जुलाई 26, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

संपादकीय

किती भरकन् नवं वर्ष जुनं ही झालं ! जानेवारी २०१६ असं  लिहिणं विशेषत्रासाच वाटलंनाही हे तुमच्या ध्यानात आलं का?- नव्या वर्षात आल्यावर निदान मी तरी चुकीनं कोणत्याच पत्रावर वा लेखावरजानेवारी २०१५ असं लिहिलं नाही. सत्य हे आहे की वेळ आपल्या कोणासाठीच थांबत नसतोआणि आपण तर विशेष काही संपादन न करता वेळ असाच जाऊ देतो.रोम १३:११-१४ म्हणते,“समय ओळखून हे करा,कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे कारण आपण  विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आपल्याअधिक जवळ आले आहे.  रात्र सरत येऊन  आणि दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे टाकून द्यावी  आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी.  दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचारानेचालावेचैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे; तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.”

या अंकात नेहमीच्या सदरांसोबत विचार करायला लावणारे इतर काही लेख आहेत. येशूने आपला याजक या नात्याने आपल्यासाठी काय केले व सध्या तो आपल्यासाठी कशी मदत करतो हे वाचून तुम्हांला उत्तेजन मिळेल.तसेच आध्यात्मिकबाल्यावस्थेतून प्रगल्भ होण्याचा देवाचा मार्ग वाचून त्यात चालण्यास जीवन समर्पित करण्यास प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. एकंदर या अंकाद्वारे येशूसाठी जगण्यास तुम्हाला उत्तेजन मिळेल अशी आशा आहे.

देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देवो.

क्रिस विल्यम्स

अध्यक्ष, लव्ह महाराष्ट्र

Previous Article

लेखांक ३: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

Next Article

बाल्यावस्थेतून प्रौढत्वाकडे

You might be interested in …

माझ्यातला पशू जागा होतो

स्कॉट हबर्ड कधीकधी देवाचा हात त्याच्या इच्छेने तुमच्या जीवनात काही चित्र काढत आहे असे तुम्ही पाहत असतानाच ती पेन्सिल अचानक  वळण घेते आणि जे फूल होणार असे तुम्हाला वाटले होते त्याचे काट्यात रूपांतर होते. न […]

त्याने त्याची शेवटची रात्र गाण्यात घालवली

ब्रायन टॅब परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? (स्तोत्र ११८:६) गीतांनी त्याला मरण्यासाठी तयार केले. गुरुवारी, येशूला वधस्तंभावर खिळण्याच्या आदल्या रात्री, त्याने पवित्र भोजन केले आणि त्याच्या मित्रांसह पवित्र गीत […]

आपल्याला  टाकून दिलंय असं तुम्हाला वाटतं का?

डॅन कृव्हर माझ्या तीन वर्षांच्या मुलाला मरणाकडे नेणाऱ्या दिवसांमध्ये, देवाने मला आणि माझ्या कुटुंबाला त्याच्या कृपामय काळजीची खोल खात्री दिली. एके रात्री मी अतिदक्षता विभागामध्ये माझ्या हातात बायबल घेऊन एकटाच माझ्या मुलाजवळ बसलो होतो. त्याचे […]