Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 9, 2019 in जीवन प्रकाश

वधस्तंभ – देवाची वेदी                                                                    डॉनल्ड मॅकलोईड

वधस्तंभ – देवाची वेदी डॉनल्ड मॅकलोईड

प्रत्येक विश्वासी व्यक्तीचा प्रायश्चित्तासबंधीचा काही तरी सिद्धांत असतो.

अखेर विश्वास हा वधस्तंभावर गेलेल्या तारणाऱ्यावर भरवसा आहे आणि ह्यासबंधी काही समजले नाही तर विश्वास हा अशक्य आहे. विश्वासाला पहिल्यापासून माहीत असते की वधस्तंभावर कोणी मरण घेतले आणि तो का मरण पावला हे ही विश्वासाला माहीत असते. तो आपल्या पापांसाठी मरण पावला.

पण इतक्या प्राथमिक ज्ञानाने विश्वास कधीच समाधान पावत नसतो. त्याला या वधस्तंभाच्या पायथ्याशी आपले सर्व जीवन जगायला पाहिजे असते. आणि रोज आणि रोज तो अधिक समजावा अशी त्याची इच्छा असते.

ती देवाची प्रीती होती

समजून घेण्याची पहिली गोष्ट म्हणजे देवाच्या प्रीतीने हे प्रायश्चित्त देऊ केले. कित्येक वेळा सुवार्तावादी लोक अगदी याविरुध्द शिकवतात असा त्यांच्यावर आरोप केला जातो. ते म्हणतात की, ख्रिस्ताने आपल्या मरणाद्वारे क्रोधविष्ट, सूड घेणाऱ्या देवाला मानवजातीवर प्रेम करायला भाग पाडले. पण असे कोणी सुवार्तावादी म्हणत नाहीत आणि बायबल तर नक्कीच असे शिकवत नाही.

देवाच्या प्रीतीमुळे देवाने आपला पुत्र दिला (योहान ३:१६; १ योहान ४:१०). आणि या प्रीतीला काही कारण नव्हते किंवा कोणती सुरुवात नव्हती. देवाप्रमाणेच तीही अनंतकालिक आहे.

हा बायबलचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. देवाची मंडळीसाठीची प्रीती ही त्याच्या पुत्राच्या प्रीतीसारखी नव्हती जी त्याच्या स्वभावाचा आवश्यक भाग होती. ती उत्स्फूर्त आणि मोफत होती. तरीही आपल्यावर प्रेम केल्याशिवाय देवाचे कधी अस्तित्वच नव्हते, आणि याच प्रीतीने त्याला प्रवृत्त केले. ज्याच्याशी गुन्हा झाला आहे अशा व्यक्तीने  पापामुळे तुटलेले नाते जुळवण्यासाठी पुढाकार घेतला; फक्त पुढाकारच घेतला नाही तर त्यासाठी सर्व किंमत भरली.

पित्यावर विशेष भर

नवा करार आपले तारण देवाच्या प्रीतीकडे फक्त नेतच नाही पण तो देवपित्याच्या प्रीतीवर खास भर देतो. यामुळे पौलाने म्हटल्याप्राणे “ज्या पुत्राने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले” (गलती २:२०) त्या पुत्राची प्रीती थोडीही कमी केली जात नाही. पण इतर अनेक मुख्य परिच्छेदात पित्याची प्रीती प्रकर्षाने दिसून येते.  ती योहान ३:१६ मध्ये जितकी स्पष्ट दिसते तितकीच १ योहान ४:१० मध्ये ही दिसते. येथे प्रेषित पौल जाहीर करतो की खरी प्रीती ही पित्याने पुत्राला आपल्या पापांसाठी यज्ञ म्हणून पाठवल्यानेच दिसून येते.

पित्याने फक्त पुत्राच्या कार्याची सुरुवात करून दिली आणि मग पार्श्वभूमीवर एका सावलीसारखा उभा राहिला असे मुळीच नाही. “ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही? (रोम८:३२). तसेच ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे (२ करिंथ ५:२१). नव्या कराराची भाषा सातत्याने देवाच्या याजकपणाकडे निर्देश करते. आपल्या स्वत:च्या पुत्राला वेदीकडे आणणारा खुद्द पिताच होता.

सर्वात आव्हानात्मक भाग

हा वधस्तंभाचा सर्वात आव्हानात्मक पैलू आहे. आपण ख्रिस्ताने स्वत:चे केलेले अर्पण समजू शकतो. जगाबद्दल दया वाटून त्याला कळवळा आला. पण देवपित्याची कृती आपण कशी स्पष्ट करू शकतो? आपल्या स्वत:च्या पुत्राचा यज्ञ करण्याचा त्याला काय अधिकार होता? येथेच प्रायश्चित्ताचे अनेक सिद्धांत चूक करतात. ते पुत्राची कृती स्पष्ट करू शकतात पण पित्याची कृती स्पष्ट करू शकत नाहीत.

