लेखक: सुझन कुटार
वेबस्टर डिक्शनरीत असमाधान याचा अर्थ एखाद्याच्या जीवनाबद्दल किंवा परिस्थितीबद्दल असमाधानी वृत्ती असणे, असा दिला आहे. अरेरे! आपल्यातले कितीतरी ख्रिस्ती जन आणि जर मी पूर्णपणे प्रामाणिक असेल तर मी ही ह्या अपायकारक पापाला बळी पडलेली आहे. माझे असमाधान लोकांना किती स्पष्ट दिसते हे मला समजले नव्हते. पण मला जरमाया बरोज यांचे “द रेअर ज्यूएल ऑफ ख्रिश्चन कन्टेटमेंट” हे पुस्तक भेट म्हणून दिले गेले. भेट मिळाल्याने मलाआनंद झालापण इतर सर्व पुस्तकांपेक्षा हेच पुस्तक माझ्यासाठी का बरे निवडले या विचाराने माझा उत्साह जरा मावळला. पण त्यामुळे काहीतरी माझ्या लक्षात आले. आणि जसजशी मी या पुस्तकाची पाने उलगडत गेले तसतसे मला समजले की माझे जीवन किती थोड्या प्रमाणात धार्मिक होते. माझ्या ख्रिस्ती जीवनात कशाची उणीव आहे हे समजल्याने पहिलीगोष्ट म्हणजे पश्चात्ताप करून नंतर हळू हळू ह्या पुस्तकातील तत्त्वेमी माझ्या जीवनात लागू करू लागले. यामुळे माझा प्रभू व देव येशू ख्रिस्त याच्याबरोबर योग्य रीतीने चालण्यास मला मदत होऊ लागली.
जरमाया बरोज ( एक प्युरीटन लेखक) आपण असमाधानाशी मुकाबला कसा करावा ह्यासाठी मदत करत असताना या खऱ्याखुऱ्या रत्नाचे काही मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न करीन. एकाओळीतउत्तर द्यायचे तर तुम्ही हे करू शकत नाही. जर तुम्ही स्वत:च्या शक्तीने प्रयत्न करताय तर नाही. जर आतापर्यंत तुम्ही असे करत असाल तर मी तुम्हाला उत्तेजन देते की एक मिनिट थांबा, प्रार्थना करा, पश्चात्ताप करा आणि तुमच्या असमाधानावर विजय मिळण्यासाठी प्रभू येशूवर पूर्णपणे अवलंबून राहा. आता या पुस्तकात जरमाया यांनी मांडलेले काही मुद्दे मी तुमच्यापुढे सादर करते.ख्रिस्ती व्यक्ती समाधानी होण्यापर्यंत कशी पोचू शकते याची त्यांनी यादी दिली आहे.
१. वजाबाकी करून , बेरीज करून नव्हे
मानव म्हणून आपल्याला जीवनातून अजून काही मिळायला हवे असते. आपल्याला ती एकच गोष्ट जर मिळाली तर आपण खरच समाधानी होऊ असे आपल्याला वाटते.मग फक्त ही गोष्ट आपल्या जीवनात अधिक झाली की आपल्याला समाधान प्राप्त होईल. साधी गोष्ट, नाही का? पण जरमाया लिहितात “ समाधान असे मिळत नाही. तेतुम्हाला जे हवे त्याची बेरीज करून असे येत नाही पण त्याची तुमच्या इच्छेतून वजाबाकी करून ते मिळते. माझी संपत्ती बदलत नसते.कारण एक तर माझी इच्छा मी माझ्या परिस्थितीपर्यंत आणू शकतो किंवा माझी परिस्थिती माझ्या इच्छेपर्यंत आणू शकतो; हे माझ्याकडे असते.” तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय? जेव्हा इयोबाने सर्व काही गमावले तेव्हा त्याने काय केले हे आपण समजून घ्यायला हवे. तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम !” इयोब १:२१
या वृत्तीसंबंधी आपल्याला असणाऱ्या समस्या आणि त्रास तुम्हाला दिसतो का? खरे ख्रिस्ती म्हणून आता आपल्याला आपल्यापित्याच्या प्रेमळ हातानेधरलेले आहोअसे आपल्याला समजले आहे का?हा आपला विश्वास आहे का? इयोबाने विश्वास ठेवून जे म्हटले तेच आपण म्हणू शकतो का? “तुझ्याहातांनी मला घडिले आहे; त्यांनी सर्वतोपरी मला बनविले आहे” (इयोब १०:८). पण आपल्याला हे ही माहीत आहे की आपल्यामध्येअशा प्रकारचे ज्ञान आणि समाधान हे प्रत्यक्ष देवाकडूनच निर्माण केले जाते. पुढे लेखक म्हणतो की, “यामुळेच श्रीमंत लोकांपेक्षागरीब असणारे देवभिरूलोकहे सुखा- समाधानाचे गोड जीवन जगू शकतात.”म्हणूनचजी ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या कृपेच्या वर्षावात भिजूनचिंब झालेली असते ती स्वत:ची परिस्थिती उंचावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत नाही पण आपले ह्रदय त्यापरिस्थितीखाली आणते.
