जुलाई 19, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

शांत केव्हा राहावे?….याविषयी बायबल काय म्हणते?

१. शीघ्रकोप झाल्यास शांत व्हा (नीती१४:१७).
२. तुम्हाला सर्व सत्य माहीत नसल्यास शांत राहा (नीती १८:१३).
३. सर्व गोष्ट तुम्ही पडताळून घेतली नसेल तर शांत राहा (अनु.१७:६).
४. जर तुमचे शब्द कमकुवत व्यक्तीला अडखळण आणणार असतील तर शांत राहा (१ करिंथ ८:११).
५. जेव्हा ऐकण्याची वेळ असते तेव्हा शांत राहा (नीती १३:१).
६. जेव्हा पवित्र गोष्टींना हलके बनवण्याचा मोह तुम्हाला होईल तेव्हा शांत राहा (उप. ५;२)
७. जेव्हा पापाची थट्टा करण्याचा तुम्हाला मोह होईल तेव्हा शांत राहा (नीती १४:९).
८. जर तुमच्या शब्दांची नंतर तुम्हाला लाज वाटणार असेल तर शांत राहा (नीती ८:८).
९. जर तुमच्या शब्दांनी चुकीचा प्रभाव पडणार असेल तर शांत राहा (नीती १७:२७).
१०.जर त्या बाबीशी तुमचा काहीही संबंध नसेल  तर शांत राहा (नीती १४:१०).
११. जर तुम्हाला सपशेल लबाडी करण्याचा मोह झाला तर शांत राहा (नीती ४:२४).
१२. जर तुमच्या शब्दांनी कोणाच्या प्रतिष्ठेला बाध येणार असेल तर शांत राहा (नीती १६:२७).
१३. जर तुमच्या शब्दांनी एखादी मैत्री बिघडणार असेल तर शांत राहा (नीती १६:२८).
१४. जेव्हा तुम्हाला कोणाची टीका करावीशी वाटत असेल तेव्हा शांत राहा (याकोब ३:९).
१५. जर ओरडल्याशिवाय ती गोष्ट तुम्ही बोलू शकत नसणार तर शांत राहा (नीती २५:२८).
१६. जर तुमचे शब्द तुमचे कुटुंब आणि मित्र यांच्यापुढे देवासंबंधी वाईट प्रतिबिंब पाडणार असतील तर शांत राहा   (१पेत्र २:२१-२३).
१७. जर तुम्हाला तुमचे शब्द नंतर  गिळण्याची वेळ येणार असेल तर शांत राहा (नीती १८:२१).
१८. जर ती बाब एकाहून अधिक वेळा बोलून झाली असेल तर शांत राहा (नीती १९:२३).
१९. जेव्हा तुमच्याकडून दुष्ट व्यक्तीची फाजील स्तुती करणे अपेक्षित असेल तेव्हा शांत राहा (नीती २४:२४).
२० , जेव्हा बोलण्याऐवजी काम करण्याची वेळ असेल तेव्हा शांत राहा (नीती १४:२३).

“जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो तो संकटापासून आपला जीव वाचवतो.” (नीती २१:२३).
“शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे” (स्तोत्र ४६:१०).

Previous Article

आपल्या मुलांना शिकवण्यासाठी दहा आवश्यक धडे  

Next Article

तुमच्या मुलांना क्षमा मागा

You might be interested in …

२०२० मध्ये कुठे चालता याकडे लक्ष द्या स्कॉट हबर्ड

ख्रिस्ती जीवन हे जोराने धावण्याची छोटी शर्यत नाही. तो दहा कोटी पावलांचा प्रवास आहे. पापाच्या ओझ्यापासून दूर होत येशूच्या मागे जीवनाच्या मार्गात जात असताना  दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्षे आपण एका पावलापुढे दुसरे पाउल टाकत असतो. […]

स्वर्गाची उत्कट इच्छा

माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या देवाघरी गेल्यानंतर व माझ्या अत्यंत मोठ्या आणि कधीही न भरून येणाऱ्या हानीच्या तीव्र दु:खांतून जात असताना जी गोष्ट फार प्रकर्षाने माझ्या मनात आली व जिने मला खोलवर विचार करावयास भाग पाडले […]