जून 30, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अल्प आयुष्याची करुणा आणि सामर्थ्य

टिम कीसी

ब्रिज स्ट्रीट स्मशानभूमी

नॉर्थॅम्प्टन, मॅसॅच्युसेट्स

आज एका मित्राच्या मदतीने मला डेव्हिड ब्रेनर्ड याची कबर सापडली; त्या मित्राला ती नक्की कुठे शोधायची हे माहीत होते. या जागेचा साधेपणा आणि नितांत एकांतपणा यांत काहीतरी असे आहे, जे या ‘अनपेक्षित नायकाला’ अगदी चपखलपणे साजेसे वाटते. कबरेसाठी शिळा घडवणाऱ्या कारागिराने आपल्या कामाकडे पुरेसे लक्ष दिले नाही. त्याने ब्रेनर्ड याचे नाव चुकीचे लिहिले, तसेच त्याच्या मृत्यूची तारीख आणि वय या दोन्ही गोष्टीही चुकीच्या नोंदवल्या. पण कदाचित, एका गरीब माणसाच्या कबरीसाठी हे ‘कच्चे’ काम पुरेसे मानले गेले असावे. तरीही त्या संगमरवरी शिळेवर कोरलेले शब्द आजही आश्चर्यकारक ताकदीने आपला प्रभाव पाडतात:

रेव्हरंड डेव्हिड ब्रेनर्ड यांच्या पवित्र स्मृतीस
स्टॉकब्रिज, डेलावेअर आणि सस्क्वेहॅना
या इंडियन जमातींचे
एक निष्ठावान आणि कष्टकरी मिशनरी.
त्यांचा मृत्यू या गावात झाला
१० ऑक्टोबर १७४७ [वय] ३२

हा “निष्ठावान आणि कष्टकरी मिशनरी” वयाच्या २९ व्या वर्षी क्षयरोगामुळे मरण पावला.  महाविद्यालयात असतानाच त्यांना थुंकीतून रक्त पडू लागले तेव्हाच त्यांच्या या असाध्य आजाराची पहिली लक्षणे तेव्हा दिसू लागली,  या धक्कादायक परीक्षेबद्दल त्यांनी आपल्या रोजनिशीत लिहिले आहे की, त्यांनी “मृत्यूला साक्षात समोर पाहिले” (The Diary and Journal of David Brainerd, 27).

त्यानंतरच्या सात वर्षांत, आपल्या शारीरिक वेदनांच्या काळात ब्रेनर्ड यांना मृत्यूचे ते भयानक रूप अनेकदा पाहावे लागले. अखेरीस त्यांचा मृत्यू अत्यंत संथ, ओकारीने ग्रासलेला आणि गुदमरवून टाकणारा ठरला; आणि या कठीण काळात त्यांना अंतिम काळातील शुश्रूषेचा तो शांतवणारा आधारही लाभला नाही. ब्रेनर्ड यांच्या अंथरुणाशेजारून जोनाथन एडवर्ड्स यांनी असे लिहिले:

तो अत्यंत शारीरिक वेदना आणि यातनांनी ग्रासलेला होता…
आपल्या छातीत होणारी ती वेदना नेमकी कशी आहे, याची कल्पना करणे कोणालाही अशक्य आहे असे त्याने मला सांगितले. आपल्या या असह्य वेदनांच्या काळात, आपण अधीर होऊन देवाचा अपमान तर करणार नाही ना, याबद्दल त्याने खूप काळजी व्यक्त केली. त्याच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की, तो म्हणाला—”ही वेदना आणखी एक मिनिटभर सोसावी लागेल, हा विचारच मला आता जवळजवळ असह्य होत आहे.” त्याने अशी इच्छा व्यक्त केली की, इतरांनी त्याच्यासाठी सतत देवाकडे प्रार्थना करावी की त्याने  या काळात मला आधार द्यावा आणि  सहनशक्ती द्यावी. त्याने असा संकेत दिला की, त्याच रात्री आपला मृत्यू होईल अशी मला अपेक्षा आहे. (Diary and Journal, 255–56)

काही तासांनंतर, ब्रेनर्ड याची क्षयग्रस्त फुफ्फुसे आणि त्याचे ते विशाल हृदय अखेरीस निकामी झाले आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.