पाठ पहिला:तरही समाधानाचीकला आहे: आपल्या परिस्थितीत भर घालण्याचा प्रयत्नकरू नये,तर आपल्या इच्छातिच्यातूनकमी(वजा) कराव्या.
२. तुमच्या परिस्थितीत काम केल्याने
हामुद्दा पहिल्या मुद्द्याशीच संबंधित आहे. आम्हाला अनेक इच्छा असतात आणि जग व सामाजिक माध्यमे आणि इतर माध्यमे आम्ही अधिक चांगल्या जीवनाला पात्र आहोत असेसतत आमच्या मनावर बिंबवत असतात. यामुळे आमच्यावरभूल पडतेआणि आमच्याजवळ जे आहे त्यापेक्षा आणि खरे तर आमच्या गरजेपेक्षा अधिक मिळावे म्हणून आम्हाला आकर्षित केले जाते,भुरळ पाडली जाते. देवाने ज्या परिस्थितीत आपल्याप्रत्येकाला ठेवले आहे त्यामध्ये कुरकुर न करता आनंदाने राहण्यासाठी आपल्याला पाचारण झाले आहे. यावेळी मला याकोब १:१३-१५ या वचनांची आठवण होते. “कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वत: कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलवलेला असा मोहात पडतो.”
असे म्हणतात की फक्त बदलच सततचा/स्थिरअसतो, आणि ते खरे आहे. मगआपली परिस्थिती बदलली आणि आपल्याला सध्या असलेल्या आमच्या परिस्थितीपेक्षा अजून नम्र किंवा खालच्या स्थितीवर आणले तर काय होणार? आपण कुरकुर करणार का? किंवा ही देवाच्या हातून मिळालेली शिक्षा आहे असे समजणार का?किंवा या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या मोहाने आपण प्रार्थना करणार का? आणि आपण प्रार्थनाच करतोय तर आपले राहणीमानपूर्वीपेक्षा सुधारावेम्हणूनमागणार? पण पुन्हा जरमाया बरोज यांनी मला विचार करायला भाग पाडले. “देवाने मला दिलेल्या या परिस्थितीत माझे कर्तव्य काय आहे?” याचे त्यांच्याकडे अद्भुत उत्तर आहे. “मलाभुरळ घालणाऱ्या विचारांपासून सावध होऊन,माझी शक्ती मीमाझ्या सध्याच्या परिस्थितीत माझे कर्तव्य पार पाडण्यास खर्च करायला हवी.इतर लोक त्यांना अस्वस्थ किंवा अशांत करणाऱ्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ घालवतात आणि ते अधिक आणि अधिक असंतुष्ट होत जातात.” तुम्हाला कितीही खालच्या दर्जाची परिस्थिती आली तरी तिच्यामध्ये देवाला मान देऊन त्याची सेवा करीत राहणे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला झालेले पाचारण आहे.देवाला मान-सन्मान देण्याचे मार्ग शोधत राहा,त्याची सेवा करा आणि तुमचे मन वरील गोष्टीकडे लावा. (कलसै ३:२)
पाठ दुसरा: सध्याच्या परिस्थितीत आपले कर्तव्य करण्यात मग्न राहण्यात ख्रिस्ती समाधान मिळते. आणि देवाने या परिस्थितीत का आणले हे आता समजून घेऊन त्या सर्वामध्ये देवाचा धन्यवाद व स्तुती करा.
३. तुमची इच्छा देवाच्या इच्छेमध्ये विरघळून
विश्वासीव्यक्ती प्रभूशी जडलेली असते.ते एक आत्मा आहेत. याचा अर्थ देवाची कोणतीही इच्छा असेल तर तिच्या स्वाधीन होणे हे फक्त चांगले कारण नाही तर हे समजून घावे की देवाची इच्छा ही माझी इच्छा आहे. आपल्याला काय हवे हे आपल्याला ठाऊक आहे असे आपल्याला वाटते आणि देवाच्या अधीन होण्याऐवजी देवाने आपल्या इच्छेला हो म्हणावे म्हणून आपण त्याला मागत राहतो.पणधार्मिकता आपल्याला शिकवतेकी, आपलेचांगुलपण हे आपल्यामध्ये नसून देवामध्ये आहे.
पाठ ३:ख्रिस्ती समाधानाची कला ही आहे की आपण आपली इच्छा देवाच्या इच्छेत विरघळून टाकतो.
४. अंत:करणात जे आहे ते शुद्ध करून
या जगातील लोक म्हणून आतमध्ये समाधान मिळवण्यासाठी बाहेरच्या गोष्टीमिळवूनत्या आपल्या जीवनात जोडण्याचे विचार आपल्यावर लादले जातात. पण हे तर सपशेल चूक आहे. आपण असमाधानी आहोत तेआपल्या आत जो संघर्ष चालू आहे त्यामुळे. याकोब हा धोका आपल्याला दाखवतो. “तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाईकरतात त्यापासून की नाही”?याकोब ४:१ जगातल्या इतर लोकांना जे आहे त्याची लालसा आपण धरतो आणि लगेच आपले ह्र्दय ते मागू लागते. पण देव आपल्याला धोक्याची सूचना देऊन सांगतो, “ ह्रदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे; त्याचा भेद कोणास समजतो” (यिर्मया १७:९)?
