नवम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक

पुनरुत्थान  

शारीरिक मरणाने आत्मा विभक्त होऊन येणारी मधली अवस्था कायम राहणार नाही. विश्वासी तसेच अविश्वासी  व्यक्तींचे वेगवेगळ्या वेळी पुनरुत्थान होणार आहे. येशूच्या पुनरागमनापूर्वी  पुष्कळ लोकांचे शारीरिक मरण होत असल्याने पुनरुत्थानाचे वर्णन नेहमीच कबरेतून बाहेर येण्याविषयी केले जाते. मृत होऊन विल्हेवाट लावण्यात आलेले जन एक दिवस शरीराने उठणार आहेत. येशू व दानीएल हेच सत्य ठणकावून सांगतात. दानी.१२:१-२; योहान ५:२८-२९. देवाच्या योजनेत पुनरुत्थानाचे टप्पे व समय यावर आपण चर्चा करणार आहोत. विश्वासीयांचे व अविश्वासीयांचे पुनरुत्थान यावर आपण स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत.

विश्वासीयांचे पुनरुत्थान  

अब्राहामापूर्वीचा प्रभूमधील पुरातन मनुष्य इयोब पुनरुत्थानाविषयी म्हणतो, “मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्नभिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहीन. त्याला मी स्वत: पाहीन. अन्याचे  नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील” (इयोब १९:२५-२६). तो जाणून आहे की शरीर छिन्नभिन्न होणे हा माझा शेवट नाही. हे महान सत्य आहे.
यशया २६:२९ मध्ये म्हटले आहे, “तुझे मृत जिवंत होतील. माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा. गजर करा…भूमी प्रेते बाहेर काढील.”
१ करिंथ १५:३५ – ४९ मध्ये आपण पुनरुत्थानाविषयी तपशीलवार वर्णन वाचतो. मेलेले कसे उठवले जातात, ते कोणत्या शरीराने येतात? आताच्या शरीराच्या अगदी उलट असे शरीर त्यांना भावी काळी  मिळेल. ते गौरवी शरीर असेल. ते आत्मिक असेल म्हणजे भुतासारखे नसेल. येशूने ४० दिवस जशा शरीराने दर्शने दिली तशा प्रकारचे असेल. पापाने दुर्बल नव्हे, तर पापविरहित व सामर्थ्यशाली असेल. कारण त्या शरीराचा उगम देव आहे. त्या शरीराची सर्व विश्वासी जन वाट पाहतात (फिलिपै ३:२१). देवाच्या सार्वकालिक राज्यात प्रवेश करण्यासाठी असेच शरीर असणे अगत्याचे आहे (१करिंथ १५:५०).  मृतांचे आत्मे देव आपल्याबरोबर घेऊन येईल व त्यांच्या पुनरुत्थित शरीराला जोडील (१ थेस्स. ४:१४-१६). त्या राज्यात ताप, शाप, आजार, मरण, क्षीण होत जाणे, रडणे, शोक नसणार.

अविश्वासीयांचे पुनरुत्थान

हरवलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी बायबल थोडीफार माहिती देते.

(१) दानीएल १२:२ मधील “मातीत निजलेले उठतील” हा वाक्यप्रयोग पुनरुत्थानासाठी वापरला आहे.  “भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.” अविश्वासीही कबरेतून बाहेर येणार व त्यांनाही प्रत्यक्ष शरीर प्राप्त होणार. “ह्याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे” (योहान ५:२८-२९). व्यक्ती तीच असेल, पण ती पुनरुत्थित झालेली असेल.