देवाने कालवरीवर जे केले ते योग्य होते याचे एका बाबीने समर्थन होते आणि तो बरोबरच आहे कारण बायबल हे एकच कारण यासाठी पुढे करते: ते उचित होते कारण ख्रिस्त या जगाचे पाप वाहत होता (योहान १:२९). येथे घाव घातला गेला कारण या कार्यामागे अनंतकालिक करार होता. यामध्ये पुत्राने पित्याला व पवित्र आत्म्याला मान्यता दिली की तो त्याच्या लोकांबदली जागा घेईल, त्यांचे पाप तो स्वत:चे म्हणून घेईल. ह्या पापामुळे जो शाप आवश्यक आहे तो शाप तो स्वत:वर घेईल आणि तो त्यांच्यासाठी घेईल. जी खंडणी या लोकांच्या मुक्ततेसाठी आवश्यक आहे ती तो  त्यांच्याऐवजी भरेल.

पण या सर्वाची गरज होती का? देव अध्यक्षपदी असल्याने सरळ क्षमा बहाल करू शकत नव्हता का?

त्याचा क्रोध शमला

वादाचा खरा विषय आहे की देवाने आपल्या पापाविरुध्द क्रोध न करण्याचे निवडले असते का? पण हा प्रश्न असे गृहीत धरतो की त्याचा क्रोध ही त्याची निवड आहे: जसे काही जगाच्या पापाला तोंड देताना, देव खाली बसला, विचार केला व त्याने ठरवले की “आता मला पापासंबधी क्रोध करणे भागच आहे”

आपण जसे आपल्या भोवतालच्या अन्यायाला व दुष्टपणाला प्रतिक्रिया करतो तसे हे नाही, आपण रागावतो कारण आपण तसे ठरवतो. आपण रागाची प्रतिक्रिया करतो कारण आपण तसे ठरवतो म्हणून नव्हे तर आपल्या स्वभावातून राग  बाहेर येतो. आपल्याला वाटते देवाचा रागही असाच आहे. पण देव पापाने थक्क होतो आणि हे त्याच्या इच्छेमध्ये मुळावलेले नाही पण तो स्वत: जो आहे त्यामध्ये आहे. मूर्तिपूजा व अमानुष कृत्ये यांमुळे त्याची पवित्रता रागाने भरून जाते. आणि त्याचा राग यांवर आहे म्हणून तो शमवणे अगत्याचे आहे.

देवाचा आपल्यावर क्रोध आहे व त्याच्याशी समेट करायला हवा ह्या संकल्पनाच परस्परविरोधी आहेत.  देवाने पापाला सूट देऊन आपली क्षमा करावी ही कल्पनाच देवाची त्याच्या देवपणापासून फारकत करील.

यामुळेच ख्रिस्ताला शरीराचा – मंडळीचा मस्तक म्हणून मरावे लागले. बहुधा मांडले जाते तसे फक्त देवाचा क्रोध शमण्यासाठीच केवळ नव्हे तर पापांची क्षमा करणे योग्य आहे म्हणून खुद्द देवालाच संतुष्ट करण्यासाठी. त्याच्या आज्ञापालनामुळे ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त घेतले  आणि त्या प्रायश्चित्तद्वारे त्याने देवाचा क्रोध शमवला.

वधस्तंभावरचे गौरव

जर देव पापामुळे क्रोधविष्ट होत नाही तर आपण अशा विश्वात राहतो की ज्याला कायदेकानू नाहीत. जर ख्रिस्ताने  देवाचा क्रोध शमवला नसता तर तो क्रोध अजूनही धुमसत राहिला असता व एके दिवशी त्याने आपल्याला ग्रासून टाकले असते.

मार्टीन लूथर यांनी एकदा म्हटले की, जर नीतिमान ठरवण्याचे पत्रक हरवले गेले तर सर्व सुवार्ताच हरवली जाते. पण नीतिमान ठरवले जाणे यापेक्षा आणखी मूलभूत काही तरी आहे. नीतिमान ठरवले जाणे हे प्रायश्चित्तावरच अवलंबून आहे. आपण त्याच्या रक्ताने विश्वासाद्वारे नीतिमान ठरले गेलो आहोत. आणि प्रायश्चित्त हे त्याच्या देहधारणावर अवलंबून आहे. ख्रिस्ताच्या कार्याचे गौरव हे ख्रिस्त या व्यक्तीच्या गौरवातून वाहते.

विश्वास भरवसा ठेवतो की देवाशी आपले नाते फक्त एकाच घटनेद्वारे ठरवले जाते ती म्हणजे कालवरीचा वधस्तंभ. आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे कारण जो वधस्तंभी खिळला गेला तो गौरवाचा प्रभू आहे.