहिते: “त्याने (देवाने) मला बरे न करण्याचे पण मला धरून ठेवण्याचे निवडले आहे.  जितकी वेदना अधिक तितकी त्याची मिठी अधिक घट्ट होते.

जितकी वेदना अधिक तितकी त्याची मिठी अधिक घट्ट होते.

या संतांच्या साक्षी मूलगामी असल्या तरी त्या दुर्मिळ नाहीत. आपल्या दु:खसहनात जे कोणी ख्रिस्ताकडे वळले आहेत आणि आपल्या वेदनात त्याच्याकडे व त्याच्या कृपेकडे पाहत होते त्यांना याच सत्याचा अनुभव आला आहे की: दु:ख सहन व आजार हे आरोग्य व समृद्धीपेक्षा मोठ्या देणग्या आहेत. त्याच्याशी वाढती  सहभागिता, त्याच्या सान्निध्यातील जवळीक, आणि त्याच्या प्रीतीचे सांत्वन ही सर्व दु:खसहनात वाढत जातात.

मला अधिक आकार देणारे दुसरे काहीही नाही

दु:खाद्वारे देवाने मला परिपूर्ण, अगदी जवळीकतेचे, अतिशय पवित्र असे त्याच्याबरोबरचे अनुभव दिले. अशा वेळा माझे दु:ख सरून गेल्यावर सुद्धा मी कधीच विसरू शकले नाही. माझा विश्वास अधिक दृढ झाला.

आजारामुळे मी ऐहिक गोष्टींना जडू शकले नाही आणि सार्वकालिक गोष्टींशी जास्त रुजू लागले. मी अधिक समजूतदार आणि कनवाळू झाले. तणावाखाली असताना माझ्या कमजोरीची व कमतरतेची मला जाणीव असते. हे सत्य आहे की दुखसहनाने मला सामर्थ्याने आकार दिला. माझे ईश्वरज्ञान, माझे चारित्र्य,  माझी देवावरची प्रीती आणि इतरांवरची प्रीती या सर्वांत बदल केला. त्याद्वारे मी शिकले की त्याच्या अंगणातला एक दिवस, त्याच्या प्रीतीची एक कव, त्याच्याबरोबरची एक दिवसाची सहभागिता ही इतरत्र घालवलेल्या हजार दिवसांपेक्षा श्रेष्ठ आहे.

समृद्धी आणि आरोग्य असताना त्याच्या देणग्यांबद्दल मी कृतज्ञ असते पण त्याच्या सान्निध्यासाठी इतकी अस्वस्थ होत नाही. माझे भौतिक आशीर्वाद मला व्यस्त ठेवतात. आराम आणि भरपुरीत  स्वार्थीपणाने, हक्काने, आणि स्वतंत्रपणे  जगण्याकडे माझा कल असतो. मला काय आराम देईल यावर मी लक्ष केंद्रित करते. असे कित्येक दिवस मी देवाचा अगदी कमी विचार केला आहे; त्याची विशेष गरज मला भासली नाही. अशा दिवसात देवाला दूरवर ठेवणे मला बरे वाटते पण दु:खसहनात मला तो जवळ हवा असतो.

आरोग्यापेक्षा मोठी दया

चार्ल्स स्पर्जन यांना वारंवार खिन्नता, संधिवात, गाऊट आणि किडनीचा विकार यांचा त्रास होत असे. त्यांनी म्हटले,

“चांगल्या आरोग्यापेक्षा जगात  एक महान दया मला माहीत आहे, ती म्हणजे आजार. आणि माझ्यासाठी आरोग्यापेक्षा ती एक महान दया ठरली आहे. त्रासाशिवाय असणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्रास असणे आणि ती सहन करण्यास कृपा कशी मिळवणे ही त्याहून चांगली गोष्ट आहे. 

आपल्या  संघर्षामध्ये ते सहन करण्यास कृपा मिळवणे हे संघर्ष नसण्यापेक्षा चांगले आहे. होय. समृद्धी आणि आरोग्य ह्या दया आहेत पण त्या तात्पुरत्या आहेत. फक्त याच जीवनात त्याचा आनंद घेता येतो. पण दु:खसहन व संकटे ही आपल्याला देवाच्या अधिक महान देणग्या मिळण्यास शक्य करते. त्या देणग्या म्हणजे त्याची सहभागिता, सांत्वन, प्रीती. आणि हे सर्व जसजसा वेळ जाईल तसे अधिक गोड बनते.

देवाला त्याच्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायला आवडते. आणि विश्वासाच्या भिंगातून पहिले तर आपल्याला दिसते की आजार व दु:खसहन या त्यातल्या सर्वात मोठ्या देणग्या आहेत.

Previous Article

प्रत्येक आरोपाविरुद्ध

Next Article

विश्वासी ख्रिस्ती उत्क्रांतीवादावर विश्वास ठेवू शकतात का?

You might be interested in …

धडा ५. १ योहान १:८-९    खरे शुद्धीकरण – स्टीफन विल्यम्स

  तुम्ही कधी लोकाशी (अविश्वासीयांशी देखील) पापाविषयी बोलला आहात का? लोकांच्या पापाविषयी काही चुकीच्या कोणत्या कल्पना आहेत? तुम्ही पापाची कशी व्याख्या कराल? •           या अभ्यासात आपण पाहणार आहोत की जर आपल्याला देवाची तारणातील महानता व्यवस्थित […]

धडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स

  तुमचे बाबा कोण आहेत? ज्यांची नावे व्यवसायावरून आहेत असे काही लोक तुम्हाला माहीत आहेत का? उदाहरणार्थ, “दारूवाला” • तुम्ही असा कधी विचार केला का की आज अशी नावे धारण करणाऱ्यांचा त्यांच्या या व्यवसायाशी किंचितही […]

वाया गेलेले जीवन कसे वाचवावे

ग्रेग मोर्स न उमललेले फूल, न पिकलेले फळ, गर्भधारणा न झालले उदर, न उबवलेले अंडे: एक वाया गेलेले जीवन. जे तुम्ही बोलला नाहीत आणि केले नाहीत ते बोलायला, करायला, फारच थोडा वेळ उरला आहे. तुम्ही […]