किती भरकन् नवं वर्ष जुनं ही झालं ! जानेवारी २०१६ असं लिहिणं विशेषत्रासाच वाटलंनाही हे तुमच्या ध्यानात आलं का?- नव्या वर्षात आल्यावर निदान मी तरी चुकीनं कोणत्याच पत्रावर वा लेखावरजानेवारी २०१५ असं लिहिलं नाही. सत्य हे आहे की वेळ आपल्या कोणासाठीच थांबत नसतोआणि आपण तर विशेष काही संपादन न करता वेळ असाच जाऊ देतो.रोम १३:११-१४ म्हणते,“समय ओळखून हे करा,कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे कारण आपण विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आपल्याअधिक जवळ आले आहे. रात्र सरत येऊन आणि दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचारानेचालावेचैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे; तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.”
या अंकात नेहमीच्या सदरांसोबत विचार करायला लावणारे इतर काही लेख आहेत. येशूने आपला याजक या नात्याने आपल्यासाठी काय केले व सध्या तो आपल्यासाठी कशी मदत करतो हे वाचून तुम्हांला उत्तेजन मिळेल.तसेच आध्यात्मिकबाल्यावस्थेतून प्रगल्भ होण्याचा देवाचा मार्ग वाचून त्यात चालण्यास जीवन समर्पित करण्यास प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. एकंदर या अंकाद्वारे येशूसाठी जगण्यास तुम्हाला उत्तेजन मिळेल अशी आशा आहे.
देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देवो.
क्रिस विल्यम्स
अध्यक्ष, लव्ह महाराष्ट्र
Social