नवम्बर 15, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आम्ही प्रार्थना कशी करावी?

वनीथा रिस्नर

भंगलेली स्वप्ने  व वेदना समोर दिसत असताना आम्ही कशी प्रार्थना करावी?

आम्ही फक्त देवाला विचारण्याची गरज आहे . देव सर्व काही करू शकतो अशा विश्वासाने देवाने आम्हाला बरे करावे आणि सुटका द्यावी म्हणून आपण प्रार्थना  करावी का? की आमच्या दु:खामध्येही त्याची योजना परिपूर्ण आहे असा भरवसा ठेवून आपण आपल्या इच्छा त्याच्या पायाशी ठेऊन द्याव्या?

होय. जेव्हा आमचं जीवनच कोसळू लागते तेव्हा या दोन्ही गोष्टी करण्यास तो आम्हाला सांगत आहे.

गेथशेमानेच्या बागेत येशूने कल्पनेपलीकडे दु:ख सहन केले. रक्ताच्या थेंबांचा घाम गळत असताना तो जमिनीवर पडला अन त्याने प्रार्थना केली; तो म्हणाला, “ अब्बा,  बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मझ्यापासून दूर कर तरी  माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”  (मार्क १४:३६).

आपल्या वेदनांमध्ये असताना येशू आपल्याला शिकवतो की  असहाय्य असताना  आपण कशी प्रार्थना करावी.

अब्बा, बाप्पा

‘सर्वसमर्थ देवा, आकाश आणि पृथ्वीच्या प्रभू’ अशी सुरुवात तो करत नाही . अर्थातच देव हा सर्वांचा प्रभू आहे आणि मान सन्मान व आदर याला तो पात्र आहे, पण येथे येशूने जवळीकीची भाषा वापरली आहे. “अब्बा “ वडिलांसाठी ही एक वैयक्तिक, जवळची हाक आहे. येशू आपल्या बापाला स्वत:साठी काहीतरी कर म्हणून विचारत आहे.

याच प्रकारे माझ्या दु:खामध्ये मी देवाजवळ यायला पाहिजे. तो सर्वसमर्थ प्रभू आहे पण तो माझा अब्बा, बाप आहे (रोम ८:१५). मी त्याच्याकडे असेच जायला हवे.

त्याला  अत्यंत कठीण असे काहीच नाही

देव काहीही करू शकतो हे येशूला माहीत आहे. हजारो टेकड्यांवरील गुरांचे सर्व कळप त्याचेच आहेत. सर्व काही त्याचे सेवक आहेत. त्याला काहीही कठीण नाही.

ही सर्व वचने मला पाठ असली तरी देव माझी परिस्थिती बदलू शकतो ह्या  त्याच्या  पात्रतेची मी अक्षरश: शंका घेऊ लागते . मी माझी परिस्थिती आजमावते व हे सर्व असेच चालणार असे गृहीत धरून चालू लागते. अगदी प्रार्थना करताना सुद्धा काही आश्चर्यकारक उत्तराची मी अपेक्षा करत नाही. माझ्या प्रार्थना एक विनंत्याची यादी असते, विश्वासाने केलेली आर्जवे नसतात.

पण गेथशेमाने मध्ये येशूला माहीत आहे की देव त्याच्या विनंत्या पुरवू शकतो, देव मेलेल्या  व्यक्तीला जीवन देऊ शकतो व नसलेल्या गोष्टींना अस्तित्वात आणू शकतो.

जेव्हा माझी परिस्थिती पार पडण्यापलीकडची आहे असे मला दिसते तेव्हा देवाचे अमर्याद सामर्थ्य मी आठवावे याची गरज आहे.

हा प्याला दूर कर

जो प्याला दूर कर असे येशू देवाला विनवीत आहे तो फक्त शरीरिक वेदनांचा नव्हता. शिष्य व गतकाळातील असंख्य हुतात्म्यांनी न भीता शारीरिक यातना सोसल्या आहेत. येशूला ज्या दु:खसहनाबद्दल यातना होत होत्या ते अनंत पटीने खोलवरचे होते. देवाचा पापबद्दल असणारा भयंकर क्रोध तो सोसणार होता. आणि हा क्रोध तो एकटाच सहन करणार होता. वरून त्याचे समाधान करायला कोणीही नव्हते.

देव  ही भयानक परिस्थिती बदलू शकतो हे येशूला ठाऊक होते. म्हणून तो  तसे विचारतो. ज्या दु:ख सह्न करण्यासाठी त्याला पाठवले होते ज्या दु:ख सह्नासाठी तो स्वखुशीने आला, ज्या दु:ख सह्नाने त्याच्या लोकांचे तारण सुरक्षित होणार होते तेच दु:खसहन देवाने दूर करावे अशी त्याची इच्छा आहे. येशूवर  बळजबरीने वधस्तंभ लादला गेला नाही. त्याने म्हटले, “ मी माझा स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”(योहान १०:१८).

अनेकदा मी माझ्या विनंत्यांचे परीक्षण करते. देव जरी माझ्या दु:खाचा वापर करणार हे मला ठाऊक असते तरी मी विचारते, माझ्या दु:खापासून मला मुक्त करशील का? मला बरे कर असे विचारणे ठीक आहे का, की तो फाजील धीटपणा आहे? की मी काहीच विचारू नये आणि तो जे देईल ते घ्यावे? कदाचित ते जास्त पवित्रपणाचे चिन्ह आहे?

तरीही येशू देवाला विचारतो की हा प्याला दूर कर.

