Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 16, 2020 in जीवन प्रकाश

तुमचे जीवन कंटाळवाणे नाही                                                               जॉन ब्लूम

तुमचे जीवन कंटाळवाणे नाही जॉन ब्लूम

कधीकधी आपल्याला वास्तवाच्या उपचाराचा डोस मिळण्याची गरज असते – एक जाणीव असायला हवी की वास्तव हे आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप अद्भुत आणि साहसपूर्ण आहे.

आपला एक विचित्र कल असतो की आपण आपले अस्तित्व, इतरांचे अस्तित्व आणि ज्या जगात आपण राहतो ते गृहीत धरून चालतो जसे काही या सर्व नित्याच्या बाबी आहेत. जसे काही हा पृथ्वीचा अवाढव्य गोल ताशी १००० मैलाच्या गतीने फिरत असताना आणि प्रचंड मोठ्या आगीच्या गोळ्याभोवती ताशी ६७,००० वेगाने परिभ्रमण करत असताना ही सूर्यमालिका आकाशगंगे भोवती ताशी ५००,००० मैलांच्या गतीने जाते आणि ही आकाशगंगा स्वत: अवकाशामध्ये ताशी १३ लाख मैलांच्या गतीने जात राहते ही साधी क्षुल्लक बाब आहे आणि खरी कृती फेस बुकवर घडत असते.

नाही. आपण आपली डोकी आपल्याला गुंतवून टाकणाऱ्या या आभासी (virtual) जगातून बाहेर काढून जे सत्य आहे त्याची आठवण करायला हवी. मला तुमचे स्मरण जागे करू द्या; तुमच्याविषयीच्या आश्चर्यकारक गोष्टींची आठवण करून देत.

तुम्ही येथे आहात!

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही येथे आहात. याचा तुम्ही केव्हा विचार केला होता? तुम्ही येथे आहात! आणि तुम्ही येथे आहात कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही येथे असावे – तुमच्या जन्माच्या वेळी काय परिस्थिती होती, इतरांनी तुमची कशी किंवा किती किंमत केली, तुमची पात्रता किंवा अपात्रता, लोकांनी तुमची किती प्रेमाने जोपासना केली किंवा त्यांनी तुम्हाला किती वाईट वागवले, तुम्ही कोणत्या प्रकारचे पापी होता किंवा तुम्ही किती काळ पाप केले याचा त्याच्याशी काहीही सबंध नाही. तुम्ही येथे आहात कारण देवाने हा वेळ आणि स्थळ तुमच्यासाठी निवडले. आपल्याला ही सृष्टी केव्हा निर्माण झाली हे ठाऊक नसतानाही त्याने तेव्हाच तुमच्यावर प्रीती करण्यास सुरुवात केली (इफिस ३:१-६). आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी दया व कल्याण तुम्हाला मिळावे असे तो करत आहे. (स्तोत्र २३:६). – होय दररोज –  आणि “आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार्‍या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास तो समर्थ आहे” (इफिस ३:२०) हे तुमच्यासाठी वास्तव आहे, यावर तुम्ही खरंच विश्वास ठेवता? मनापासून? एक आभासी सिद्धांत म्हणून नव्हे तर ज्यामुळे कधीकधी तुमचा श्वास रोखून धरला जातो आणि तुमचे पाय डगमगतात. तुम्ही देवाची कल्पना आहात आणि त्याची निर्मिती आहात याचा कधी तुम्हाला तडाखा बसतो का? – की तुमचे अस्तित्व हे त्याची योजना होती?

तुमचे अस्तित्व हे जेवण, खेळाचा सराव, बातम्या, चित्रपट, तुटलेले नातेसबंध, राजकारण, निवृतीसाठी करायची साठवणूक, या सर्वांपेक्षा खूप अधिक आहे, होय येशूने म्हटल्याप्रमाणे “अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे” (लूक १२:२३). खूपच अधिक.

