नवम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

संघर्षला तोंड देताना जॉश स्क्वायर्स

मला संघर्षला तोंड द्यायला नेहमीच नको वाटे. संघर्ष टाळा अशी पाटी मला बाळगायला आवडले असते. त्याचे काही का कारण असेना (स्वभाव , संदर्भ, पाप, इ. ) संघर्षाशी मुकाबला करण्याऐवजी मला त्यापासून पळणे बरे वाटे. पण तिशीचा असताना समुपदेशक म्हणून मी प्रशिक्षण घेत असताना एकाने मला स्पष्ट केले की संघर्षामुळे  नेहमी हानीच होते असे नाही. याउलट एखाद्या व्यक्तीशी संघर्ष होत असतानाही त्या व्यक्तीशी जवळीक वाटणे शक्य आहे.

ही कल्पना माझ्यासाठी क्रांतिकारी होती. तथापि कुशलतेने हाताळलेला संघर्ष सोपा नसतो. त्यासाठी समर्पण,  चिकाटी, आणि जेव्हा पुढे जाताच येत नाही तेव्हा क्षमा करण्याची तयारी हवी असते. थोडक्यात म्हणजे आपले ख्रिस्ती जीवन ते प्रतिबिंबित करते.

बायबलमध्ये  यासंबंधी खूप काही सांगितले आहे. कलसै: ३:१२-१७ या वचनाचा अभ्यास करताना माझ्या मनावर हे सत्य ठसले गेले की ह्या गुणांची आपल्या ख्रिस्ती जीवनात वृद्धी व्हायला हवी एवढेच नाही तर ते बाहेर – बाहेरच्या जगामध्ये- आणि -आतमध्ये-  आपल्या ख्रिस्ती बहीण भावांमध्ये वापरले गेले पाहिजेत. मला वाटते कलसै३:१२ विशेषत: ख्रिस्ती जनांनी एकमेकांसोबत कसे वागायला हवे याची दिशा दाखवते.

१. करुणायुक्त ह्रदय
करुणायुक्त ह्रदय असणे हा पहिला गुण पौलाने दिला आहे. कनवाळू ही भावना आपल्या तारणारा येशू ख्रिस्त यासाठी अनेक वेळा वापरली आहे. (मत्तय २०:३४; मार्क १:४१; लूक ७:१३ इ.) करुणायुक्त ह्रदय असणे म्हणजे एखाद्याची स्थिती पाहून मन खोलवर द्रवणे. एखाद्याच्या स्थितीने असे मन द्रवण्यासाठी आपल्याला त्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी धडपड करायला हवी. याचा अर्थ बोलण्याऐवजी ऐकण्यासाठी घाई करावी (नीती १८:१३). याचा अर्थ ते कसे दुखावले गेले हे समजण्याची इच्छा हवी, मग जर दुखवणारे तुम्ही असलात तरी. जेव्हा दोन्ही बाजूंना आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटते तेव्हा तर हे अधिकच कठीण होते. तथापि दुसऱ्याचे ऐकण्यासाठी आपल्या भावना काही काळ प्रथम बाजूला ठेवणे हे आध्यात्मिक प्रौढत्वाचे चिन्ह आहे.

२. दयाळूपणा

दयाळू म्हणजे कनवाळूपणाची कृती. तुमच्या कृतीद्वारे दाखवून द्या की संघर्षात असतानाही तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता आणि काळजी करता. डोळे फिरवणे, खांदे उडवणे, सुस्कारा टाकणे अशा प्रतिक्रिया संघर्ष आणखीनच वाढवतात. तणावाच्या वेळी तुमच्या शरीराची भाषा, आवाजाचा चढउतार ही महत्वाची काळजी व्यक्त करणारी संपर्काची साधने आहेत. दयाळू असण्यामध्ये तुमचे विचार आणि शब्दांवर नियंत्रण ठेवणेही येते. बहुधा दोन्ही गट आपला राग व दु:ख प्रकट करणाऱ्या विचारांची व भावनांची शब्दफेक करत असतात. अशावेळी उभारणी करणारा संवाद बाजूला सारला जातो. त्या विचारांना तोंड द्या. आठवण स्वत:ला आठवण करून द्या की तुम्हीही पापी आहात व तुम्हालाही कृपेची अत्यन्त गरज आहे (रोम ३:२३). देवाने तुमच्या जीवनात क्षमेची तरतूद केली आहे म्हणून त्याचे उपकार माना आणि त्याला विनंती करा की ज्या व्यक्तीशी तुमचा संघर्ष चालू आहे त्यालाही अशी क्षमा करण्यास त्याने मदत करावी (कलसै: ३:१३).

३. नम्रता

नम्रता ही कृती बक्षिसाची अपेक्षा करत नाही. अनेकदा लोकांना संघर्षात उतरताना एक खेळी खेळण्याची भावना असते. यातली बहुतेक देवाणघेवाण दोष देणे आणि चुका दाखवण्याची असते, एकमेकांना उभारण्याची नसते. (इफिस ४:१५-१६; रोम १४: १९; १ थेस. ५:११.) संघर्षाद्वारे तुम्ही तुमच्या वैयक्तिक इच्छांना मरा आणि त्याऐवजी अशा विचाराने जगा की तुम्हाला येशू दाखवण्यासाठी ही एक अमोल संधी आहे.