जर येशूने विचारले तर मी ही असे विचारू शकते. देवाला माझे दु:ख दूर कर असे विचारणे योग्य आहे. माझी परिस्थिती बदल,  आणखी वेदना होण्यापासून  मला वाचव . मला चांगल्या देणग्या द्यायला तो उत्सुक आहे. मी देवाजवळ भीक मागितली की माझ्या मैत्रिणीला बरे कर, कुटुंबातील व्यक्तीला वाचव, त्याच्या कार्यासाठी पुरवठा कर आणि त्याने होय असे उत्तर दिले. पण मी प्रभूला माझ्या मरणाऱ्या मुलाला वाचव अशीही याचना केली , माझा बळावणारा आजार बरा कर, माझा नवरा (सोडून गेलेला) माझ्याकडे परत आण. आणि तो म्हणाला नाही. म्हणून जरी मला त्याचे उत्तर काय असेल हे माहीत नाही तरी तरी माझा पिता मला म्हणतो की ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे त्या कळकळीने मागा.

माझी इच्छा नको पण तुझी इच्छा

अखेरीस येशूने आपली इच्छा देवाच्या इच्छेशी सोपवून दिली. जेव्हा त्याची इच्छा नाकारली गेली तेव्हा येशूने देवाची इच्छा पूर्णपणे स्वीकारली. आपल्या वधाच्या ठिकाणी तो कुरकुर किवा तक्रार न करता  पुढे गेला.

माझ्यासाठी असे सोडून देणे फार कठीण असते. अपेक्षा न करता तटस्थपणे बसून राहणे मला येते. पण जेव्हा मी त्याच्याजवळ येते आणि तो परिस्थिती बदलू शकतो असा खऱ्या रीतीने विश्वास धरते तेव्हा जो परिणाम मला अपेक्षित आहे तो मी घट्ट धरायला लागते. “तुझी इच्छा होऊ दे” असे मी म्हणते पण मी माझी इच्छाच कुरवाळत राहते.

बहुतेक वेळा माझ्या अपेक्षित परिणामावर ठेवलेली  माझ्या हाताची बोटे देव उचलतो. जरी त्याच्या “नाही” मुळे मी असहाय्य होते आणि –बहुदा अश्रू व निराशा सोबत- मी त्याच्या इच्छेच्या अधीन होते – तेव्हा तो मला खात्री देतो की हे तो माझ्या भल्यासाठी करत आहे. मला फक्त अर्धवट चित्र दिसत असते. त्याच्या नकारामध्ये त्याचा एक हेतू असतो.

पित्याने पुत्राला “नाही” म्हटले. आणि त्या “नाही” ने सर्व इतिहासात सर्वात मोठे “चांगले” घडवून आणले.

देव लहरी नाही. आपल्या इच्छेला जर त्याने नाही म्हटले तर त्याला त्यासाठी कारण असते. कदाचित १०००० कारणे असतील. आपल्याला कदाचित या जीवनात ती कारणे कळणारही नाहीत. पण एके दिवशी आपण ती सर्व पाहू. आता आपण असा भरवसा ठेवायचा की त्याचा नकार हा नेहमीच आपल्यावर केलेली त्याची दया असते.

पित्याकडे धाव घ्या

आणि आता आपल्या जीवनातील वादळांचा अर्थ समजून घेण्यास झगडत , वाट पाहत असताना आपल्या तारणाऱ्याने केली तशी प्रार्थना करू या. देवाजवळ येऊ या. तो परिस्थिती बदलू शकतो अशा विश्वासाने आपल्याला ज्याची गरज आहे ते धैर्याने मागू या आणि त्याच्या इच्छेच्या अधीन होऊ या.

आपल्या पित्याच्या योजना नेहमीच परीपूर्ण असतात. त्या नेहमीच आपल्या चांगल्यासाठी आणि त्याच्या गौरवासाठी असतील.

(वनीथा रिस्नर – ह्या इतरांना दु:खामध्ये आशा व आनंद देण्यासाठी नेहमीच उत्कट असतात. त्यांना बालपणी पोलिओ झाला होता, त्याचे परिणाम वाढतच गेले, त्यांना त्यांचे लहान बालक अचानक गमवावे लागले. पतीने फारकत घेतली. आता  देवाने दिलेल्या नव्या कुटुंबासोबत त्या देवाची सेवा करतात.)

 

 

Previous Article

कावकाव … की..?    

Next Article

इतरांना क्षमा करणे

You might be interested in …

खरे आशीर्वादित होणे म्हणजे काय?

वनिथा रिस्नर मला खूप आशीर्वाद मिळाला असे म्हणण्याची एक प्रचलित पद्धत आहे. तुम्ही फेसबुक किंवा ट्विटर वर नजर टाकली तर किती लोकांना आज आशीर्वादित वाटते हे तुमच्या लक्षात येईल. आजच्या सामाजिक माध्यमांच्या जगात तुम्ही आशीर्वादित […]

लेखांक ३: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) “हे आमच्या स्वर्गातील पित्या,तुझे नाव पवित्र मानले जावो,तुझे राज्य येवो,जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहीतुझ्या इच्छेप्रमाणे होवो! “(मत्तय ६: ९ व १० ) […]

मी असले कृत्य करणार नाही

मार्शल सीगल लैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर आत्म्याद्वारे होणाऱ्या जाणीवेने निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि इच्छा यांद्वारे जिंकले जाते. विधाने व मित्र या लढ्यात […]