दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

क्षमा करणे हे आध्यात्मिक युद्ध आहे

मार्शल सीगल

आपल्या जीवनात गोंधळ आणि दु:ख होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या जिवाच्या शत्रूची किंमत आपण कमी करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यातील काहीजण सैतानाचा व त्याच्या हस्तकांचा विचारही करत नाही आणि केलाच तर त्यांचे सामर्थ्य व प्रभाव आपण कमी लेखतो. अर्थातच सैतान पराभूत आहे  आणि त्याचा अंत निश्चित आहे हे सत्य आहे. तरीही अजूनही तो “या जगाचा अधिपती आहे” (योहान १२:३१).  आणि अजूनही तो ‘सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींना व  आकाशातल्या दुरात्म्यांना’ (इफिस ६:१२) चालवतो. तो फसवून राज्य करतो व भ्रष्ट करतो. येशू इशारा देतो की, “कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे” (योहान ८:४४ ). म्हणून प्रेषित पौल धोका दाखवतो की, “आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही” (२ करिंथ २:११).

सैतानाचे आपल्यावर वर्चस्व करणारी गोष्ट कोणती हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. पौल म्हणतो, “ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे; अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही” (२ करिंथ २:१०,११).

सैतानाच्या योजना काय आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचे? तुम्ही आकस धरावा, द्वेष बाळगावा अशी त्याची इच्छा आहे. देवाने नव्हे तर तुम्ही स्वत: सूड घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. क्षमा सैतानावर मात करते आणि क्षमा त्याची दुष्टता उलथून पाडते.

क्षमा करणे कठीण का आहे?

आपल्या जीवनभरात कदाचित क्षमा करणे हीच सर्वात कठीण गोष्ट असावी. मला वाटते याचे कारण अनेक जण यामध्ये वाईट रीतीने यातना सोसतात आणि झगडतात. पण तरीही आपल्या यातना किती प्रमाणात इतरांच्या पापामुळे किंवा चुकांमुळे असतात? आपल्यातील कोणीही पापविरहित नसल्याने आपल्याला या जीवनात प्रीती करायची व मिळवायची असल्याने क्षमा केली जाते.

क्षमा कठीण असू शकते कारण ती आपल्या देहाच्या सर्व इच्छांविरुद्ध झगडते: “पाहिलंत त्यानं मला कसं दुखवल? मी त्याला  पुन्हा का घाव घालू देऊ माझ्यावर?” “ हे इतके खोल दु:ख मला अजूनही जाणवतेय- मी सर्व ठीक आहे असं तिच्याशी ढोंग कसे करू शकते?” “हे असं तो माझ्याशी दहावेळा वागला असेल. मी त्याला काय कमी क्षमा केलीय?” “ तिच्यावर मला आता कधीच विश्वास टाकता येणार नाही- मी तिला कशी क्षमा करू शकते?”
क्षमा न करण्यासाठी तुमचे आवाज काय म्हणतात?

क्षमा करणे कठीण आहे म्हणूनच देव आपल्याला क्षमा करण्याची मोठी कारणे देतो. आपण क्षमा करतो कारण त्याने प्रथम आपल्याला क्षमा केली: “आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा” (इफिस ४:३२). आपण क्षमा करतो कारण देवाने आपल्याला क्षमा करण्यासाठी त्याच्या पुत्राला चेचले.  “आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले” (कलसै २:१४). “त्याने सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले” (कलसै २:१५). खूप किमती क्षमेद्वारे त्याने सैतान आणि त्याचे सैन्य यांना शस्त्रहीन केले – तुमच्या क्षमेसाठी.
सैतान कोण होता, त्याला काय हवे, तो कसे कार्य करतो हे ठाऊक असल्याने देवाने मोडलेल्या शरीराद्वारे आणि रक्त सांडून सैतानाशी लढणे निवडले. देवाने क्षमा करण्याचे निवडले. आणि म्हणून आपणही क्षमा करतो. “आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही”  

क्षमा एक शत्रुत्व

सैतानाला क्षमेचा वीट आहे. तो जे काही आहे आणि ज्यासाठी तो लढतो त्या सर्वाचा क्षमा अपमान करते. तो सतत – सकाळ, संध्याकाळ, दुपारी, रात्री – आपली पापे आपल्याकडे दगडासारखी भिरकावत आपल्याला दोष लावतो (प्रकटी १२:१०). तो खुद्द दोष लावणारा असल्याने क्षमा ही त्याची कट्टर शत्रू आहे. क्षमा ही त्याच्या अस्तित्वाविरुद्ध आहे. क्षमा ही त्याच्या जीवन कार्याचाच अवमान करते. त्याच्यासाठी क्षमा एक शत्रुत्व आहे.