खेद

ब्रेनर्डच्या शेजारी जोनाथन एडवर्ड्सची मुलगी जेरुशा हिची कबर आहे, तिचा मृत्यू तिच्या अठराव्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी झाला होता. डेव्हिडच्या शेवटच्या काही महिन्यांत, ब्रेनर्ड एडवर्ड्सच्या घरी गेला, तिने त्याची काळजी घेतली; तिला बहुधा ब्रेनर्डकडून क्षयरोगाची लागण झाली आणि चार महिन्यांनंतर तिचाही मृत्यू झाला. डेव्हिडच्या मृत्यूच्या काही दिवस आधी, त्यांनी एकमेकांना स्वर्गात भेटण्याचे वचन दिले होते.  ती भेट किती लवकर होईल याची त्यांना कल्पना नव्हती.

शेजारी असलेल्या त्या कबरी डेव्हिड आणि जेरुशाच्या स्नेहाची आणि वेदनेची, त्यांच्या दुःखाची आणि निश्चित आशेची रहस्ये जपतात, कारण ब्रेनर्डच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या डायरीतूनच आपल्याला त्यांच्या नात्याची केवळ एक झलक मिळते. त्यांची मैत्री छोटी पण गोड होती, जी ख्रिस्त आणि त्याच्या गौरवावरील त्यांच्या सामायिक आणि उत्कट प्रेमावर आधारलेली होती.

जुन्या दगडांभोवती वाढलेले तण आणि रानगवत उपटताना, मी कल्पना करतो की जोनाथन एडवर्ड्स येथे उभा आहे. पण मी त्याला न्यू इंग्लंडमधील एखाद्या धर्मोपदेशकाच्या जुन्या, ताठर चित्रासारखा पाहत नाही. त्याऐवजी मी एडवर्ड्सला एक मित्र आणि वडील म्हणून पाहतो. कारण ब्रेनर्डच्या कबरीवरील खोदलेली जमीन स्थिरावण्यापूर्वीच, त्याच्या लाडक्या किशोरवयीन मुलीसाठी तिच्या शेजारी एक नवीन कबर खोदण्यात आली. त्याच्या दुःखावर दुःखाचा वर्षाव सुवार्तेच्या आशेने  कमी झाला, पण दुःख अजूनही खरे होते. अकाली संपलेल्या आयुष्यांच्या रिकाम्या जागा आणि हरवलेले आवाज यांनी त्याचे हृदय खोलवर छेदले असावे.

देवाच्या सार्वभौम योजनेत, ब्रेनर्डच्या मृत्यूची करुणा ही शक्ती बनणार होती.”

समाधानकारक निष्कर्षांच्या घाईत, ख्रिस्ती लोकांनी या कथेतील किंवा आजच्या कोणत्याही तत्सम कथेतील करुणेला कमी लेखू नये. अनेकदा, मरणे — मृत्यू नव्हे — ही आपल्यासाठी खूप वेदनादायक कल्पना असते, म्हणून आपण त्याला अचानक स्वर्गात फिरत असल्याच्या आणि स्वर्गीय हवा श्वास घेत असल्याच्या गोड गाण्यांमध्ये गुंडाळतो.   अपघात, व्हेंटिलेटर, कर्करोग आणि उघड्या कबरी यांसारख्या गोष्टी आपण ओलांडून जातो.  विश्वासणाऱ्यांसाठी, “मरणे म्हणजे मृत्यू नव्हे” हे केवळ अर्धेच सत्य आहे. शेवटच्या नदीच्या पलीकडच्या तीरावर, विश्वासाचे प्रत्यक्ष दर्शन होते, आणि तिथे कोकऱ्याचे कल्पना न करता येणारे गौरव व कृपा आहे. पण ह्या तीरावर, अजूनही एक खवळलेली नदी ओलांडायची आहे.

