जेव्हा लूकाने (लूक११:२-४) मधील प्रभूची प्रार्थना नमूद केली तेव्हा त्याने येशूने केलेला त्या प्रार्थनेचा उलगडाही नमूद केला. यावेळी येशूने एक जुना दाखला वापरला. तो ऐकून त्यावेळचे त्याचे श्रोते आतल्या आत दचकले असतील:
“मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’ आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही’? मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल” (लूक११:५-८).
जरा विचित्र बाब म्हणजे ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या नमवणारी परिस्थिती आहे. एक वैतागलेला व नाखूष दाता आपल्याला येथे प्रार्थना करण्यासाठी उत्तेजन देत आहे. अशा प्रकारच्या गरजेमध्ये आणि अशा प्रकारच्या दात्यामध्ये येशू आपल्याला काय पाहावे असे असे सांगतो?
१. अनपेक्षित गरजांची अपेक्षा करा
पहिली पहायची गोष्ट म्हणजे प्रमुख पात्र असलेला पाहुणा हा अनपेक्षित आहे. येशूच्या श्रोत्यांना हे सहजच समजले असेल.
पहिल्या शतकातील पौर्वात्य संस्कृतीत आलेल्या पाहुण्याला जेवण न वाढणे हे ही अत्यंत शरमेची बाबा असे. लक्षात घ्या की हा मनुष्य आपल्या अनपेक्षित पाहुण्याला जेवण देण्यासाठी मध्यरात्री आपल्या झोपलेल्या संपूर्ण कुटुंबाला झोपेतून उठवायला तयार होता. जेवण नसणे आणि झोपलेले कुटुंब या दोन्ही गोष्टी लाजिरवाण्या आहेत आणि जर त्याने हे आगाऊ पाहिले असते तर नक्कीच टाळले असते.
धडा पहिला: आपण अनपेक्षित गोष्टींची अपेक्षा करून त्यांना प्रतिसाद द्यावा अशी येशूची इच्छा आहे.
२. तुम्ही गैरसोयीसाठी तयार असा
दुसरी गोष्ट म्हणजे या प्रमुख पात्राचा अनपेक्षित पाहुणा मध्यरात्री आला. अर्थातच हे मध्यरात्रीच घडायला हवे होते.
आपल्यापैकी बहुतेक जणांना अनपेक्षित गोष्ट पुरवण्यासाठी मध्यरात्र ही गैरसोयीच वेळ वाटेल. त्या काळात तर ही खरोखरच गैरसोयीची वेळ होती. आपल्या या मनुष्याला कुटुंब होते आणि तो त्यांची झोप मोडणार होता. यामुळे घरात देण्यासाठी अन्न नसताना – अचानक मध्यरात्री अनपेक्षित पाहुण्यांना जेवण पुरवताना नाराजीचा सूर किंवा तू मजा तर करत नाहीस ना? असे उद्गार येणे सहाजिकच होते. आतासारख्या २४ तास मिळणाऱ्या सुविधा, गुपचूप फोन करून मदत मिळवणे उपलब्ध नसल्याने या मनुष्याला मध्यरात्री केवळ तीन भाकरींसाठी मित्राच्या घराकडे जाऊन त्याच्या सर्व कुटुंबाला उठवावे लागले.
धडा दुसरा: अत्यंत गैरसोयीच्या वेळी आपण अनपेक्षित गरजा पुरवाव्या अशी येशूची इच्छा आहे.
३. तुमची कमतरता मान्य करा
आपले मुख्य पात्र या झोप आलेल्या मित्राला काय म्हणतेय याकडे लक्ष द्या. “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही.”
“माझ्याकडे काही नाही” हे काही करू शकत नाही असे सांगणारे प्रभावी शब्द आहेत. दाखल्यातील या मनुष्याला गरज भागवण्यासाठी काहीच जवळ नसल्याने ज्याच्याजवळ साधने आहेत त्याच्याकडे विनंती करायला भाग पाडतात.
लक्षात घ्या की हा दाखला प्रार्थनेसबंधी आहे पाहुणचारासबंधी नाही. माझ्याजवळ काही नाही अशा या मनुष्याच्या शब्दांद्वारे आपण आपली देवासमोर असलेली आपली स्थिती पहावी अशी येशूची इच्छा आहे. दुसऱ्या कोणाची गरज भागवताना आपल्याला हताश वाटणारी भावना हेच सांगत नसते काय? पती, बाप, मित्र, पाळक, लेखक – एक ख्रिस्ती या नात्याने मला हे रोज आणि रोज जाणवत असते. माझ्यासभोवती असलेल्या गरजा भागवण्याची साधने माझ्यामध्ये नाहीत. आपली कमतरता कबूल करण्यापेक्षा इतरांच्या गरजा टाळण्याचे स्वीकारण्याचा मोह आपल्याला बरा वाटतो.