पण ख्रिस्ती व्यक्तीसाठी क्षमा ही शांती करण्याची कृती आहे, जी वधस्तंभावर देवाने विकत घेऊन शक्य केली. पौल लिहितो, “कारण तोच आमची शांती आहे; त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली; त्याने आपल्या देहाने वैर, म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले; ह्यासाठी की, स्वत:च्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी; आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्या द्वारे दोघांचा देवाशी समेट करावा” (इफिस २:१४-१६).

कालवरीच्या टेकडीवर शत्रुत्व मरण पावले आणि त्या जागी शांती वाढू लागली. पौल इथे यहूदी व विदेशी यांच्या मधल्या कित्येक शतके असलेल्या कटू शत्रुत्वाबद्दल बोलत आहे. पण ही शांती जे वधस्तंभांकडे येतात त्या सर्वांसाठी आहे.

क्षमा ही सैतानाचा शत्रू आहे कारण तो शत्रुत्व पोसतो व कृपेला तुच्छ लेखतो. यामुळेच कृसाने त्याचा छळ केला , त्याच्या दुष्ट कल्पनांपेक्षा हा त्याच्यासाठी भयानक अनुभव होता. आणि क्षमा करण्याची प्रत्येक कृती ही त्याच्या मनावर झालेल्या आघातावर पुन्हा पुन्हा आघात करते.

जर आपण क्षमा राखून धरतो

याचा अर्थ क्षमा राखून ठेवणे हे सैतानाच्या आहारी जाणे, त्याच्या लढाईत मदत करणे, त्याच्या कार्याला जाऊन मिळणे आहे. क्षमा राखून ठेवणे हे आपल्या जीवाची आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे. येशूने सूचना दिली, “ कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही” (मत्तय ६:१४-१५).
क्षमा न करण्यातली आत्महत्या तुम्ही इथे ऐकताय ना? जे आपण इतके कटू किंवा गर्विष्ठ असू की आपण आपले हात क्षमा करण्यासाठी पुढे करणार नाही तर देव त्याचे हात आखडून घेईल. जर आपण क्षमा करण्यास नकार दिला तर आपले प्रत्येक पाप तो आपल्यापुढे धरेल जोपर्यंत आपण क्षमा करणार नाही. (मत्तय १८:३५) आणि आपण ते कधीच भरू शकणार नाही. क्षमा न करणे म्हणजे सैतानाच्या दुष्टतेला जाऊन मिळणे एवढेच नाही तर असहाय, क्षमा न केले असे अंधारात टाकले जाणे.

आणि येशू आपल्याला केवळ एकदाच नव्हे तर पुन्हा पुन्हा अथक क्षमा करण्याचे पाचारण करतो. “तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्‍चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्‍चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर” (लुक १७:३-४). त्यापूर्वीच्या वचनात जो क्षमा करायला नकार देतो त्याच्यावर भयंकर न्याय येईल असे तो सांगतो (लूक १७:२).

एका दिवसात सहा वेळा क्षमा केली असली तरी क्षमा राखून धरणे हा देवाविरुद्ध दुष्ट गुन्हा आहे. शहाणे लोक न्यायापासून दूर पळतात आणि क्षमा करण्यासाठी धावतात.

तुमच्या अपराध्याचे समाधान करा

जेव्हा पौल करिंथ येथील मंडळीला ज्या व्यक्तीची क्षमा करण्यास सांगतो त्या व्यक्तीसाठी ही वैयक्तिक आणि  दु:खदायक गोष्ट होती. “म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा” (२ करिंथ २:७). सैतान कचरलेला तुम्हाला दिसतोय? पौल त्याच्या या अपराध्याला  फक्त क्षमाच करत नाही तर क्षमेसाठी मोहीम करतो आणि क्षमेपलीकडे जाऊन त्याच्यावर प्रीती व  समाधान करायला सांगतो.  “मी तुम्हांला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या” (२ करिंथ २:८).

