नवम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

गुंडाळलेला  देव – सामान्य बाळ

डेविड मॅथीस

“आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” (लूक २:१२).

गुंडाळणे म्हणजे काय हे मी बाप होईपर्यंत मला ठाऊक नव्हते. तीस वर्षे मी ख्रिस्तजन्माची गोष्ट वर्षानुवर्षे ऐकत आलो होतो. “बाळंत्याने गुंडाळलेले” म्हणजे येशू ज्या गरिबीत  जन्माला आला होता त्याचे दर्शक आहे असे माझे अनुमान होते. मला वाटायचे की बाळोते हे एक वापरून जुने झालेले कापड असावे.

पण हे मला आलेले शहाणपण १९९० साली बदलून गेले. अर्भकांना झोपवताना श्वास घेणे सुलभ व्हावे म्हणून त्यांना पालथे न झोपवता पाठीवर  झोपणे योग्य असे आम्हाला सांगितले गेले. यामुळे आम्ही दोघे आमच्या जुळ्यांना कापडात गुंडाळून झोपवत असू. आणि त्यानंतर आमच्या दोन्ही मुलींसाठी पण तसेच करत असू. आणि या प्रक्रियेमुळे येशूच्या गोष्टीतील “गुंडाळणे” हा जुना शब्द चांगला समजू लागला आणि अर्थभरित वाटू लागला.

गव्हाणीत झोपलेले

लूक हा एकच लेखक याचा तपशील देतो आणि काही थोड्या वचनांत तो दोनदा हे सांगतो. मरीयेला “तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले” (लूक २:७). लूक हे नमूद करतो कारण मेंढपाळानी मरीया व योसेफ यांना देवदूतांनी दिलेल्या  ह्या दोन खुणा बाळ सापडावे म्हणून सांगितल्या होत्या. “आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” (लूक २:१२).

त्यासोबतच दाविदाच्या नगरात म्हणजे बेथलेहेमात हे सुद्धा त्यांना सांगितले होते. यामुळे मेंढपाळ हेच मनात घोकत शोधत चालले होते: नगर, बाळंत्याने गुंडाळलेले, गव्हाणी. मागी लोकांसारखे मेंढपाळांना तार्‍याने मार्ग दाखवल्याचा कोठेही उल्लेख नाही. हे साधण्याचा मुख्य दुवा होता बेथलेहेम. ते जवळच असलेले एक साधे लहान नगर होते. अशा गावात कोणी नवे बालक जन्मल्याची विचारपूस करण्यात खूप वेळ लागणार नव्हता.

त्यात समाधान देणारा तपशील म्हणजे हे बाळ एका गव्हाणीत निजवले होते. हे वैशिष्ट्य आहे. हा तपशील
मेंढपाळांचा शोध संपल्याची खात्री देणारा होता असे लूक सांगतो. “तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले” (२:१६)


बाळंत्याने गुंडाळलेले

तर  बाळंत्याने गुंडाळलेले हे सांगण्याची गरज तरी काय होती? गव्हाणीप्रमाणे हे मुळीच वैशिष्ट्यपूर्ण नव्हते. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की नवीन अर्भकाला गुंडाळले जाते.

पहिल्या शतकात यहूदी लोकांची अर्भकांची निगा राखण्याची पद्धत ही त्या वेळच्या इतर जगातील लोकांप्रमाणेच होती. ग्रांट ऑसबोर्न हे भाष्यकार लिहितात; “बाळाला गुंडाळणे ही यहूदी मातांसाठी  नेहमीची सामान्य पद्धत होती. ह्या लांब पट्ट्या असून बाळाचे हातपाय सरळ ठेवण्यासाठी त्याच्याभोवती गुंडाळत असत. यामुळे बाळाला सुरक्षित वाटत असे व ते एकाच जागी स्थिर झोपू शके.” अशी पद्धत अजूनही सिरीया व पालेस्ताईन देशात चालू आहे.

ही आतासाठी  प्राचीन पद्धत नाही तर ती मरीया व योसेफ यांच्यासाठी सुद्धा प्राचीन होती. येशू येण्यापूर्वी सहाव्या  शतकात ही सामान्यपणे चाललेली पद्धत होती. म्हणूनच देवाचे लोक त्याच्या निवडीपासून दूर गेले आहेत हे सांगताना यहेज्केल संदेष्टा चित्र रेखाटतो की: “तुझ्या जन्माविषयी म्हटले तर तू जन्मलीस तेव्हा तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने धुऊन स्वच्छ केले नाही, तुझ्या अंगाला मीठ चोपडले नाही व तुला बाळंत्यात गुंडाळले नाही” (यहेज्केल १६:४).

