जून 26, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

एक विशाल आणि चैतन्यपूर्ण सुंदरता

मार्शल सीगल

अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! (रोम ११:३३)


जर देव तुम्हाला कंटाळवाणा किंवा सामान्य वाटू लागला असेल, तर कदाचित तुम्ही त्याला – त्याच्या वचनात, त्याच्या निर्मितीमध्ये, तुमच्या स्वतःच्या जीवनात कसे शोधायचे आणि उघड करायचे हे विसरला असाल.

पापाचा एक मोठा आणि दुःखद परिणाम एक म्हणजे ते देवाच्या चांगुलपणावर पडदा टाकते, मग ते एका दुर्बलतेच्या क्षणासाठी असो किंवा बंडखोरीच्या आयुष्यभरासाठी असो. आपला नवा जन्म  झाल्यावरही- नवीन हृदय, नवीन डोळे, देवाचे सौंदर्य, ज्ञान आणि शक्तीबद्दल नवीन आत्म्याने भरलेले कौतुक याचा अनुभव घेतल्यावरही सैतान आपल्याला त्या गौरवापासून विचलित करण्यासाठी आणि देव खरोखरच सौम्य, साधा, प्रेरणाहीन, रंगहीन आहे हे पटवून देण्यासाठी तो शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न करतो. आणि त्याच्या खोट्या बोलण्यामुळे, आपल्यापैकी बरेच जण शांतपणे स्वर्गाची  धास्ती बाळगू लागतो. सतत उपासना करण्याच्या भविष्याऐवजी आपल्याला इतर कोणतेही भविष्य हवे असते.

पण, देवावर आशा ठेवणाऱ्यांसाठी जे भविष्य आपली वाट पाहत आहे त्याऐवजी जर  या जगातील सुखे आपल्याला अधिक आवडत असतील तर आपल्याला धिक्कार असो. आणि जर या जीवनातील आशीर्वाद, साहस आणि नातेसंबंध यांपुढे देव कंटाळवाणा वाटत असेल तर आपल्याला धिक्कार असो. त्याचा चांगुलपणा, पृथ्वीवरील आपल्याला ज्या सर्व गोष्टी आवडतात त्या सर्वांमधून धावतो आणि त्यांच्यामध्ये गुंफलेला आहे, आणि तो त्याच्या विशाल आणि चैतन्यपूर्ण प्रीतीकडे इशारा करत असतो.

आपल्यापैकी बरेच जण अशा कधीही न बदलणाऱ्या देवाला ओळखू शकत नाहीत आणि तरीही आपल्याला तो नेहमीच आश्चर्यचकित करतो आणि समाधानी करतो. आणि तरीही तो कधीही बदलत नाही आणि आपल्यासाठी हे तो नेहमीच करेल.

अहाहा देवाची गहनता

देवाने ज्यांना निवडले आहे त्यांना तो निवडतो व वाचवतो या देवाच्या स्पष्ट न करता येणाऱ्या, सार्वभौम उद्देशांचे स्पष्टीकरण पूर्ण केल्यानंतर, पेषित पौल नम्रतेने आणि आश्चर्याने आपले हात उंचावून म्हणतो:

“अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!

“प्रभूचे मन कोणी ओळखले अथवा त्याचा मंत्री कोण होता?”

“अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करूनघेईल असा कोण आहे?”

कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थआहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (रोम. ११:३३-३६).

या वचनांचा देव आपल्याला त्याच्याविषयी कंटाळा आणूच शकत नाही.  अगम्य, गूढ, अवर्णनीय असा देव, सौंदर्य आणि आनंदासाठी असलेल्या आपल्या सर्व गरीब, विरळ, आपल्यापुरतेच पाहणाऱ्या अपेक्षांपेक्षा फार उंच आहे. जर आपण देवाला कंटाळलो आहोत, तर आपली अंतःकरणे आपल्या स्वतःच्या भग्नतेने थंड झाली आहेत. देवामधील कोणत्याही कमतरतेमुळे किंवा मर्यादेमुळे नाही – कारण तसे काही त्याच्यामध्ये नाहीच.

