Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 5, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा १६.                                             १ योहान ३:७-१०                                   स्टीफन विल्यम्स

धडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स

 

तुमचे बाबा कोण आहेत?

  • ज्यांची नावे व्यवसायावरून आहेत असे काही लोक तुम्हाला माहीत आहेत का? उदाहरणार्थ, “दारूवाला”
    • तुम्ही असा कधी विचार केला का की आज अशी नावे धारण करणाऱ्यांचा त्यांच्या या व्यवसायाशी किंचितही संबंध नसतो, असे का?
    “घराण्याचा व्यवसाय” असण्याची कल्पना पूर्वी होती; हे खरे आहे. आणि भारतातील काही ठिकाणच्या संस्कृतीत आजही तसे चालू आहे.
    योहानाने हे पहिले पत्र लिहिले, त्या काळात ग्रीक – रोमन संस्कृतीत तशी प्रथा होती. मुले आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालू ठेवीत असत. असे अवशिष्ट लोक तुम्हाला पाश्चात्यांमध्येही आढळतात. उदा. बेकर किंवा लॉयर ही आडनावे हेच सूचित करतात. या संस्कृतीत तुमचे पूर्वज केवळ तुमचे बीजधारक नव्हते, तर तुमच्या जीवनरहाटीचेही मूळ होते.
    •           ही कल्पना मनात ठेवून योहान ४थ्या वचनातील नैतिकतेची चाचणी पुढे चालू ठेवतो ख्रिस्ती व्यक्ती पापाला विरोध करते. आजच्या आपल्या शास्त्रभागात योहान आपल्याला दाखवून देत आहे की तुम्ही जी जीवनरहाटी     जगता यावरून तुमचा पिता देव आहे की सैतान आहे, हे तुम्ही दाखवून देता. तुमचे “बाबा” कोण आहेत?

शास्त्राभ्यास

तुम्ही जे करता त्यावरून तुमच्या कुटुंबाचा व्यवसाय दिसून येतो

मुलांनो कोणी तुम्हांस बहकवू नये, जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही न्यायसंपन्न आहे. पाप करणारा सैतानाचा आहे. कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला (३:७).

  • तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय काय आहे? या जगातील कुटुंबात कदाचित तुमचा व्यवसाय नसेलही. पण तुमच्या जीवनरहाटीनुसार तुम्ही नेहमीच तुमच्या आध्यात्मिक पित्याच्या वडिलोपार्जित व्यवसायात असताच.
    •  वचन ७ मध्ये योहान त्याच्या भाषाशैलीतून ते स्पष्ट करतो – मुद्दा एखाद्या वेळी एखादे पाप करण्याचा नाही. तो वाक्यप्रयोग करताना सतत “पाप करत” राहण्याविषयी किंवा ” नीतीने चालत” राहण्याविषयी बोलतो. जर    तुमची चालचलणूक नीतिमत्तेशी निगडित असेल तर तुम्ही देवाच्या कुटुंबातील असल्याचा तो पुरावा आहे. कारण तो नीतीच्या व्यवसायात व्यस्त आहे.
    • लक्षात घ्या की योहान केवळ “नीतिमान असण्याविषयी” बोलत नाही. योहानाच्या काळाप्रमाणेच काही खोटे  शिक्षक आहेत; ते आंतरिक नीतिमत्तेवर किंवा नीतिमान ठरले जाण्याच्या अवस्थेवर जोर देतात. आज काही ख्रिस्ती लोक फक्त देवाने नीतिमान ठरवल्याविषयीच बोलण्याची चूक करतात.

