Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जुलाई 7, 2020 in जीवन प्रकाश

संकटामध्ये आनंदाचे पाच अनुभव                                            क्रिस विल्यम्स

संकटामध्ये आनंदाचे पाच अनुभव क्रिस विल्यम्स

शास्त्रभाग: रोम ३:३-५

“इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, (आपण आपल्यावर आलेल्या संकटातही उल्लासतो. पं. र. भा.) कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.”

आपल्या कुणालाच वेदना आवडत नाहीत. संकटाचा आपण तिरस्कार करतो. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आजार आणि मरण घुसतात तेव्हा ते नकोसे पाहुणे असतात. आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्याला अडथळा आलेला आवडत नाही; जर ते सुखद अडथळे असतील तर आपल्याला आवडते. आपले जीवन सुखी आणि शांतीने भरलेले असावे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये शक्य होईल ती उभारणी व रक्षण  करतो. तथापि जीवन तसे मुळीच नाही.

तुम्हाला आठवतंय तुमच्या बोटात कुसळ घुसलं होतं,  किंवा तुमच्या टाचेत काटा मोडला होता? तुम्ही स्वत:च ते हाताळायचा प्रयत्न केला होता; ते चोखून काढून किंवा तसेच चालवून घेत. अखेरीस ते दुखणे इतके वाढले की कोणीतरी ते पीन, सुई किंवा छोट्या चिमट्याने ते ओढून काढण्याच्या वेदनेतून तुम्हाला जावे लागलेच. आणि दाताच्या दुखण्याचे काय? डेंटीस्टच्या खुर्चीत बसण्याचा विचारच तुम्ही सहन करू शकत नव्हता. तुम्ही वाट पाहत होता पण अखेरीस ते दुखणे इतके असह्य झाले की अखेरीस तुम्ही त्या दंतवैद्याला शरण गेलात आणि ते रूट कनालही करून घेतलेत. कधी तुमच्या कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीचे गंभीर आजाराचे निदान झाले होते. तुम्ही ही गोष्ट कुटुंबातच गुप्त ठेवली होती. डॉक्टरला भेटी देणे पुढे ढकलले होते पण अखेरीस शस्त्रक्रिया करून घेतली.

ह्या प्रत्येक वेळी, लहान किंवा मोठ्या – तुम्ही ती समस्या बरी करणाऱ्या समस्यांच्या मूळ कारणाला हात न घालता त्या समस्येसह राहणे व वेदना सहन करणे निवडले. पण शेवटी तुम्हाला तो संसर्ग किंवा आजाराचे अधिक परिणाम टाळायला हवे होते. तुम्हाला कायम बरे व्हायचे होते. जेव्हा कोणताच इलाज चालला नाही तेव्हा बरे होण्यासाठी लागणाऱ्या वेदनेतून जाणे तुम्ही निवडले.

तुमच्या संकटाच्या/परीक्षेच्या बाबतीतही असेच घडते. तुमच्यातील बहुतेक जणांची पवित्र होण्याची प्रामाणिकपणे इच्छा असते. देवाला आनंद द्यावा, त्याच्या गौरवासाठी जगावे अशी तुम्ही इच्छा करता. तुम्हाला येशूसारखे व्हायचे आहे. ही इच्छा म्हणजे पवित्रीकरणाचे ध्येय आहे. आणि देवाची तुमच्यासाठी अगदी हीच इच्छा आहे. देवाने तुमचे पापापासून तारण केले यासाठी की तुम्ही पवित्र होत जात येशूसारखे होत जावे. जेव्हा आपण येशूसारखे होण्याची इच्छा करतो तेव्हा आपण देवाच्या इच्छेशी जोडले जातो. यामुळे आता आपण आजच्या शास्त्रभागाकडे येतो. संकटामध्ये आनंदाचे पाच अनुभव येतात त्यांचा आपण विचार करू या. ह्यामुळे आपल्याला हळूहळू ख्रिस्तासारखे होत जाण्याचा अनुभव येतो.

अ.  संकटामध्ये गौरवाचा अनुभव. (वचन ३)

“इतकेच नाही, तर संकटांचाही/तही अभिमान बाळगतो”

संकट ह्यासाठी वापरलेला शब्द सुचवतो की असह्य ताण. गरजा प्राप्त करण्यासाठी पडणारा ताण; कठीण परिस्थितीत गुंतून पडणे; महान दु:खात आणि छळात असणे. देवाचे वचन सांगते की तुम्ही ह्या असह्य परीक्षेमध्ये खिस्तासारखे गौरव अनुभवू शकता.