(२) जसे विश्वासीयांना सार्वकालिक जीवनासाठी योग्य शरीर मिळेल, तसेच अविश्वासीयांना अग्निसरोवरात यातना भोगण्यास योग्य असे शरीर मिळेल. जसे नवे आकाश व नवी पृथ्वी हे निश्चित स्थल आहे तसेच अग्निसरोवर हे निश्चित स्थळ आहे. प्रकटी १४:११-१४; २०:१५. असा हा स्पष्ट फरक विश्वासी व अविश्वासी यांच्यामध्ये असणार आहे. ते शरीराने यातना सहन करतील. ती पश्चात्ताप न करणार्‍यांची अवस्था असल्याचे वरील दोन्ही शास्त्रभाग दाखवतात. ते सतत त्या अग्निसरोवरात होरपळत राहतील. “त्यांच्या पिडेचा धूर युगानुयुग वर जात राहतो, त्यांना रात्रंदिवस विश्रांति मिळत नाही” (प्रकटी १४;११). किती भयानक वर्णन आहे हे.


आता आपण नरकाविषयी पाहू.

नरक  


हे सार्वकालिक सत्य आहे. येशू  स्वत: नरकाचे वर्णन करतो. ती मनाची अवस्था नव्हे. ते सार्वकालिक यातनांचे स्थळ आहे.
(१) ते शिक्षेचे स्थळ आहे. तेथे दुर्जनांना त्यांच्या कृत्यांबद्दल ही शिक्षा आहे.
(२) ती नाशाची जागा आहे. आपली धूळधाण व नाश झाल्याचा ती अनुभव देते.
(३) ते हद्दपारीचे ठिकाण आहे. देवाच्या आशीर्वादांना मुकल्याचे ते स्थळ आहे. गौरवी पृथ्वीचा त्यांना उपभोग घेता येणार नाही. देव जो राजा त्याने त्याची आशा व सान्निध्य या अनुभवापासून दूर अशा या ठिकाणी त्यांना  घालवून दिले आहे. तरी या राजाचे त्यांच्यावर नियंत्रण आहे ( स्तोत्र १३९:८). त्यापासून ते सुटलेले नाहीत.

नरकासाठी ‘शिओल’ हा शब्दही वापरला आहे. त्याचा अर्थ जेथे मृत राहतात ते स्थान. जगातील जिवंतांपासूनही ते तुटलेले आहेत. त्या स्थळासाठी ‘अंधकारमय खाडा’ असाही एक शब्द यातनेच्या स्थळासाठी २ पेत्र २:४ येथे वापरला आहे. हे खास दुरात्म्यांच्या शिक्षेचे  स्थान आहे. तेथे उत्पत्ती ६:२ मधील पतित देवदूतांना डांबले आहे. त्यासाठीच ‘अगाधकूप’ असाही शब्द वापरला आहे (लूक ८:३१). तर प्रकटी ९:१-२ मध्ये पृथ्वीवरील लोकांना उपद्रव करायला भावी काली या दुरात्म्यांना सोडण्यात येणार आहे. आता आगाधकूपातून ते बाहेर येऊ शकत नाहीत. पुन्हा प्रकटी २०:१-३ मध्ये ख्रिस्ताच्या द्वितीयागमनाच्या वेळी राष्ट्रांना त्यांनी फसवू नये म्हणून सैतानासह त्यांना एक हजार वर्षे अगाधकूपात बंदिस्त करण्यात येणार आहे. एक हजार वर्षे देवाचे पृथ्वीवरील लोकांवर राज्य होईल. त्यानंतर त्यांना मोकळे करण्यात येईल. आणि पुढे सैतान, पतित दूत, व सर्व अविश्वासी लोकांना अग्निसरोवरात टाकण्यात येईल. ते त्यांचे अंतिम स्थान आहे.


