Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 13, 2016 in जीवन प्रकाश

इतरांना क्षमा करणे

इतरांना क्षमा करणे

पॉल ट्रीप

लोक सहज क्षमा का करू शकत नाहीत? प्रश्न खूपच चांगला आहे. जर क्षमा करणे सोपे आणि आपल्यासाठी हितकारक आहे तर ते अधिक लोकप्रिय का नाही बरे? त्यात एक दु:खद सत्य आहे ते म्हणजे क्षमा करण्याचे नाकारण्यात, थोडक्या काळासाठी का होईना पण नाते उध्वस्त करणारे एक सामर्थ्य असते. दुसऱ्यांच्या चुका धरून ठेवण्याने त्या  नात्यामध्ये आपली बाजू वरची राहते. आपण चुकांची नोंद ठेवतो कारण देवाला कशाने सन्मान मिळेल आणि दुसऱ्यांसाठी काय भल्याचे आहे ह्या विचाराने आपण प्रवृत्त होत माही तर आपल्या फायद्याचे काय आहे याचाच आपण विचार करतो.

क्षमा न करण्याचे पाच काळे फायदे

ऋण हे सामर्थ्य आहे.

दुसऱ्यासमोर असे काहीतरी धरून राहण्यात सामर्थ्य असते. एखाद्या व्यक्तीच्या चुका किंवा दुर्बलता तिच्या विरुध्द वापरण्यात सामर्थ्य असते. जेव्हा आपल्याला आपल्या मनासारखे घडायला हवे असते तेव्हा आपला हुकमी एक्का म्हणून आपण आपल्या विरुद्ध केलेली चूक त्या नात्यामध्ये पुढे करतो.

ऋण हे ओळख आहे.

दुसऱ्याचे पाप, दुर्बलता, अपयश  धरून राहण्याने आपल्याला त्या व्यक्तीपेक्षा आपण सरस आहोत अशी जाणीव दिली जाते. आपण तिच्यापेक्षा जास्त धार्मिक , प्रगल्भ आहोत असा विश्वास ठेवण्यास ते मुभा देते. त्यामुळे आपण अशा नमुन्यात स्वत:ला अडकवतो  की स्वत:ची जाणीव आपल्याला  सुवार्तेच्या समाधानात व पाचारणातून न मिळवता  दुसऱ्यांशी तुलना करून आपण ती मिळवतो. हा नमुना आपल्याला स्वधार्मिक वृत्तीकडे नेतो . प्रत्येक पापी व्यक्तीचा याच्याशी संघर्ष चलू असतो.

ऋण हे लाभ आहे

दुसऱ्या व्यक्तींनी आपल्याविरुद्ध चुका केल्याने त्यांचे आपल्याला देणे लागते. ह्या चुका पुढे नेण्याने आपण जास्त लायक आहे असे आपल्याला वाटते.  त्यामुळे स्वकेंद्रित होणे  आणि हक्काने मागणे हे सोयीस्कर होते. “नाहीतरी तुझ्याशी असलेल्या या नात्यामुळे मला इतके सहन करावे लागले मग ह्यासाठी  मी पात्र नाही का..?”

ऋण हे शस्त्र आहे

दुसर्यांनी आपल्या विरुद्ध केलेलं पाप व चुका आपण भरलेल्या बंदुकीसारख्या जवळ बाळगतो. आपल्याला राग आला की त्या बाहेर काढण्याचा मोह आपण टाळू शकत नाही. जर दुसर्याने काही प्रकारे आपल्याला दुखावले असेल तर तर ते किती दुष्ट व बालिश आहेत असे उद्गार त्यांच्या तोडावर फेकून त्यांना दुखावण्याचा मोह टाळणे कठीण असते.

ऋण आपल्याला देवाचा दर्जा देते

ह्या ठिकाणी आपण कधीच असू नये. पण तरीही आपण सर्व जण हा दर्जा आपल्याला देतो. आपण दुसऱ्यांचे न्यायाधीश नाही. दुसऱ्याच्या पापाच्या परीणाम लागू करणे आपले काम नाही . त्यांनी जे केले त्याबद्दल त्यांना योग्य दोष वाटू देण्याची खात्री करून देण्याचे काम आपले काम नाही. पण देवाच्या राजासनावर आरोहण करून स्वत:ला न्यायाधीश बनवणे हा मोह आपण टाळू शकत नाही.