सामर्थ्य

कॉलेजचा विद्यार्थी असताना ज्याने पहिल्यांदाच “मृत्यूला थेट सामोरे जाण्याचे” धाडस केले होते, त्या ब्रेनर्डने मृत्यूपासून कधीच आपली नजर हटवली नाही. आपल्या प्रभूचे आणि आपल्या जीवनाच्या क्षणभंगुरतेचे सतत भान ठेवून, त्याने आपल्या प्रतीक्षेत असलेल्या कबरीकडेच एक साक्षीदार म्हणून निर्देश केला:

“जेव्हा तुम्ही माझी कबर पाहाल, तेव्हा मी जिवंत असताना तुम्हाला जे सांगितले होते, त्याची आठवण करा… त्या कबरीत निजलेला तो माणूस मला मृत्यूची तयारी करण्यासाठी कसा उपदेश आणि इशारा देत असे, हे आठवा.” (डायरी आणि जर्नल, २४७)

ब्रेनर्डच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, एडवर्ड्सने त्या तरुण धर्मप्रचारकाच्या दैनंदिन्या आणि रोजनिशी ‘द लाइफ ऑफ डेव्हिड ब्रेनर्ड’ या पुस्तकात प्रकाशित केल्या. देवाच्या सार्वभौम योजनेनुसार, ब्रेनर्डच्या मृत्यूची ती शोकांतिका एका शक्तीमध्ये रूपांतरित झाली—जागतिक मिशनरी चळवळीच्या मुसळधार पावसापूर्वी पडलेला तो पहिला थेंब ठरला: विल्यम केरी भारतात, हेन्री मार्टिन पर्शियामध्ये, जडसन ब्रह्मदेशात, मॉरिसन आणि हडसन टेलर चीनमध्ये, तर मोफॅट आफ्रिकेत गेले. या सर्वांच्याच जीवनावर डेव्हिड ब्रेनर्डच्या जीवनाचा खोलवर प्रभाव पडला होता. परंतु ही केवळ मिशनरी इतिहासातील काही गाजलेली नावे आहेत. ब्रेनर्डच्या त्या अल्पकालीन सेवेतील श्रद्धा, सहनशीलता आणि सोसलेली दुःखे यांनी आणखी हजारो लोकांना—ज्यांची गणना करणेही अशक्य आहे—त्या गौरवशाली सुवार्तेचा संदेश घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी आव्हान दिले.

‘द लाइफ ऑफ डेव्हिड ब्रेनर्ड’ हे काही यशस्वी रणनीती आणि मोठ्या यशाच्या गाथा सांगणारे केवळ एक हलकेफुलके वर्णन नाही. कदाचित म्हणूनच हे पुस्तक अनेक मिशनरी आणि पाळकांना इतके भावते. जॉन पायपर याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात:

“या जीवनाचा इतका विलक्षण प्रभाव का पडला असावा?…”

“याचे उत्तर असे आहे की, ब्रेनर्डचे जीवन हे एका सत्याची ज्वलंत आणि शक्तिशाली साक्ष आहे; ते सत्य म्हणजे—देव आपल्या गौरवासाठी अद्भुत कार्ये साध्य करण्याकरिता, रात्रंदिवस त्याला आर्त साद घालणाऱ्या अशा दुर्बल, आजारी, निराश, खचलेल्या, एकाकी आणि संघर्षाशी झगडणाऱ्या संतांचा वापर करू शकतो—आणि तो तसा वापर करतोही.” (द हिडन स्माईल ऑफ गॉड, १३२)

