Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Oct 7, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा २५.                     १ योहान ४: १७- २१                स्टीफन विल्यम्स

धडा २५. १ योहान ४: १७- २१ स्टीफन विल्यम्स

                                                                                      परिपूर्ण प्रीती

ज्या अधिकाऱ्यांना आपण घाबरतो अशा काही व्यक्ती लक्षात आणा. त्यांना आपण का भितो याच्या कारणांचा विचार करा.
आजच्या अभ्यासात आपल्याला योहान परिपूर्ण प्रीतीची दोन लक्षणे निदर्शनास आणून देत आहे: धैर्य आणि बंधुजनांवर प्रीती.

शास्त्राभ्यास

परिपूर्ण प्रीतीचे पहिले लक्षण – धैर्य  (व. १७-१९)

न्यायाच्या दिवसासंबंधी आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे; कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहो. प्रीतीच्या ठायी भीती नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो (४:१७-१९).

१२ व्या वचनात योहानाने आपल्याला सांगितले की जेव्हा आपण ख्रिस्ती म्हणून परस्परांवर प्रीती करतो तेव्हा दोन गोष्टी दिसून येतात: देव त्याच्या आत्म्याद्वारे आपल्यामध्ये राहतो; आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्वाला येते.
आपण १३-१६ वचनांच्या अभ्यासात देव आपल्यामध्ये राहतो याबाबत चर्चा केली – जेव्हा आपण  प्रीती करतो तेव्हा आपण ओळखतो की देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो.
आता वचन १७ पासून पुढे आपण परिपूर्ण प्रीतीविषयी चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण परस्परांवर प्रीती करतो, तेव्हा देवाचा प्रीतीविषयीचा उद्देश आपल्यामध्ये पूर्ण होतो (प्रीती पूर्णत्व पावते).
• वचन १७ मध्ये “परिपूर्ण प्रीतीचे” पहिले लक्षण धैर्य होय.
न्यायाच्या दिवशी असणाऱ्या धैर्याविषयी हे संबंधित आहे – दुसऱ्या शब्दात सांगायचे तर २:२८ मध्ये जसा त्याने ख्रिस्ताच्या द्वितीयागमनाच्या वेळचे धैर्य व त्यासाठी आता त्याच्यामध्ये राहण्याच्या अढळ विश्वासाच्या आधाराचा उल्लेख केला तसेच .
या वचनात ह्या सत्यावर आधारित धैर्य आहे: “जसा तो आहे तसे या जगात आपणही आहो.” दुसऱ्या शब्दात सांगायचे तर न्यायसमयी त्याच्यासमोरील आपले धैर्य हे या जगात असताना आपले त्याच्याशी किती साधर्म्य आहे यावर आधारित आहे.
۰ हे चित्र बालकाला आपल्या बापासमोर वाटणाऱ्या धैर्याप्रमाणे आहे.
۰ आज आपण जितके त्याच्यासारखे दिसू, तितके आपण उद्या त्याच्यासमोर धैर्याने उभे राहणार आहोत – मी तुझे मूल आहे! मी तुझे जीवन           माझ्यामध्ये पाहतो!
•  हाच मुद्दा पुढे चालू ठेवून वचन १८ नकारात्मक विधानाने स्पष्टीकरण करते.
परिपूर्ण प्रीती आणि भय एकत्र राहू शकत नाहीत. येथे आदरयुक्त भयाविषयीचा संदर्भ त्याच्या मनात नाही (इब्री ५:७, ८ वाचा; येशूने                 पित्याचा आदर केला).  या ठिकाणी भयाचा संबंध ज्याचे भय वाटते  त्या व्यक्तीपासून लपण्यास कारण ठरणाऱ्या मनोवृत्तीशी आहे.
रोम ८:१४-१५; २ तीमथ्य १:७ पाहा.
भय व परिपूर्ण प्रीती एकत्र का राहू शकत नाही याचे कारण पुढे दिले आहे – भयाचा संबंध शिक्षेशी आहे आणि तुम्ही जर शिक्षेला घाबरत असाल तर तुम्ही प्रीतीत पूर्ण झालेला नाहीत.
साध्यासोप्या शब्दात सांगायचे तर, जेव्हा देवाच्या प्रीतीचा आपण अनुभव घेतो तेव्हा दोष पूर्णपणे दूर झाल्याचा त्यात समावेश असतो (१ योहान ४:१०). म्हणून माझी शिक्षा ख्रिस्ताने स्वत:वर घेतल्यामुळे दूर करण्यात आली आहे.
जर मला देवाची प्रीती प्राप्त झाली आहे तर मला शिक्षेला भिण्याचे काही कारणच नाही. जर मला भय असेल तर त्याचा अर्थ मला देवाची प्रीतीच प्राप्त झालेली नाही.
•  वचन १९ पाहा. अशा प्रकारे भिण्याऐवजी ख्रिस्ती व्यक्ती देवावर प्रीती करते. त्याची प्रीती आपल्यामध्ये व आपल्यासाठी असल्यामुळे ती आपल्या प्रीतीपूर्वी आली आहे..