१ संकटाचाही अभिमान बाळगणे (व.३)

काही भाषांतरामध्ये ‘उल्लास’ हा शब्द वापरला आहे. एक असा मोसम असतो की त्यामध्ये ख्रिस्ती लोक संकटातही उल्लास करतात/ त्यांचा अभिमान बाळगतात. त्याला एक कारण आहे. रोम ५ मध्ये हा शब्द पाच वेळा वापरला आहे. “आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो./उल्लास करतो” ( व.२).   या वचनात “संकटात अभिमान बाळगतो.” वचन ११-  “आपण… ठायी अभिमान बाळगतो.”

याचा अर्थ देवाची स्तुती /भक्ती करतो आणि अभिमान बाळगतो. जेव्हा आपण संकटातून जातो तेव्हा देवाची उपासना करत आपण त्यांना सामोरे गेले पाहिजे. लक्षात ठेवा की उपासनेमध्ये अधीनता येते.
देवाच्या लोकांनी संकटामध्ये  देवाविषयी अक्षरश: बढाई मारायला हवी. जेव्हा सर्व काही ठीक चाललेले असते त्यापेक्षा संकटाला तोंड देताना तुम्हाला देवाचे सान्निध्य अधिक जवळचे वाटते आणि वाटायला हवे. म्हणून जेव्हा विश्वासी एकमेकांना अभिवादन करताना, “कस तुमचं चाललय?” “सगळं छान चाललंय” असं म्हणतात तेव्हा मी कचरतो. अशा प्रकारच्या विधानाच्या वातावरणात देवाच्या गोड चांगुलपणाची जाणीव विसरली जाते.

काही भाषांतरात “आनंद करतो” असा शब्दही वापरला आहे. म्हणजे संकटामध्ये आनंद ही संकल्पना सुद्धा आहे. देवाने आपल्या तारणाची येशूमध्ये जी महान तरतूद आणि संरक्षण पुरवले आहे त्याला प्रतिसाद देताना रोम ८:३५-३७ या वचनात पौल भर देतो की; ज्याने आपल्यावर प्रीती केली त्यामध्ये आपण “विशेष विजयी आहोत.” लूक ६:२३ येशूने म्हटले, जेव्हा तुमचा त्याच्या नावासाठी छळ होतो तेव्हा आनंदित होऊन उड्या मारा.  म्हणून तुम्ही तुमच्या संकटातून जात असताना त्या निघून जाव्या अशी प्रार्थना करण्याऐवजी तुमच्या आध्यात्मिक अनुभवामध्ये अमाप आनंद घ्या आणि उल्लास करा. कारण जेव्हा सर्व सुरळीत चाललेले असते त्या वेळेपेक्षा संकटाच्या वेळी देव तुमच्या अनुभवामध्ये मोठ्या प्रकारे प्रवेश करतो. एक गोष्ट नक्की – जेव्हा तुम्ही परीक्षेतून जात असता तेव्हा तुम्ही त्याच्यावर अधिक अवलंबून राहता व त्याला धरून राहता व त्याची उत्कंठा धरता. जेव्हा सर्व व्यवस्थित असते तेव्हा नाही.

पौल साक्ष देतो की त्याच्या जीवनात तो अनेक संकटातून गेला. (२ करिंथ ११:२३-३० वाचा.) पौल सांगतो की त्याच्या संकटामुळे त्याला एक असामान्य अनुभव आला. हे त्याच्या स्वत:च्या शब्दातच ऐका. आपल्या संकटांबद्दला सांगताना २ करिंथ १२:९-१० मध्ये तो म्हणतो;
“परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.”
आपणही म्हणू शकतो, “जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.”

२. संकटामध्ये सुज्ञ असणे

तिसरे वचन म्हणते आपल्याला ठाऊक आहे.  विश्वासी व्यक्तीला ठाऊक असते. जेव्हा तो/ती संकटातून/परीक्षातून जात असतो तेव्हा काही चांगल्या गोष्टी घडतात, ज्या सर्व चांगले असताना कधीच घडत नाही. संकटे ही ख्रिस्तासारखे बनण्यास जशी मदत करतात ती दुसऱ्या कशानेही होत जात नाही. आपण पवित्र होण्याची उत्कंठा धरतो. देवाला आनंद देण्याची इच्छा आपण बाळगतो. म्हणून आपण खेदाने नाही तर हे समजून आनंद करतो की देव आपल्या परीक्षांमध्ये अनंतकालिक पारितोषिके पाठवतो यासाठी की आपल्या अंत:करणाची खरी इच्छा पुरवली जावी. तुम्ही ख्रिस्तासारखे व्हावे अशी इच्छा बाळगताय ना? अगदी तेच तो तुमच्यासाठी करतो.