तुम्ही जिवंत आहात

आता क्षणभर विचार करू या की ज्याला जीवन म्हणतात ते तुम्हाला आहे. तुम्हाला तुमचे जीवन कुठे मिळाले? तुम्हाला ते देवापासून मिळाले (१ करिंथ ७:१७). तुम्ही जिवंत आहात ना? त्याचा अर्थ काय हे तरी तुम्हाला समजतंय का? नाही; तुम्हाला ते समजत नाही आणि मलाही समजत नाही.

जीवन काय आहे याची व्याख्या कोणीही मानव प्राणी करू शकलेला नाही. जीवन आहे हे आपल्याला फक्त माहीत आहे. जीवनाची शास्त्रीय व्याख्या फक्त सजीव आणि निर्जीव यातला फरक काय याचे वर्णन करते. आणि सजीव कसे वर्तन करतात ते सांगते. जीवनाची वाढ कशी होते, ते कसे टिकवले जाते, त्याचा शेवट कसा होतो हे आपल्याला माहीत असेल पण जीवनाचा अर्क काय आहे, जीवनाचे गूढ काय आहे हे आपण काबीज करू शकलो नाही. आणि याचे कारण सर्व जीवन हे त्या ‘जीवना’ पासून येते, जो स्वत: जीवन आहे (योहान १४:६). जो अस्तित्वाचा प्रमुख मुद्दा आहे (निर्गम ३:१४).

सजीव या नात्याने तुम्ही किती दुर्मिळ आहात हे तुम्हाला माहीत आहे का? भौतिक, दृश्य विश्वामध्ये जीवन हे फार फार फारच दुर्मिळ आहे. आणि  हे वाक्य अतिशयोक्ती नाही. जीवनात तग धरून राहण्याच्या अटी इतक्या बंधनकारक आहेत की कोणतेही जीवन मग ते कितीही बुद्धिमान असले तरी या संपूर्ण विश्वात कोठही जगणे अशक्यप्राय आहे. आणि आकडेवारी नुसार विचार केला तर तुम्ही -तुम्ही सुद्धा अस्तित्वात असायला नको. करोडो शुक्राणू आणि बीजांडे यांना परिस्थितीनुसार कितीतरी वळणे मिळाली असती आणि मानवी इतिहासात तुम्ही न जन्मता दुसरे कोणी जन्मले असते. पण हे आश्चर्य आहे की तुम्ही येथे आहात. सजीव म्हणून तुमचे अस्तित्व आकडेवारीचा अभ्यास करता इतके दुर्मिळ आहे, इतके अशक्य आहे की आपण आपल्या अस्तित्वाचे आकलन करून घेण्यास असमर्थ आहोत. तुम्ही जिवंत आहात कारण सर्व अडथळे व शक्यतांविरुद्ध देवाने तुम्हाला जीवन दिले आहे.

तुम्हाला मेंदू आहे

आणि विश्वातील सजीव असणाऱ्या वस्तूंमध्ये अल्प असूनही तुम्ही दुर्मिळ आहात कारण तुम्हाला मेंदू आहे. तुमच्या डोक्यामध्ये असलेली ती गोष्ट तुम्हाला वाचू देते, आणि आता तुम्ही हे आकलन करू शकता. या भौतिक जगात तुमचा मेंदू ही सर्वात गुंतागुंतीची गोष्ट आहे. दुसरी कोणतीच गोष्ट त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही.

मेंदूचा विचार करताना आपण त्याच्यासबंधी वैद्यकीय दृष्टिकोनातून बोलतो जसे काही ही आवश्यक अशी सर्वसामान्य बाब आहे. पण हे वस्तूंमधील आश्चर्य आहे. एका आश्चर्यकारक अशा गुंतागुंतीच्या मजासंस्थेद्वारे तुमचा मेंदू तुमची दृष्टी, ऐकणे, चव , वास, आणि स्पर्श, तोल, पचन, ह्रदय व रक्तवाहिन्या, श्वसनसंस्था, त्वचा, रोगप्रतिकारशक्ती आणि इतर अनेक कार्ये चालवतो. आणि या सर्वांचे एकत्रितपणे इतके सुसंगत संचलन करतो की तुम्ही जीवनात विचार करीत व  इतर गोष्टी करीत पुढे जाऊ शकता.

