जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

लेखांक ४: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा )

(२) (अ) या घटनेव्दारे माझा देवावरचा विश्रास अजून बळकट होण्यास मदत झाली की देव माझा “स्थिर पाया”आहेव “त्याचे लोक”कोण आहेत हे त्याला माहीत आहे आणि त्याला हे ही माहीत आहे की मला त्याची अत्यंत गरज आहे!

तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे.  प्रभु आपले जे आहे

त्यांनाओळखतो” (२तीमथ्य २: १९ ).

(ब) आणि जेव्हा देव माझा ‘मालक’ होतो तेव्हा तो मला माझ्या ‘सार्वकालिक जीवनासंबंधीची’ आशा व खात्रीदेतो!  खाली नमूद केलेली अभिवचने ह्याबाबत समर्थन करतात

तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे ; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो (यशया४१:१०).

  • तसेच देव मजबरोबर सदोदीत आहे व त्याची कृपा सदोदीत माझ्याभोंवती आहे या देवाच्या अभिवचनांनमुळे, देवाच्या ज्ञानी योजनांना स्वीकारीत ज्या वेळेस मी माझे अत्यंत तीव्र दु: ख न घाबरता सहन करीतो त्यावेळेस देव मला माझ्या परिस्थितींसंबंधी काळजी न करता तिच्यामधून जाण्याचेमाझे धैर्य अधिक बळकट करतो.

 

“Your grace abounds in deepest waters

Your sovereign hand will be my guide

Where feet may fail and fear surrounds me

You never fail and You won’t start now

So I will call upon Your name

Keep my eyes above the waves

When oceans rise

My soul will rest in Your embrace

For I am Yours and You are mine”

 

(3) (अ) देवाचे पवित्र वचन आम्हाला शिकवते की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानामुळे  आमच्या परीक्षा आणि दु:खे हीआम्ही सहन करू शकतो व प्रभू येशू ख्रिस्त आमच्या परिक्षांमध्ये व तसेच दु:खांमध्ये प्रवेश करतो या आमच्या विश्वासाला अधिक बळकटी मिळते. तसेच प्रभू येशूला  आमच्या वेदना समजतात आणि तो आमच्या दु:खांमध्ये आमचा भागी होतो.

 

 “…… तो (येशू) आत्म्यात अस्वस्थ व विव्हळ झाला  ….... येशू रडला”. (योहान ११:३३ (ब) ,३५).

(ब) जरी समय आम्हाला शांत होण्यात व तसेच आम्हाला आमच्या दुःखांतून व वियोगाच्या फार मोठ्ठ्या “नुकसानातून” उभारण्यात सहाय्य करितो, तरी आम्हांला वाटतं की, आम्ही यातून पूर्णपणे कधीच बाहेर निघू शकत नाही! मात्र हळूहळू  माझ्या या आध्यात्मिक व भावनिक नुकसानावर मात करण्यात पवित्र शास्त्राच्या वचनांनी माझे खूपच सहाय्य केले आहे व  करीत आहे– कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आगोदरच माझ्यासाठी मोबदला देऊन मला ‘खरेदी’ केलेले आहे यासाठी की मी सदोदीत त्याचे म्हणून राहावे!

 

येशूने तिला म्हटले,”पुनरुत्थान आणि जीवन मीच आहेः. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेलः आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही (योहान ११: २५,२६).

 

तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्र पुसून टाकीलः यापुढे मरण नाहीःशोक, रडणे व कष्ट हेही नाहीतः कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या ” (प्रगटीकरण २१: ४).

 

  • माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या वियोगाच्या दुःखाच्या प्रसंगाने मला हेही शिकवले आहे की मी माझे पापमय जीवन सोडून देवावर पूर्णपणे सदोदीत अवलंबूनराहावे. जसे आम्ही आमचा विश्वास पूर्णपणे ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ठेवतो की ख्रिस्ताच्या रक्ताव्दारे आमची सर्व अनितीमत्ता ही धुऊन साफ झाली आहे त्या वेळी आम्ही ख्रिस्तामध्ये’विजयी’ असे होतो! जो प्रसंग माझ्यावर येऊ नये अशी माझी  इच्छा होती तो प्रसंग माझ्यावर आला! परंतु  देवाच्या वचनाव्दारे मी शिकत आहे की देवाने माझ्यासाठी जो आनंद राखून ठेवलेला आहे तो प्राप्त होण्यासाठी मी ही वस्तुस्थिती सहन केली पाहिजे, कारण देवाला माहीत आहे की हे माझ्यासाठी लाभदायक असे आहे.