महत्त्वाचे हे की, देव क्षमाशील, प्रेमळ, दयाळू, असल्याने कोणालाच अग्निसरोवरात टाकणार नाही अशी वचनात शिकवण नाही. प्रकटी २१:८ मधील अग्निसरोवरात जाणार्‍यांच्या यादीत ‘भेकड’ हे पण ‘विश्वास न ठेवणार्‍यांचे’ नाव आहे.
अथवा सर्वांसाठी पुरेसे असे बदलीचे मरण येशूने सहन केले असल्याने तो सर्वांनाच स्वर्गात घेईल अशीही वचनात शिकवण नाही.
तसेच दुर्जनांना काही काळ शिक्षा देऊन मग त्यांनाही स्वर्गात घेतले जाईल, अशीही वचनात शिकवण नाही. (प्रकटी २०:११-१५; २१:१-७; मत्तय २५:४१;४६). जे देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा स्वीकार करणार नाहीत, त्यांचा पापासाठी न्याय, न्यायी देवाने मुक्रर करून ठेवला आहे (योहान ३:३६).
तसेच अग्निसरोवरात टाकताच दुर्जनांचे अस्तित्व नष्ट होईल अशीही वचन शिकवण देत नाही. केवळ तारलेल्या विश्वासीयांनाच सार्वकालिक जीवनाचे दान प्राप्त होईल. पवित्र देवाविरुद्धच्या पापाला मर्यादा नाही. त्याचे परिणाम अमर्याद, शिक्षाही अमर्याद गंभीर आहे. ती शिक्षा केवळ आत्मिक नाही. ती सर्व संवेदना शाबूत असताना भोगायची आहे, हे आपण लक्षात ठेऊ या.    

                                                   प्रश्नावली                                                                       

सूचना – लेख वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत. उत्तरासाठी संदर्भ \ दिशा दिली आहे.

प्रश्न १ ला खालील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                                            

१.अब्राहामापूर्वीच्या कोणत्या व्यक्तीने पुनरुत्थानाची आशा व्यक्त केली आहे? कोणत्या शब्दात?
   ( इयोब १९:२५-२६)                                                                                              
२. विश्वासीयांना मिळणारे गौरवी शरीर कसे असेल? का?                                                              
३.  दानीएल १२:२ वरून लोकांचे पुनरुत्थान कशासाठी होणार आहे?                                              
 ४. अविश्वासीयांना पुनरुत्थानानंतर कशा प्रकारचे शरीर मिळेल ?                                             

प्रश्न २ रा – कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(स्मरणशक्ती; शिओल; जाणीव; हद्दपारीचे; धन्य; तरसताना; नाशाची; सुखालोकात; अंधकारमय; शिक्षेचे; मान्य; अगाधकूप; गौरवी शरीर; पुनरुत्थानाची; पश्चात्तापाची ; विसावा; भेद)                                                                                                    

१. शारीरिक मरण जवळ आले तरी विश्वासी व्यक्ती ———-  वाट पहात असते.               
२. नरकात माणूस पाण्याच्या एका थेंबासाठीही ————  दिसतो. आपल्याला योग्य शिक्षा मिळत आहे, हे तो  
    ——  करतो; पण त्याला ———–  इच्छा होत नाही. त्याची ——— जागृत असते.     
३. खांबावरील चोराप्रमाणे विश्वासी व्यक्ती मृत्यूनंतर  ———– असते, तिला या जगातील कष्टांपासून ———
   मिळतो. आणि तो ——– होतो. जगातील सर्व परिस्थितीची त्याला ——- असते. त्याला स्वर्ग पृथ्वीमधील
   ——– समजतो. मात्र पुनरुत्थानांनंतर त्यांना ———-  प्राप्त होईल.                                
४. नरक हे —-  स्थळ ; ——– जागा व ———- ठिकाण आहे.                            
५. नरकाला प्रतिशब्द आहेत, अधोलोक, ———-, ———- खाडा; किंवा ———–                

प्रश्न ४ था – कंसातील पुढील वर्णने विश्वासी / अविश्वासी या शीर्षकांखाली विभागून लिहा.             

