देवाने आपल्याला नेमूनदिलेल्या ठिकाणी आपण त्याची सेवा करत असताना आपण खूप प्रार्थनेत राहण्याची जरुरी आहे. देव कार्य करत आहे आणि त्याचे सहकारी या नात्याने आपण काळजी घ्यायला हवी की आपले देवाबरोबरचे सामूहिक आणि वैयक्तिक चालणे आपल्याकामामुळेझाकोळून टाकले जात नाही.त्यासोबतप्रार्थना ही आपल्या कार्याला जोडलेली पुरवणी किंवा परिशिष्ट बनता कामा नये. कित्येकदा आपण सर्व योजना करतो आणि नंतर शेवटची प्रार्थना करताना म्हणतो: आमच्या सर्व योजना आशीर्वादित कर..
सावध असा! आपण देवाला आपल्या योजनांवर आशीर्वाद दे म्हणून विचारतो? आपण त्याची इच्छा काय आहे हे प्रथम शोधले होते का? आपण योजना करत असताना आणि त्या योजना राबवत असताना खरंच देवावर अवलंबून आहोत का? कीआपण फक्त शब्द उच्चारत आहोत कारण सवयीनुसार सभेच्या शेवटी तशी प्रार्थना केली जात असते?
आम्ही करत असलेल्या कार्यात तुम्ही देत असलेल्या सहभागाबद्दल आम्हालाआनंद वाटतो.तुमच्या प्रार्थनांची आम्हाला गरज आहे आणि जे आमच्या सेवेला आर्थिक सहभाग देतात त्यांचे आम्ही आभारी आहोत. हा अंक तुमच्या जीवाला एक आशीर्वाद असा ठरू देत.
क्रिस विल्यम्स
अध्यक्ष एल एम
Social