 

आपण आपल्या विश्रासाचा उत्पादक व पूर्णत्वास नेणाऱ्या येशूकडे आपले लक्ष केंद्रीत करू या व जो आनंद त्याच्यासमोर होता, त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला  ” (इब्री १२: २अ).

 

आणि या कारणांणमुळे मी सुध्दा दु: ख सोसीत आहे. परंतु मी लाज धरत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.” (२ तीमथ्य१:१२)

 

(४) (अ) माझ्या परिक्षां आणि दु: खे मला हे देखील शिकवित आहेत की मी माझे जीवन आणि माझ्या जीवनातील गोष्टी ‘गृहीत’ धरू नयेत. आतां मला नेहमी वाटत असते की देव मला काही काळापासून हीच गोष्ट ‘शिकविण्याचा फार प्रयत्न करत होता परंतु मी ही गोष्ट  शिकत नव्हतो व देवाने ही गोष्ट मला अनुभवायास लावली!

 

अनुभव हा अत्यंत कठीण शिक्षक आहे कारण तो आमची प्रथम परीक्षा घेतो व नंतर धडा शिकवितो”.[1]

 

जर देवाने पृथ्वीवरील लोकांचा आत्मा आणि श्वास घेऊन टाकायचे ठरविले, तर पृथ्वीवरील सर्वजण मरतील.सगळ्यांची परत माती होईल”( ईयोब ३४: १४ व १५)

 

(ब) इतकी वर्षे मी कितीतरी गोष्टी गृहीत म्हणून धरल्या! मी नेहमी माझ्या असे गृहीत धरले होते, किंबुहना माझी अशी इच्छा होती की माझी प्रिय पत्नी रीटा ही माझ्यापेक्षा अधिक अधिक काळ या जगांत जिवंत राहील. परंतु रीटाच्या ‘देवाघरी’ जाण्यामुळे मी आतां माझा प्रत्येक दिवस कृतज्ञतापूर्वक  घेण्याचे शिकत आहे. रीटा नेहमी म्हणायची की, “देवाने मला आजचा दिवस दिला आहे, मी त्याची आभारी आहे!” हा ‘अनुभव’ मला हेही शिकवत आहे की मी माझ्या जीवनांबद्दल ‘कमी चिंता’ केली पाहिजे,  परंतु त्याच बरोबर मी ‘अधिक नम्र’ झालो पाहिजे व मी माझ्यामधल्या   जीवनबाबत असलेल्या ‘गर्वाला  ‘ विसरले पाहिजे!

 

चांगला काळ आमच्यासाठी चांगल्या आठवणी होतात,

वाईट काळ आमच्यासाठी चांगला धडा बनतो! “

 

(५) (अ) माझ्या परिक्षां आणि दु: खे मला देवाचा अधिक आणि अधिक शोध घेण्याकडे मला प्रेरीत करत आहेत. देव देखील त्याच्या वचनांव्दारे व त्याच्या आत्म्याच्याव्दारे माझे सांत्वन करीत आहे व मला दिलासा देत आहे जेणेकरून मी देखील इतरांना सांत्वन देण्याचे देवाचे एक “हत्यार” असे बनावे! मला आता हे उमगत आहे की जसजसे मी दररोज माझे दु: ख सहन करित आहे, माझ्या दु: खांचा सामना करित आहे, तसतसे ते मला देवाच्या वचनांचा अधिक आणि अधिक सखोलपणे अभ्यास व मनन करण्याकडे घेऊन जात आहेत आणि मला माझ्या स्वत: च्या जीवनात देवाचा अधिकाअधिक गौरव करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची माझी तयारी करून घेत आहेत.

