Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Oct 1, 2016 in जीवन प्रकाश

संपादकीय

संपादकीय

मी सकाळी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की २०१६ सालचे  आठ महिने सरले असून आता आपल्याला ह्या वर्षाची अखेर गाठायला फक्त चार महिन्यांचा अवधी आहे. मला भीती वाटली कारण आता या जगाचा शेवट होण्याच्या एक वर्ष आणखी जवळ आपण आलो आहोत आणि येशूचे येणे समीप येऊन  ठेपले असून तो जगाचा न्याय करील आणि लाखो लोकांना अनंतकालच्या नरकात पाठवील.  मी ख्रिस्ताची पुरेशी सेवा केली का? माझ्या पाचारणाला लायक असे जीवन मी जगलो का? या विचारांनी मी दडपून गेलो.  येशू काही फक्त दुष्टांचा न्याय करण्यास आणि त्यांना अनंतकालिक नरकात पाठवण्यासच येणार नाही पण तो विश्वासीयांचाही न्याय करील. त्याच्या तारणाला प्रतिसाद म्हणून त्याच्या नावाने त्यांनी केलेल्या चांगल्या कृत्यांचा तो न्याय करील आणि त्यांना पारितोषिके देईल.

देवाने दिलेला प्रत्येक दिवस जगत असताना तुम्ही अनंतकाळाचा विचार करता असा माझा विश्वास आहे. आणखी एक वर्षही लगेच सरून जाईल – फक्त जे येशूसाठी केले आहे तेच टिकेल.

ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या या अंकाचाही आनंद घ्या.  तुमची काळजी आहे यामुळेच आम्हाला तुमच्या आत्म्याला  चांगले आध्यात्मिक अन्न पुरवायचे आहे. वाचनाचा आनंद घ्या आणि दुसऱ्यांनाही यात सहभागी करा. कदाचित त्यांना या मासिकाचे वर्गणीदार होण्यास तुम्ही गळ घालू शकता.

या अंकातील “जेव्हा देव अन्यायी वाटतो” या लेखाचा अखेरचा भाग तुम्हाला अनंतकाळाची ओढ लावेल यात शंका नाही. नाताळ जवळ येत असताना ख्रिस्ताच्या देहधारणेचा खोल अर्थ सांगणारे “कृपा आणि वैभव” हे लेख तुम्हाला चकित करतील आणि हा आपला देव असल्याने तुम्ही त्याच्यापुढे नतमस्तक व्हाल अशी आशा आहे.

आम्हाला लिहा. एलएमच्या कार्यलयाच्या पत्यावर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा leena187@gmail.com   येथे इमेल द्वारे  लिहू शकता.

ख्रिस्तात आपला

क्रिस विल्यम्स

अध्यक्ष एल एम