पाप्यांसाठी आशा
आपल्या पापामुळे आपण का भारावून टाकले जातो यावर चर्चा करा.
पत्राचा समारोप करताना योहान जी तीन ठाम विधाने करतो, त्यातील पहिले १८ व्या वचनात आहे. यामध्ये ख्रिस्ती जीवनाविषयीचे मुद्दे त्याने उभे केले आहेत. हा पहिला मुद्दा पापाविषयी आहे.
शास्त्राभ्यास
पाप्यांसाठी आशा
पाप या विषयावर योहानाने केलेली सांगोपांग चर्चा आपण पाहिली आहे. पण समारोप करताना योहान आपल्याला आपल्या पापाविषयी आशा देत आहे.
• १ योहान १:९ व २:१-२ मध्ये आपण पापात पतन पावल्याने व देवाच्या नियमांच्या उल्लंघनाचा अपराध केल्याने होणाऱ्या परिणामांविषयी योहानाने आपल्याला आशा दिली आहे.
ज्या विश्वासी व्यक्तीने स्वत:ला पाप करून भ्रष्ट केले आहे त्याच्यासाठी शुद्धीकरणाची तरतूद आहे.
जितके ख्रिस्तावर विश्वास ठेवतील त्या सर्वांच्या पापांसाठी येशूख्रिस्त “प्रायश्चित्त” झाल्यामुळे त्यांना क्षमा मिळते व त्यांच्यावरील देवाचा क्रोध दूर केला जातो.
• पण येथे योहान सांगत आहे की आपण पाप केले तर आपल्याला केवळ आशा आहे एवढेच नाही तर तो आपल्याला पापावर विजय मिळवण्यासाठी संरक्षण देणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी पुरवतो.
पहिले संरक्षण अस्त्र: नवीन स्वभाव
जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत राहत नाही हे आपल्याला ठाऊक आहे ( ५:१८अ ).
पहिले संरक्षण वचन १८ मध्ये स्वभावासंदर्भात आहे.
• योहान विश्वासीयांच्या संदर्भात बोलत आहे हे स्पष्टच आहे. कारण तो म्हणतो, “जो कोणी देवापासून जन्मला आहे” हे लोक देवाची आत्मिक मुले आहेत. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. ते सतत “पाप करीत राहत नाहीत.” ते सवयीच्या पापाचा तिरस्कार करतात. ते त्या पापाशी लढा देता.
यात आपण आशा व उत्तेजन कसे प्राप्त करू शकतो? घालून दिलेला दर्जा उच्च आहे.
तो विश्वासीयांचे वर्णन कसे करतो यात त्याचे उत्तर आहे – “देवापासून जन्मलेला”
“आम्ही पाप करत राहात नाही” हे आमच्यासाठी मोठे कर्तव्य आहे. पण कर्तव्य जितके मोठे आहे, तितके महान सामर्थ्यही आपल्याला पुरवले आहे.
” देवापासून जन्मला आहे” हे शब्द नवीन जन्माविषयी बोलतात. त्यावेळी आपल्या स्वभावाचे पवित्र आत्म्याद्वारे नवीकरण होते.
योहान ३:६: “आत्म्यापासून जन्मणे” हे देहाने जन्मण्याशी समांतर आहे – स्वाभाविक कृती.
रोम ८:८,९: विश्वासी व्यक्ती “दैहिक नसतात” तर “आत्मिक असतात.” याचा अर्थ त्या देवाला संतुष्ट करू शकतात.
रोम ६:६-७ दुसऱ्या शब्दात सांगायचे तर “पुनर्जन्म होणे” म्हणजे “आत्म्याने जन्मणे.” याचा अर्थ आपण इत:पर “दैहिक नाही” किंवा पापाच्या पाशात अडकू शकत नाही. देवाचा आत्मा आपल्याला नीतिमत्तेचे फळ देण्यास सामर्थ्य पुरवतो.
चर्चा करा की हे तुम्हाला देवाच्या समागमे चालण्याची वाटचाल करण्यास कसे आशादायी बनवते?
दुसरे संरक्षक अस्त्र : ख्रिस्ताचे संरक्षण
जो देवापासून जन्मला तो (ख्रिस्त) त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही (५:१८).
हे स्पष्टच आहे की विश्वासी व्यक्ती देवाचे मूल आहे म्हणून तिच्यावर मोह येण्यापासून ती मुक्त आहे असे नाही.
• आपण पाहिले की विश्वासी व्यक्तीचा एक भाग आहे की तिला आत्म्यात नवीन स्वभाव मिळालेला आहे; ज्यात नवीन प्रीती आहे आणि ती आता पापाच्या बंधनात नाही. आता आपण पापाशी लढा देऊ शकतो.
• तरीही सैतान दोषारोप ठेवणारा आहे. तो गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो (१ पेत्र ५:८).
• आपला पुनर्जन्म झाला आहे म्हणून आपण स्वत:ला आज्ञाधारक राखण्यास सक्षम आहोत असा अर्थ होत नाही.
• याच हेतूने योहान आपल्याला या दुसऱ्या महान संरक्षणाची आठवण करून देतो: ख्रिस्ताकडून आपण रक्षिले जातो.
• लक्षात घ्या की देवापासून जन्मलेली प्रत्येक व्यक्ती पाप करत राहात नाही. तर देवापासून जो जन्मला आहे त्याचे तो रक्षण करतो.
ख्रिस्ताशिवाय तो दुसरा कोण असणार? ख्रिस्त, देवाचा पुत्र, देवाच्या मुलांना राखतो. हे कौटुंबिक सुरक्षिततेचे सुरेख चित्र आहे.
• जर आपण त्या दुष्टाच्या विरोधात एकटेच उभे राहायचे म्हटले तर आपल्याला काय आशा आहे? पण योहान काय म्हणतो पाहा – ख्रिस्त आपले रक्षण करतो आणि तो दुष्ट त्याला स्पर्शही करू शकत नाही. हे समजून घ्या.
योहान १७:१५: त्या दुष्टापासून राखण्यास (संरक्षण करण्यास) येशूने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली.
योहान १७:१२; योहान १०:२८: येशू आपल्या संरक्षणासाठी कार्यरत असतो.
यहूदा २४, १ पेत्र १:५: देव आपल्याला पतनापासून राखतो. यासाठी की आपण आपल्या तारणाचा शेवट गाठावा, तो म्हणजे आपल्या शरीराची मुक्ती .
चर्चा व मननासाठी प्रश्न
चर्चा करा: नवीन जन्माचे वास्तव तुमच्या स्वत:च्या देवासोबतच्या वाटचालीत तुम्हाला कसे आशादायी बनवते?
• विश्वासी व्यक्तीचे संरक्षण देवाने आपल्याला राखण्यात आहे. आपण स्वत: देवाचे आज्ञापालन करण्यात नाही. पापाशी चालू असलेल्या आपल्या संघर्षात आपण देवावर अवलंबून आहोत हे कोणकोणत्या प्रकारांनी आपण व्यक्त करू शकतो?
Social