 

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करूणायुक्त देवपिता, तो सांत्वन करणारा देव आहे तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो. यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करू शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करावे “(करिंथ १: ३ व ४).

(६) (अ) माझ्या परीक्षा आणि दु:खे मला अशा परीक्षांतून, दु: खांतून, शोकातून व इतर तत्सम परिस्थितीतून जाण्याऱ्या दुसऱ्या अनेक व्यकतींबद्दल माझ्यामध्ये त्यांची दु:खे,व्यथा,शोक समजण्यात व त्यांच्याबरोबर सहभागी होण्यात माझी मदत करित आहेत.या सर्व व्यक्तींबद्दल माझ्या मनामध्ये अधिक कळवळा आणि सहानुभूती निर्माण करित आहे. मी आता माझ्या जवळच्या काही नातेवाईक, मित्र  व इतर ओळखीचे लोक जे अशा परीक्षांतून, दु:खांतून, शोकातून व इतर तत्सम परिस्थितीतून गेलेले आहेत व जात आहेत त्यांच्याबरोबर स्वतःला समरूप होण्याचे शिकत आहे.’

परंतु काही काळ दु: ख सहन केल्यानंतर सर्व कृपेचा उगम जो देव ……तो स्वत: तुम्हांला पुन्हा खंबीरपणे उभे करील. तुम्हांला सामर्थ देईल. तुम्हांला स्थिरता देईल ” ( पेत्र ५: १०).

 

(ब)मला हे देखील कळत आहे की देवाचा उद्देश मला सध्यापेक्षा जास्त ‘चांगली व्यक्ती’ बनविण्याचा आहे! मला हेही अधिकाधिक उमगत आहे की देवाची इच्छा माझ्यामधील सर्व स्वार्थीपणा, सर्व प्रकारची पापे, सर्व प्रकारची कृतघ्नता, माझा सर्व गर्विष्टपणा व स्वत: वर अवलंबून रहाण्याच्या प्रयासाचा मी त्याग करावा.

परमेश्र्वरा, मी दु: खी व एकाकी आहे, माझ्याकडे वळ व मला दया दाखव.  माझी माझ्या संकटांतून मुक्तता कर; माझ्या समस्या सोडवण्यासाठी मला मदत कर.परमेश्र्वरा, माझ्या यातनांकडे व संकटाकडे पहा.मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा कर ”  (स्तोत्र २५: १६-१८ ).

(क) मला आता समजत आहे आणि उमगत आहे की ‘मौजमस्तीच्या’ ठिकाणा’पेक्षा ‘शोकगृही’ जाणे अधिक प्रशंसनीय आहे! “(रीटा नेहमीच असे करायची !)

“शोकगृही जाणे हे एखाद्या समारंभाला जाण्यापेक्षा अधिक  चांगले आहे कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे आणि प्रत्येक जिवंत माणसाने हे लक्षात ठेवले पाहिजे” (उपदेशक ७:२  ).

                                                                                                                     क्रमशः

Previous Article

बाल्यावस्थेतून प्रौढत्वाकडे

Next Article

आणिवल्हांडणाची सांगता झाली

You might be interested in …

तुम्ही विश्वास ठेऊ शकाल अशा सात लबाड्या मॅट रीगन

एका आजारी मुलाला त्याचे आजोबा प्रिन्सेस ब्राईड हे गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवत होते. त्यामध्ये ह्या राजकन्येवर अन्यायामागून अन्याय घडत जातात व एका दुष्ट राजपुत्राशी लग्न करण्याची बळजबरी तिच्यावर केली जाते याचे वर्णन होते. तो मुलगा […]

तुमच्या गर्वाबरोबर वाद करा

स्कॉट हबर्ड वेडेपणा असलेल्या व्यक्ती बरोबर राहताना कसे वाटते याची कल्पना तुम्हाला असेल. “मनुष्य संतानाचे  ह्रदय हे  दुष्टतेने भरलेले असते आणि ते जिवंत असतात तोवर त्यांच्या ह्रदयात वेडेपण असते” (उपदेशक ९:३ पं. र. भा.). जर […]

गेथशेमाने बाग

लेखांक ३                                     ब –  प्रार्थना अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा […]