Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जुलाई 25, 2023 in जीवन प्रकाश

देव आपले विचार वाचू शकतो का?

देव आपले विचार वाचू शकतो का?

जॉन पायपर

जोन चा प्रश्न

पास्टर जॉन देव आपले विचार वाचू शकतो का?

उत्तर


याचे उत्तर एका शब्दात ‘होय’ असे आहे, पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उत्तराचे परिणाम काय आणि किती आहेत आणि हे समजल्याने  आपल्या जीवनात कसा बदल घडू शकेल. माझी खात्री आहे की जोनने पण याच उद्देशाने हा प्रश्न विचारला आहे. 

तर प्रथम हे  मूलभूत सत्य आपण समजावून घेवू आणि नंतर त्याचे परिणाम.

प्रत्यके विचार देवापुढे उघडा

स्तोत्र १३९:२,४, २३ म्हणते, “माझे बसणे व उठणे तू जाणतोस… तू दुरून माझे मनोगत समजतोस… हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही… हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.”  तसेच स्तोत्र १९:१४ म्हणते, “ हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.” 


आणि अशीच अनेक शास्त्रवचने देव आपल्या ह्रदयाची आणि मनाची परीक्षा घेत असतो असे सांगतात. “दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे” (स्तोत्र ७:९). “हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा” (स्तोत्र २६:२). “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो” (यिर्मया १७:१०).  “हे नीतिमानांचे सत्त्व पाहणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे” (यिर्मया २०:१२).


नव्या करारातही  देव हृदय पारखतो याची वचने आहेत.
“म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन’” (प्रकटी २:२३).
“कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे” (इब्री ४:१२).
शेवटच्या न्यायाच्या वेळी देव आपल्या ह्रदयाच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील. पौल म्हणतो, “ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल” (रोम २:१६). 
देव आपले ह्रदय आणि विचार जाणतो हे पुन्हा पुन्हा आपण वाचतो. आणि “ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो” ( १ करिंथ ३:२०). 
सर्वांचे ह्रदय तो जाणतो. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू, हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव” (प्रेषित १:२४-२५). ह्रदय आणि मन जाणणारा हा देव आहे.


त्याच्या सेवेमध्ये येशूचा शास्त्री व परूशी लोकांबरोबर मोठा वाद झाला याचे मुख्य कारण म्हणजे ते वरून आपण काही आहोत असे भासवत होते पण अंत:करणात तसे नव्हते. आणि येशूला त्यांच्या अंत:करणात काय होते ते माहीत होते. “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत. अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल” (मत्तय २३:२५-२६). 
योहानाने हे योहान २:२५  मध्ये नमूद केले आहे. “मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.”

याचे सहा प्रचंड परिणाम

तर अनेक पैलूमधून देव शिकवतो की त्याला  आपले विचार, भावना आणि वृत्ती, कल आणि निर्णय आपण कृती करण्यापूर्वीच  ठाऊक असतात. आता आपल्यापैकी काहीजण विचार करतील; ‘होय हे तर स्पष्ट आहे कारण तो देव आहे.’ आणि याचे परिणाम काय याचा विचार न करता आपण पुढे जाऊ. पण मला तुम्हाला याचे काही परिणाम स्पष्ट करू देत म्हणजे हा विचार आपल्या जीवनावर प्रभाव पाडील.


१. देव  आपल्याला आतून बाहेर असे शुद्ध करतो

देवाचे पवित्रीकरणाचे काम – आपल्याला पवित्र करण्याचे काम – हे आतून बाहेर असे होत असते. हे पवित्र आत्म्याचे आपल्या अंत:करणात होत असलेले कार्य आहे. पौल म्हणतो, “शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत” (१ थेस्स. ५:२३).

आता जर तो जॉन पायपरची वृत्ती आणि कल बदलणार असेल तर त्याला नक्की काय बदलायचे आहे हे पाहण्याची त्याला गरज आहे. जर माझ्या ह्रदयात तो काम करणार असेल तर माझे हृदय जाणण्याची गरज आहे. हा महान सर्जन त्याची सर्जरी डोळे बांधून करणार नाही. तो कशावर काम करत आहे हे तो पाहतो. तो माझा गर्व, माझा लोभ, माझी भीती, माझा राग आणि त्यातून निघणारा माझा सर्व प्रकारचा कल आणि संभाव्य निर्णय पाहतो. तो मला शुध्द करण्याचे काम आतून बाहेर करतो.