आणि या इतर गोष्टी कोणत्या प्रकारच्या आहेत? उंच इमारती बांधणे, चष्मे तयार करणे, वर्तमानपत्राचे व्यवस्थापन करणे, शालेय अभ्यासक्रम तयार करणे, अवकाश यानाची रचना आखणे, संस्कृतीपार जाऊन सुवार्ता सेवा करणे, चवदार जेवण बनवणे, चित्र चितारणे, संगणकाचे सोफ्टवेअर तयार करणे, घरातील पाईपलाईन दुरुस्त करणे, बायबलचे भाषांतर करणे, किचनमधील कपाटे बसवणे, फूटबॉलचे कोचिंग करणे, अकाऊंटींग करणे, लॅंडस्केप तयार करणे, शेतीचे प्रकल्प हाती घेणे, परदेशी भाषा शिकवणे, नव्या औषधांचे शोध लावणे, गीतांची रचना करणे, मंडळी रोपण करणे, दुकान चालवणे, सार्वजनिक वाचनालय चालवणे, मुलांबरोबर लपाछपी खेळणे, उपग्रह त्याच्या कक्षेत पाठवणे,  वाहने दुरुस्त करणे, तुम्ही वाहन चालवत असताना तुमच्याशी बोलणारे जी पी एस चे नकाशे बनवणे आणि देवाचे वचन पाठ करणे अशा शेकडो आणि लाखो इतर गोष्टी – तुमच्यासारख्या – मानवी मेंदूचा परिणाम घडवतात.

तुम्ही कोण आहात?

अवाक् करणाऱ्या वास्तवाच्या तुमच्या अस्तित्वाच्या हिमनगाचे हे फक्त टोक आहे. हे तुम्हाला हवे त्या दिशेकडे तुम्ही नेऊ शकता आणि विचार करा ह्या अद्भुत जगामध्ये जिवंत आणि सजग असणे किती विस्मयकारक गोष्ट आहे.

उदास आणि भयानक गोष्टींनी तुमचे विचार भरून टाकू नका. किंवा तुमचा कमकुवतपणा, निराशा, पाप, उणीवा यांनी तुमचे आकाश ढगाळून टाकू नका. त्या वास्तवता आहेत, पण त्या दुय्यम आहेत त्या विरून जातील. जे वधस्तंभावर खिळण्याची गरज आहे ते खिळून टाका. पण मग उठा आणि अंतर्मुख होण्यातून उठा आणि भरारी मारा. काही वेळ आठवण करा की तुमचे अस्तित्व – आणि जगाचे- हे भव्य आहे, भयावह आहे आणि अद्भुत आहे (स्तोत्र १३९:१४). आणि आठवण करा की त्यांना आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने धरून ठेवणारा कोण आहे (इब्री १:३).

तुम्ही अस्तित्वात आहात कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही अस्तित्वात असावे. आणि तुम्ही जे आहात, तुम्ही जसे आहात, तुम्ही जेथे आहात, आणि तुम्ही जेव्हा आहात तेच तुम्ही आहात कारण देवाने तुम्हाला निर्माण केले आहे (योहान १:३). त्याने तुम्हाला आईच्या गर्भाशयात घडले (स्तोत्र १३९:१३). तुम्ही त्याचे असावे म्हणून तुम्हाला पाचारण केले (योहान १०:२७; रोम ८:३०). आणि तुम्हाला जगण्यासाठी जीवन दिले (१ करिंथ ७:१७). आणि या जीवनामध्ये बरे किंवा वाईट, कडू किंवा गोड, आरोग्य व आजार, भरभराट व गरिबी, सुखसोयी अथवा दु:खे – या सर्वामध्ये एक अथांग प्रतिष्ठा, हेतू आणि वैभव या सर्वांमध्ये  हेच सत्य तुमचे सर्व जीवन व्यापून टाकते.