पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल अन त्याला इम्मॅन्युएल म्हणतील यशया ७:१४
येशू हा देहधारी देव आपला प्रभू व तारणारा आहे आणि तरीही तो आपला भाऊ आणि मित्र आहे. चला आपण त्याची भक्ती अन प्रशंसा करू या. प्रथम त्याचे अलौकिक गर्भधारणा आपल्याला दिसते. अशी गोष्ट घडल्याचे पूर्वी कोणीही ऐकले नव्हते आणि त्यानंतरही कुमारीला पुत्र होणे ही घटना कधीही घडणार नाही.
देवाने दिलेले पहिले अभिवचन कुमारीच्या बीजासंबंधी आहे पुरुषाच्या नव्हे. तिने पाप करण्यासाठी प्रथम धाडस केले व याची परिणती स्वर्गसुखाचा नाश होण्यात झाली आणि ते परत मिळवून देण्यासाठी तिलाच देवाने निवडून घेतले.
आपला प्रभू जरी पूर्ण मानव होता तरी तो देवाचा पवित्र होता. या पवित्र बाळाला आपण आदराने वंदन करू या कारण त्याच्या निर्दोषतेमुळे मानवाला त्याचे पुरातन गौरव दिले गेले. आपण प्रार्थना करू या की हा जो आपली गौरवी आशा आहे तो आपल्यामध्ये घडवला जावा.
त्याच्या नम्र आईवडिलांचा विचार करा. त्याच्या आईला फक्त कुमारी असे म्हटले आहे राजकुमारी , संदेष्ट्री किंवा प्रभावी स्त्री असे म्हटले नाही तरी सत्य असे होते की तिच्या धमन्यांतून राजांचे रक्त बाहत होते आणि तिचे मन कमकुवत किंवा अशिक्षित नव्हते कारण ती सहजपणे स्तुतीचे गोड गीत गाऊ शकली. तरीही किती गरीब स्थिती होती तिची! तिच्याशी मागणी झालेला पुरुषही किती गरीब होता आणि या नवजात बालक राजाला मिळालेली जागा किती दयनीय होती!
इम्मानुएल –आम्हाबरोबर देव आमच्यासारखा झाला आमच्या दु:खात, आमच्या रोजच्या कामात, आमच्या शिक्षेत, आमच्या मृत्यूमध्ये आमच्याबरोबर आहे; इतकेच नाही तर आम्ही त्याच्यामध्ये आहोत त्याच्या पुनरुत्थानात, त्याच्या स्वर्गारोहणात , त्याच्या विजयात आणि त्याच्या पुन्हा येण्यामध्ये.
Social