Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 13, 2021 in जीवन प्रकाश

नीतिसूत्रे ३१ मधला पुरुष

नीतिसूत्रे ३१ मधला पुरुष

स्कॉट हबर्ड

 बरेच पुरुष नीति. ३१ प्रमाणे आपल्याला बायको मिळावी असे स्वप्न पाहतात. ती सर्वात सुद्न्य स्त्री आहे आणि कष्टाने आपले घर उभारते (नीति. १४:१). ती आपल्या पतीचे नाव उंचावते आणि तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो (३१:२३). ती एक उत्तम लाभ आहे  (१८:२२). कारण ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही (३१:१२). तो तिच्याशिवाय सन्मान्य असू शकेल पण तिच्यासह तो राजासारखा असतो (१२:४).

वैवाहिक जोपासना

तथापि कित्येक जण हे समजून घेत नाहीत की नीति. ३१ च्या स्त्रीमागे नीति. ३१ मध्ये एक पुरुष आहे. आणि ही कविता जर आपण सर्व पुस्तकाच्या संदर्भात वाचली तर आपल्याला समजते तो कोणी शुंभ नाही. तो देवाचे भय बाळगतो स्वत:च्या बुद्धीवर अवलंबून राहत नाही (नीति. १:७,९,१०). शहाणपणाच्या मार्गाने चालण्यासाठी त्याने मूर्खपणाचे, थट्टा करण्याचे आणि आळशीपणाचे मार्ग धिक्कारले आहेत (३:१७, ९:४-६).

दुसर्‍या शब्दात तो फक्त तिचा नवराच नाही तर तिच्या चारित्र्याची जोपासना करणारा, काळजी घेणारा आहे. तर अशा माणसापासून आपण काय शिकू शकतो? तो जरी नीति. ३१ च्या पार्श्वभूमीवर असला तरी जोपासना करण्याचा बाबतीत तो आपल्याला धडे शिकवतो आणि ते नवविवाहित पुरुषांसाठी तसेच प्रगल्भ पुरुषांसाठीही आहेत.

तो तिच्यावर भरवसा ठेवतो

ह्या पतीची आपल्या पत्नीसाठी पहिलीच दिसणारी वृत्ती लक्षणीय आहे: “तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते” (३१:११). या वाक्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटत नाही पण वाटायला पाहिजे. बायबलमध्ये ह्रदयाचा भरवसा हा फक्त देवासाठीच आहे. उदा. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव” (३:५) पण इथे त्याचे ह्र्दय तिच्यावर भरवसा ठेवते.  का?

कारण अगदी पूर्वीच तो हा धडा शिकला आहे की, “सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्‍या स्त्रीची प्रशंसा होते” (३१:३०).

पुरातन जगातील कित्येक पुरुष त्यांच्या बायकोला निव्वळ मुले जन्माला घालण्याचे साधन म्हणून पाहत असत.  ती जितकी सुंदर तितके उत्तम. पण हा पुरुष तसा नाही. त्याच्यासाठी विवाह हे सुख आणि समृद्धी यापेक्षा अधिक आहे. विवाह हा त्याच्यासाठी देवाच्या आदरयुक्त भयामध्ये वाढलेली जवळीक आणि मैत्री, सहभागिता, विश्वास आहे (३१:१०). यामुळेच प्रेमात पडणे, मागणी आणि त्यापुढे त्यांचा  संयोग हा  देवाच्या भयावर आधारला आहे.

ह्या भरवशाची फळे त्या कवितेच्या प्रत्येक वचनामध्ये आपण चाखू शकतो. विशेषत: या भरवशामुळे प्रत्येक गोष्टीच्या तपशीलात लक्ष घालण्याच्या गरजेपासून तो मुक्त आहे. देवाच्या भयाच्या वातावरण असलेल्या कुटुंबात त्याने तिला आणलेले आहे. आणि ती त्याच्याबरोबर आपल्या संपूर्ण जीवाने आणि ह्रदयाने आहे. या संपूर्ण विश्वासाच्या ठिकाणातून ती स्त्रीसुलभ कृती करण्यास उमलते. –तिच्या हातांचे श्रमफल – (३१:३१) म्हणजे गोळा करणे, विकत घेणे, विकणे, पुरवठा करणे, शिकवणे, स्त्रीसुलभ कृती करणे- ह्या सर्वांचा तो आनंदाने उपभोग घेतो.

