सितम्बर 9, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

नव्या वर्षात पदार्पण करताना…

उच्च डोंगरावर चढ.  यशया ४०:९
प्रत्येक विश्वासी व्यक्तीला जिवंत देवाची तहान हवी आणि देवाचा डोंगर चढून त्याला तोंडोतोंड पहायची आस लागायला हवी.  डोंगराचा कडा आपल्याला साद घालत असताना फक्त दरीच्या धुक्यातच तृप्त राहण्याची गरज नाही. जे पर्वताच्या टोकापर्यंत चढतात त्यांना तेथे ठेवलेया खास प्याल्यातून पिण्याची आणि स्वर्गात डुबून जाण्याची अत्यंत उत्कंठा असते. किती शुद्ध असते पर्वतांवरील दव ! तेथली हवा किती आल्हाददायक असते. तिथे राहणाऱ्यांना किती समृद्धी असते त्यांच्या खिडक्यातून त्यांना थेट नव्या यरूशलेम दिसू शकते.

बरेच  संत कोळशाच्या खाणीतल्या कामगारांसारखे राहणे पसंत करतात . त्यांना सूर्याचे दर्शन होत नसते. जरी त्यांना देवदूतांचे अन्न खाण्याची संधी असते तरी ते सापासारखी धूळ चाखत असतात. जरी राजवस्त्रे घालण्याची त्यांना संधी असली तरी खाणी कामगारांची वस्त्रे घालणे ते पसंत करतात. तेलाचा अभ्यंग होण्याऐवजी  त्यांची मुखे अश्रूंनी डागाळलेली असतात. माझी खात्री आहे की अनेक विश्वासी जरी राजवाड्याच्या गच्चीवर फिरू शकतात तरी त्याऐवजी ते अंधारकोठडीत झुरत असतात. हे विश्वासी माणसा उठ, तुझ्या या नीच स्थितीतून ! तुझा आळस, तुझा थंडपणा किंवा तुझ्या जीवाच्या धन्याला, ख्रिस्ताला शुद्ध प्रेम देण्यास जे काही अडखळण आहे ते झटकून टाक. तुझ्या जीवाच्या क्षेत्रामध्ये त्यालाच तुझा उगम, केंद्र आणि आनंदाचा विषय बनव.

जर तू राजासनावर बसू शकतोस तर त्या खड्ड्यात बसण्यास तुला कोण मोहिनी घालतो? आता बंधनाच्या खोलगट जागी राहू नकोस. तुला तर  पर्वताचे स्वातंत्र्य  प्रदान केले जात आहे. तुझ्या इवल्याश्या संपादनात तृप्त राहू नकोस तर अधिक उच्च व स्वर्गीय गोष्टींकडे पुढे जा उंच , सन्मान्य व पूर्ण जीवनाची आस धर.

चार्ल्स स्पर्जन

Previous Article

यावर विचार करा

Next Article

प्रभू काहीही कर पण मला शिस्त लाव

You might be interested in …

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या […]

रात्री उच्च स्वराने गा लेखक: स्कॉट हबर्ड

ख्रिस्ती लोक हे अशा प्रकारचे लोक असतात की ते मध्यरात्री गाणी गातात. जेव्हा पौल व सीला यांना मारहाण करून, रक्तबंबाळ करून, बेड्या घालून तुरुंगात डांबले होते तेव्हा तुरुंगातील इतर कैद्यांनी त्या कोठडीत त्यांना गाणी गाताना […]

विसाव्या वर्षी तुमचे जीवन कसे उद्ध्वस्त कराल जोनाथन पोकलडा

आपले जीवन उद्ध्वस्त करण्याच्या योजना कोणीच करत नसते. अपयश हे आपले ध्येय कोणीच बनवत नाही किंवा नव्या वर्षासाठी तसा निर्णय घेत नाहीत वा पंचवार्षिक योजना बनवत नाहीत. लहान मुले आपण दारुडे होणार असे स्वप्न रंगवत […]