पाठ ४था:आपली समस्या ही अंत:करणाची आहे हे आपल्याला समजायलाच हवे. आणि जर ह्या लालसा आपल्या आत आहेत तर त्या बाहेर काढूनच तुमचे मन समाधानाने भरून जाईल.जगाच्या अपेक्षेनुसार असणाऱ्या व देवाच्या इच्छेप्रमाणे नसणाऱ्या इच्छा व वासना दूर करण्यासाठी व सत्यापासून शुद्ध होण्यासाठी आपल्याला देवाचे वचन वाचून झगडायला हवे त्यातील वचने पाठ करायला हवीत आणि देवाच्या अभिवचनांना घट्ट धरून राहायला हवे.
५. येशू ख्रिस्ताकडून सामर्थ्य मिळवून
जग आपल्याला सतत सांगत असते की कोणत्याही परिस्थितीशी मुलाबला करायला आपल्यामध्ये जे आवश्यक ते आहे. ठीक, पण हे ख्रिस्ती जनांसाठी नाही. प्रत्येक परिस्थितीत येशूवर विश्वास ठेवून,सामर्थ्य मिळवूनच आपल्याला समाधान मिळतेव त्याद्वारे जे काही देव आपल्यावर पाठवतो ते सहन करण्यास आपल्याला समर्थ केले जाते. येथे मला इयोबाचेच उदाहरण योग्य वाटते. बायबल आपल्याला सांगतेकी सर्व कसोटीमध्येइयोबाने पाप केले नाहीअथवा देवाला दोष दिला नाही.जेव्हा आपल्यावर समस्या येतात तेव्हा आपण ख्रिस्ताकडे धाव घेतो का?कीआपण मनुष्याकडे मदतीसाठी धाव घेतो?त्यापरिस्थितीचा प्रत्येक अंश आपण स्वत:च हाताळायचा प्रयत्न करतो की आपण प्रभू येशूला या परिस्थितीत आनंदाने व समाधानाने घेऊन जाण्यासाठी सामर्थ्य द्यावे म्हणून मागतो?आपण देवाचे लोक आहोत व आपल्याला मोठ्या संकटामध्ये परिश्रम करून असे चालण्यास बोध केला आहे की इतरांना आपल्यामध्ये देवाचे वचन आपल्यामध्ये खरे होत आहे हे दिसून येईल. आपण आपले ह्र्दय शांत ठेवण्यास शिकले पाहिजे.
पाठ ५वा: ख्रिस्तामध्ये आपल्याला तारण्याचेव पवित्र करण्याचेच फक्त सामर्थ्य आहे इतकेच नव्हे तरसर्वसंकटात व कसल्याही ओझ्याखाली तोआपल्याला आधार व सामर्थ्य देऊ शकतो. आणि कोणत्याही ओझ्याखाली आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडून सामर्थ्य व सद्गुण प्राप्त करायला हवे.
बहुधाआपलेअसमाधान हे कशाच्या तरी कमतरतेमुळे उद्भवले जाते. आपल्याकडे जे नसते त्याची आपण इच्छा धरू लागतो. दुसरे जसे जीवन जगतात तसे आपण जगावे अशी आपण लालसा धरू लागतो.पण ख्रिस्ती जनहो, आपल्याला यापेक्षा उच्च जीवनाचे पाचारण आहे. अंधाराने भरलेल्या या जगात आपल्याला प्रकाश होण्यासाठी बोलावले आहे. आपल्याला महान साक्ष व्हावी म्हणून बोलावले आहे. आपण या जगात असताना देवाने जे करण्यास आपल्याला बोलावले आहे ते करणे ही आपली जबाबदारी आहे.पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला असमाधानाचीभावनाअसल्याचे जाणवेल तेव्हा आज जे काही तुम्ही शिकला त्याद्वारे त्याच्याशी संघर्ष करा. शेवटीहा विषय सुंदर रीतीने व्यक्त करणारी वचने मी शेवटी तुमच्यापुढे मांडते.“कारण ज्या स्थितीत मी असेन तिच्यात तृप्त राहण्यास मी शिकलो आहे. अडचणीत राहणे मला समजते; प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणेव क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे शिक्षण मला मिळाले आहे. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठायी मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे” (फिली४:११ते१३).
सुझन कुटार
मी सुझन, व्यवसायाने मानव संसाधन (एच आर), आणि एक उत्कट वाचक. जगातील माझे सर्वात आवडते ठिकाण हे नि:संशय वाचनालयच आहे. पुस्तकांवरील माझ्या प्रेमाची परिणती लिहिण्यात अन ब्लॉग करण्यात झाली. माझा जन्म अ-ख्रिस्ती घराण्यात झाला. वयाच्या १६व्या वर्षी देवाचा शोध करण्यास मी सुरुवात केली. परंतु वयाच्या २६व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या कृपेने मला मुक्ती दिली. माझा शोध संपला आणि एका नव्या जीवनाला सुरुवात झाली.
Social