Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 13, 2016 in जीवन प्रकाश

बाल्यावस्थेतून प्रौढत्वाकडे

बाल्यावस्थेतून प्रौढत्वाकडे

ग्रेस टू यू च्या सौजन्याने 
अपरिपक्वतेचे स्पष्ट लक्षण आहे स्वार्थ. लहान बाळे पूर्णपणे स्वकेंद्रित असतात . त्यांना हवे ते  ताबडतोब मिळाले नाही तर ती किंचाळतात.  स्वत: च्या गरजा आणि इच्छा याचीच तेवढी त्यांना जाणीव असते.  ती इतरांना मदत करू शकत नाही; ती काहीही देऊ शकत नाही. ती फक्त घेऊ शकतात.

बाल्यावस्थेत असे वर्तन नैसर्गिकरीत्या घडते तेव्हा त्यात  नक्कीच चुकीचे काही नाही. पण जेव्हा  एखाद्या मुलाची प्रगती खुंटून जाते , असहाय्यतेने तो स्वार्थीपणाच्या पायरी पलीकडे  कधी जात नाही तेव्हा हे पाहणे एक दु:खाची  बाब होते.

आज  मंडळीतील  पुष्कळ लोकांची हीच  आध्यात्मिक स्थिती आहे. ते पूर्णपणे स्वत:तच मग्न झालेले आहेत.  त्यांच्या स्वत: च्या समस्या सोडवल्या जाव्या  आणि त्यांच्या स्वत: च्या सोयी वाढाव्या एवढीच त्यांची इच्छा असते. त्यांचा आध्यात्मिक विकास खुंटला गेला आहे व ते स्वार्थी आगतिकतेमध्ये कायमचे राहत आहेत  आहे. ही एक विकृतीची शोकांकिका आहे.
बाल्यावस्थेत अडकून राहिल्याचा परिणाम म्हणजे  विवेकाचा  अभाव. जसे बाळ रांगत जाताना, दिसेल ते  तोंडात टाकते  तसे आध्यात्मिक बाळांना त्यांच्यासाठी काय  चांगले आहे आणि काय नाही हे माहीत नसते. अपरिपक्वता आणि असमंजसपणा  जोडीनेच  येतात ; खरे तर ती एकच  गोष्ट आहे.

नवीन करारात देखील अपरिपक्वतेमध्ये (बालिशपणामध्ये ) अशी अडकून राहण्याची प्रवृत्ती होती. पौलाने वारंवार ख्रिस्ती लोकांना आध्यात्मिकतेमध्ये वाढा असे आवाहन केले. इफिस ४: १४-१५ मध्ये तो म्हणाला “ हे असे आहे म्हणून यापुढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने  तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत  त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे.”
आध्यात्मिक प्रगती आम्ही कशी करू? एकमेकांशी  “प्रेमाने सत्य बोलून” आम्ही सत्यामध्ये  वाढतो. ह्याच सत्याने  आम्ही पवित्र झाले आहो, ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखे होत आहोत आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रौढ केले जात आहोत  (योहान १७:१७,१९). जसजसे आम्ही देवाचे वचन आत्मसाद करतो तसे आम्ही वाढू लागतो व उभारले जातो.  आध्यात्मिक वाढीची  प्रक्रिया ही समंजसपणाच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण आहे असे  अचूकपणे आपण म्हणू शकतो.

इब्री लोकांस ५:१२ ते ६:१  यावरच भर देते:
 आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हाला कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हांला दुधाची गरज आहे, सकस अन्नाची नव्हे!  कारण जो कोणी अजून दुधावरच जगतो त्याला वचनाच्या पोक्त शिक्षणाची काहीही माहिती नसते. कारण अजून तो बाळच असतो.  परंतु याउलट सकस अन्न हे प्रौढांसाठी योग्य असते. ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चागंले व वाईट यांतील भेट ओळखण्यास तयार झालेली असतात. म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ.

इब्री लोकांस लेखक  आपल्या वाचकांना सांगत होता, तुम्ही अजून बाळे आहात. तुम्ही शिक्षक व्हावे इतका काळ गेलाय  परंतु मला  तुम्हाला दूधच द्यावे लागते. मला तुम्हाला प्राथमिक गोष्टीच द्याव्या लागतात . आपण घन अन्न घेऊ शकत नाही. देवाच्या वचनातील मोलवान गोष्टींशी तुम्ही परिचित नाही –ही फार दु:खद बाब आहे.

सामंजस्य आणि  परिपक्वता हातात हात घालून जातात. १४वे वचन पहा , तो म्हणतो ” परंतु याउलट सकस अन्न हे प्रौढांसाठी योग्य असते. ख्रिस्ती लोकांची इंद्रिये ख्रिस्ती जीवनाच्या सरावामुळे चागंले व वाईट यांतील भेद ओळखण्यास तयार झालेली असतात”. धार्मिकतेचे वचन  जाणून आणि समजून घेण्यामुळे – घन आहार घेतल्याने – आपल्याला चांगले व वाईट हे ओळखून घेण्यास आपल्या ज्ञानेन्द्रीयांना  प्रशिक्षण मिळते.