▫         मी विश्वास ठेवला ना, मग मी देवासमोर नीतिमान आहे. मला आणखी काही करण्याची गरज नाही; आणि आता मला देवापासून                       काहीच विभक्त करू शकत नाही.
▫         समस्या ही आहे की तुम्ही “नीतिमान असण्यापासून” “नीतीने चालणे” विभक्त करू शकत नाही.  जर तुम्ही खरोखर देवाचे असाल                  तर तुमच्या प्रत्येक कृतीतून नीतिमत्त्व ओसंडून वाहते.
•           तुमचे आचरण काय प्रदर्शित करते? ८वे वचन त्याविषयी विस्ताराने बोलते.
१.         सातत्याने पाप /आज्ञाभंग करणे म्हणजे तुम्ही सैतानाच्या कुटुंबातील आहात आणि त्याची कामे (व्यवसाय) तुमची कामे आहेत असे                    दर्शवणे.
२.         सातत्याने पाप /आज्ञाभंग करणे म्हणजे अगदी तुमचा बाप सैतान याच्याप्रमाणेच कृत्ये करणे – वचनातून  आपण त्याच्याविषयी पाहतो               की प्रारंभापासूनच तो पापाच्या व गर्वाच्या कृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. जर  तुम्ही पूर्वीच्याच जोमाने पाप चालू ठेवत असाल, तर तुम्ही                         त्याच्यासारखेच आहात. (वचन ८ अ, योहान ८:४४ वाचा. येशू परूशांना अगदी असेच बोलला.)
३.         सातत्याने पाप / आज्ञाभंग करणे म्हणजे केवळ देवाची इच्छा धिक्कारणे नव्हे, तर देवाच्या उद्दिष्टांविरुद्ध  सक्रिय होऊन लढा देणे.
▫         सैतानाचा गुणविशेष पाप करणे आहे तर येशूचा गुणविशेष पापापासून तारण करणे हा आहे.
▫        या वचनांमध्ये म्हटले आहे की ख्रिस्त सैतानाची कार्ये नष्ट करायला (बंधनातून सोडायला, मोकळे करायला) आला.
▫         आपल्याला पापाचा पूर्ण नाश झालेला दिसत नाही याचे कारण तो दिवस नजीकच्या भावी काळात लवकरच येणार आहे. (३:२)
▫         पण देवाचे वचन सांगते की सैतानाचा नाश करून झाला आहे. कारण वधस्तंभाद्वारे त्याला पूर्ण नि:शस्त्र करण्यात आले आहे (रोम                      ६:६; २ तीम. १:१०; इब्री २:१४).
▫         पण जर कोणी ख्रिस्तावर विश्वास असल्याचा दावा करीत असेल आणि पाप करत राहात असेल तर त्याने ख्रिस्ताविरुद्ध आणि ज्याचा                   नाश करण्याचे कार्य तो करीत आहे त्याविरुद्ध लढा पुकारला आहे.

तुम्ही जे आचरण करता त्यातून तुमच्या पित्याचा स्वभाव प्रगट होतो

जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही; कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहाते.  त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे (३:९).

