डेविड मॅथिज
माझ्या वडिलांनी मला क्षमा मागितली ते मी कधीच विसरू शकत नाही. पपांनी मला क्षमा मागितल्याचे हे काही क्षण अविस्मरणीय, मला भावूक करणारे, माझे मन वेधून घेणारे ठरले आहेत – वयाच्या पाचव्या , सातव्या अथवा दहाव्या वर्षी – त्यांनी तीव्र प्रतिक्रया केली होती व त्याबद्दल त्यांना वाईट वाटत होते.
मला आठवतं, प्रत्येक वेळी मी भारून गेलो कारण मी काही निर्दोष बळी नव्हतो. माझी अवज्ञा, बंड आणि अपरिपक्वता हीच आमच्या संघर्षाचे कारण असायचे. प्रथम मीच पाप केले होते आणि माझे चुकले हे मला ठाऊक असायचे.
पण पपांनी बायबल स्टडीला जायला सुरुवात केली होती आणि त्यांचे मन देवाच्या वचनासंबंधी मृदू होत होते. ज्या शुभवर्तमानावर ते प्रेम करत होते त्याला अनुरूप असे त्यांचे वर्तन असावे असे त्यांना वाटत होते. फक्त लोकांसमोरच नाही तर खाजगी जीवनातही. जग जेथे त्यांना पाहत होते तेथे म्हणजे फक्त डेंटिस्ट आणि चर्चचे वडील म्हणून नव्हे तर बाप म्हणून जेव्हा फक्त छोटे डोळे त्यांना पाहत होते तेव्हाही. हे सत्य त्यांनी मान्य करायला सुरुवात केली की त्यांच्या मुलाने दिलेला वाईट प्रतिसाद हा पापी प्रतिक्रिया करण्यासाठी सबब होऊ शकत नाही. प्रथम स्वत:चे पाप ओळखून कबूल करण्यास ते शिकू लागले. स्वत:च्या डोळ्यात असलेले मुसळ काढून आपल्या मुलाच्या डोळ्यात असलेले कुसळ काळजीपूर्वक व धीराने काढण्यास ते शिकू लागले.
राजाचे नवे चिलखत
काहींना चिंता वाटेल की स्वत:ला आपल्या मुलांपुढे असे असुरक्षित करून आपल्या पालकांच्या अधिकाराच्या चिलखताला आपण भेग पाडत आहोत. जर आपण आपले उच्च स्थान सोडून दिले तर आपली मुलांना वाढवण्याची जबाबदारी आपल्याला नक्कीच पूर्ण करता येणार नाही असे आपल्याला वाटते. बालपणातील तसेच आता सहा वर्षांच्या जुळ्याचा बाप म्हणून आलेला माझा अनुभव ठाम सांगतो की तसे होत नाही.
जेव्हा माझ्या प्रौढतेमुळे मिळालेले भावनांचे दडपण मी त्यांच्यावर टाकू लागतो तेव्हा ते चिरडून जाण्याची शक्यता असते. पण जेव्हा मी त्यांच्याकडे खाली उतरून त्यांच्याबरोबर उभा राहून माझे पाप कबूल करतो आणि येशूद्वारे सुटकेची माझी सततची गरज मान्य करतो तेव्हा मी फक्त पश्चात्तापाचे उदाहरणच त्याच्यासमोर ठेवत नाही पण मी स्वत: खरे ख्रिस्ती जीवन जगत असतो.
माझ्या मुलांसाठी मी परिपूर्ण असण्याची गरज नाही. ते येशूने केलेले आहे. माझ्या मुलांना मी त्यांचा परिपूर्ण तारणारा असावे याची गरज नाही तर प्रामाणिकपणे माझ्या पापाविषयी जो आपला परिपूर्ण तारणारा त्याकडे निर्देश करण्याची गरज आहे. खरं तर मी परिपूर्ण नाही आणि माझी आशा ही माझ्या चांगुलपणात नाही पण येशूमध्ये आहे हे त्यांना तातडीने समजायला हवे. त्यांच्या बरोबरच पापी म्हणून उभा आहे, पापामध्ये जन्मलेला आहे आणि मला देवाच्या कृपेची नितांत आवश्यकता आहे. जर माझ्या चिलखताला गेलेला तडा लपवायचा मी प्रयत्न केला- आणि त्याला एकच तडा गेलेला नाही तर अगणित तडे गेलेत आणि भोकेही पडलीत- तर मी काही मुलांना धोक्यापासून वाचवू शकत नाही. आपण आपला खोटा भ्रम करून घेतो की आपण चांगले आहोत आणि त्यामुळे देव आमचे चांगले करील.