बंधुजनांवर प्रीती करणे हे “परिपूर्ण” प्रीतीचे दुसरे लक्षण आहे ( व. २०-२१)

मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे (४;२०,२१).

हा मुद्दा आपण यापूर्वी अनेकदा पाहिला आहे.
• वचन २० नुसार परिपूर्ण प्रीती केवळ देवावर प्रीती करून आणि त्याच्यासमोर धैर्याने जगून सिद्ध करता येत    नाही, तर इतरांवर व बंधुजनांवरची प्रीती दिसल्याने सिद्ध होते .
▫         देवासमोर, परिपूर्ण प्रीती भय घालवून देते.
▫         इतरांसमोर, परिपूर्ण प्रीती द्वेष घालवून देते.
• योहानाची शिकवण लक्षात घ्या:
जर मी दावा करत असेन की मी देवाला ओळखतो, आणि “अंधारात चालत असेन” तर मी लबाड बोलतो आणि मी त्याला ओळखत नाही (१ योहान १:६).
या तत्त्वाचे खास लागूकरण वचन २०मध्ये आहे – जर मी माझ्या बांधवावर प्रीती करू शकत नाही तर मी देवावर प्रीती करू शकत नाही.
۰जे माझ्या डोळ्यांना दिसते त्यावर जर मी प्रीती करू शकत नाही तर न दिसणाऱ्या गोष्टींवर मी प्रीती करतो असा दावा मी कसा करू शकतो? जेव्हा देवाच्या मुलांवर तुम्ही प्रीती करत नाही तेव्हा तुम्ही देवावर प्रीती करत असल्याच्या गप्पा मारणे मूर्खपणाचे आहे. जर तुम्ही माझ्या मुलीला माझ्या अनुपस्थित सतत मारत असाल तर तुम्ही माझ्याशी चांगले  नातेसंबंध ठेऊ शकणार नाही.
प्रभूच्या शरीरात परस्परांशी प्रीतीहीनतेची जीवनशैली मी सवयीने जगत असलो तर त्यातून अखेर हेच सिद्ध होईल की मी देवाशी असलेल्या माझ्या नातेसंबंधांविषयी काहीही दावे केले तर ते खरे नाहीत कारण देवाच्या लोकांवर प्रीती करण्यासाठी मी परिश्रम घेत नाही.
• म्हणून वचन २१ मध्ये आज्ञेची पुनरावृत्ती केली आहे त्यात देवावरील प्रीती व बंधुजनांवरील प्रीती याविषयीच्या येशूच्या वचनातील दोन वास्तवांची सांगड घातली आहे.

चर्चा व मननासाठी प्रश्न

जर “परिपूर्ण प्रीती भय घालवून देते” तर मग देवाचे भय हे ज्ञानाचा आरंभ कसे काय होऊ शकते? (नीति. १:७) चर्चा करा.
• “बंधूचा द्वेष करणे” म्हणजे आपण परस्परांचा खून पाडण्याची इच्छा धरणे नव्हे. द्वेषामध्ये पुढील गोष्टींचा     समावेश होतो.
एखाद्या भावाविषयी किंवा बहिणीविषयी कटुता किंवा राग असण्याची भावना – त्यांच्या विरोधात आपल्याला काहीतरी म्हणायचे असते पण कधीच थेट जाऊन त्यांच्याशी आपण बोलत नाही. एखाद्याविषयी सतत त्याच्या पाठीमागे निंदा करण्यातून त्याच्याविषयीचा द्वेष व्यक्त होतो – एखाद्या भावाविषयी किंवा बहिणीविषयी वाईट शब्दांनी चिखलफेक केली जाते.
स्वधार्मिकतेतून द्वेष व्यक्त होऊ शकतो – तुम्हाला वाटते की आपण इतर सर्वांपेक्षा चांगले आहोत; आणि “प्रत्येक जण माझ्या विरोधात आहे.” अशा प्रकारे तुम्ही इतरांशी क्वचितच संबंध ठेवता.
• तुमचे परस्परसंबंध कसे आहेत? तुम्ही तुमच्या सहभागितेत एकलकोंडे आहात का? हे केवळ “द्वेष न करणे” इतपतच मर्यादित नाही तर प्रत्यक्षात सक्रियतेने प्रीती करण्यासंदर्भात आहे. इशाऱ्याकडे लक्ष द्या – जर कोणी म्हणत असेल “मी देवावर प्रीती करतो” आणि आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतो; तर तो किंवा ती लबाड आहेत.