कोणत्याही वैवाहिक प्राधान्यापूर्वी  नीति. ३१ चा हा पुरुष आपल्या पत्नीची पवित्र भीतीच्या सहभागितेने जोपासना करतो. कौटुंबिक प्रार्थना टी.व्ही. दूर सारते. रविवारची भक्ती स्पोर्ट्सवर मात करते. तिने ख्रिस्तासारखे व्हावे म्हणून तो स्वत:च्या सुखसोयी मागे टाकतो. आणि ती देवाचे भय बाळगते म्हणून तिच्यावर भरवसा टाकायला तो भीत नाही.

तो तिच्या सामर्थ्याची किंमत करतो

नीति. ३१ मधली ही स्त्री विरोधाभास सादर करते. एका बाजूला ती अगदी टिपिकल स्त्री आहे आणि घराशी बांधलेली आहे की ज्यामुळे आधुनिक लोक नाराज होतील. तर दुसर्‍या बाजूला ती इतकी कणखर आणि आघाडीवर आहे की पारंपारिक लोक नाराज होतील. तिची बोटे कुदळ हाती धरण्यासाठी नाजूक नाहीत किंवा चाती हातात धरण्यासाठी बोथट नाहीत (३१:१६,१९). स्त्री असूनही ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते; ती आपले बाहू नेटाने कामाला लावते (३१:१७).

आणि ही कविता सुचवते की तिच्या नवऱ्याला हे सर्व आवडते. जेव्हा तो घरी येतो आणि तिची नखे मातीने भरलेली पाहतो (३१:१९), किंवा जेव्हा तो भविष्याकडे पाहतानाचे तिचे हसणे ऐकतो (३१:२५), किंवा त्याच्या शक्तीशी प्रतिस्पर्धा करणारी तिची खटपट तो पाहतो (३१:१५,२२,२७) तेव्हा तो घाबरून जात नाही. तो इतका समर्थ आहे की तिच्या शक्तीची त्याला भीती वाटत नाही.

याउलट त्यांची मैत्री सूचित करते की ती समर्थ असावी ही त्याची इच्छा, आनंद आणि लक्ष्य आहे. तिची उत्कटता, मनोधैर्य हा तिच्या सद्गुणी स्त्री असण्याचा भाग आहेत (३१:१०,१९) देव आपल्या पुरुषांना असेच पाचारण करतो की आपण ख्रिस्तातील प्रौढतेमध्ये इतके वाढावे आणि ख्रिस्ताच्या सुरक्षेमध्ये इतके खोल जावे की आपण आपल्या पत्नीच्या स्त्रीसुलभ सामर्थ्याला अडथळा न आणता ते जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत.

जो नवरा याउलट करतो, जो आपल्या बायकोचे सामर्थ्य प्रत्यक्ष  (तिला नाउमेद करून ) किंवा अप्रत्यक्ष (स्वत: समर्थ होण्याचे नाकारून) कमी करतो त्याला सहचारिणी नको आहे तर एक मोलकरीण हवी आहे.

तो स्वत:ला देवाच्या पाचारणाला वाहून देतो

ती तिचे लक्षणीय सामर्थ्य मुख्यत: तिच्या पतीचे  जे पाचारण आहे त्याला आधार देण्यासाठी वापरते. आपल्या पतीची मदतनीस म्हणून ती त्याच्या पंखाखाली आपले कार्यक्षेत्र निवडते. त्यांचे पाचारण हे दोन समांतर रूळांप्रमाणे नाही तर एका झाडाचे खोड व फांदी याप्रमाणे आहे. ती आपले कुटुंब मजबूत व स्थिर करते यासाठी की त्याने शाखा पसरून आपल्या कुटुंबाची फळे जगाला द्यावी.