पालकांसाठी तीन धडे
माझी वडिलांनी मला क्षमा मागितल्याचा दीर्घकालीन परिणाम सांगणे कठीण आहे- विशेषत: जेव्हा पहिली चूक
माझीच होती. मला स्वत;ला माझ्या मुलांचे पालकत्व करताना खूपच शिकायचे आहे. माझी जुळी मुले फक्त ६ वर्षांची आहेत. आम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय पण प्रथमच नाझ्या लक्षात आले जेव्हा त्यांच्या अवज्ञेला माझा तीव्र प्रतिकार होतो तेव्हा तेव्हा माझे पाप कबूल करून ते पदरी घेण्यामुळे माझे आणि त्यांचे नाते संबंध अधिक दृढ होत आहेत. सत्य हे आहे की माझे पाप लपवण्याच्या कौशल्याने नातेसंबंध सुधारत नसतात. जर माझ्याप्रमाणेच तुम्हाला नम्रतेने पालकत्व करायचे असेल मुलांवर प्रेम करताना तीन धडे शिकायची गरज आहे.
- पालक म्हणून देव फक्त माझ्याद्वारे कार्य करत नाही पण माझ्यामध्ये कार्य करतो.
पालक असणे म्हणजे माझी खिस्तीपणात वाढ पूर्ण झाली असा अर्थ नाही तर आता मी एका महत्त्वाच्या मोसमात प्रवेश केला असा होतो. पालक मुलांची शारीरिक वाढ होण्याच्या प्रखर मोसमात जसे मुलांबरोबर चालतात तसेच देव पालकांबरोबर त्यांच्या आध्यात्मिक वाढीच्या प्रखर मोसमात त्यांच्याबरोबर चालत असतो. सर्वच पालक आपल्या मुलांविरुद्ध पाप करतात . प्रश्न आहे की आपण आपले पाप ओळखून ते कबूल करून मुलांना क्षमा मागतो का? आपल्या पैकी अगदी थोडे जण हे करायला तयार असतात. - खरी पापकबुली ही ह्रदयातून येते तिची योजना करावी लागत नाही.
या लेखामुळे एक धोका उद्भवण्याची शक्यता आहे. आपल्या मुलाने काही परिणाम दाखवावे म्हणून काही पापकबुली आखण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. आपला एखादा कमकुवतपणा स्वीकारून किंवा एखाद्या पापाबद्दल दु:ख प्रकट करून मुलांचे लक्ष वेधून त्यांच्या ह्रदयाची तार छेडण्याचा प्रयत्न करू शकाल. असा प्रयत्न खरी पापकबुली नाही. जेव्हा तुम्ही आपले पाप पदरी घेऊन तुमचा कमकुवतपणा दाखवता तेव्हाच तुमचे मूल बदलण्याची शक्यता असते.
पण खर्या पापकबुलीचा उद्देश परिणाम घडावे हा नसतो. आपल्या मुलांना या प्रकारे वागवून देवाने आपल्याला जे पाचारण केले आहे ते डावलल्याने खरे दु:ख होऊन, देवाला आपण कमी लेखले आहे या जाणीवेने ती होते. आपण देवाला योग्य असे जीवन जगलो नाही या जाणीवेतून ती होते. तो कृपाळू व दयाळू आहे. मी तर अकृपाळू व कडक आहे. तो मन्द्क्रोध आहे . मी तर पटकन रागावतो व मुलाने अवज्ञा करताच माझा रागाचा पार वर चढतो. तो प्रीती आणि विश्वासूपणात उदंड मी तर त्यामध्ये कृपण आहे आणि अविश्वासनीय आहे.
- खरी क्षमायाचना शेवटी “पण” म्हणत नाही
आमच्या मुलांशी सर्वात अर्थभरितसंवाद होतात जेव्हा आम्ही आपला कमकुवतपणा कबूल करून त्याचा दोष त्यांच्यावर लादत नाही. उदा. “पण जेव्हा तू…” तुमची क्षमायाचना तशीच त्यांच्यापुढे राहू दे. प्रयत्न करा. “पण” म्हणून तुमच्या पापाचा दोष त्यांच्यावर लादू नका. - तुम्ही पालक आहात, प्रौढ आहात. कित्येक वेळा तुमच्या मुलाच्या पापाचा दोष तुमच्या पापामुळे होतो. मुलांना फक्त पापस्वभावच नाही तर पापी आईवडील पण आहेत. मुलांनी पाप करण्यापूर्वी आपण आपली भूमिका बजावलेली नसते. ती म्हणजे आपली शक्ती खर्चून मुलांना शिकवण्याची , त्यांच्या पुढे नियम मांडण्याची आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते हळुवारपणे सांगण्याची.
होय क्षमायाचना आपला कमकुवतपणा दाखवते – आपल्या मुलांनी तो जसा पाहायला हवा तसाच. आपण प्रौढ पालक देवासमोर आपल्या पापी मुलांपासून दूर असे उभे राहत नाही तर आपण त्यांच्या बरोबरच पापी म्हणून उभे असतो अजूनही आपल्याला त्याच्या कृपेची आणि बदलण्यासाठी त्याच्या सामर्थ्याची गरज आहे.
Social