गोड सांत्वन

डेव्हिड ब्रेनर्ड यांच्यासाठी — आणि खूप नंतर जिम इलियट यांच्यासाठी — देवाने ठरवले की त्यांच्या कथा त्यांच्या मृत्यूनंतरही दीर्घकाळ टिकून राहतील. पण त्या विश्वासणाऱ्यांचे काय, जे तरुणपणीच मरण पावतात, ज्यांच्यासाठी कोणतेही पुस्तक लिहिले जात नाही? त्यांच्या अल्पायुष्यात काय सामर्थ्य आहे? हा एक कठीण आणि वेदनादायी प्रश्न आहे, विशेषतः एडवर्ड्ससारखे, जे कबरीच्या सर्वात जवळ उभे आहेत त्यांच्यासाठी. मी त्यांचे दीर्घकाळ टिकणारे दुःख कमी करण्यासाठी नव्हे, तर त्यांची आशा उजळवण्यासाठी लिहीत आहे.

ब्रेनर्ड यांच्या जीवनाचे सामर्थ्य त्यांच्या प्रकाशित झालेल्या रोजनिशीत नव्हते. सामर्थ्य यात होते की, ब्रेनर्ड यांनी आपले जीवन प्रत्येक कठीण दिवशी ख्रिस्ताचा शोध घेण्यासाठी आणि इतरांना त्याच्याकडे नेण्यासाठी समर्पित केले होते. ते त्यांच्या शीलालेखाप्रमाणेच होते — “एक विश्वासू आणि कष्टाळू” सेवक. आणि ख्रिस्त सर्वांना त्या योग्य सहवासात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो — मग आपल्याला पाच तालांत मिळोत किंवा दोन, अनेक वर्षे मिळोत किंवा थोडी. आयुष्य कितीही लहान असले तरी, जेव्हा विश्वासाचे प्रत्यक्ष दर्शन होईल, तेव्हा प्रत्येक विश्वासू सेवकाला प्रभूचा “शाब्बास!” हा आवाज ऐकू येईल.

पण जर एका विश्वासू जीवनात ख्रिस्ताची कीर्ती मरणासन्न जगात पसरवण्याचे सामर्थ्य असेल, तर अधिक प्रभाव, अधिक साक्ष, अधिक वर्षे जगणे अधिक अर्थपूर्ण ठरणार नाही का? येथे देवाचे सार्वभौमत्व आणि चांगुलपणा एकत्र येतात, आणि आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले जाते. आपल्या दिवसांची संख्या ही काही देवाने ठरवलेली थंड, गणना नाही. आपल्या घरी परत बोलावण्याच्या वेळेत एक शहाणे आणि उत्सुक प्रेम आहे, आणि डेव्हिड, जेरुशा व इतर अनेक संत जिथे निद्रिस्त आहेत तिथे उभे असताना हा एक गोड दिलासा आहे; “जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते”  (१ करिंथ. १५:४३).

Previous Article

हे जग सोडायला भिऊ नका

You might be interested in …

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का?

लेखक: स्टीफन विटमर येशूच्या काळापासून लोक दावा करत आहेत की अखेरच्या दिवसातील घटना त्यांच्या स्वत:च्या दिवसातच होणार. १९व्या शतकात विल्यम मिलर नावाच्या एका बायबल पंडिताने येशू मार्च २१, १८४४ या दिवशी येणार असा दावा केला. […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १६ (अखेरचा) सैतानाचे अखेरचे बंड सैतानाला १००० वर्षांचे राज्य सुरू होण्यापूर्वी बांधून आगधकूपात बंदिवासात टाकले जाणार हे आपण पाहिले. आता १००० वर्षांच्या अखेरीस त्याला बंदिवासातून मुक्त करण्यात येईल. लागलीच तो […]

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना

स्कॉट हबर्ड वाट पाहा. यासारखे काही शब्द असतात जे आनंद देणारे नसतात. अगदी थोडे लोक धीराने आशा उंचावतात आणि मग सोडून देतात. “आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते” (नीती १३:१२). जेव्हा एखाद्या मोलवान गोष्टीसाठी […]