या वचनात ज्ञानेंद्रिये म्हणजे भावना किंवा इतर व्यक्तीनिष्ठ  यंत्रणा असा  अर्थ  नाही. या पत्राचा  लेखक स्पष्टपणे आपले मन वापरावे म्हणून तो वाचकांना प्रोत्साहन देत आहे. कारण सरावने त्यांनी आपल्या इंद्रियांना समजण्यास शिकवले आहे –व ते सुज्ञ आहेत. हे लोक देवाच्या वचनाच्या घन अन्नावर पोषण करतात.  आम्ही सुरुवातीपासूनच पाहिले आहे की काळजीपूर्वक शिस्तबद्ध जीवनाद्वारे समजदारपणा मिळतो. समजदारपणा ही भावनिक बाब नाही, किंवा ती एक गूढ देणगी नाही. जुन्या करारातून हे पाहा की समजदारपणा हा देवाच्या वचनात मुरलेल्या , विकसित झालेल्या माहितगार मनाशी जोडलेला आहे.
स्तोत्र ११९:६६ ” परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे. माझा तुझ्या आज्ञांवर विश्वास आहे.”
नीतिसूत्रे २: २-५  “ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर.  ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव.  ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे.  जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.”

नीतिसूत्रे १०:१३ शहाणे लोक ऐकायला योग्य अशा गोष्टी बोलतात.”
समंजस पणाचा मार्ग हा प्रौढते पर्यंत जाण्याचा  मार्ग आहे. आणि आध्यात्मिक परिपक्वता फक्त  देवाच्या  वचनावर निपुणता मिळवून येते.

बहुतेक लोक त्यांना महत्वाच्या असलेल्या गोष्टीसंबंधी समजदार असतात. आरोग्यपूर्ण आहार महत्त्वाचा मानणारे लोक ते काय खातात याकडे  काळजीपूर्वक लक्ष देतात. प्रत्येक पाकिटावर दिलेला उष्मांक, चरबीचे प्रमाण, पोषण मुल्ये ते वाचतात.

कीटकनाशके किंवा धोकादायक रसायने कार्य करणारे लोकांना खूप काळजी घ्यावी लागते. ते कोणत्याही संभाव्य प्राणघातक संसंर्ग टाळण्यासाठी फार काळजीपूर्वक खबरदारी घेतात.

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक नेहमी विचारपूर्वक गुंतवणूक करतात. शेअर बाजाराचे  वृत्तपत्र सूची अभ्यास आणि टिकर टेप यांचा अभ्यास करतात.
वकील त्यांच्या अशीलाशी चोखंदळपणे वागतात. ते कायदेशीर व्यवसाय समजावून खात्री करूनच नंतर ते  सह्या  करतात
सौदर्य शस्त्रक्रिया करून घेणारे लोक  खूप चोखंदळ असतात. ते कौशल्यपूर्ण डॉक्टर शोधतात . जी शस्त्रक्रिया तो करणार त्याचा त्याला भरपूर अनुभव असल्याची खात्री करून घेतात.

पण आध्यात्मिक समंजसपणासाठीही हीच कौशल्ये आवश्यक आहेत हे तुमच्या ध्यानात आले का?

काळजीपूर्वक विचार , गाढ आवड, काळजीपूर्वक विश्लेषण, जवळून तसेच दक्षतेने  निरीक्षण, तयारी, विचार करणे  आणि यासोबत सत्याबद्दल प्रेम. आपल्या सगळ्यांना हे गुण थोड्या तरी  प्रमाणात आहेत आणि ते आपण आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात वापरतोच.

तथापि आध्यात्मिक सामंजस्यापेक्षा अधिक महत्त्वाची कोणती गोष्ट असू शकेल?
सध्याचे  ख्रिस्ती एवढे बालबुद्धीचे का याला योग्य  स्पष्टीकरण नाही –पण त्यामुळे एक आध्यात्मिक उदासीनता प्रगट होते व ती  प्राणघातक आहे.

मंडळीमध्ये समंजसपणाची  क्षमता पुन्हा येऊ शकते का? होय, फक्त आध्यात्मिक रीतीने  वाढत जाण्याने. याचा अर्थ या युगाच्या आत्म्याशी मुकाबला करून देवाच्या अचूक शब्दाचे पालन करण्यास आपले जीवन वाहून देऊन. एका रात्रीत आपण समंजस होऊ शकत नाही. , किंवा  गूढ अनुभवाने हे प्राप्त  करू शकत नाही. समस्या समजून घेणे हे उत्तर नाही . आम्ही देवाचे वचन सत्य समजून घेण्याचे  आपल्या मनाला शिकवून  आणि आमच्या जीवनात कुशलतेने ते  सत्य लागू करूनच समंजसपणा आपल्यामध्ये येईल.