तो सर्व काही, सर्व वेळी आणि संपूर्ण इतिहासात, प्रत्येक गोष्टीबद्दल आणि प्रत्येकाबद्दल, तुमच्यासह, जाणण्यासारखे जे काही आहे ते सर्व जाणतो. त्याचे ज्ञान कोणत्याही आणि प्रत्येक निर्णयाला आणि समस्येला निर्दोष नीतिमत्तेने, परिपूर्ण न्यायाने, अतुलनीय दयाने आणि अमर्याद सहजतेने उलगडते. त्याची संपत्ती मोजता येत नाही किंवा साठवता येत नाही, कारण कोणत्याही विश्वात असे काहीही नाही जे आधीच त्याचे नाही. सर्व गोष्टी त्याच्यापासून आहेत. त्या त्याच्या अतुलनीय सर्जनशीलता आणि श्रेष्ठतेतून निघतात. त्या त्याच्या पोषण करणाऱ्या आणि टिकवून ठेवणाऱ्या सामर्थ्याची क्षणोक्षणी वाट पाहत आहेत. यासाठी की त्याच्या मूल्याची उंची आणि खोली प्रकट करावी.

“त्याची थोरवी अगम्य आहे” (स्तोत्र १४५:३). आपला देव, जसा तो खरोखर आहे, तसा तो कोणत्याही मानवी कल्पनाशक्तीला विस्मयाने बुडवून टाकतो.

अगणित दया

देवाचे आश्चर्य समजून घेण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो कारण आपली अंतःकरणे लहान आहेत. तो आणि त्याची प्रीती लहान  आहे म्हणून नव्हे. देवाच्या अमर्याद आणि सतत वाढणाऱ्या चांगुलपणाचे वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पौलाने आपली भाषा विस्तृत केली.

“तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे); आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्‍या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी” (इफिस. २:४-७)

दयेने समृद्ध. प्रीतीमध्ये महान. कृपेने आणि दयाळूपणाने अतुलनीय. हाच तो देव आहे ज्याला आपण लहान, कंटाळवाणा, निरस मानण्याच्या मोहात पडतो. जरी आपण येशूसोबत दशके किंवा त्याहून अधिक काळ चाललो असलो तरी, स्वर्गात एके दिवशी सापडणाऱ्या मेजवानीचा सुवास घेण्याची सुरुवात आपण नुकतीच करू लागलो आहोत.

आणि जरी आपण दहा हजार वर्षे तिथे असू,  स्वतःच्या आठवणी आणि देवाच्या अनुभवांनी भरलेले दहा हजार वर्षांचे चांगले ते  पाहिलेले असू,  तरी आपण त्याच्याबद्दल आपल्याला दिसलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपले पाय केवळ बुडवलेले असतील.

कधीही चांगलेच

पण, आश्चर्य म्हणजे देव आपल्या सर्व अपेक्षा, स्वप्ने आणि आकांक्षा ओलांडतो एवढेच नाही तर त्याच्या सर्व वैभवात, तो- लहान, क्षुल्लक, उद्धट, मृत- अशा  आपल्यावर प्रेम करण्याचे निवडतो आणि आपले तारण करतो. जीवन देणारा, मृत्यूला आव्हान देणारा, जगाला फिरवणारा, आकाशगंगा निर्माण करणारा देव त्याचा कंटाळा आलेल्यांना वाचवतो.

अमर्याद पवित्रता, अमर्याद न्याय, अमर्याद शक्ती, अमर्याद प्रेम आणि दया, अमर्याद वैभव असलेला देव आपल्यासारख्या लोकांचे पुनरुत्थान करण्यासाठी आणि सोडवण्यासाठी खाली का उतरेल? कारण तो केवळ अगणित कृपाळू आणि दयाळू असण्यातच आनंदी नाही. तो किती कृपाळू आणि दयाळू आहे हे तो दाखवू इच्छितो – त्याची  कृपा आणि दयाळूपणा  अगणित आहे. आपण त्याच्या अनंतकाळच्याप्रीतीचे धागे शोधू, प्रत्येक वळणावर रोमांचक आणि समाधानकारक दृश्यांसह, आणि तरीही शेवट कधीही सापडणार नाही. कधीही नाही.

आणि हे मुक्त करणारे आणि उत्साहवर्धक आहे की आपल्या भाषांमध्ये  त्याच्यासाठी शब्दच नाहीत.  पाप आणि मृत्यूच्या पलीकडे, गेल्यानंतरही आपल्यासाठी देव अधिक आणि अधिक चांगलाच  होत राहील हे जाणून घेण्याने, आपण जे तो देतो त्याचा दररोज अनुभव घेत, आणि त्याच्याबद्दल शिकण्याचा आनंद घेत आपण मुक्त होऊ शकतो .

Previous Article

सध्या ख्रिस्त राष्ट्रांवर राज्य करतो का?

You might be interested in …

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या […]

गुंडाळलेला  देव – सामान्य बाळ

डेविड मॅथीस “आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” (लूक २:१२). गुंडाळणे म्हणजे काय हे मी बाप होईपर्यंत मला ठाऊक नव्हते. तीस वर्षे मी ख्रिस्तजन्माची गोष्ट वर्षानुवर्षे ऐकत […]