(नवे आकाश व नवीन पृथ्वीवर;  यातना भोगत असताही मृत न पावणारे शरीर; धिक्कार मिळवणारे; महानिद्रा पावलेले; दात ओठ खाणारे; जेथे किडा मरत नाही अग्नी विझत नाही;  देवाच्या पावित्र्यासमोर उभे राहू शकणारे शरीर ; सार्वकालिक जीवन भोगणारे; सार्वकालिक मरण भोगणारे; मरण पावताच नरकात यातना भोगत; देव व पवित्र दुतांच्या सान्निध्यात, दु:ख, शोक आजार नाही, सैतान दुरात्मे व दुर्जनांची सोबत; शांत व निरामय विसाव्यात, मरण पावताच सुखालोकात.      
             

                  विश्वासी                                                                    अविश्वासी                                                                                 


प्रश्न ५ वा – कंसात दिलेले संदर्भ वाचून रिकाम्या जागा भरा.

(दानी १२:१,२; यशया २६:१९; योहान ५:२८,२९; फिलिपै १:२२-२५; ३:१०; प्रे कृ ३:२१)                                 

१. येथून सुटून ——- जवळ असण्याची मला —— आहे. ——- राहण्यापेक्षा हे अधिक —– आहे. 
२. तुझ्या —— पैकी ज्यांची —– वहीत लिहिलेली ——— ते सर्व त्या वेळी —- होतील.               
३. तो व त्याच्या ——- चे सामर्थ्य व त्याच्या दु:खाची ——–ह्यांची त्याच्या —— ला —— होऊन मी —–
   करून घ्यावी.                                                                                 
४. कोणतेही —- निर्माण झाल्यापासून  कधीही आले नाही असे —– त्या समयी येईल.                                                                  ५. सर्व गोष्टी ——- ला ——- च्या ज्या काळाविषयी देवाने ——– पासून आपल्या पवित्र ——-   मुखाने
    सांगितले त्या काळापर्यंत —– ला —— राहणे प्राप्त आहे.                                      
६. भूमीतील ——– ——- मोठा ——–उठेल. कित्येक ——– चे ——- मिळवण्यास व कित्येक   ——-
     व —— चा —— मिळवण्यास उठतील.                                                 
७. तुझे —— ——- होतील. माझ्या —— ची —— उठतील. —— मिळालेल्यांनो ———- व्हा.—करा.
   भूमी —– बाहेर टाकील.                                                                   
८. कारण ——- सर्व माणसे त्याची —- ऐकतील आणि ज्यांनी —- केली ते ——- च्या —– साठी व ज्यांनी
   —— केली ते ——च्या ——- साठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे.                         

Previous Article

माझ्यातला पशू जागा होतो

Next Article

अजून अधिक साध्य करता आले असते अशी इच्छा तुम्ही करता का?

You might be interested in …

स्वर्गाची उत्कट इच्छा

  (iii) आम्ही ‘अनंतकाळात’ आहे त्याच अवस्थेत जाऊ.त्यात कोणताही बदल होणे शक्य नाही! देवाच्या दृष्टीने’नीतीमान असणारे सर्वजण (ख्रिस्तामधील प्रत्येक विश्वासी)  स्वर्गात जातील व सदैव त्याच स्थितीत रहातील त्याठिकाणी ‘वेळ’ नाही परंतु फक्त ‘अनंतकाळ’ आहे व […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ७ शेवटचा काळ देवाचे राज्य यावर विचार करताना त्याचा उद्देश काय आहे, ते युगारंभापासून कसे सुरू आहे, ते दृश्य स्वरूपात कसे आहे, अदृश्य स्वरूपात कसे आहे, जुन्या करारात त्याची वाटचाल […]

चांगले करताना थकू नका डेविड मॅथिस

जे खरेपणाने चांगले करतात त्यांना आपण थकून जात आहोत असा लवकरच मोह येईल. इतरांसाठी जेव्हा तुम्ही – देवाच्या पाचारणानुसार, त्याच्या अटींवर – चांगले करण्यास वाहून घेता तेव्हा थोडक्याच अवधीत तुम्हाला थकण्याचा मोह होईल. प्रेषित पौलाला […]