२. देव माझ्या मुखावर पहारा ठेवतो

रूपांतर करणाऱ्या या आंतरिक सर्जरीशिवाय आणखी एका प्रकारे देव आपल्या जीवनातल्या दुष्टतेवर बंधन घालतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, “ हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार सांभाळ” (स्तोत्र १४१:३). आपल्याला पवित्र करण्यासाठी आपल्या  ह्रदयात तर तो काम करतोच पण तो आपल्या मुखावर पहारा ठेवतो म्हणजे आपला आतला विचार, भावना आणखी लोकांना दुखावणार नाही. पण आपल्या तोंडातून काय शब्द बाहेर पडणार हे जर देवाला समजले नसते तर त्याला  हे विचार थांबवता आले नसते.

त्याला हे माझ्या मनात खोलवर बदल करून घडवता आले असते पण त्यामागे त्याचे स्वत:चे कारण आहे. तो मला निरनिराळ्या प्रकारे पवित्र करतो आणि आपल्याला पवित्र करण्याचा हा ही एक प्रकार आहे. “ मला दिसतंय हा विचार त्याच्यामध्ये येत आहे आणि तो त्याच्या मुखातून येऊ नये म्हणून मी त्याचे रक्षण करीन.”

३. देव चांगले आणि वाईट हेतू ओळखतो

देवाला जर गुप्त हेतू दिसले नसते तर चांगले आणि वाईट यातला भेद त्याला करता आला नसता. आपली कितीतरी चांगली बाह्यकृत्ये ही ढोंग  असतात कारण आपल्या आत कितीतरी दुष्ट विचार असतात. आपल्यापेक्षा देवाला लोकांबद्दल चांगले समजते कारण त्याला ह्रदयात काय आहे हे दिसते. त्याने परूशी लोकांना धार्मिक न म्हणता चुना लावलेल्या कबरा म्हटले. प्रत्येक वर्तनाचा खरा गुण त्याच्या हेतूवर अवलंबून असतो. देवाला ह्रदय ठाऊक आहे म्हणूनच तो चांगले व वाईट समजू शकतो.


४. देव शांत भक्ती स्वीकारतो

पूर्ण  पक्षघात झालेल्या व्यक्तीची भक्ती सुद्धा देव स्वीकारू शकतो कारण त्याला त्याचे ह्रदय समजते. मी अशा व्यक्तीचा विचार करतोय की ज्याने सर्व प्रकारच्या बाह्य क्षमता गमावल्या आहेत पण ज्याचे मन, ह्रदय आणि विवेक शाबूत आहेत आणि ती विश्वास आणि भक्तीने भरलेली आहेत. देवाला जर आपले विचार समजले नसते तर अशा अपंग संताची भक्ती तो स्वीकारू शकला नसता. तो त्याचे ह्रदय पाहतो आणि त्याच्या विश्वासामुळे आनंद करतो.

५. देव शांत प्रार्थना ऐकतो

हेच प्रार्थनेबाबतही खरे आहे. ज्यांना ओठांनी शब्द उच्चारता येत नाहीत त्यांच्या प्रार्थना देव ऐकू शकतो कारण देव त्यांचे विचार व भावना पाहतो. जेव्हा दाविदाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत” (स्तोत्र १९:१४);  तेव्हा तो म्हणत होता, माझ्या प्रार्थना तुला मान्य असू देत. हेच असे म्हणता येईल की, “ माझ्या ह्रदयाच्या प्रार्थना तुला मान्य असू देत.”


६. देवाच्या योजना नेहमी स्थिर राहतात

ही सर्वात अद्भुत गोष्ट आहे. देवाला जर ह्रदयाच्या कल्पना आणि विचार ठाऊक नसते तर तो जगावर राज्यच करू शकला नसता. डोळ्यापुढे हे चित्र आणा बरे. आठशे कोटी लोक जर देवाला दररोज, दर मिनिटाला त्यांच्या गुप्त विचारांच्या कृतीने चकित करत असले असते आणि त्याला धक्का बसला असता कारण त्यांचे विचार भावना, शब्द त्याने पाहिले नव्हते. असे असते तर देव स्थिरतेने व निश्चितपणे राज्यच करू शकला नसता.

आठशे कोटी लोकांच्या तोंडातून, हातातून, पायातून काय घडणार याविषयी जर देव अज्ञानी  असता तर सर्वत्र, सर्वकाळ , संपूर्ण विश्वात काय घडणार हेही त्याला समजले नसते. नीति १९:२१ म्हणते, “मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.”  देवाला मनाच्या योजना समजतात. आणि त्याच्या सार्वभौम सुज्ञतेने आपल्या योजनेनुसार सर्व कसे घडेल हे तो पाहतो.