४. सौम्यता

सौम्यता म्हणजे दोष न देता मदत करण्याची कृती. याचा अर्थ आपल्या संघर्षाला एक हेतूची गरज आहे. बहुतेक वेळा संघर्ष हा तणाव मुक्त करण्याचे धोरण नसून  भावनांच्या ज्वालामुखीचा उद्रेक असतो. आता आपल्याला कोणी केव्हा आणि कोठे दुखावेल हे आपण निवडू शकत नसलो तरी तो आपल्याशी केव्हा आणि कसे बोलणार हे आपण निवडू शकतो.
तसेच प्रत्येक वेदनेवर चर्चा करायचीच असे नाही. जर १ ते १० च्या पट्टीवर जर तुमची वेदना पाच किंवा त्याखाली असेल तर तुम्ही क्षमा करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जा (कलसै ३:१३). पण जर तुम्ही क्षमा करू शकत नाही आणि जर तुमची वेदना यापेक्षा मोठी असेल तर सुज्ञतेने तुम्ही केव्हा व कसे बोलणार हे निवडा. उदा. काही लोक सकाळच्या व्यक्ती असतात; अशा व्यक्तींशी जर अगदी रात्री बोलण्यास सुरुवात केली तर ते तुमच्या बोलण्याकडे फार लक्ष देणार नाहीत आणि हेच रात्रीच्या व्यक्तीलाही लागू करा. तुम्ही शब्दही असे निवडा की जे दुखावणार नाहीत व दोष देणारे नसतील (नीती १६:२४). तुम्हाला कितीही वैताग वाटला, राग आला तरी एखाद्याला बचावात्मक पवित्रा घेण्यास लावणारे शब्द सहसा मदत करत नाहीत. आपला वेदनेचा अनुभव सांगताना दुसऱ्यांना न दुखावता योग्य रीतीने तो सांगण्याची क्षमता आपल्यामध्ये असते.

५. धीर

काही परिणाम होत नसला तरी  मदत करतच राहणे धीरामुळे आपल्याला शक्य होते. सेमिनरीमध्ये एकदा आमचे एक प्राध्यापक म्हणाले, “क्ष या व्यक्तीशी देव जसा तुमच्याशी धीराने वागतो तसा धीर धरण्यास तुम्हाला जमेल का?” आता क्ष ऐवजी ज्या व्यक्तीशी तुमचा संघर्ष आहे तिचे नाव घाला. प्रत्येक वेळी आपण पाप करतो तेव्हा देव आपल्याला झटका देण्यासाठी एक विजेचा लोळ पाठवत नाही. आणि जर मी पूर्वीसारखेच आताही पाप केले तर तो माझा नाश करणार नाही. तरीही देव आपल्याला सोडत नाही किंवा मला टाकून देत नाही. त्याऐवजी तो आपल्या लोकांना अभिवचन देतो  “तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही” (अनुवाद ३१:६).

लोक सर्व जीवनभर एकाच प्रकारच्या बाबीशी झगडत असतात. तुम्हाला असा कोणी मित्र आहे का  ज्याला कुणाची मदत घ्यायला संकोच वाटतो? तुमचा जोडीदार/ जोडीदारीण असा आहे का जो व्यवस्थित संवाद करू शकत नाही? तुमचे एखादे भावंड सर्वच तपशील देत राहते का? आता हे ओळखा की बहुतेक  हे काही नाट्यमय रीतीने लवकर बदलणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला दुखवणार नाहीत अशी बतावणी करण्याची आपल्याला गरज नाही – पण तरीही आपण आपल्या अपेक्षा फार वाढवू नयेत. सतत प्रीतीने बोलणारा आवाज हा अधून मधून काढलेल्या कर्कश आवाजापेक्षा अधिक चांगला असतो.

संघर्षात कनवाळू, दयाळू, नम्र, सौम्य आणि धीर धरणारे असणे खूपच कठीण आहे. तरी पौलाने स्पष्ट सूचना दिली आहे की हे गुण आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात व सर्व वेळी दिसून यायला हवेत  (कलसै ३:१७). असे करण्याने संघर्ष संपल्यावर आपण अधिक जवळ येण्याच्या शक्यता अधिक आहेतच पण ते प्रभावीपणे येशूच्या स्वभावाकडे दाखवते आणि येथेच शुभवर्तमानाची अधिक गरज असते.

 

 

Previous Article

करोनाच्या संदर्भात महत्त्वाचा संदेश अर्पण बागची, पुणे

Next Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

You might be interested in …

देवावर विश्वास लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

विश्वसनीय देव देव हा विश्वसनीय आहे या सत्यावर देवावर विश्वास ठेवण्याचा विचार आधारलेला आहे. आतापर्यंत जी सत्ये आपण शिकलो त्यामध्ये आपण दृढ व्हायला हवे. आपली तो सातत्याने काळजी घेतो. याविषयीच्या अभिवचनांचा आपण आधार घ्यायला हवा. […]

अपयशाला तोंड देतानालेखिका

 वनिथा रेंडल अपयशावर मी खूप विचार केला, विशेषकरून पुनरुत्थानानंतरच्या काही आठवड्यात. येशू जेव्हा वधस्तंभाकडे धैर्याने व सामर्थ्याने सामोरा गेला तेव्हा त्याच्या भोवतालची माणसे लज्जा आणि खेदाने व्यापून विरघळल्यासारखी झाली होती. जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहते […]

पुनरुत्थानदिन दहा प्रकारे सर्व काही बदलतो

जॉन पायपर येशूच्या मेलेल्यातून पुन्हा उठ्ण्यामुळे सर्व काही बदलून गेले आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. यावेळी अशा दहा बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. १. येशूचे पुनरुत्थान नव्या निर्मितेचे मूर्त स्वरूप आहे आणि या […]