जॉन पायपर
बार्बराचा प्रश्न
मी लहान असल्यापासून ऐकत आले आहे की देवदूत आपल्या प्रार्थना देवाकडे नेतात. पण “ एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे” (१ तीम. २:५) हे वचन तसे काही सांगत नाही. पास्टर जॉन कृपया यावर आपण प्रकाश टाकाल का?
उत्तर
बार्बरा, हा प्रश्न असे दाखवतो की देवदूत हे मध्यस्थ आहेत. रोमन कॅथोलिक पंथामध्ये येशूची आई कुमारी मरीया ही देव व आपल्यामध्ये मध्यस्थ अशी घातली आहे. सर्व जगभर लोक मरियेकडे प्रार्थना करतात ही दु:खद बाब आहे. देवाकडे येशूद्वारे नम्रपणे थेट आणि धैर्याने येण्याऐवजी ते ‘हेल मेरीज’ म्हणतात आणि ‘रोझरी’ करतात.
माझ्या आजीला म्हणायला आवडत असे की “माझ्या प्रार्थना ऐकण्यापेक्षा देवाला खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत.” हे विधान नम्र असल्याची लोकांची कल्पना असते. पण खरेतर ही नम्रता नाही. ते ख्रिस्ताला नाकारणे आणि गर्वाने त्याची लायकी कमी करणे आहे. आजीने प्रार्थना न करण्याचे कारण आपली लायकी नाही असे तिला वाटत नव्हते. ती प्रार्थना करत नसे कारण तिचा देवाच्या वचनावर विश्वास नव्हता. येशू कोण होता आणि पाप्यांसाठी देवाकडे जाण्याचा दरवाजा उघडण्यासाठी त्याने काय किंमत दिली यावर तिचा विश्वास नव्हता ना तिला त्यात स्वारस्य होते.
देवाने दिलेल्या मार्गाने येण्याचे तिचे नाकारणे हे नम्रतेचे नव्हते. हे स्वत:चे समर्थन करणारे नाकारणे होते की आपल्याला तारणाऱ्याची गरज नाही. आपली ओझी स्वीकारून ती उचलण्याने देवाचा गौरव होतो यावर तिचा विश्वास नव्हता. जर ती नम्रपणाने आपली पापे कबूल करत येशूकडे आली, ख्रिस्ताद्वारे ती अनंतकालिक देवाच्या सान्निध्यात आली तर देव तिला पित्याच्या ममतेने जवळ करील यावर तिचा विश्वास नव्हता.
इतर कोणी मध्यस्थ नाही
तिच्याप्रमाणेच अनेक लाखो लोक विश्वास ठेवत नाहीत की, देवाची अनंत, तळपती पवित्रता इतकी महान आहे की कोणताही देवदूत, कोणतीही देवाची माता ही येशूपेक्षा अधिक संरक्षण देऊ शकणार नाही.
जर प्रार्थनेद्वारे आपण आत्ता देवाच्या अनंत पवित्रतेमध्ये प्रवेश करणार आहोत, आता देवाशी सहवास ठेवणार आहोत आणि अखेरीस त्याला समोरासमोर भेटणार आहोत तर आपल्या संरक्षणासाठी व स्वीकारासाठी ख्रिस्तासोबत मरीया, देवदूत यांची जोड देणे हे मूर्खपणाचे आहे. शुद्ध मुर्खपणा आहे.
बायबलमध्ये असा कोणताही शास्त्रलेख नाही जो शिकवतो की देवदूत, मरीयेद्वारे देवाजवळ जा. एकही नाही. देव आणि आपल्यामध्ये ख्रिस्तासोबत आणखी कोणाला घुसवणे ही प्रथा बायबलला सोडून आहे आणि ती ख्रिस्ताचा अनादर करते. त्याने वधस्तंभावर जे साध्य केले आणि आज जे तो करत आहे त्याचा यामुळे अपमान केला जातो.
