मई 1, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पवित्रस्थानातील पडदा

जॉन पायपर

तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मत्तय २७:५१.

इतका जाड व मजबूत पडदा फाटून दुभागणे हा काही हलकाफुलका चमत्कार नाही; तसेच तो फक्त सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याकरताही केला नाही – यामध्ये बरेच धडे गोवलेले आहेत.

यामुळे कायदेकानून असलेले जुने नियम जुन्या जीर्ण वस्त्रांसारखे बाजूला सारले गेले. जेव्हा येशू मरण पावला तेव्हा सर्व यज्ञांची समाप्ती झाली कारण ते त्याच्यामध्ये पूर्ण केले गेले. त्यामुळे यज्ञ करण्याचे स्थळ जे मन्दिर त्याच्यामध्येच हा स्पष्ट बदल घडून आला.

पडदा फाटला गेल्याने जुन्या समर्पित वस्तू उघडपणे दिसू लागल्या: दयासन आता दिसू शकत होते. आपल्या येशूच्या मरणामुळे आता आपल्याला देवाचे स्पष्ट प्रकटीकरण झाले आहे. कारण येशू हा मोशेप्रमाणे नव्हता जो  २ करिंथ ३:१३ नुसार आपल्या चेहऱ्यावर आच्छादन घेत असे. जीवन व अविनाशित्व ही आता प्रकाशात आणली गेली. आणि ज्या गोष्टी जगाच्या स्थापनेपासून गुप्त राखल्या होत्या त्या येशूमध्ये दाखवल्या गेल्या.

प्रायश्चित्ताचा वार्षिक विधी आता रद्द केला गेला. जे रक्त दर वर्षी पडद्याच्या आत प्रायश्चित्तासाठी महायाजक शिंपडत असे, ते चिन्ह म्हणून असलेले विधीसंस्काराचे स्थळ आता संपुष्टात आले.  आता कोणत्याही गोऱ्ह्याच्या अथवा मेंढ्याच्या रक्ताची गरज नाही कारण येशूने पडद्याच्या आत स्वत:चे रक्त घेऊन प्रवेश केला.

यामुळे देवाजवळ आता आपण सरळ प्रवेश करू शकतो आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विश्वासीयाला ही संधी प्राप्त झाली आहे. एका छोट्याश्या भगदाडातून अर्धवट दिसणाऱ्या दृश्याने आपण दयासन पाहत नाही तर हा पडदा वरपासून खालपर्यंत फाटलेला आहे. आपण धैर्याने या दयासनाकडे येऊ शकतो.

अशा अद्भुत रीतीने परमपवित्र स्थानाकडे जाण्यासाठी आपल्या प्रभूने अखेरीस  केलेली आरोळी सर्व संतांना स्वर्गाचे द्वार उघडणारी होती नव्हे का? आपल्यासाठी रक्त सांडलेल्या आपल्या प्रभूकडे स्वर्गाची किल्ली आहे. तो उघडतो आणि कोणीही ते बंद करू शकत नाही. त्याच्याबरोबर स्वर्गीय स्थानामध्ये आपण प्रवेश करू या आणि आपला शत्रू कायम पदच्युत होईपर्यंत आपण तेथेच असू या. २ करिंथ ३:१३.

Previous Article

ईयोबाच्या शरीरावर हल्ला

Next Article

त्याने मुलांवर मरणापर्यंत प्रीती केली

You might be interested in …

उत्तेजनाचे कृपादान

लेखक: जेम्स फॅरीस मंडळीमध्ये असे काही लोक असतात की त्यांना वाटते त्यांना लोकांनानिराश करण्याचे  आध्यात्मिकदान मिळाले आहे . एवढेच काम ते करत असतात-इतरांना निराश करणे. आणि सत्य परिस्थिती पहिली तर आपण सर्वच एखाद्या वेळी नव्हे […]

ईयोब आपल्या यातनांशी झगडतो

सॅमी विल्यम्स धडा ६ वा ईयोब ३:१-१० आपण काव्यात्मक लिखाणाचा अभ्यास करत आहोत –  ईयोबाच्या सुखी जीवनाला कशी कलाटणी मिळाली याचे कथानक आपण १ व २ अध्यायात पहिले. तो अगदी एकटा पडला. भयानक शारीरिक यातनादायी […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ७ उत्पत्ती ३ व […]