स्वार्थीपणाची कुरूप जीवन शैली

हे ओंगळवाणे आहे. अशा नात्याची जीवन शैली कुरूप स्वार्थीपणातून निर्माण होते. आपल्याला काय पाहिजे , आपण काय विचार करतो, आपली गरज काय आहे आणि आपल्याला कसे वाटते या प्रेरणेतून ती निघते. यामध्ये आपण इतरांशी जसे वागतो त्याद्वारे देवाला आनंद देण्याची इच्छा अजिबात नसते.  ह्या मोडलेल्या जगात आपले संघर्ष होत असताना, देवाच्या मार्गाने जगावे व इतरांवर प्रेम करावे अशा आशयाचे त्यात मुळीच काही नसते.

तसेच ते भीती वाटेल इतके आंधळे असते. दुसऱ्यांच्या चुकांवर आपण इतके केन्द्रित असतो की आपल्यासाठी आंधळे होतो. आपण कितीदा चुकतो, आपण जे करतो ते पापाने किती बिघडवले जाते  हे आपण विसरतो. आणि जी कृपा आपल्याला रोजन् रोज दिली जाते ती दुसऱ्यांना देण्याची इच्छा आपल्याला होत नाही . या प्रकारच्या वागण्याने आपल्या जीवनातील लोक आपले वैरी बनतात. आपण राहत असलेले ठिकाण युद्धभूमी बनते.

तरीही आपण सर्व जण क्षमा न करण्याच्या सामर्थ्याला फशी पडलेलो आहोत. दुसऱ्यांचे पाप आपण त्यांच्या विरुध्द वापरले आहे. आपण सर्व न्यायाधीशाप्रमाणे वागलेलो आहोत. आपल्या भोवताली असलेल्या लोकांपेक्षा आपण फार नीतिमान आहोत असे आपल्याला वाटले आहे. दोषीपणाच्या भावनेचे सामर्थ्य वापरून आपल्याला जे हवे आणि जेव्हा हवे ते आपण मिळवले आहे .  असे करण्याने आपल्या नात्याच्या काचेला तडा गेलेला आहेच पण आपल्याला क्षमेची किती गरज आहे हे आपण दाखवून दिले आहे.

क्षमा करणे हाच उत्तम मार्ग

आता हे अगदी स्पष्ट दिसते व हेच सत्य आहे की क्षमा करणे हाच उत्तम मार्ग आहे. या सत्याचे प्रमाण म्हणजे आपल्या तारणाची कृपा हेच होय. दुसऱ्या  व्यक्तीबरोबर जवळिकीचे , दीर्घकाळ नाते ठेवण्याचा क्षमा करणे हाच फक्त मार्ग आहे. आपल्या रोजच्या नातेसंबंधात आपल्या दुर्बलता व चुका यातून पुढे जाण्याचा एकच मार्ग म्हणजे क्षमा करणे. निराशा व क्लेश  यांना हाताळण्याचा तो एकमेव मार्ग आहे. आपली आशा व आत्मविश्वास उभारण्याचा क्षमा करणे हाच मार्ग आहे. आपल्या भूतकाळाने आपल्याला अपहरण करू नये यासाठी क्षमा करणे हा एकच मार्ग आहे. तुमच्या नात्याला नवी सुरवात व आशीर्वाद देण्याचा तो एकमेव मार्ग आहे.

कृपा , क्षमाशील कृपा हा खराखुरा चांगला मार्ग आहे. तुम्हाला क्षमा करण्यास बोलावले आहे ही अद्भुत गोष्ट तर आहेच पण या पाचारणाला आवश्यक ती सर्व कृपाही देवाने तुम्हाला पुरवली आहे.

(पॉल ट्रीप हे एक पाळक लेखक व आंतरराष्ट्रीय परिषदांचे वक्ते आहेत. येशू ख्रिस्ताचे रूपांतर करणारे सामर्थ्य दररोजच्या जीवनात  कसे कार्य करते ह्याबद्दल ते मार्गदर्शन करतात.)