येशूला आपली दीन स्थिती फक्त माहीत आहे असे नाही तर त्यानेच ती निर्माण केली आहे. तो वेल आहे आपण फाटे आहोत. “कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही” (योहान १५:५). आपल्याजवळ स्वत:चे असे देण्यास काही नाही हे आपल्याला खरेपणाने समजावे अशी त्याची इच्छा आहे. कारण हीच असहायता आपल्याला देवाकडे नेते आणि त्याच्याजवळ आपली गरज मागायला लावते. म्हणूनच हा दाखला सांगितल्यानंतर लगेचच येशूने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल” (लूक ११:९).
धडा तिसरा: अनपेक्षित, गैरसोयीची गरज भागवण्याची आपली कमतरता समजून आपण देवाने आपल्याला इतरांची सेवा करण्यास साधने पुरवावी म्हणून त्याच्याकडे विनंती करण्यास धाव घ्यावी.
४. देव मदत करण्यास उत्सुक आहे हे लक्षात ठेवा
चवथी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे असहाय मित्राला मदत करण्यासाठी झोप आलेल्या मित्राकडून नाखुशी. यामुळेच हा दाखला जरा विचित्र वाटतो. झोप आलेल्या मित्राला आपल्याला कोणी त्रास देवू नये असे वाटते. यामुळे आधीच गैरसोय व मानहानी झालेल्या आपल्या प्रमुख पात्राला अधिकच आग्रहाने मदत मागण्यास भाग पाडले जाते.
अशा नाखूष मित्राचा उपयोग करून येशूने प्रार्थनेला उत्तेजन का दिले? याचे कारण आपल्याला काही वाक्यानंतर येशूने जो मुद्दा मांडला त्यातून दिसते: “मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल” (लूक ११:१३).
येशूचा इथला मुदा आहे की आपण दुष्ट बाप आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याची इच्छा करतो त्यापेक्षा अधिक आपला स्वर्गीय पिता आपल्याला चांगल्या देणग्या देण्याची इच्छा करतो. तसेच या दाखल्यातील मित्राची नाखुशी हे आपल्या स्वर्गीय पित्याचे प्रतिबिंब नाही. तो तर आपल्या स्वर्गीय पित्याच्या विरुध्द आहे. हा स्वार्थी आहे, गैरसोय टाळणारा मित्र असूनही जर आपल्या असहाय मित्राच्या गरजेने त्याला स्पर्श होतो तर आपला उत्सुक उदार पिता आपल्या सातत्याच्या प्रार्थनांनी किती हेलावला जाईल? जर देव आपल्या प्रार्थनांना उत्तर देण्यास उशीर लावत असेल तर तो त्याच्या नाखुशीमुळे तर मुळीच नाही.
धडा चवथा: आपण मिटवू न शकणाऱ्या अनपेक्षित गैरसोयीच्या गरजांना प्रतिसाद द्यावा अशी येशूची इच्छा आहे; आणि आपला स्वर्गीय पिता आपल्याला पुरवण्यास उत्सुक आहे याची आठवण ठेऊन तो आग्रहाच्या प्रार्थनेद्वारे द्यावा.
हे आमंत्रण तुम्ही स्वीकारलं का?
प्रार्थनेबद्दलचा हा जरा विचित्र वाटणारा दाखला ही एक अद्भुत देणगी आहे. येशू आपल्याला खात्री देत आहे की अगदी अवेळी उद्भवणाऱ्या गैरसोयीच्या गरजा, अनपेक्षित गरजा आपण भागवण्यास असमर्थ असतो म्हणून त्या आपल्याला देवाकडे मागण्यास प्रवृत्त करतात. ह्या बाबी सामान्य ख्रिस्ती जीवनाचा भाग आहेत.
खरे तर त्या देवाची रचना आहेत. लोकांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी आनंदाने त्याग करणे यामध्ये जो आनंद देण्याचे सामर्थ्य आहे तितके इतर गोष्टींत नसते. आणि देवाने आपल्या गरजा पुरवाव्या म्हणून त्याच्यावर भरवसा ठेवण्याची इच्छा करणे यासारखी देवाला संतोष देणारी एक बाब आहे. जेव्हा आपण अनपेक्षित, गैरसोय व दडपून टाकणाऱ्या बाबींना तोंड देतो तेव्हा ही दोन सामर्थ्ये एकत्र येतात. आपल्या येशूसारखा त्याग करून आणि पूर्णपणे येशूवर विश्वास टाकण्यासाठी या आपल्याला संधी अशा असतात.
Social