याचा अर्थ जेव्हा पतीला स्वत:साठी मोठे पाचारण असते तेव्हा तो आपल्या पत्नीच्या पाचारणाला उत्तम रीतीने मदत करू शकतो. जर पुरुषाचा दृष्टांत लहान असेल – फक्त त्याच्या कामासंबंधीच नाही तर त्याचे कुटुंब, मंडळी, समाज यांसाठी- तर त्याला आपल्या पत्नीकडून थोडीच मदत लागेल. पण जर त्याचा दृष्टांत विस्तृत आणि देवभीरू असेल तर ती त्याला पूर्णपणे आणि मोठ्या प्रमाणात मदत करू शकेल. अशी मदत ती शारीरिक, आध्यात्मिक सर्व सामंजस्याने, प्रीतीने बुद्धीने आणि ह्रदयाने  करेल.

आणि हे नक्की की त्याला अशी मदत लागणारच. ही कविता सांगते की तिच्या पतीचे मस्तक वेशीत बसलेला असताना उंच असते कारण जे तो स्वत: आहे त्यामुळे नाही पण त्याला ज्या प्रकारची स्त्री लाभली आहे त्यामुळे. ती त्याची हाडे सडवणारी नाही तर आपल्या पतीला मुकुट आहे (१२:४)

तो तिची प्रशंसा करतो

       या कवितेचा शेवट तिचे कौतुक करणाऱ्या नवऱ्याच्या शब्दांनी होतो. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो : “बहुत स्त्रियांनी सद्‍गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस” (निती ३१ :२८-२९).

तो अतिशयोक्ती करतोय का? कदाचित करत असेलही. पण जसा प्रियकर आपल्या प्रियेला म्हणतो, “हे परम सुंदर स्त्रिये”  (गीतरत्न १:८) तसेच हा पुरुष म्हणतो “तू त्या सर्वांहून वरचढ आहेस” त्याच्या दृष्टीला हे सार्थ दिसते.

हा प्रतिसाद त्याच्या पत्नीच्या सुंदरतेलाच  केवळ नाही तर तो तिची जोपासना करणाऱ्याचे साधन आहे. सुवार्तेच्या तर्कशास्त्रात प्रीतीने सुवार्तेचे सौदर्य अधिक वाढले जाते, प्रशंसेमुळे प्रशंसेचा  विषय वाढला जाते. प्रथम येशूची प्रीती येते नंतर त्याच्या वधूची सुंदरता येते (इफिस ५:२५-२७). जो पती पत्नीसाठीची प्रशंसा आवरून धरतो तो अशा माळ्यासारखा आहे की जो झाड वाढल्याशिवाय त्याला पाणी टाकत नाही.

तुमची पत्नी काही विश्वासूपणा (व. ११), कर्तव्यतत्परता (व. १५),  मुलांची काळजी व जोपासना (व.२१), शेजाऱ्यांशी सामंजस्य (व.२६), गरिबांसाठी उदारपणा (व.२०) दाखवते का? मग तुम्हाला नि:संकोचपणे, तिची विचारपूर्वक विशिष्ट आणि उदारपणे स्तुती करायला कारण आहे.

तिची एकांतात तसेच सर्वांसमोर स्तुती करा. ती असताना किंवा नसताना. मुलांना, शेजार्यांना, तुमच्या मित्रवर्गाला तिची प्रशंसा करा. सुखात – दु:खात, गरिबीत – श्रीमंतीत, आरोग्यात – रोगात, मरणाने वियोग होईपर्यंत तिची प्रशंसा करा. आणि जसे तुम्ही हे कराल तसे ती तुमच्या प्रशंसेला अधिक पात्र होत जाईल.

ख्रिस्ती पती हा जेव्हा पत्नीची प्रशंसा करतो तेव्हा काही तो देवाकडे पाठ फिरवत नाही. जसे त्याचे मन तिच्यावर भरवसा ठेवते तसे अखेरीस ते ज्या देवाने त्याला ती दिली त्याच्यासाठी असते (१९:१४). जेव्हा नीति. ३१ चा पुरुष तिच्या हातच्या कृत्यांसाठी तिची प्रशंसा करतो तेव्हा तो देवाच्या हातच्या कृतीची प्रशंसा करतो. त्याची पत्नी!