  • देवाच्या कुटुंबातील असण्याने पापात जीवन जगणे किती विसंगत आहे हे आपल्या लक्षात येऊ लागले आहे.
    •           योहान काय सांगून समारोप करत आहे? तो पुन्हा म्हणतो की “जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत  नाही” (वर्तमानकाळ).
    याचे कारण काय? कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. यावरून काय निष्कर्ष निघतो? तो पाप करू शकत नाही.
    •           प्रथम आपण खात्री करून घेऊ की योहान जे म्हणत आहे ते आपल्याला समजले आहे. काही लोक असा निष्कर्ष काढतात की योहान म्हणत आहे, जर तुम्ही ख्रिस्ती असाल तर तुम्ही मुळीच पाप करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ख्रिस्ती असणे म्हणजे या जीवनात परिपूर्ण असणेअसे म्हणणे याचा अर्थ यापूर्वीच योहानाने स्वत: दिलेल्या शिकवणीशी हे विसंगत विधान असणे.
    १ योहान १:८; २:१
    •           दुसरे म्हणजे “देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते” याचा अर्थ काय? योहान नवीन जन्माविषयी बोलत आहे. तारणाने परिवर्तन होण्याविषयी बोलत आहे. पुनरुज्जीवन.
    ▫         प्रथम ९व्या वचनात ख्रिस्ती व्यक्तीचे वर्णन “देवापासून जन्मलेला” असे केले आहे. ही जन्म घेण्याची प्रक्रिया आहे. योहान ३ मध्ये येशूने याविषयी निकदेमाला शिकवण दिली होती.
    ▫         दुसरे असे की नवीन जन्माविषयी समजण्याकरता येशू स्वत: आपल्याला त्याचा अर्थ समजावून  सांगतो:
    ۰         ते पाण्याने जन्मणे (वधस्तंभामुळे शुद्ध होण्याचे ते चिन्ह होय) व आत्म्याने जन्मणे होय. (देवाच्या आत्म्याद्वारे हरवलेल्या आत्म्याचे दैवी परिवर्तन होण्याशी याचा संदर्भ: योहान ३:५.)
    ۰         हा स्वीकार आध्यात्मिक रीतीने होतो (म्हणजे देहाने नव्हे तर आत्म्याने होतो). त्यामुळे जीवन नवीन मिळते (योहान ३:६,८).
    ۰         दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशूने जे स्पष्टीकरण दिले तेच योहान येथे वर्णन करून सांगत आहे. ख्रिस्ती व्यक्ती अशी आहे की जी ख्रिस्तावरील विश्वासाने नवीन व्यक्ती बनली आहे.  देवाचे बीज (किंवा स्वभाव किंवा DNA) त्याच्यामध्ये राहते. देवाने तुम्हाला नवीन जन्म दिला आणि तुम्ही त्याचे खरोखरचे मूल झाला आहात – तुम्ही त्याच्यासारखेच दिसणार.
    •           या विषयाचा निष्कर्ष काय निघतो? जर माझे मूल खरोखर माझेच असेल तर ते माझ्यासारखे दिसणारच, आणि माझा स्वभाव                    दाखवणारच. आपण प्रयत्न करूनही हे घडल्याशिवाय राहणार नाही.
    ▫         जर तुम्ही “देवापासून जन्मले असाल” तर तुम्ही पित्यासमान  दिसल्याशिवाय राहणारच नाही.
    ▫         तुम्ही पाप करू शकणार नाही – कारण तुम्ही जे आहात त्याच्या ते अगदी विरुद्ध होईल.
    ۰         जर मी एक गोंडस कुत्र्याचे पिलू हातात पकडले आणि तुमच्या हातात  सुरा दिला, तर  तुम्ही त्याच्यावर वार कराल का? तुम्ही                    म्हणाल, “मला हे जमणार नाही.”
    ۰         तुम्ही जे म्हणत आहात ते प्रत्यक्षात करणे अशक्य मुळीच नाही. अगदी मऊ मऊ                                                                         असणाऱ्या कुत्र्याच्या पिलावर चाकू चालवणे काही अवघड नाही. पण तुम्ही जे बोलत आहात त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वभावाविरुद्ध करू शकत नाही.
    ۰    ख्रिस्ती व्यक्तीचा पापाशी सामना होताना ती हेच म्हणते “मी हे करू शकत नाही”                                                                            याचे  कारण तुम्ही देवापासून जन्मले आहात. जे म्हणून पाप आहे ते तुम्हाला तुच्छ वाटते,  हा तुमचा स्वभाव झाला आहे.

 

चर्चेसाठी प्रश्न :  तुम्ही कसे आचरण करता?

 ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही देवाचा नाही (३:१०).

  • दहावे वचन सर्वाचा एकत्रित सारांश देते. योहान मोठ्या चातुर्याने केवळ “पापात राहण्याविषयी” बोलत नाही तर “पापात राहण्याच्या” दोन नकारात्मक प्रकारांचे तो वर्णन करतो.
    ▫         नीतीने वागत नाही.
    ▫         बंधुंवर प्रीती करत नाही.
    •           दुसऱ्या शब्दात सांगायचे तर “आपण काय करत नाही ” यातच केवळ  देवाला रुची नाही तर आपण  सकारात्मक काय करतो यात देखील रुची आहे. पापावर हाच उपाय आहे की आपण नीतिमत्व व प्रीतीचे आचरण करावे.
    ▫         “नीतीने  वागणे” याचा अर्थ काय?
    ▫         पापाशी लढा देण्यासाठी त्या जागी सत्कृत्ये करण्याचे काही मार्ग कोणते?