त्या ओघाने यहेज्केल संदेष्टा  आपल्याला पुरातन काळी नूतन अर्भकाच्या होणार्‍या निगराणीची झलक दाखवतो. नाळ कापणे, पाण्याने धुणे, मीठ चोळणे आणि बाळंत्याने गुंडाळणे. जी बालके हवी असत त्यांना धुवून गुंडाळले जात असे.


का गुंडाळायचे
?

आपण वर पाहिल्याप्रमाणे नव्या बालकाला  संरक्षण, स्थिरता व सुरक्षा मिळणे हा गुंडाळण्याचा हेतू असे. येशू सुद्धा इतर कोणत्याही बालकासारखाच होता. गुंडाळणे हे बाळाच्या निगराणीचे प्रमाण होते. अशा रीतीने येशू हा प्रेमळ मातापित्याच्या काळजीखाली असलेल्या बाळाचे एक उदाहरण होता.

त्याला गुंडाळलेले बाळोते हे काही त्याच्या गरीबीचे लक्षण नव्हते. तर अर्पणासाठी आणलेली दोन कबुतरे हे त्यांची गरिबी दाखवतात (लेवीय १२:८; लूक २:२४). तर हे गुंडाळणे हे नव्या अर्भकाचा मानवीपणा, सामान्यता याचे चिन्ह आहे. आपल्यातील प्रत्येकाला जन्माच्या वेळी जो कमकुवतपणा, दुर्बलता होती तीच दुर्बलता खुद्द देवाने अनुभवली.

अखेरीस इतकी काळ वाट पाहिलेला ख्रिस्त आला आहे आणि तो असा आला आहे – आई -वडिलावर अवलंबून असलेला, कमजोर आणि इजा पोचू शकेल असा. आईच्या उदरातून बाहेर आल्यामुळे  असुरक्षित आणि अशक्त.  पूर्ण देव असहाय बालकामध्ये झोपून राहताना त्याचे स्वत:च्या हातापायांवर सुद्धा नियंत्रण नाही. त्याला उबदार आणि सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. त्याला शांत करून गोंजारण्याची गरज आहे. असा मानव, पूर्ण मानव तो आहे. त्याच्या मानवी जीवनाची सुरुवात त्याने आपल्यातील इतर कोणासारखीच केली. असा तो सामान्य होता: बाळंत्याने गुंडाळलेला.

ही तर त्याच्या नम्र होण्याची सुरवात होती

आणि तरीही तो सामान्य नव्हता. हे नवजात बालक गव्हाणीत झोपवले आहे. गुंडाळणे हे जरी त्याची सामान्यता दाखवत असले तरी गव्हाणी ही त्याची असामान्यता दाखवते. हा ख्रिस्त बालक हा अनपेक्षित रीतीने सामान्य आणि आश्चर्यकारक रीतीने वेगळा – भिन्न आहे. तो सामान्य आहे आणि तरीही नाही. तो पूर्ण मानव आहे तरीही केवळ इतर मानवांपेक्षा अधिक आहे. काळाची निर्मिती होण्यापूर्वी तो वेगळा केला गेला होता – आता तो जनावरांना खाणे देण्याच्या भांड्यात झोपलेला आहे.  देवाच्या पुत्राचे देहधारण करून येणे हा देवाने कसे केले आणि आपण कसे केले असते याचा एक परस्परविरोधी अभ्यास आहे.  कुमारीचे गर्भधारण होण्यापासून, साधे गरीब आईवडील,  एक छोटे नगर, अप्रतिष्ठित लोकांची भेट, आणि आता गव्हाणी. देव असे करतो की कोणत्याही मानवाने अशी योजना कधीच केली नसती.

हा बालक मरण्यासाठी जन्मला. त्याने स्वत:ला रिकामे केले” – देवत्वाची वजाबाकी करून नाही तर मानवीपणाची बेरीज करून- “तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले …त्याने स्वतःला लीन केले (फिली. २:७-८). इतर सर्व जागा सोडून गव्हाणीमध्ये झोपून आता तो तीस वर्षांच्या वधस्तंभाच्या पथावर होता. त्याने कुमारीचे उदर, आपली मानवता, किंवा जनावरे खातात ती जागा किंवा दु:खसहनाचा मार्ग  काहीच तुच्छ् मानले नाही.  “ त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले” (फिली. २:८).