या जगामध्ये येशूसारखे होण्यासाठी देव आपल्या जीवनामध्ये त्याच्या कृपेचे काम करतो. जरी येशूचे नसलेले सर्व जग त्यांना हवे तसे स्वार्थीपणात आणि पापात जगत आहे तरी देव आपल्यामध्ये अशी इच्छा निर्माण करतो की आपण येशूसारखे होण्याची आस बाळगावी व प्रार्थना करावी. यासाठी तो दोन साधने वापरतो.

पहिले साधन आहे शिस्त. (इब्री. १२:५-१२ वाचा.)  शिस्त याला शिक्षा, पाठपुरावा, शिकवण, सुधारणा अशीही दुसरी नावे आहेत.  देव  फटके /मार वापरेल ज्यामुळे वेदना आणि दु:ख होईल पण शेवटी आशीर्वाद प्राप्त होतील. आपण येशूसारखे होतो.

शुद्ध करण्यासाठी आणि येशूसारखे होण्यासाठी देवाचे दुसरे साधन आपल्याला याकोब. १:२-४ आणि १ पेत्र १:६-९ मध्ये आढळते. जेव्हा संकटे येतात तेव्हा आपण देवाची स्तुती करावी कारण येशूसारखे होण्याच्या आपल्या इच्छेचे आणि प्रार्थनेचे देव उत्तर देत आहे.

देवाने आपल्याला शिस्त आणि परीक्षा यापासून  सोडवावे यासाठी आपल्यातले बहुतेक लोक प्रार्थना करतात ही दु:खाची गोष्ट आहे. अशी सुटकेची प्रार्थना म्हणजे ‘देवा मला येशूसारखे बनवू नकोस.’

नुकतेच कोणीतरी अशी प्रार्थना केली: “बापा, आम्हाला पवित्र करायचे आणि तुझ्यासोबत अधिक परिश्रम करून चालण्याचे तू तुझे काम आणि तुझे हेतू आमच्यामध्ये पूर्ण करीपर्यंत ही परिस्थिती बदलू नकोस.” तुम्ही विचार कराल: मी अशी प्रार्थना करत नाही. बहुधा माझी प्रार्थना असते की देवा, त्रासदायक परिस्थितीतून मला सोडव.

आम्ही भरभराटीच्या शुभवर्तमानवर विश्वास ठेवत नाही. आम्ही श्रीमंत आणि सदा निरोगी असावे अशी देवाची इच्छा आहे यावर आमचा विश्वास नाही. तरीही जेव्हा आम्ही आजारी पडतो तेव्हा आम्ही आरोग्यासाठीच प्रार्थना करतो. जेव्हा आमची नोकरी जाते किंवा आमच्या पगारात कपात होते तेव्हा देवाने पुरवठा करावा अशी आपण प्रार्थना करतो. जेव्हा आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा आपण आनंद मानत नाही पण जेव्हा चांगली नोकरी मिळते, बढती होते, पगार वाढतो, भरभराट होते तेव्हा आपण आनंद मानतो.

आपण अशी प्रार्थना करायला हवी की, देवबापा, या परीक्षेतून मी काय शिकायला हवे हे तू कृपा करून मला दाखव. या समस्येचा कृपया उपयोग कर आणि मला येशूसारखे बनव. आपण निरोगी असण्यापेक्षा पवित्र असावे याची देवाला जास्त काळजी आहे. आपण श्रीमंत होण्यापेक्षा येशूसारखे व्हावे याची देवाला जास्त फिकीर आहे. आपण अचूक सिद्धांत मानतो पण प्रत्यक्षात आपण भरभराटीच्या शुभवर्तमानाला पुष्टी देतो.

जेव्हा आपण देवाच्या शिस्तीला किंवा परीक्षेला तोंड देतो तेव्हा सुटका व्हावी अशी प्रार्थना करण्याऐवजी आपण ही आठवण करण्याची गरज आहे: ख्रिस्तासारखे व्हावे अशी आमची इच्छा आहे.  शिस्त आणि परीक्षा आपल्यातून दूर केल्याने देवाची कृपा दिसणार नाही. शिस्त आणि परीक्षा पाठवल्यामुळे देवाची कृपा दिसते. त्यांचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही त्यांना तोंड देता तेव्हा आनंद माना. तुमची दु:खे दूर होण्याची प्रार्थना करण्यापेक्षा येशूसारखे होण्यासाठी  देवाचे साधन म्हणून त्यांचा स्वीकार करा.

(उत्तरार्ध पुढील आठवडी)