तर ख्रिस्ताने जे कार्य वधस्तंभावर पूर्ण केले आणि सध्या त्याचे आपल्यासाठी स्वर्गात प्रार्थना करण्याचे जे काम आहे, ज्यामुळे क्षणोक्षणी आपल्याला देवाकडे येण्याचा मार्ग खुला होता त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ या.
त्याच्या देहाद्वारे
म्हणून बार्बराने नमूद केलेला शास्त्रभागाकडे आपण वळू या; “एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे” (१ तीम. २:५). आपला नाश न होता आनंदाने देवाशी सहवास ठेवण्यास शक्य करणारे अनेक मध्यस्थ नाहीत. दुसरा कोणीही नाही. ख्रिस्त आणि ख्रिस्त ह्या एकानेच हे कायमचे साध्य केले आहे.
यासंबंधी पौलाने स्पष्ट असे गौरवी विधान केले आहे. “त्याने येऊन जे तुम्ही ‘दूर होता’ त्या तुम्हांला ‘शांतीची सुवार्ता सांगितली व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली; कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो” (इफिस २:१७-१८). आणि नंतर तो लिहितो, “प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत” (इफिस ३:१२). यापेक्षा स्पष्ट आणखी काय असू शकेल?
आणि हे ख्रिस्ताने कसे केले? जो अनंत पवित्र असा देव, त्याच्याकडे पाप्यांनी धैर्याने येण्यासाठी त्याने कसा मार्ग उघडला? “त्याने त्या दोघांना वधस्तंभाद्वारे एक केले” (इफिस २:१६). किती गौरवी! किती महान सुवार्ता.
“ वधस्तंभाद्वारे- त्याच्या मृत्यूमधून.”
इब्री १०:१९-२० मध्ये ते असे मांडले आहे: “म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे”
म्हणजे येशूचे रक्त आणि त्याचे वधस्तंभावर विंधीलेले शरीर आपली पापे झाकून टाकते. पवित्र देवासमोर उभे राहण्यास आवश्यक असलेली नितीमत्ता ते आपल्याला पुरवते. आणि मग हा जिवंत पुनरुत्थित ख्रिस्त त्याच्या परिपूर्ण यज्ञाद्वारे आपल्यासाठी कायम विनवणी करत आहे.
“तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे” (रोम ८:३४). तसेच योहान म्हणतो, “अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे” (१ योहान २:१).
आपल्याला आणखी एका वकिलाची गरज नाही. येशूशिवाय दुसरा मध्यस्थ मागणे म्हणणे देवाची निंदा होईल. “ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे” (इब्री ७:२५). तो आपल्याला सतत आणि सर्वकाळ देवाकडे येण्यास स्वागत करतो.
येशूच्या नावामध्ये
तर आता या पवित्र देवाच्या सान्निध्यात प्रार्थना व सहभागितेमध्ये आपण कसे येतो? इथे त्याचे उत्तर आहे; “म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे” (इब्री १०:१९).
“तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून…. आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ” (इब्री ४:१४,१६).
येशूने काय म्हटले ते ऐका. ते किती अद्भुत, मोलवान, विचार करण्यापलीकडचे आहे. त्याने म्हटले, “त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल. आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे” (योहान १६:२६,२७).
दुसऱ्या शब्दात जेव्हा तुम्ही पवित्र देवाशी माझ्या नावामध्ये बोलता, प्रार्थना करता – म्हणजे माझ्या क्षमेमध्ये, माझ्या नीतिमत्त्वामध्ये – तेव्हा मला पित्याने तुमचे ऐकावे हे सांगण्याची गरजच नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो. माझ्यावर जसे केले तसेच तुमच्यावर प्रेम करतो. देव आणि आपल्यामध्ये एकच मध्यस्थ आहे याचा अर्थ हाच आहे. तो म्हणतो, माझ्यावर भरवसा टाका, माझ्याद्वारे देवाकडे या.
Social