एक अखेरचे गुंडाळणे

गव्हाणीतले गुंडाळणे हे त्या मानवी देहाचे शेवटचे गुंडाळणे नव्हते.  “सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहूद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले” (योहान १८:१२). आणि ते त्याला एका अन्यायी खटल्यातून पुढच्या खटल्याकडे बांधलेला नेणार होते (मत्तय २७:२, मार्क १५:१, योहान १८:२४). त्या असहाय गुंडाळलेल्या बाळापेक्षा तो मनुष्य येशू ख्रिस्त, हातपाय लोखंडी बेड्यात बांधलेला, आणि याहून अधिक : खिळ्यांनी वधस्तंभाला बांधलेले त्याचे हात आणि पाय.

त्याच्या जन्माच्या वेळचे बांधणे हे शेवटचे नव्हते. शुभवर्तमानात आपण वाचतो की देहधारी पुत्राला कापडात गुंडाळण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर तो पुन्हा गुंडाळला जाणार होता – यावेळी तागाच्या कपड्यात. लूक त्याच्या कबरेमधल्या कापडाबद्दल नमूद करतो. “तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओणवे होऊन त्याने आत पाहिले तेव्हा त्याला केवळ तागाची वस्त्रे दिसली; आणि झालेल्या गोष्टीविषयी आश्‍चर्य करत तो घरी गेला” (लूक २४:१२).

गव्हाणीमधले अर्भक गुंडाळलेलेच राहणार नव्हते. आणि त्याचे वधस्तंभावरचे शरीर मेलेलेच राहणार नव्हते. त्याने मानवी अस्तित्वात गुंडाळलेला,  बांधलेला, अशक्त, आणि मानवी अस्तित्वाच्या दुर्बलतेत प्रवेश केला. आणि आपल्याला आपल्या मर्यादित सीमेतून अनंतकाळाच्या  अमर्यादेमध्ये आणि येणाऱ्या नव्या जगामध्ये नेले. तो मेलेला नाही तो पुन्हा उठला आहे. जो आपल्यासाठी गुंडाळलेला होता तो आता विश्वाचा मानवी राजा आहे.

आणि तरीही याची सुरुवात बेथलेहेममध्ये  इतक्या सोम्यतेत आणि लीनतेत झाली. जो आपल्याला वाचवायला स्वर्गातून येणार होता तो सर्व प्रकारे आपल्यासारखाच असणे आवश्यक होते. आणि म्हणून आपण त्या येशूच्या गुंडाळलेल्या मानवीपणाच्या सामान्यतेने आणि त्याच्याच  असामान्य गव्हाणीतील श्वासाने आचंबित होतो

Previous Article

आपण ख्रिस्तजयंतीच्या भावनांसाठी धडपडतो

Next Article

देवाचे गौरव येशू

You might be interested in …

शांत केव्हा राहावे?….याविषयी बायबल काय म्हणते?

१. शीघ्रकोप झाल्यास शांत व्हा (नीती१४:१७). २. तुम्हाला सर्व सत्य माहीत नसल्यास शांत राहा (नीती १८:१३). ३. सर्व गोष्ट तुम्ही पडताळून घेतली नसेल तर शांत राहा (अनु.१७:६). ४. जर तुमचे शब्द कमकुवत व्यक्तीला अडखळण आणणार […]

विस्कटलेल्या कुटुंबातील मुलांसाठी आशा

जॉन पायपर एका चवदा वर्षांच्या मुलाचा प्रश्न- पास्टर जॉन, भीतीसंबंधी मला एक प्रश्न आहे – स्पष्टच सांगतोय की मला बायबल आणि प्रार्थनेद्वारे देवाजवळ जाण्यास भीती वाटते. मला देवाशी संबंध जोडावा अशी खूप इच्छा आहे पण […]

आपल्या मुलांना शिकवण्यासाठी दहा आवश्यक धडे  

 जॉन मकआर्थर (जॉन मकआर्थर यांच्या “ब्रेव डॅड या पुस्तकातून हे दहा धडे घेतले आहेत. नीतीसूत्रे १-१० मधून घेतलेले हे धडे पालकांना आपल्या मुलामुलींना शिकवण्यास अत्यंत उपयुक्त ठरतील. जर आपण ते शिकवले नाहीत तर सैतानाला आपण […]