पौलाच्या  यापूर्वीच्या  पत्रामुळे बंडखोर लोकांनी पश्चात्ताप केला (२ करिंथ ७:९). पण काही लोकांना आपल्याला  दगा दिला असे वाटले आणि त्यांच्या  पुढार्यांना शिक्षा द्यायला ते तयार होते. (२ करिंथ  २:६). तथापि सैतानाला काय हवे होते हे पौलाने पाहिले. त्याला चीड येण्यास, आकस बाळगण्यास अनेक कारणे होती. पण त्याने स्वत:ला नाकारले, आपला वधस्तंभ उचलला आणि त्यांना क्षमा केली. सैतानाने परिस्थिती कटुता आणि फूट पाडून बिघडवण्याचा प्रयत्न केला, पौलाने कनवाळूपणा व क्षमा करणाऱ्या प्रीतीने ती सुधारली. ज्यांनी त्याला दुखावले त्यांचे तो समाधान करू शकला कारण त्याचे समाधान पुन्हा पुन्हा केले गेले होते. ते “जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” (२ करिंथ १:३-४) याने केले होते. तुम्ही असे समाधान अनुभवले आहे का? मग ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांच्यापर्यंत ते समाधान तुम्ही पोचवणार नाही का?

क्षमेचे शस्त्र

ई.डी. वेल्च हे समुपदेशक लिहितात; “आज आध्यात्मिक युद्ध करण्याचा आपल्यासाठी परिणामकारक मार्ग म्हणजे लवकरात लवकर आणि मुक्तपणे क्षमा करणे. लक्षात ठेवा:
१) देहाचा कल हा पापाकडे, स्वत:च्या फायद्याकडे असतो. “मला यातून काय मिळेल” हा च प्रश्न विचारण्याची त्याची वृत्ती असते.
२) सैतान हा लबाड आणि फूट पाडणारा आहे. लक्षात घ्या की आध्यात्मिक युद्धाचे स्पष्ट शिक्षण (इफिस ६) देणारे पुस्तक ऐक्यावर भर देते. सैतानाचे प्रमुख धोरण म्हणजे फूटी आणि विभाजन करणे.
३) जग याच प्रवृत्तीचे भांडवल करते.”

“ आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नाही” (इफिस ६:१२).  आपण रक्त व मास यांना क्षमा करण्यास धावतो.  अंधाराचे राज्यकर्ते व अधिकारी हे क्रोधयुक्त आकसाने व्यवहार करतात. दुष्ट आध्यात्मिक शक्ती कटुत्व व मतभेद निर्माण करतात. पण आपण ज्यांना देवाने क्षमा केली आहे ते क्षमेच्या मोल्यवान व धोकादायक  शस्त्राने त्यांना विरोध करतो व त्यांच्यावर मात करतो.

Previous Article

चिडचिड? विसरून जा

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

उधळ्या पुत्रांच्या पालकांसाठी सात उत्तेजने

जॉन पायपर प्रश्न पास्टर जॉन, वीस वर्षांच्या एका उधळ्या पुत्राची मी आई आहे. लूक १५ हा अध्याय मी पुन्हा पुन्हा वाचते. मी त्याचा खूप अभ्यास केला आहे. जर तुम्ही  अशा उधळ्या पुत्राच्या/ कन्येच्या  पालकांशी बोलला […]

तुम्ही विश्वास ठेऊ शकाल अशा सात लबाड्या मॅट रीगन

एका आजारी मुलाला त्याचे आजोबा प्रिन्सेस ब्राईड हे गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवत होते. त्यामध्ये ह्या राजकन्येवर अन्यायामागून अन्याय घडत जातात व एका दुष्ट राजपुत्राशी लग्न करण्याची बळजबरी तिच्यावर केली जाते याचे वर्णन होते. तो मुलगा […]

अजून अधिक साध्य करता आले असते अशी इच्छा तुम्ही करता का?

वनिथा रिस्नर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सुरुवात महान अभिवचनाद्वारे झाली. एका देवदुताने केलेली घोषणा. देवाकडून झालेले पाचारण. एक भरभराटीचे सेवाकार्य. तरीही त्याच्या जीवनाचा शेवट होताना कोणाला त्याची काहीच कल्पना नव्हती – एका तुरुगांच्या कोठडीत एकाकीपणात.जेव्हा देव […]